विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मारकीनाथ- एक संत. चंद्रभागेतीरीं दर्यापूर म्हणून गावं आहे. तेथील कण्व शाखेच्या व वैश्यवृत्तीनें उपजीविका करणार्या बाबाजी नांवाच्या गृहस्थाचा वृध्दपणी झालेला एकुलता एक पुत्र वारल्यामुळें त्यास उपरति झाली व स्थूलग्रामाजवळ पयोष्णीतीरीं खेड मारकी म्हणून गांव आहे तेथें तो आला आणि १२ वर्षें मौन धारण करून तप केलें. अन्न वर्ज केलें होतें. हे पूर्वीचे त्याचें गुरुग्राम याचीं कांहीं पदें उपलब्ध आहेत.