विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंगलोन संस्थान- ब्रह्मदेश. उत्तर शान संस्थानांपैकीं एक संस्थान. क्षेत्रफळ ३००० चौरस मैल. यांतून सालवीन नदी वहाते, येथें सरासरी ४०००० लोकसंख्या असून तींत शान, चिनी व पलौंग लोकांचा समावेश होतो. याची राजधानी तकुत ही असून इ. स. १९०३-०४ मध्यें येथील थाथामिड कराचें उत्पन्न ११००० रु. होतें. येथील उत्पन्नांतून ५०० रु. इंग्रज सरकारकडे खंडणी जाते.