प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर          

महामारी (पटकी, विषूचिका)- हा एक विशिष्ट जंतूमुळें उद्भवणाऱ्या साथीचा रोग आहे. यांत साधारणतः पुढील लक्षणें आढळतात- मोठामोठाले पाण्यासारखे रेच, वाति, हातापायांत गोळे येणें, लघवी बंद होणें व शक्तिपात होऊन हातपाय गार पडणें.

रो ग जं तू चें व र्ण न.- हा जंतु कॉक या शास्त्रज्ञानें १८८३ या वर्षी शोधून त्याचें वर्णन प्रसिद्ध केलें, व त्याचें नांव त्याच्या आकारावरून कॉमॉबॅसिलस (स्वल्पविरामजंतु) ठेविलें. हा जंतु वक्राकार जंतूच्या जातींपैकीं असतो. हा रोग्यास झालेल्या रेचामध्यें अगर मृत्यूनंतर आंतडयांतील मळामध्यें व स्लेष्मावरण त्वचेमध्यें सांपडतो परंतु रक्तांत मात्र सांपडत नाहीं. हा क्षयजंतूसारखा वक्र परंतु मध्यें जरा जाड असून याच्या दोन्हीं टोंकांस एक अगर दोन पुच्छें असतात. याचीं वाढ आंतडयांतील पोकळ भागांत, त्यांतील पिंडांत, श्लेष्मावरण त्वचा आणि तिच्यावरील एपिथोलिअममध्येंहि झपाटयानें होते. त्यापासून विषोत्सर्जन होत गेलें म्हणजे या रोगाची लक्षणें होण्यास सुरवात होते अशी कल्पना आहे.

रो ग प्र सा रा चीं का र णें.- हीं बहुतेक विषमज्वराप्रमाणेंच असतात. पिंण्याचें, स्वयंपाकाचें, अगर आंघोळीचें पाणी या जंतूंच्या योगानें दूषित होऊन अन्नमार्गांतून त्यांचा प्रवेश हातो. असल्या रोगाचे कपडे नदी, विहिरी, तळी, या ठिकाणीं धुतल्यानें अगर मोरींतील मलयुक्त पाणी त्यांत झिरपल्यानें पाण्यापासून संसर्ग होतो. मलावर बसलेल्या माशा खाद्य अगर पेय पदार्थावर बसून संसर्गप्रसार करतात हेंहि सिद्ध झालें आहे. या रोगानें बरी झालेलीं माणसेंहि रोगप्रसारास कारण होतात. डोंगरावर हा रोग क्वचितच पहाण्यांत येतो. एकदां सांथ सुरू झाली म्हणजे सर्व वयाचे व दर्जाचे अगर जातीचे स्त्रीपुरुष बळीं पडूं लागतात. उन्हाळा व पावसाळयाच्या आरंभी या सांथी बहुधां असतात. फाजील आहार हेंहि या रोगास बहुधां निमित्त होतें. एकदां हा रोग झाला असतां अंगांत रोगप्रतिबंधक शक्ति येऊन पुन्हां रोग होत नाहीं.

रो गा चा क्र म व ल क्ष णें.- रोगाची गर्भावस्था बहुधां एक अगर दोन दिवस असते. रोगास आरंभ होतांनां कधीं कधीं पूर्व चिन्हावस्थेमध्यें रोग्यास साधे जुलाब प्रथम होतात, किंवा ते न झाले तर रोग्यास अस्वस्थता वाटून तो मलूल होतो. चक्कर, डोकें दुखणें, कानांत नाद ऐकूं येणें, अगर पोटांत कसेसें होऊन चैन न पडणें असें एकपासून तीन दिवसपर्यंत होत असतें. नंतर एकदम मोठमोठाले रेच होऊं लागून त्यांतील पिंवळेपणा नाहींसा होतो, व ते तांदुळाच्या धुवणाच्या रंगासारखे दिसतात. थोडया मिनिटांत घागरभर पाण्याइतके रेच होऊन दोन तीन तासांत तर याच्या तिप्पट अगर चौपट पाणी शरीरांतून रेच होऊन निघून जातें. हें रेच अल्कलीरूप असतात व त्यांत मीठ, अल्ब्यूमिन व श्र्लेष्मल पदार्थ असतात.

