विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महंमदाबाद- मुंबई, खेडा जिल्ह्याचा तालुका. क्षे. फ. १७१ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ६७६९२. यांत ५९ खेडीं आणि महंमदाबाद व खेडा हीं २ मोठीं गांवें आहेत. महंमदाबाद गांव या तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. महंमदाबाद गुजराथचा महमूद बेगडा (पहा) यानें इ. स. १४७९ मध्यें बसविलें. नंतर तिसऱ्या महमुदानें (१५३७-५४) येथें मृगयाभूमि तयार करून तिच्या चारहि कोपऱ्यांवर महाल बांधले. लोकसंख्या सुमारें सहा हजार स. १८६३ मध्यें येथें म्युनिसिपालिटी स्थापन करण्यांत आली. सध्यां यांत ४ शाळा व एक दवाखाना आहे.