विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुरसान- संयुक्तप्रांताच्या अलिगड व इटाह जिल्ह्यांतील इस्टेट. क्षेत्रफळ ६० चौरस मैल. ही सर्वांत महत्त्वाची जाठ लोकांची इस्टेट आहे. १६ व्या किंवा १७ व्या शतकांत राजपुतान्यांतून मकन नांवाचा एक जाट येथें आला व त्यानें ही वसविली. येथील मुख्य शहर मुरसान हें कानपूर अछनेरा रेल्वेवर आहे.