एखादा दुसरा तास याप्रमाणें जुलाब होऊन नंतर वांतीस आरंभ होतो. प्रथम अन्न पडून जाऊन नंतर तांदुळाच्या धुवणासारखी वांति पुष्कळशी विशेष त्रास झाल्याशिवाय वरच्यावर होते. रोग्यास दुसरें कांहीं खाणेंपिणें नकोसें होऊन कोरड पडून त्यास अति तृष्णा लागते. जीभ कोरडी व पांढरी होते. पोट हातानें थोडें दाबलें असतांहि सहन होत नाहीं. बहुधां बऱ्याच रोग्यांनां पायांतून वेदनायुक्त गोळे येऊं लागतात. व नंतर क्वचित् प्रसंगीं हातांत व इतर भागांतहि ते येतात. नंतर रोग्याचा शक्तिपात होऊं लागतो व पुढील स्थित्यंतर होतें :- शरीर काल्यासारखें थंडगार पडत जाऊन त्याचा वर्ण काळानिळा दिसतो. नाकहि फार गारठून काळेंनिळें होतें, व अशीच स्थिति हातापायांची व चेहऱ्याची होते. श्वासदेखील उष्ण न येतां थंडगार योते. कांखेंत तापाची नळी लाविली असतां नेहमीच्या उष्णमानापेक्षां (९८.४˚) ४-५˚ अंश उष्णतेचें मान कमी असतें. पण गुदद्वार अगर योगीमध्यें नळी लाविल असतां उष्णमान १०२˚ ते १०४˚ असलेलें आढळतें. जे रोगी कष्टसाध्य किंवा असाध्य असतात, त्यांचे डोळे रुक्ष, पांडुर व निस्तेज दिसतात. नाडीची गति शीघ्र होऊन ती बारीक सुतासारखी व अति मंद चालते. दर मिनिटास ३५ ते ४० पर्यंत श्वासोच्छ्वासाचें मान चढून दम लागल्यासारखें वाटतें. श्वासहि वरवर येऊं लागतो. नाडीचें मान दर मिनिटास ९०-१०० असतें. शरीरांतील मांसल भाग अगदीं दुर्बल होऊन निश्चेष्ट पडतात. उलघाल फार होते. आवाज घोगरा किंवा कानांत बोलल्याप्रमाणें बारीक होतो. या स्थितीमध्यें रेच बंद झालेले असतात. परंतु वांति मात्र सुरू असतें. लघवी कमी होत जाऊन शेवटीं नाहींशीं होते. रक्त  दाट होऊन त्याचें विशिष्टगुरुत्वहि वाढतें. त्यांतील पेशीमध्यें रत्तरंग वाढतो व पांढऱ्या पेशींची संख्याहि वाढते. रक्ताचा अल्कलीपणा नेहमीपेक्षां आणखी कमी होतो. रोगी जरी त्रासून निश्चेष्ट पडलेला असतो तरी त्यास शुद्धि चांगली असते. ही स्थिति येण्यास सुरवातीपासून सुमारें दहा अगर सात तास लागतात, आणि ही अशी स्थिति बारा ते चोवीस तास सुमारें असते, व त्यांत उतार न पडतां रोगी गतप्राण होण्याचाहि संभव असतो.

परंतु ज्या रोग्यांनां उतार पडण्यासारखा असतो त्यांस या स्थितिनंतर किंचित् १०१˚-१०२˚ पर्यंत येऊन अंग गरम लागते व त्यांची कांति पूर्व रंगास येण्याच्या पंथास लागते. नाडी हातास चांगली चालत असलेली आढळून येते. ज्वर बरा होऊन रोगी बहुधां बचावतो.

