विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मनसा- हिला बंगाल्यांत सपांची अधिष्ठात्री देवता मानितात. मनसा ही वासुकीची बहीण व जरत्कारु ॠषीची पत्नी होय. सर्पांपासून आपलें संरक्षण होण्यासाठीं लोक तिची आराधना करतात. हिला विषहारी असेंहि एक नांव आहे. हिच्यासंबंधीं कथा 'बंगाली वाङ्मय' ('ब' पृ. १६, विभाग १७) लेखांत दिली आहे.