विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुरबाड- मुंबई, ठाणें जिल्ह्याचा आग्नेयीकडील तालुका. क्षेत्रफळ ३५२ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें ६५ हजार. यांत एकंदर १७० खेडीं आहेत. हा तालुका खडकाळ असून येथें बरेंच जंगल आहे व जमीन निकस आहे. येथें बहुतेक ठाकुर, कोळी व मराठा जातीचे लोक रहातात.