भे द.- या रोगांत भेद व उपभेद पुष्कळच असतात; उदा. (१) सौम्य प्रकारः- यांत फक्त रेच होतात व नंतर ते कमी आणि नंतर अगदीं बंद होऊन उतार पडतो. (२) विषूचिकासदृशातिसार- यांत मागील प्रकारापेक्षां लक्षणें अधिक तीव्र असतात. पण हीं लक्षणें थोडया दिवसांत अगर एक दोन आठवडयानंतर थांबतात. (३) लघुविषूचिका- याचीं लक्षणें एकाएकीं व अकल्पितरीतीनें सुरू होतात, व तीं खऱ्या विषूचिका रोगाप्रमाणेंच बहुतेक असतात. उतार सावकाश पडत जातो. (४) निर्जलविषूचिका- या भेदामध्यें शक्तिपातावस्थेसच एकदम आरंभ होऊन रोगी थंडगार पडून मृत्युपंथास लागतो. (५) प्रत्यागतविषूचिका- या प्रकारांत जी परावर्तन स्थिति इतर प्रकारच्या रोग्यास येते ती नीटशी येत नाहीं. (६) उग्रविषूचिका- या प्रकारांत ज्वर अतिशय वाढून त्याबरोबर लालसर किंवा गुलाबी गर कधीं गांधी उठल्यासारखा पुरठ उठतो. यानंतर विषमविषूचिका नांवाची भयंकर अवस्था कधीं कधीं सुरू होण्याचा संभव असतो. ती अशी-रोग्याच्या आरंभापासून सुमारें एक आठवडयानें ही स्थिति प्राप्त होते. हातापायांत अगदी निर्जीवित्व, निर्बलत्व प्राप्त होऊन रोगी निश्र्चेष्ट पडतो. तोंड लाल दिसतें, डोकें दुखतें, जिभेवर बुरशी व भूक नाहिंशी होतें. कोरडया ओकाऱ्या अगर खरोखरी वांतीसहि सुरवात होते. रेच सुरू असतात पण एखाद्या वेळीं उलट शौचाचा अवरोध झालेला असतो. चक्कर फार येते व त्यापासून रोग्यास चैन पडत नाहीं. मग त्यास प्रथम सुस्ती येते. अगर गुंगीहि येते. ज्वर १०२०-१०३० पर्यंत वाढतो. नाडी बारीक व अशक्त होते, व रात्रीं वात होऊन रोगी थोडा बरळतो. लघवीमध्यें अल्ब्यूमिन सांपडतें. (७) मूलविषशोषणविषूचिका- यांत शक्तिपातावस्थेनंतर गुंगी, उलघाल होणें, आपल्याशींच वात होऊन पुटपुटणें, आंचके येणें व बळकट बेशुद्धि ही लक्षणें होतात. हीं अवस्था दोन ते ९ दिवसपर्यंत टिकून नंतर बहुधां मृत्यु येतोच.

रो गां त उ द्भ व णा रे आ गं तु क दो षः- हे रोग सुरू असतांना अगर मागाहून रोगी निःशक्त  स्थितींत असतांना उद्भवतात, ते असेः- श्वासनलिकादाह, कफोदर, फुफ्फुसदाह, फुफ्फुसावरणदाह, गलदाह, कंठदाह, मूत्राशयदाह, योनिदाह, मस्तिष्कावरणदाह, संधिवात, कर्णपार्श्वग्रंथिदाह, लिंग, वृषण व नाक हीं त्वरित कुजून विगलित व दुर्गंधियुक्त होणें, अक्षिपुटदाह, शक्तिपातावस्थेंत डोळे आपोआप फार वेळ उघडे राहिल्यानें अक्षिकांचदाह व अक्षिकांचकलुषता, शय्याक्षते इत्यादि रोग उत्पन्न होतात.

रो ग नि दा न.- हा रोग सौम्य प्रकारचा झाला असतांना त्याचें पूर्ण सदृश्य अजीर्णोद्भूत अतिसाराशीं अगर नासकें अथवा अंबलेलें जडान्न खाऊन (उदाहरणार्थ, दूध, श्रीखंड) झालेल्या अतिसाराशीं असतें. म्हणजे या दोहोंतहि हातपाय गार पडणें, शक्तिपात, ग्लानि, थोडी लघवी व पांढरे जुलाब होतात. पण हीं लक्षणें फक्त एकाच माणसास अगर कुटुंबास झाल्यामुळें निदानास पुष्टि मिळते. सोमलाची विषबाधा झाली असतांहि हुबेहुब अशींच लक्षणें होतात. खात्रीचें निदान ठरविण्यास रेचाचें सूक्ष्मदर्शकयंत्रानें परीक्षण व जंतूचें जंतुशास्त्ररीत्या परीक्षण करावें.

