प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

मृदुकाय - अपृष्ठवंश प्राण्यांच्या विभागांतील मृदुकाय हा एक संघ आहे. मृदुकाय प्रण्यांचा संघ संधिपाद प्राण्याच्या संघाप्रमाणेंच मोठा असून प्राणिकोटींतींल अपृष्ठवंश विभागाच्या मुख्य संघांपैकीं एक संघ आहे. या संघांतील प्राण्यांच्या शरीररचनेंत बरेंच वैचित्र्य दिसून येतें. या संघांत जलचर म्हणून जलश्वासी व स्थलचर म्हणून वातश्वासी असे दोन तर्‍हेचे प्राणी आढळून येतात. गोगलगाय, पिकूळ, खुबडी, कवडी, कालवे, शुक्ति ( शिंप ), म्हाकूल वगैरे प्राणी या संघांत मोडतात. या संघांतील प्राण्यांत शरीराचे विभाग झालेले नसतात, व बहुतकरून शरीररक्षणार्थ बाह्य कवचरूपी शिंपला असतो. तो क्वचितच प्राण्याच्या अंतरंगीं झालेला असतो. या प्राण्यांत मुख्यत: शरीर मृदु व लवचिक असें झालेलें असतें, म्हणून यांनां मृदुकाय असें म्हणतात. या मृदुकाय प्राण्यांमध्यें शरीराच्या उदरतलाच्या भागापासून शरीराची हालचाल घडवून आणणारा एक मांसल असा भाग वाढलेला असतो, तो या संघाचें विशेष लाक्षणिक चिन्ह होय. याला मृदुकायपाद असें म्हणतात. हा कित्येक मृदुकाय प्राण्यांमध्यें अखंड असतो किंवा कित्येकांमध्यें निरनिराळ्या रीतींनीं विभागला जातो. याचा प्राण्याला जमिनीवर हालचाल करण्यास उपयोग व्हावा म्हणून अथवा त्याच्यायोगानें माती खणतां यावी म्हणून व पाण्यांत तरंगतां येण्यास उपयोग व्हावा म्हणून त्याचें निरनिराळ्या तर्‍हांनीं रूपांतर झालेलें असतें. मृदुकायपादाचीं हीं रूपांतरें या संघाच्या वर्गांतील प्राण्यांचें वर्गीकरण करण्यास उपयोगी पडतात. या संघांतील प्राण्यांचें दुसरें लाक्षणिक चिन्ह हें आहे कीं, या प्राण्यांत शरीराच्या सभोंवतीं पृष्ठभागीं दोहोंकडे त्वचेचा एक अलग भाग आवरणाप्रमाणें वाढतो, त्याला पृष्ठत्वचावरण म्हणतात. या पृष्ठत्वचावरणाच्या कांठापासून शिंपा तयार होतात. शरीराच्या आणि या त्वचावरणाच्या मध्यें एक पोकळी राहाते. तिला पृष्ठत्वचावरणगुहा असें म्हणतात. हींत जलचरांमध्यें जलश्वसेंद्रियें झालेलीं असतात, व स्थलचरांमध्यें ते वातश्वासी असल्यामुळें तिचें वायुकोश किंवा फुफ्फुसांत रूपांतर झालेलें असतें. या वायुकोशावर किंवा फुफ्फुसाच्या पृष्ठभागावर रक्तवाहिन्या बनतात, त्यामुळें त्यांतून अभिसरण पावणार्‍या रक्ताचें शुद्धिकरण होतें. रुधिराभिसरणार्थ हृदय हृतकलेनें आच्छादित असें बनलेलें असतें, व त्याला बहुधां दोन लाक्षणिक कप्पे, एक संचयकर्ण व एक नि:सारकर्ण असे झालेले असतात. रक्तवाहिन्या पूर्णत्वानें न बनल्यामुळें रंगरहित रुधिर हें इंद्रियांच्या मध्यंतरांतील कोनाकोपर्‍यांतून अभिसरण पावत असतें. हे कोनेकोपरे शरीरगुहेच्या भागांपैकीं भाग होत. तेव्हां शरीराच्या पोकळींतून रुधिर वहात असल्यामुळें या पोकळीला शरीरगुहा म्हणतां येत नाहीं. जलश्वासी प्राण्यांचीं जलश्वासेंद्रियें जेव्हां झालेलीं असतात तेव्हां तीं लाक्षणिक दृष्ट्या म्हटलीं म्हणजे पापुद्रयाप्रमाणें असून शरीराला पार्श्वभागीं एका उभ्या सांध्यानें जोडलेलीं असतात. या मृदुकाय प्राण्यांमध्यें ज्ञानेंद्रियव्यूह ज्ञानपेशी समूहांच्या अथवा ज्ञानकंदांच्या तीन जोड्यांचा झालेला असते, व हे ज्ञानपेशीसमूह किंवा ज्ञानकंद ज्ञानरज्जूनीं एकमेकांशीं संयोजित झालेले असून अन्ननलिकेसभोंवतीं कंकणांप्रमाणें रचलेले असतात. या संघांतील पुष्कळ प्राण्यांत फलद्रूप झालेलीं अंडीं विकास पावतांना दोन वेळां रूपांतरें पावतात व नंतर पूर्णत्वास येतात, परंतु दुसर्‍या प्राण्यांत हीं परिपूर्तितावस्थेंतील रूपांतरें होत नाहींत व अंडीं सारखीं सरळ विकास पावतात.

