प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर     

मधुमेह- या रोगांत एकंदर शरीरप्रकृतींत बिघाड होऊन लघवी अतिशय होऊ लागते हें मुख्य लक्षण आहे. याचे दोन भेद मानितातः - (१) बहुमूत्रमेह - यांत लघवीमध्यें कांहीं बिघाड न होतां फक्त ती फारच होते येवढेंच लक्षण असतें. इतर कांहीं रोगांमध्यें पुष्कळ लघवी होणें हें लक्षण असतें परंतु त्या रोगांचा या रोगाशीं कांहीं संबंध नसतो. हे रोग पुढें दिले आहेत :- जीर्ण मूत्रपिंडदाह, सिक्थमय मूत्रपिंडदाह, व वातोन्मादरोग. (२) दुसरा भेद म्हणजे मधुमेह - यामध्यें लघवी पुष्कळ होऊन त्यांतून कमी अगर जास्त प्रमाणांत शर्करा जाते. म्हणून या भेदासच हें नांव जास्त सार्थ आहे. हा रोग काळजी करण्यासारखा भयंकर आहे. शरीराचें पोषण व झीज यांतील स्वाभाविक मेळ न राहिल्यानें, जे कांही रोग होतात त्यांपैकीं हा आहे. कारणें:- आनुवंशिक संस्कार हें एक मोठेंच कारण आहे. खेडेगांवांत मोकळया हवेंत राहणाऱ्या लोकांमध्यें हा रोग फार कमी आढळतो. पण मोठाल्या शहरांत याचें प्रमाण फार अधिक असतें. चहाच्या निमित्तानें व अन्य तऱ्हेनें साखर पोटांत जाणें हें कारण असावें असें मानतात. तसेंच स्थूल मनुष्यांनां हा रोग बहुधां होतो. पण कोणी म्हणतात कीं मधुमेह अगोदर होऊन त्यामुळें अंगांत मेद वाढतो. सर्व वयाच्या माणसांत हा रोग आढळतो पण पन्नाशीच्या सुमारास होणें बरेंच संभवनीय असतें. यहुदी लोकांत असे रोगी फार असतात. स्त्रियांपेक्षां दुपटीनें हा रोग पुरुषांत आढळतो. व कृष्णवर्ण माणसापेक्षां गौरवर्णीयांमध्यें विशेष आढळतो. लक्षणें : - हीं एकदम लक्षांत येण्यासारखीं नसून तीं हळू हळू होत असतात. लक्षांत येण्यासारखें पहिलें लक्षण म्हणजे शरीरास येणारी अशक्तता व कृशता, वारंवार तहान लागणें व लघवीस जावें लागणें, आणि हीं लक्षणें होऊं लागल्यावर रोगी साहजिकपणें वैद्यास आपली प्रकृति दाखवितो. मोठ्या माणसास लघवी चाळीस ते साठ औंस अहोरात्रामध्यें होते. पण या रोगांत ती याच्या चौपट किंवा १०-१२ पटहि होते. तिचा रंग फिकट असून ती अंमळ दाट असते. तिची चव गोड असल्यामुळें लघवीस किंवा रोग्याच्या मोरीस मुंग्या अगर मुंगळे येतात. लघवीचें विशिष्ट गुरुत्व नेहमीं १०१५-२५ असतें, पण या रोगांत तें १०३० पासून १०५० पर्यंतहि असतें, व त्यामुळें मूत्रमार्गांत दाह व कंड हीं बरीच होतात. असली लघवी कढविली असतां ती निवतांना तंतून साखरेचे स्फटिक कण निघतात. रासायनिक परीक्षण केलें असतां ती शर्कराच आहे असें सिद्ध होतें. यासाठीं तींत ठराविक रासायनिक द्रव्यें घालून तपासतात व त्यामुळें त्या लघवींत साखर किती आहे हेंहि सांगतां येतें. कोणा रोग्यास लघवींतून एक दोन औंस साखर रोज जाते तर दुसऱ्याच्या एक किंवा दोन पौंड साखर जाते. खाण्यापिण्यांत साखर अधिक जाईल त्या दिवशीं लघवींतूनहि साखर अधिक जाते. पिष्टान्न खाण्यांत आलें तरीहि असेंच