विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मही- ही नदी ग्वाल्हेर संस्थानांतील अमझेरा प्रांतांत उगम पावून धार, सतलाम, सैलाना वगैरे संस्थानांतून वहात जाऊन, पुढें उदेपूरच्या सीमेवरून निघून मेवाड टेंकडयांच्या बाजूने गुजराथेंत शिरते. तेथून महीकांठा व रेवाकांठा संस्थानांतून व खेडा जिल्ह्यांतून जाऊन खंबायताच्या आखातास मिळते. हींत समुद्राचें पाणी सुमारे २० मैलापर्यंत आंत आहे.