विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुंगेली- मध्यप्रांतांतील विलासपूर जिल्ह्यांतील पश्चिमेकडील तहशील. हिचे खालसा व जमीनदारी असे दोन भाग पडतात. दोहोंचे मिळून क्षेत्रफळ १४५२ चौरस मैल व लोकसंख्या दोन लाखांवर आहे. तहशिलींत एकंदर ९०२ खेडीं व फक्त मुंगेली हें एकच मोठें गांव (लोकसंख्या सुमारें पांच हजार) आहे.