विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाबन- कृष्णचरित्रांतील कांहीं प्रसंग येथें घडलेले आहेत. म्हणून या गांवाला पवित्र मानतात. महाबनचा इतिहास १०१८ पासून सुरू होतो. महंमद गिझनीनें मथुरा शहर उध्वस्त केल्यावर महाबनची तीच दशा केली. त्यावेळेस तेथील हिंदु राजानें आपलीं बायकामुलें ठार मारून आपण आत्महत्या करून घेतली. ११५१ सालं अजपाळ राजानें तेथें एक देवालय बांधलें असें शिलालेख सांगतो. तेथें वेल्लभाचार्यांची मुख्य जागा होती.