विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मरुत्त- अवीक्षत राजाचा पुत्र. ऐतरेय ब्राह्मणांत संवतीकडून याला राज्याभिषेक झाल्याचा उल्लेख आहे. शतपथब्राह्मणांतहि याचा उल्लेख आहे. हा महान् पराक्रमी, शूर व यज्ञकर्ता असा होऊन गेला. याच्या यज्ञांत विश्वेदेव सभासद व मरुद्गण परिवेष्टे (अन्न वाढणारे) होते. मरुत्त राजास दम नांवाचा एकच पुत्र होता.