उ प चा र.- सांथीच्या दिवसांत जुलाब होतांक्षणीं अफुमिश्रित अवष्टंभक मिश्रणें अगर पुडया अगर गोळया रोग्यास देण्याचा प्रघात आहे. पण हीं औषधें देणें असल्यास रोगाच्या अगदीं प्रथमावस्थेंतच द्यावयाचीं असतात. पण जर कां एकदां पुढील शक्तिपातावस्थेस आरंभ झाला तर त्यावेळीं अफु व अवष्टंभक औषधें रोग्याच्या प्रकृतीस अपायकारक होतात. त्यांचा उपयोग होत नाहीं, इतक्यावरच भागत नाहीं. उत्तम उपाय म्हणून शिरांतून अमृतजल (लवणांबु) सुईनें टोंचून घालतात व पोटामध्यें परमॅग्यानेटयुक्त औषध देतात. टोंचलेल्या पाण्याच्या योगानें रत्तचभिसरणाचा नष्ट झालेला जारे पूर्ववत् होण्याच्या मार्गास लागतो व पोटांत दिलेल्या औषधानें या महामारीच्या जंतूंनीं पोटांत व आंतडयांत उत्पन्न केलेल्या विषाचें निराकरण व मारण होतें. टोंचून औषध घालतात त्याचें प्रमाण शुद्ध मीठ १२० ग्रेन, पोटयाशियम क्लोराइड ६ ग्रेन, क्यालशियम क्लोराइड ४ ग्रेन व उकळून थंड केलेलें पाणी २० औंस जसें आहे. दंडांतील शिरेमध्यें असें तयार केलेलें औषध शेर किंवा सव्वा शेरपर्यंत जाऊं द्यावें. बहुधां एकदां टोंचणें पुरें होतें. पण पुन्हां शक्तिपात झाला तर दुसऱ्यांदां टोंचावें हें बरें. जर रत्तचभिसरणभार अगोदरच ठीक असेल (म्हणजे ८० मिलिमिटरपर्यंत) तर हें पाणी त्वचेखालीं टोंचावें. शिरेंत टोंचून घालीत नाहींत. टोंचून घालण्याच्या औषधाचें उष्णमान कोमट म्हणजे १००˚ फा. ही. सुमारें असावें. जर गुदद्वारांत उष्णता याहून अधिक असेल तर याहूनहि कोमट औषध टोंचून घालावें, म्हणजे परावर्तन-स्थितीमध्यें बेतापेक्षां अधिक ज्वर येणार नाहीं. उलटपक्षीं गुरद्वारांत उष्णमान बरेंच कमी असल्यास टोंचावयाच्या औषधाचें उष्णमान अंमळ कडक असावें. पोटामध्यें परमँग्यानेट हें औषध देण्याच्या दोन तऱ्हा आहेत. (१) कॅलशियम परमँग्यॉनेट अर्धा ते एक ग्रेन हें वीस औंस गरम पाण्यांत विरघळून तें पाणी जाईल तितकें वरच्यावर रोग्यास पाजावें. यापेक्षांहि जास्त प्रमाण पुढें म्हणजे चार ते सहा ग्रेनपर्यंत वाढवावें. (२) किंवा फक्त आतडयांतच विरघळणाऱ्या केराटिनचें पूट दिलेल्या या औषधाच्या गोळया दर १५ मिनिटांनीं एक याप्रमाणें दोन तासपर्यंत ८ गोळया द्याव्या नंतर रेच हिरव्या रंगाचे व लहान होईपर्यंत गोळया दर अर्ध्या तासांनें द्याव्यात. याला सुमार १२ तास लागतात. त्यानंतर सबंध दिसांत व त्याच्या दुसऱ्या दिवशीं दररोज ८ गोळया पोटांत द दोन अगर तीन तासांनीं देत असावें. या स्थितीमध्यें डॉ. रोजर्स हे बारली धान्याच्या कषायाखेरीज दुसरें कांहीं पिऊं देत नाहींत. विशेषतः त्यांच्या मतें मांसाचे सूप (रसा) किंवा मद्याकमिश्रित उत्तेजक पेयें अगदीं वर्ज असावींत. बाहेरून कढत पाण्याच्या बाटल्या किंवा जड पांघरुणें हेंहि उपयोगीं नाहीं, कारण परावर्तन फार जोरानें होऊन फाजील ज्वरोत्पत्ति होण्याचें भय त्यानें असतें, व यामुळें एखाद्या वेळेस काळजी उत्पन्न करण्यासारखी रोग्याची स्थिति होते. शिरांतून हें औषध टोंचलें म्हणजे थोडा ज्वर येण्याची प्रवृत्ति अगोदरच असते. ही परावर्तनस्थिती वाजवीपेक्षां जास्त थरावर जात आहे असें वाटल्यास डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. थंड पाण्यानें सर्वांग मधून मधून पुसून काढावें. स्पजांचे मोठे तुकडे किंवा खादीचे रुमाल थंड पाण्यांत पिळून काढून त्यानें हें करतां येतें. वर सांगितलेल्या औषधांत बर्फ घालून ते गुदद्वारांत बस्तिरूपानें हळू हळू व थोडथाडें घालावें. एक दोन दिवस खाण्यास फक्त वर सांगितलेला बारली धान्याचा कषाय देणें; त्यानंतर, आरारूट, तवकील, ताजें ताक अथवा दूध हीं आवडीप्रमाणें देत जावीं. मूत्रविषशोषणविषूचिका म्हणून जो वर भेद सांगितला आहे तशी स्थिति येऊं नये म्हणून लघवी पुन्हां साफ व पुष्कळ होऊं लागेपर्यंत हें औषध शिरांतून टोंचीत असावें, किंवा त्वचेखालीं टोंचावें असें डॉ. रोजर्स यांचें मत आहे. हृदयक्रिया शाबूत ठेवण्यासाठी डिजिटालीस, आड्रिनाली, व पिच्युइटारियाचा अर्क ही टोंचून घालावीं व कमरेच्या ठिकाणीं घटिकाचूषण करावें. डॉक्टर याच औषधांत यासाठीं शुद्ध मीठ ६० ग्रेन आणि सोडाबायकार्बोनेट १६० ग्रेन व २० औंस पाणी हें पूर्वी सांगितलेल्या औषधांतच मिसळून टोंचीत असतात.

