विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिराशी- मुसुलमान लोकांत गाणारे, जुन्या गोष्टी, वंशवृक्ष आणि पूर्वजांचीं कृत्यें सांगणारे भाटासारखे हे लोक असून क्रुक्सच्या मतें हे डोम जातींतील असावेत. हे लोक पूर्वी हिंदु होते. १२९५ सालीं अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारीं असलेल्या अमीर खुश्रू कवीनें यांनां मुसुलमान केलें असें म्हणतात. यांच्या बायकाजनानखान्यांत नाचतात व तेथें असलेल्या बायकांचें इतर तर्हेनेंहि मनरंजन करतात.