विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाराजगंज- (१) संयुक्तप्रांत, गोरखपूर जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ १२३९ चौरस मैल असून लोकसंख्या (१९११) ६०२७४० आहे. यांत खेडीं १२९९ आहेत. तहशिलीचा उत्तर भाग जंगलमय असून त्यांत उत्तम प्रकारचें कुरण आहे. नेपाळांतून पुष्कळ नद्या खालीं वहात जातात.
(२) संयुक्तप्रांत, रायबरेली जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ४६५ चौरस मैल असून लोकसंख्या (१९११) २६३७३७ आहे. यांत खेडीं ३६४ आहेत.