विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मसूरी- संयुक्तप्रांत, डेहराहून जिल्ह्यांतील एक थंड हवेचें ठिकाण. हें हिमालयाच्या पायथ्याशीं समुद्रसपाटीवर ६००० ते ७५०० फूट उंचीवर बसलेलें आहे. लोकसंख्या सुमारें सात हजार. हें इ. स. १८२६ त थंड हवेचें ठिकाण म्हणून प्रसिध्दीस आलें. स. १९०० पर्यंत येथें सहारणपूरहून गाडीवाटेनें (५८ मैल) जात असत परंतु ''हरिद्वार डेहरा'' रेल्वे सुरू झाल्यापासून येथें जाणें सुलभ झालें आहे. येथें यूरोपीय व युरेशियन मुलांकरितां बऱ्याच शाळा असून दोन तीन इस्पितळेंहि आहेत.