विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माढें, तालुका.- मुंबई, सोलापूर जिल्हा. क्षेत्रफळ ६१५ चौरस मैल. तालुक्यांत ८९ खेडीं असून लोकसंख्या सुमारें एक लाख आहे, जमीन उत्तम नाहीं. हवा रुक्ष आहे. मार्च ते मेपर्यंत उष्ण वारे सुटतात. पाऊस अनिश्चित असतो. माढें येथें एक किल्ला आहे.