होतें. रक्त, लाळ, अश्रू व इंद्रियांत उत्पन्न होत असलेल्या नानाविध रसांमध्येंहि शर्करा असते. तहान इतकी जबर लागते कीं रोग्याचें सर्व लक्ष वरचेवर पाणी पिऊन ती भागविण्याकडे असतें. असें पाणी पोटांत किती जातें हें ऐकून आश्र्चर्य वाटेल. भूकहि जबर वाढलेली असते. कांहीं रोग्यांनां मात्र खाखा सुटत नाहीं. घशास व टाळयास सदा कोरड पडलेली असते व श्वासोच्छ्वासास गुळवट वास येतो. रोगामुळें रोग्याच्या प्रकृतीवर उत्तरोत्तर परिणाम जलद होऊन त्याचें शरीर खंगतें. स्नायूंची शक्ति अधिकाधिक नष्ट होउंच् लागते, अंग थंड लागतें, त्वचा रुक्ष होते, डोळयाखालीं हाडाचें जें टेकाळ असतें त्यावर व त्याच्या आसपास लालसर अशी झांक चेहऱ्यावर दिसते. दांत किडूं लागतात किंवा हलूं लागून पडण्यास आरंभ होतो. हिरडयांतून रक्त  वहाण्याची खोड लागते. अपचनाची तक्रार उद्भवण्यास आरंभ होतो. बद्धकोष्ठता आणि नपुंसकत्व अशा रोग्यांनां बहुधा असतेंच. मन बहुधा अति उदास आणि चिरडखोर बनलेलें असतें.

तरुण माणसांनां हा रोग झाला असतां दुष्परिणाम त्वरित होऊन रोग्याचा अंत होतो व स्थूळ शरीराच्या रोग्यांपेक्षा कृश रोगी लवकर खंगतात. या रोगापासून नाना प्रकारचे दुष्परिणाम होतात. व त्यांपैकीं कांहीं बरेच भयंकर असतात. संयोजक स्नायुशैथिल्यामुळें दृग्मज्जास्थानाची प्रकाशसंवेदनशक्ति क्षीण झाल्यामुळें दृष्ठिमांद्य येतें. डोळयांत मोतीबिंदु होण्याचा संभव फार असतो. चेंगट, बरे होण्यास वेळ लागणारे असे त्वचेचे रोग होतात. गळवें, काळपुळया, धांवरें, कोथरोग हे रोग जसजसें उतारवय वाढतें त्या मानानें रोग्यास जर्जर करतात. शेवटचा रोग स्त्रियांपेक्षां पुरुषांनां फारकरून जास्त होतो. ह्या रोग्यांनां कफक्षय अगर फुप्फुसदाह हे रोग होतात. या शेवटच्या रोगांतून तो वांचल्यास त्याला फुप्फुसकोथरोग होण्याचा संभव असतो. नाना तऱ्हेचें अपचन व अजीर्णविकार, मूत्रपिंडरोग, वसावृद्धिजन हृद्रोग व हृदयदौर्बल्य यापैकीं एखादा रोग होण्याचा संभव विशेष असतो. आणखी अशी एक मौज आहे कीं अशा रोग्यांनां विषमज्वर होण्याचा संभव फार असतो व तो बहुधा फार तीव्र प्रकारचा नसतो. हा ज्वर आला असतां लघवींत शर्करा नसते. अत्यंत भयंकर आपत्ति म्हणजे या रोगांत अखेरची येणारी बेशुद्धि, आणि ती एकदां आली म्हणजे तींतून रोगी सहसा वांचत नाहीं. ती येण्याचीं पूर्व चिन्हें अगदीं सावकाश होतात, तीं अशीं : - भूक मंद व नंतर नाहीशी होणें. लघवी व तींतील शर्करा या दोहोंचें प्रमाण एकदम कमी होणें. बद्धकोष्ठता किंवा अतिसार होणें. क्वचित काळीं पोटांत उत्पन्न होणारा शूळ इत्यादि. प्रथम हीं लक्षणें होऊन फक्त शक्तिपात झाला आहे असें वाटतें पण मग त्यास बेशुध्दीचें स्वरूप येतें. रोग्यास दम झाल्याप्रमाणें श्वास चालतो व श्वास सर्वांगास गुळचट दर्प येतो. अशी स्थिति एक ते तीन दिवस अष्टोप्रहर राहून शेवटीं मृत्यु येण्याचें बहुतेक ठरलेलेंच असतें. या