प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर                       

मिशन- कोणत्याहि धर्माचा अगर धर्मसंप्रदायाचा प्रसार करणार्‍या संस्थेला 'मिशन' अशी संज्ञा आहे. धर्मप्रसार करणार्‍या मनुष्याला धर्मप्रसारक उर्फ धर्मोपदेशक असें नांव आहे. परंतु मिशन व मिशनरी हे दोन्ही शब्द हल्लीं 'कोणत्याहि मताचा प्रसार करणारी संस्था व प्रसार करणारा मनुष्य' या व्यापक अर्थानें वापरण्यांत येतात. 'मिशन' संस्थांचा जन्म मुख्यतः ख्रिस्तीधर्मामधून झाल तथापि हें धर्मप्रसाराचें तत्त्व फार प्राचीन काळापासूनच अस्तित्वांत आलें होतें असें प्राचीन इतिहासावरून आढळून येतें. ख्रिस्तीधर्माचा जनक या जगांत अवतरण्यापूर्वी हिंदुस्थानांतील बौद्धांनीं हें तत्त्व अमलांत आणलें होतें, हें त्या धर्माचा इतिहास वाचरणार्‍यास कळून येईल.

बौ द्ध मि श न.- अशोकानें व तत्पूर्वी बुद्धानेंहि आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठीं संस्था काढल्या होत्या. अशोकानें तर केवळ अखिल हिंदुस्थानभरच नव्हे तर चीन, तिबेट इत्यादि बाहेरच्या देशांतहि धर्मोपदेशक पाठविले होते. ख्रिस्ती शकाच्या ६७ व्या वर्षी बौद्धधर्मानें चीनच्या दरबारांत प्रवेश केला होता व त्यानंतर ४-५ वर्षांनींच लोकांमध्यें बौद्ध धर्मोपदेशकांनीं आपली चळवळ सुरू केली होती. मध्यआशिया व पार्थिया या ठिकाणीं बौद्धभिंक्षूंनीं आपल्या धर्माचा प्रसार करण्यास सुरवात केली होती. शिहकाओ नांवाचा प्रसिध्द पार्थियन धर्मोपदेशक चीनच्या आसपासच्या भागांत लेखनद्वारां बौद्धधर्माचा प्रसार करीत होता. त्यानंतरहि चीनमध्यें बौद्धांच्या बर्‍याच धर्मप्रसारक संस्था होत्या व या संस्थांमार्फत बौद्धधर्मग्रंथांचीं चिनी भाषेंत भाषांतरें झालीं होतीं. विशेषतः चवथ्या व पांचव्या शतकांत तर बौद्धधर्माच्या प्रसारकांनीं धर्मप्रसाराचें काम, ताओ संप्रदायाच्या विरोधाला न जुमानतां जोरांत चालविलें होतें. अनाथांनां मदत करून रोगग्रस्तांनां दवापाणी देऊन, व अनेक प्रकारांनीं त्यांनीं हें काम मोठया आस्थेनें चालविलें होतें. उत्तर चीनमध्यें फोतुचेंग, कुमारजीव इत्यादि नांव घेण्यासारखे प्रसारक होऊन गेले तर दक्षिण चीनमध्यें बुद्धभद्र, गुणवर्म, तिस्स, धर्मकाल इत्यादि महान् धर्मप्रसारकांनीं बौद्धधर्माचा झेंडा उभारला.खुद्द चीनच्या बर्‍याच बादशहांनी या धर्माचा अंगीकार केला. जी गोष्ट चीनच्या बाबतींत तीच तिबेट, कोरिया, जपान इत्यादि देशांत घडून आली. अवघ्या दीड शतकांत कोरिया राष्ट्रानें बौद्धधर्माचा अंगीकार केला व जपानमध्येंहि कांहीं काळ बौद्धधर्म हा राजधर्म म्हणून गाजला. तिबेटमध्येंहि राज्यकर्त्यांच्या आश्रयानें बौद्ध भिक्षूंनीं आपल्या धर्माचा पुष्कळ प्रसार केला.

