विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मीरगंज- संयुक्तप्रांत, बरेली जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ १४९ चौरस मैल. यांत १५८ खेडीं व एक शाही नांवाचें गांव आहे. लोकसंख्येचें प्रमाण दर चौरस मैलास ६४० असें आहे. यांत मुख्य उत्पन्न उंसाचें असून ठिकठिकाणीं साखरेचे कारखाने आहेत.