विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मयासुर- हा असुरांचा शिल्पी असावा. हा दिल्लीजवळ देवगिरी पर्वतावर रहात असे. याची कन्या उपदानवी ही हिरण्याक्षास दिली होती. मयासुरास हेमा अप्सरेपासून दुदंभि आणि मायावी हे दोन पुत्र व मंडोदरी नांवाची एक कन्या होती, तीच पुढें रावणास दिली होती. खांडववनदाहापासून अर्जुनानें मयासुराचें रक्षण केल्यामुळें यानें इंद्रप्रस्थास पांडवांकरितां एक विचित्र मयसभा तयार करून दिली. मयमत नांवाचा एक वास्तुशिल्पावर संस्कृत ग्रंथ आहे.