इ स्ला मी मि श न.- इस्लामी धर्माचा जनक महंमद पैगंबर हा स्वतः मोठा धर्मप्रसारक होता व धर्मोपदेशक कसे असावेत यासंबंधीं त्यानें नियमहि करून ठेवले होते.तथापि अलीकडे ज्याप्रमाणें इस्लामीधर्मप्रसारक संस्था स्थापन झालेल्या दिसतात तशा त्या प्राचीन व मध्ययुगीन काळात दिसून येत नाहींत. पण धर्मोपदेशकांच्या संस्था जरी इस्लामी धर्मांत प्राचीन काळीं आढळत नाहींत तथापि सत्तेच्या व तरवारीच्या जोरावर त्यांनीं आपल्या धर्माचा बराच प्रसार केला होता. १० व्या शतकामध्यें त्यांनीं तुर्कांनां व अफगाण लोकांनां इस्लामाची दीक्षा दिली. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून इस्लामी धर्मोपदेशक संस्थांनीं व विशेषतः 'नक्षबंदी' संस्थेनें मोंगल जातीमध्यें इस्लाम धर्माचा प्रसार करण्यास सुरवात केली व हळू हळू त्यांनीं मोंगल जातींनां इस्लाममध्यें आणिलें, मोंगलांनीं इस्लामी धर्माचा स्वीकार करतांच त्यांच्या सत्तेखालीं असलेल्या जावा, सुमात्रा, चीन, मलाया द्वीपकल्प इत्यादि प्रदेशांतहि इस्लामी धर्मोपदेशकांचा संचार व बाटविण्याची क्रिया सुरू झाली. ११ व्या शतकापासून, आफ्रिकेमधील बर्बरादि जातींमध्येंहि इस्लामी धर्मानें आपले हातपाय पसरले. हिंदुस्थानामध्यें शेकइस्मायल (१००५),सय्यद नादीरशहा (१०३९), अल्दअल्ला, नूर सतागर, मुइनअल्दीन चिस्ति, जलालदिन ताब्रीझी वगैरे धर्मप्रसारकांनीं इस्लामी धर्माचा बराच प्रसार केला. वहाबीपंथाचा उदय झाल्यापासून तर हिंदुस्थानामध्यें इस्लामीधर्माचा प्रसार झपाटयानें सुरू झाला. त्यांतच राजकीय सत्तेचा आश्रय मिळाल्यामुळें इस्लामची प्रगति अधिक सुकर झाली. पण धर्मोपदेशकांच्या संस्था मात्र ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या संस्थेच्या अनुकरणानें १९ व्या शतकांत उदयास येऊं लागल्या. तथापि आजकाल हिंदूंनां धर्मोपदेशकानें बाटविण्यापेक्षां अन्य तर्‍हानीं बाटविण्याच्या कामींच या संस्थानीं आपलें सर्वस्व खर्च करण्यास सुरवात केलेली दिसते.

पा र शी मि श न.- पारशीधर्म हा जात्याच प्रसारकधर्म आहे. पारशीधर्माचा पुरस्कर्ता झरथुष्ट्र यानें आपल्या हयातींत पुष्कळशा प्रदेशांवर आपला धर्म प्रसृत केला. सस्सानियय घराण्याच्या कारकीर्दीत धर्मप्रसाराच्या कामाला तेजीचे दिवस आले; व राजसत्तेच्या जोरावर आर्मेनिया, चीन इत्यादि भागांतहि पारशीधर्माचा थोडाफार प्रसार झाला. तथापि या घराण्याच्या र्‍हासानंतर धर्मप्रसाराचें कार्य समाप्तच झालें असें म्हणावयास हरकत नाहीं. हिंदुस्थानांतहि झरथुष्ट्री संप्रदायाचा प्रसार करण्याचे प्रयत्न प्रथमतः करण्यांत आले पण या पंथास अस्पृश्यवर्गाखेरीज कोणीच अनुयायी मिळंत नाहींत असें दिसून आल्यामुळें त्यांच्या अंतर्भावास विरोध करण्यांत आला.

