विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मायावरम्, ता लु का आणि गां व.- मद्रास, तंजावर जिल्ह्याच्या ईशान्येकडील समुद्रकिनार्यावरील एक तालुका. क्षे.फ. २८३ चौरस मैल व लोकसंख्या सुमारें अडीच लक्ष हा तालुका कावेरी नदीच्या मुखाजवळील बेचक्यांत असून यांत ५० ते ५३ इंच पाऊस दरवर्षी पडतो. यांतील जमिनीत भुईमूग, तांदूळ वगैरे जिन्नस होतात. यांत १८६ खेडीं व मायावरम् आणि त्र्यंबकेश्वर हीं दोन गावें आहेत. त्या दोन गावांपैकीं मायावरम् हें या तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे व दुसरें मोडकळीस आलेलें एक बंदर आहे. मायावरम् गांवाची लोकसंख्या सुमारें २८००० आहे. येथें पार्वतीनें मयूररूपानें श्रीशंकराची पूजा केली अशी आख्यायिका आहे. या गांवाच्या कोरनाड नामक उपनगरांत रेशमी कापड तयार होतें.