विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महीपति (१७१५-१७९०)- एक महाराष्ट्रीय कवि. अहमदनगर जिल्ह्यांतील ताहराबादचा कुलकर्णी. हा ॠग्वेदी देशस्थ ब्राह्मण असून उपनांव कांबळे होतें. भक्तिविजय, संतविजय, संतलीलामृत, कथासारामृत, पांडुरंगस्तोत्र, शनिमहात्म्य, कृष्णलीलामृत, पंढरीमहात्म्य इत्यादि लहानमोठे ओवींबद्ध ग्रंथ त्यानें लिहिले. हा चैतन्यपंथी होता. ग्वाल्हेरचा नरहरीनावाचा शिष्य महिपति याच्याहून निराळा आहे.