या संघाचें वर्गीकरण केलें असतां मुख्य तीन वर्ग दिसून येतात, ते येणेंप्रमाणें:- ( १ ) उदरतलपादमृदुकाय (गास्ट्रोपोडा ) अथवा गोगलगाईसमूह, ( २ ) पत्रसमश्वासेंद्रियमृदुकाय ( लॅमेलीब्रँचीएटी ) अथवा द्विपुटकवचमृदुकाय ( बायव्हाल्हडमोलुस्का ) अथवा परशुसमपादमृदुकाय ( पेलॅसीपाडा ) अथवा कालवे, शुक्तिसमूह व ( ३ ) शीर्षपादमृदुकाय ( सेफॅलोपोडा ) अथवाम्हाकूल ( माकूल ) समूह.

उ द र त ल पा द मृ दु का य अ थ वा गो ग ल गा ई स मू ह.-उदरतलपादमृदुकाय हा अपृष्ठवंशांतील मृदुकायसंघाचा एक वर्ग आहे. या वर्गामध्यें जलचर व स्थलचर असे दोन्ही तर्‍हेचे मृदुकायप्राणी आढळतात. स्थलचरापैकीं प्रतिरूप गोगलगाय ही होय. जलाचर म्हणजे समुद्रांत राहाणारे किंवा गोड्या पाण्यांत राहाणारे गोगलगाईप्रमाणें ज्यांच्या शरीराला एकच शिंप असते असे मृदुकायप्राणी होत. तेव्हां या वर्गांतील प्राण्यांचें कवच एकच शिंपेचें झालेलें असतें. या शिंपेच्या विवरांत त्या प्राण्याचें सर्व शरीर राहूं शकतें. शरीराच्या पूर्वशेवटीं मुखयुक्त असा शीर्षाचा भाग या उदरतलमृदुकाय प्राण्यामध्यें चांगल्या रीतीनें झालेला असून स्पष्टपणें व्यक्त होतो. शरीराची हालचाल होत असतांना व प्राणी बाहेर वापर करतांना शिंपल्याच्या बाहेर फक्त शीर्षाचा भाग आलेला असतो. या शीर्षाच्या भागाला नलिकासम गात्रांच्या दोन जोड्या लागलेल्या असतात. शीर्षाच्या पृष्ठभागीं या गात्रांची एक लांब जोडी लागलेली असून त्यांच्या शेवटीं टोंकाला एकेएक नेत्र बनलेला असतो. गात्रांची जोडी दुसरी आंखुड असून तोंडाच्या बाजूला लागलेली असते शीर्षाच्या पश्चिमभागीं सर्व शरीराचा भाग गोलदार असून वाटोळा वेटाळला जातो व त्याचा एक सुळका बनलेला असतो. परंतु वेटाळला जात असतांना तो एकाच बाजूला जास्त कलला जातो त्यामुळें त्याचें अंगसादृश्य अथवा आकारशुद्धता नाहींशी होते. या सुळक्यासारख्या शरीराच्या भागासभोंवतीं तशाच तर्‍हेचा शिंपला झालेला असतो व या शिंपल्याला आंतून तो भाग चिकटून रहातो व या शिंपल्यामुळें त्याचें संरक्षण होतें. शिंपल्याबाहेर हा भाग येत नसतो. शीर्षाच्या पश्चिमभागीं शरीराच्या सुळवयाच्या पहिल्या वेटाळ्याच्या उदरतलभागापासूनच बहुतकरून एक मांसल असा भाग वाढतो व त्याला पाद असें म्हणतात. या वर्गांतील प्राण्यांची हालचाल घडवून आणणारा हा एक अवयव आहे. गोगलगाईंमध्यें तो सबंध अखंड असतो व त्याच्या तळपायाचा भाग सपाट बनलेला असल्यामुळें गोगलगाईला बळकट रीतीनें दुसर्‍या पदार्थाला चिकटून रहातां येतें. हा भाग गोगलगाईला कवचविवरामध्यें आंत ओढून घेतां येतो व बाहेर काढतां येतो. याचा संकोचविकास फार मंद रीतीनें होत असतो म्हणून गोगलगाय ही मंद गतीनें चालते. या पादामध्यें एक श्लोष्माविमोचनपेशीचें पिंड झालेलें असून त्याचें स्त्रोतस या पादाच्या पश्चिमशेक्टीं एका छिद्रानें उघडतें. गोगलगाईची हालचाल होत असतांना या श्लोष्माविमोचक पिंडांतून श्लेष्मा बाहेर पडत असतो. तो बाहेर आल्याबरोबर सुकतो. त्याच्य धोरणानें गोगलगाय पुन्हां आपल्या निवासस्थानास जाऊन पोंहचूं शकते. तसेंच वर्षाच्या कांहीं पर्जन्यरहित महिन्यांत म्हणजे विशेषत: भर उन्हाळ्यांत गोगलगाईची हालचाल बंद पडते व खाणेंपिणें टाकून गोगलगाय सुषुझातावस्थेमध्यें रहाते. यावेळेस ती सर्व शरीर कववाच्या आंत ओढून घेऊन कवचविवराचें मुख श्लेष्माच्या पातळ पापुद्र्यानें बंद करून टाकते. हा श्लेष्मा चिकट असल्यामुळें ही गोगलगाय कवचासुद्धा एखाद्या झाडाच्या बुंधाला किंवा दगडाला त्या अवस्थेंत चिकटून रहाते. या वर्गांतील प्राण्यांची हालचाल घडवून आणणारा अवयव हा पाद होय. तेव्हां या वर्गांतील निरनिराळ्या जातींमध्यें निरनिराळ्या प्रकारचे व्यवहार होण्यास उपयुक्त असें याचें रूपांतर होत असतें.