प्र ति बं ध क उ पा य.- विषमज्वर व आमातिसार हे रोग ज्या मार्गानें पसरून संसर्ग वाढत जातो, त्याच मार्गानें हा रोग पसरत असल्यामुळें त्या सर्वांचे प्रतिबंधक उपाय सारखेच आहेत; उदा. पिण्याचें पाणी व मोऱ्या स्वच्छ ठेवणें, रोग्याच्या मलमूत्रांत जंतुघ्न औषध टाकून नंतर ते मोरींत टाकणें, मलमूत्रानें खराब झालेले कपडे सावधगिरीनें धुणें, सर्वांनीं पाणी कढवून मग तें पीत जाणें व एकंदरीत अति स्वच्छता राखणें हे वैय्यक्तिक प्रतिबंधक उपाय करण्यासारखे आहेत. सार्वजनिक उपाय म्हणजे जेथें रोग आहे असे ठाऊक आहे तेथून येणारास कांहीं दिवस वेगळें ठेवावयाचें, पण हा उपाय अंमलांत आणण्यास त्रासदायक व अवघड आहे. फक्त असें करणेंच शक्य आहे कीं, ज्या वाहनांतून अगर आगगाडीच्या डब्यांतून किंवा आगबोटींतून रोगी उतरला असेल, त्यानें दूषित केलेली जागा जंतुघ्न द्रव्यांनीं शुद्ध करणें, व त्या रोग्यास ठेवून घेऊन त्यास उपचार करणें व उतारू तपासण्यासाठीं डॉक्टरची योजना करणें, या उपायांनीं रोगाच्या पसरण्यास चांगला आळा बसतो. हा रोग न होण्यासाठीं हॉफकिन या प्रसिद्ध रशियन डॉक्टरनें प्रतिबंधक लस शोधून काढली आहे व ती या देशांत निदान यूरोपीय लोकामध्यें टोंचून घेण्याचा प्रघात बराच आहे.

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .