विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलकनगिरि- ही तहशील मद्रास इलाख्यांत विजगापट्टम् जिल्ह्यांत असून हिच्या पूर्वेस व पश्चिमेस माखुंद व साबरी या नद्या आहेत. क्षेत्रफळ २३७६ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) ५३९३१. ही तहशील जयपूरच्या राजाची आहे. येथें साग व साळा यांची अरण्यें आहेत.