शीर्षाच्या मागें परंतु शरीराच्या किंवा कवंधाच्या आरंभीं पृष्ठावर किंवा दोन्ही कडांनीं त्वचेचा एक अलग भाग सभोंवतीं आवरणाप्रमाणें वाढतो, व त्याची लहान किंवा मोठी अशी एक पूर्वपृष्ठभागीं पोकळी बनते. ही पोकळी तिच्या पश्चिमशेवटीं बंद असून पूर्वशेवटीं एका छिद्रानें उघडते व तिला पृष्ठत्वचावरणविवर असें म्हणतात. या वर्गांतील जलचर अथवा जलश्वासी प्राण्यांमध्यें या पोकळींत जलश्वासेंद्रियें झालेलीं असतात, व या पोकळींत पाणी आंत येऊं शकतें व तें बाहेर काढून टाकतां येतें. पाण्यांत विरघळलेल्या प्राणवायूमुळें श्वासेंद्रियांतून अभिसरण पावणारें रक्त शुद्ध होतें. स्थलचर म्हणजे वातश्वासी प्राण्यांमध्यें, ( उ. गोगलगाय ) या पोकळीचें फुफ्फुसांत रूपांतर होऊन त्यांत हवा सांचते. तिच्या पृष्ठावर रक्तवाहिन्या बनलेल्या असतात व त्यामुळें तिच्या आंत आलेल्या हवेंतील प्राणवायू या रक्तवाहिन्यांतून अभिसरण पावणार्‍या रक्तांत मिसळूं शकतो व अशा सरळ रीतीनें रक्ताचें शुद्धिकरण होतें. हीच या प्राण्यांतील श्वासोच्छवासाची क्रिया होय. फुफ्फुसांतील हवा फुफ्फुसमुखावाटें बाहेर पडूं शकते व नवीन शुद्ध हवा त्याच वाटें आंत साचूं शकते.

