विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मानाग्वा- हें शहर निकाराग्वा संस्थानची राजधानी असून याच नांवाच्या सरोवराच्या दक्षिण किनार्यावर हें वसलेलें आहे. उद्योगधंदे व व्यापार या दृष्टीनें शहराचें महत्त्व दिवसानुदिवस वाढत आहे. एकंदर लोकसंख्या सुमारें ३०००० आहे. कॉरिंथियन पद्धतीप्रमाणें बांधलेल्या सरकारी इमारती. लष्करी शिपायांच्या चाळी वगैरे पाहाण्यासारख्या आहेत. येथें राष्ट्रीय वाचनालय, व वस्तुसंग्रहालय आहे. आगगाडी व आगबोट या दळणवळणाच्या साधनांमुळें, कॉफी, साखर, कोको, कापूस वगैरे जिन्नसांचा महत्त्वाचा असा बहिर्गत व्यापार चालतो. येथील लोकसंख्या वाढत्या प्रमाणांत आहे.