रोगाचा शेवट या तऱ्हेनें मृत्यूंतच होतो. हे रोगी क्वचित् बरे होतात. रोग हळू हळू वाढत राहून रोगी बरेच दिवस जगतो पण अखेर शेकडा ५० रोगी अशा बेशुद्धीत मरतात, शेंकडा २५ रोगी क्षय किंवा फुप्फुसदाहानें व बाकीचे मूत्रपिंडरोग, अर्धांगवायु, कोथरोग इत्यादि रोगामुळें मरतात. प्रौढवयाचे रोगी म्हणजे जे रोगी अंगानें स्थूल आहेत अगर ज्यांनां संधिगत उष्णवात झालेला असतो किंवा ज्यांनां सांपत्तिक स्थिति बरी असल्यामुळें पथ्य व औषधोपचार करण्यास सांपडतें असे रोगी सुधारण्याचा संभव बराच असतो. एखादें जबर दुखणें प्रथम येऊन गेल्यावर हा रोग जडला असेल तर त्यांतील थोडे रोगी मात्र कायमचे बरे होतात. पण ज्यांनां हा रोग आनुवंशिक संस्कारामुळें झालेला असतो, व जे वयानें अगदींच लहान अगर तरुण असतात त्यांचें हें दुखणें असाध्यच समजावें. असें जरी आहे तरी वरील सर्व प्रकारच्या रोग्यांनां जीं भयंकर लक्षणें होतात व दुष्परिणाम घडतात ते औषधोपचारानें व पथ्यानें पुष्कळ अंशीं टाळून अगर सौम्य करून आयुष्य लांबवितां येतें.

उ प चा र.- यांत पथ्य व औषधें या दोहोंचाहि समावेश होतो. व प्रत्येक माणसाच्या स्वाभाविक आवडीनिवडीकडे व वैय्यक्तिक प्रकृतीकडे लक्ष पुरवून या दोहोंची योजना करावयाची असते. सर्वच रोग्यांस एकच नियम लावणें योग्य नाहीं हें ध्यानात ठेविलें पाहिजे. प्रथम पथ्यासंबंधीं विचार करण्यासारख्या गोष्टी अशा:- (१) पिष्टपदार्थ व शर्करायुक्त पदार्थ या दोहोंनीं रोग त्वरित व निःसंशय वाढतो. यासाठीं औषधापेक्षांहि पथ्य बाळगणें हें जास्त महत्त्वाचें आहे. म्हणून तांदूळ, जोंधळा, बटाटे, रताळीं, तवकील इत्यादि पिष्टपदार्थ, मुळे, गाजरें, बहुतेक प्रकारचीं फळें व निःसत्व गहूं हे पदार्थ वर्ज्य करावे व पुढील पदार्थ हितकर समजावेतः - मांसाशन व मांसाचा रस्सा, हिरव्या शाकभाज्या, साय, दहीं, खवा, अंडीं, श्रीखंड, चहा कॉफी (साधी साखर न घालतां कृत्रिम शर्करा घातलेली), लोणी, सात्विक गहूं, बदाम, इत्यादि. रोग्यास भागरपोळी अगर पाव हे जेवणांतून कायमचे वर्ज करणें फार जड जातें. व त्याच्या ऐवजी कोंडा (ब्रॅन) किंवा गव्हाचा चीक (ग्लुटेन) यांची पोळी किंवा बदामाचें पीठमिश्रित रोट किंवा बिसकिटें यांवर काम भागण्यासारखें असतें. नेहमींच्या जेवणांत वरीलप्रमाणें बदल करणें, तोहि एकदम केल्यानें वर वर्णन केलेली बेशुद्ध स्थिति रोग्यास येण्याचा संभव असतो आणि म्हणून अन्नांत बदल अगदीं सावकाश करावा लागतो. पिष्टपदार्थ सोडणें ते प्रथम बटाटे सोडावे व मग दुसऱ्या प्रकारचे साखर, फळें, इ. पदार्थ क्रमानें व हळू हळू सोडून त्याचा लघवींतून जाणाऱ्या शर्करेवर काय परिणाम घडतो याची नोंद ठेवावी. भाकरी, पोळी, अगर पाव वर्ज्य करणें हें मात्र अगदीं शेवटीं व विचारांतीं, इतर पथ्य अंगवळणीं पडल्यावर मग सोडावे, व त्याच्या ऐवजीं वर सांगितलेले पदार्थ द्यावेत. अशा रीतीनें पथ्य करून लघवींतील साखर कमी होऊन तें कमी अगर शून्यप्रमाण स्थिर होऊन कांही दिवस टिकल्यावर पुन्हां थोडे पिष्ट पदार्थ आहारांत आणिले तरी चालतें. मद्यसेवन करणें अगर न करणें हें रोग्याची जात, धर्म, व संवयीवर अवलंबून आहे. पथ्य कडक असल्यामुळें रोग्यास पूर्वीची संवय असल्यास थोडें मद्य घेण्यास हरकत नाहीं. वरीलप्रमाणें पथ्य पाळीत असतांना रोग्यास सुस्ती येते असें वाटताक्षणी पूर्वीप्रमाणें पिष्टान्नमिश्र आहार रोग्यास द्यावा. आहार ठरविणें तो जपून, प्रत्येकास मानवेल असाच ठरवावा. तूप, लोणी, कॉड माशाचें तेल वगैरे स्निग्ध पदार्थ फार उपयोगी असतात. पालेभाज्यांचा पाला तेवढा खावा. ॲपल फळें खाण्यास चांगलीं, कारण त्यांतील शर्करा वेगळया प्रकारची व निरुपद्रवी असते. निवळ दुग्ध प्राशन करणें चांगलें नाहीं. शर्करा कमी होऊन पुन्हां थोडें पिष्टान्न खाण्यास रोग्यास परवानगी मिळते तेव्हां थोडें थोडें दूध प्यावे. पण याविषयीं बराच मतभेद आहे. वरील पथ्य पाळल्यानें बहुमूत्रतेचें लक्षण थांबलें कीं, लागलीच अतितृष्णाहि थांबते. पायलोकारपीन हें औषध टोंचून घातल्यानें लाळ सुटून तोंडाची कोरड कमी होते. मलशुद्धि साफ न झाल्यानेंहि शोष पडतो, म्हणून कोठा साफ ठेवावा.

मधुमेहांत उपयुक्त अशीं औषधें पुष्कळ आहेत पण त्यांत अफूचा मात्र फार उपयोग होतो, कारण तिच्या योगानें पुष्कळ लक्षणांचा जोर कमी होतो. तसाच उपयोग मार्फिया व कोडिया या अफूच्या घटकद्रव्यांचाहि होतो. रोग फारच तीव्र असला तर मात्र हींहि औषधें कुचकामीं ठरतात व त्यांनी बद्धकोष्ठता मात्र वाढते. हेरोईन हायड्रोक्लोराइड ह्या अफूच्या सत्वाचा उपयोग केल्यानें तशीच स्थिति होते, म्हणजे फक्त सौम्य व मध्यम रोगांत उपयोग होतो. जांभळाच्या बिया, अगर त्यांचा अर्क, आस्पिरीन सोडा सॅलीसीलेट हींहि बरींच गुणकारक औषधें आहेत. ती शर्करा कमी करतात; परंतु त्यांपासून इतर वाईट परिणाम घडत नाहीं.

ब हु मू त्र मे ह.- या भेदांत अतितृष्णा व बहुमूत्र हीं लक्षणें असतात. पण मूत्रांत शर्करा नसते. बाकी इतर परिणम मागील भेदापेक्षां जरा कमी प्रमाणांत या भेदांत असतात. याचीं लक्षणें सुरू होतांना तीं अत्यंत सावकाशपणें सुरू होतात. कांहीं रोग्यांनां तर प्रकृतींत कांहीं बिघडलें आहे किंवा वाईट लक्षण होत आहे हें कळत देखील नाहीं. या निवळ सौम्य भेदापासून मृत्यु येत नाहीं खरा पण तो शरीरांत अशक्तपणा उत्पन्न करतो. त्यामुळें भयंकर व प्राणघातक अशा दुसऱ्या व्याधींमुळें मृत्यु येण्याचा संभव असतो. उपचारः - अन्नपुरवठा भरपूर व पुष्टिदायक असावा व शक्तिवर्धक औषधें घेऊन शक्ति कायम ठेवीत जावी, व्हलेरियनची पूड ५ ग्रेन या प्रमाणांत पोटांत देतात. दुसरीं अशींच उपयुक्त औषधें व्हलेरियनेट ऑफ झिंक किंवा झिंक ऑक्साइड याच्या गोळया करून देतात. कॉडलिव्हर ऑईल पोटांत शक्तीसाठी जरूरीप्रमाणें देत असावें.

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .