विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुबारकपूर- संयुक्तप्रांत, अझमगड जिल्हा, महमुदाबाद तालुक्यांतील एक शहर. लोकसंख्या सुमारें १५ हजार. याचें पूर्वीचें नांव कासिमाबाद होतें. येथें इसवी सन १८१३, १८४२ व १९०४ मध्यें हिंदुमुसुलमानांत पुष्कळ तंटे झाले. येथें रेशमी व सुती कापड निघतें.