ख्रि स्ती मि श न.- वरील तिन्ही धर्मांपेक्षांहि ख्रिस्ती धर्मानें या कार्यांत अधिक आघाडी मारली आहे. ख्रिस्तीधर्माच्या स्थापनेपासून तों आतांपर्यंत ख्रिस्तीधर्मानें हें काम फारच पद्धतशीर तह्रेनें व मोठया यशस्वी तह्रेनें चालविलें आहे. ख्रिस्तीधर्मामध्यें बरेच पोटभेद झालें व त्यांनीं परस्परांशीं झगडेहि चालविले. तथापि आपला धर्म जगामध्यें प्रसृत करण्याच्या कामीं या सर्व संप्रदायांनीं अवाढव्य परिश्रम केले आहेत. अगदीं प्राचीन काळीं पॉल, क्रिसॉस्टोम इत्यादिकांनीं हें कार्य केलें. मध्ययुगांत केल्टिक, स्लाव्ह, स्कँडिनेव्हिया, इस्लामी प्रदेश, हिंदुस्थान इत्यादि ठिकाणीं धर्मप्रसारकांनीं ख्रिस्तीधर्माचा प्रसार केला. अर्वाचीन काळांत, मिशनसंस्थांनीं मागील काळांतील वैयाक्तीक प्रयत्नांच्या ऐवजीं सामुदायिक प्रयत्न करण्यास सुरवात केली व त्यामुळें सर्व जगांत या संस्थांचा शिरकाव झाला आहे. त्यांतच राजसत्तेचा पाठिंबा मिळाल्यामुळें धर्मप्रसाराला चांगलीच मदत झाली आहे. नुसत्या इंग्लंड व अमेरिकेंतच शंभरावर मिशनरी संस्था असून त्यांच्या शाखा जगाच्या पाठीवर सर्वत्र पसरल्या आहेत. या संस्थांमध्यें बौद्ध भिक्षुणींप्रमाणें बायकांचा देखील प्रवेश करण्यांत आल्यामुळें त्यांची या धर्मप्रसाराला फारच मदत झाली आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या चळवळींत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रानटी, असंस्कृत व खालच्या दर्जाच्या लोकांमध्यें त्यांनीं मुख्यतः धर्मप्रसार केला ही होय. ख्रिस्ती मिशनर्‍यांपैकीं बर्‍याच मिशनर्‍यांनीं धर्मप्रसाराचें कार्य शांततेनें केलें. तथापि कांहीं मिशनर्‍यांनीं हिंदूंचा अत्यंत छळ करून निर्दयतेनें त्यांनां बाटविलें, असें गोव्यांतील मिशनर्‍यांच्या इतिहासावरून दिसून येतें.

