विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माड्रीड- स्पेनची राजधानी. लोकसंख्या १९२३ मध्यें ८१३९९१ होती. येथें मुख्य धर्मोपदेशकाची जागा असून स्पेनमधील मुख्य आगगाडीचे रस्ते येथून सुरू होतात. माड्रीड हें स्पेनमधील शिक्षणाचें केंद्र आहे. येथील विश्वविद्यालयांत एक वेधशाळा व एक पुस्तकालय आहे. या विश्वविद्यालयांत मुख्यत्वेंकरून कायद्याचें व वैद्यकीचें शिक्षण दिलें जातें. येथें कातडीं, छत्र्या, पंखे, गुंडया कागद वगैरे जिन्नस करण्याचे कारखाने आहे. शिवाय तंबाखूचा कुलमक्ता घेतलेली एक कंपनी आहे.