विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाजन- ही ''ग्रामणी'' ची पदवी आहे, पण काश्मीर पंजाबकडे जात झाली आहे. काश्मिरी महाजनांची लोकसंख्या २० हजार असून वृत्ति कायस्थांप्रमाणें आहे. काश्मिरांत फारसे कायस्थ नाहींत. अनेक ठिकाणीं खालच्या जातींतल्या स्वतःस शिष्ट समजणारे लोक (उदाहरणार्थ, कलाल इत्यादि) आपणांस महाजन म्हणवून निराळी जात स्थापन करीत आहेत.