ख्रिस्ती धर्मोपदेशक व हिंदुस्थानः- हिंदुस्थानांत अगदीं पहिल्या प्रथम नेस्टोरियन पंथाचे धर्मोपदेशक आले. त्यांच्या नंतर १६ व्या शतकामध्यें जेसुइट पंथाच्या धर्मोपदेशकांनीं प्रवेश केला, व त्यांनीं पुष्कळ लोकांनां आपल्या धर्माचे अनुयायी बनविलें. पुढें १८ व्या शतकांत 'डॅनिश कोस्ट मिशन' या संस्थेच्या धर्मोपदेशकाचें आगमन झालें. या तिन्ही मिशनसंस्थांच्या परिश्रमामुळें ख्रिस्ती धर्माचें बीं हिंदुस्थानांत थोडें फार रुजलें व त्यामुळें त्यांच्यानंतर आलेल्या ख्रिस्ती मिशनर्‍यांचा कार्यभाग सुलभ झाला. १९ व्या शतकाच्या प्रारंभीं विल्यम कॅरी यानें श्रीरामपूर येथें आपल्या मिशनरी संस्थेची स्थापना केली व आपल्या हाताखालच्या उत्साही मिशनर्‍यांच्या साहाय्यानें ख्रिस्तीधर्म पसरविण्याची अतोनात खटपट केली. त्यानें बायबलचें सात भाषांमध्यें भाषांतर करविलें, गरीबांनां मदत करण्यासाठीं शेतकी संस्था व बँका काढल्या, व हिंदु धर्मांतील ज्या सती सारख्या चाली होत्या त्या नाहींशा करण्यासाठीं खटपट केली. दक्षिण हिंदुस्थानांत लंडन मिशनरी सोसायटीनें व चर्च मिशनरी सोसायटीनें मुख्य मुख्य शहरीं आपल्या संस्था स्थापिल्या. महाराष्ट्रांत व विशेषतः अहमदनगर येथें अमेरिकन-वार्ड संस्थेनें आपलें कार्य सुरू केलें. हिंदुधर्माचें केंद्रस्थान जें गंगेचें खोरें त्या ठिकाणीं बॅप्टिस्ट, व चर्च मिशनरी व लंडन मिशनरी सोसायटयांनीं ख्रिस्ती धर्माचा झेंडा रोंविला. अशा रीतीनें १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत या मिशनरी सोसायटयांनीं आपलें जाळें हिंदुस्थानभर पसरलें. त्यांच्या कार्याची मुख्य दिशा पुढीलप्रमाणें होतीः- (१) जातिभेदाचे कडक निर्बंध शिथिल करणें व सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठीं खटपट करणें, (२) मूर्तिपूजेविरुद्ध चळवळ करणें, (३) एकेश्वरीमताचा व उपासनामार्गाचा पुरस्कार करणें (४) स्त्रीविषयक पारतंत्र्याविरुद्ध चळवळ करणें. या कार्यासाठीं त्यांनीं खेडेगांवांत आपल्या संस्थेतर्फे शाळा उघडल्या, धर्मोपदेशकांच्या द्वारें व्याख्यानें देण्यास आरंभ केला, दवाखाने काढले, अनाथगृहें उघडलीं, स्त्रीशिक्षणाच्या संस्था स्थापल्या, अस्पृश्यांची सुधारणा करण्यासाठीं परिश्रम केले, इंग्लिश भाषा व ख्रिस्ती वाङ्‌मय यांचा प्रसार केला, व निरनिराळया ठिकाणीं चर्चेस्थापन केलीं. या कार्यांत त्यांनां, अनेक बाजूंनीं विरोध झाले तथापि त्यांनीं आपल्या कार्यांत खंड पडूं दिला नाहीं. या त्यांच्या कार्याचें फळ म्हणजे हिंदुस्थानांत आर्यसमाज, ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज इत्यादि हिंदुधर्माच्या मिशनरी संस्था निर्माण झाल्या हें होय. तथापि अलीकडे हिंदूधर्मांत सामाजिक जागृति झाल्यामुळें या मिशनरी संस्थांचें कार्यक्षेत्र कमी कमी होत चाललें आहे, व उत्तरोत्तर अधिकाधिक कमी होत जाण्याचीं स्पष्ट चिन्हें दिसत आहेत.

हिं दु मि श न.- हिंदुधर्माच्याच तेवढया मिशनरी संस्था नाहींत व असल्या तरी त्या अगदीच थोडया आहेत व त्यांचे उद्देशहि निराळे आहेत. हिंदुधर्म हा अत्यंत उदार धर्म असल्यानें तो कोणत्याहि धर्माचा तिरस्कार करीत नाहीं व आपला धर्म सामोपचारानें अगर जबरीनें परधर्मावर लादूं इच्छीत नाहीं; त्यामुळें त्याच्यामध्यें अशा प्रकारच्या संस्थांचा प्रसार झाला नाहीं. हिंदुधर्माच्या अनेक संप्रदायांमध्यें संप्रदायांच्या मुख्यांनीं, इतर संप्रदायांतील अनुयायांनीं आपला संप्रदाय अनुसरावा एतदर्थ खटपट केल्याचीं उदाहरणें आहेत, तरी परधर्माच्या लोकांमध्यें जाऊन तेथें आपल्या धर्माला अनुयायी मिळविण्याची त्यांनीं कधींच खटपट केली नाहीं. हल्लीं मिशनरी संस्थांच्या अनुकरणानें आर्यसमाज, ब्रह्मोसमाज, हिंदुमिशनरी सोसायटी इत्यादि संस्था निघाल्या आहेत, तथापि त्यांचें कार्य मुख्यतः हिंदुधर्मामध्यें सुधारणा घडवून आणणें व धर्मांतर केलेल्यांनां स्वधर्मांत परत आणणें हेच आहे.

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .