विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुक्ताबाई.- आद्य मराठी कवियित्री. ही ज्ञानेश्वराची बहीण होय. हिचें थोडक्यांत चरित्र असें:- आपेगांवी जन्म (शके १२०१), पैठण गांवीं गमन; तेथून नेवाशाच्या रस्त्यानें आळंदीस येऊन वास्तव्य; वटशे चांगदेवास उपदेश व ज्ञानेश्वर व सोपान यांच्या समाधीनंतर (१२१८-१२१९) एडलाबादेजवळ माणगांवीं हिनें जलसमाधि घेतली (१२१९). ही कवियित्री असून हिच्या अभंगाविषयीं माहिती 'अभंग' या लेखांत पहा. हिचे ग्रंथ ज्ञानेश्वरीताटी, कल्याणपत्रिका, नमन, हरिपाठ हे होत. ही अविवाहित होती.