या पृष्ठत्वचावरणविवराला लागून शरीराच्या पृष्ठभागीं हृतकलाविवर असतें व त्यालाच जोडून वृक्क (किडने) झालेलें असतें. या हृतकलाविरांमध्यें हृदय स्थापित झालेलें असतें व त्याला दोन कप्पे झालेले असतात. एक संचयकर्ण व दुसरा नि:सारकर्ण. संचयकर्णांत फुफ्फुसाच्या पृष्ठावरील एका मध्यवर्ती शिरेच्या मार्गानें रंगरहित रुधिर सांठतें व लगेंच तें नि:सारकर्णामध्यें जातें. नि:सारकर्णांतून तें एका धमनीवाटें बाहेर पडतें. या धमनीच्या शेंवटास दोन फांटे फुटून एक फांटा शरीराच्या पूर्वभागीं रक्त नेतो व दुसरा पश्चिमभागीं रक्त पोंचवितो. रक्तवाहिन्या पूर्णपणें सर्व शरीरभर झाल्या नसल्याकारणानें हें रक्त अंतररिंद्रियांच्यावरून व त्यांच्या मध्यंतरांतील कोनाकोपर्‍यांतून अभिसरण पावून प्रथमत: फुफ्फुसाच्या अधोभागीं एका रक्तशिरापात्रांत संचय पावतें व नंतर तेथून फुफ्फुसाच्या पृष्ठावरील रक्तवाहिन्यांतून अभिसरण पावतें व तेथें शुद्ध होऊन त्याच्या पृष्ठावरील मध्यवर्ती शिरांमध्यें येतें व नंतर हृदयाच्या संचयकर्णां पुन्हां जातें. फुफ्फुसाच्या पृष्ठावरील रक्तवाहिन्यांतून अभिसरण पावणारा कांहीं रक्ताचा भाग एका बाजूनें अगोदर वृक्कामध्यें जाऊन मग मध्यवर्ती शिरांमध्यें जातो. यामुळें रक्तांतून मूत्रमय द्रव्यें वृक्कांत काढून टाकली जातात व अशा रीतीनें रक्ताची शुद्धि होते.

या प्राण्यांत पचनेंद्रियव्यूह पचनेंद्रियनलिका व पाचकपिंड यांचें झालेलें असतें. पचनेंद्रियनलिका लांब असून तिचें वेटाळें असतें व तिचा शेंवटचा भाग पुन्हां उलटून शरीराच्या पूर्वभागीं त्वचावरणविवराच्या पूर्वकांठाजवळ येऊन बाहेर उघडतो. गोगलगाईमध्यें हें मलछिद्र फुफ्फुसाच्या मुखाखालीं लगतच उघडतें व त्याच ठिकाणीं वृक्कश्रोतसाचेंहि छिद्र उघडतें. मुखद्वाराला लागून वरच्या बाजूस एक खरबरीत जबडा बहुधां झालेला असतो. मुखद्वारापासून शीर्षाच्या भागांत मुखक्रोडकोश झालेला असतो व त्याची पोकळी ती मुखक्रोड होय. या मुखक्रोडाच्या तळाच्या भागापासून एक दंतपंक्तिवाहक टणक जिव्हेसारखा भाग झालेला असतो, त्याच्या पृष्ठावर एखाद्या चपट्या कानशीप्रमाणें असणारी दंतपंक्तियुक्त फीत अथवा जिव्हाकानस बसलेली असते. ती पुढेंमागें हलविली गेल्यानें खाल्लेल्या अन्नाचें चर्वण होतें. मुखक्रोडकोशाच्या पृष्ठापासून अन्ननलिका निघून ती पुढें थोडीशी विस्तार पावते व या विस्तार पावलेल्या भागावर बाहेरून दोन लालापिंड लागलेले असतात व त्यांचीं स्त्रोतसें मुखक्रोडांत उघडतात. अन्ननलिका पुन्हां संकुचित होऊन जठरामध्यें शेंवट पावते. या जठराच्या भागांत यकृतसमपिंडाचे स्त्रोतस उघडतात. जठरानंतर आंत्राचा भाग सुरू होऊन तो यकृतसमपिंडाबरोबर सुळक्याच्या भागांत वेटाळला जातो, व नंतर आंत्राचा शेंवटचा भाग उलट फिरून शरीराच्या पूर्वभागीं येतो व वर सांगितल्याप्रमाणें मलद्वारामध्यें शेंवट पावतो. गोगलगाय आपली उपजीविका बहुतकरून वनस्पतीवर करते.

या मृदुकाय प्राण्यांमध्यें ज्ञानेंद्रियव्यूह इतर उच्च दर्जाच्या अपृष्ठवंश प्राण्यांच्यासारखा पसरट नसून एकवटलेला असा झालेला असतो. ज्ञानपेशीसमूहांचें एकीकरण होऊन एखाद्या वलयाप्रमाणें त्याची रचना झालेली असते. हे ज्ञानपेशीसमूहांचें वलय किंवा कंकण मुखक्रोडकोशाच्या पाठीमागें लगतच अन्ननलिकेसभोंवतीं झालेलें असतें. या वलयाच्या पृष्ठावर म्हणजे अन्ननलिकेच्या वरच्या बाजूवर ज्ञानपेशीसमूहांची अथवा शीर्षज्ञानकंदांची एक जोडी ज्ञानरज्जूनें एकमेकाला जोडलेली असते, व हे दोन्ही समूह दोन बाजूंनीं पार्श्वज्ञानरज्जूंनीं अन्ननलिकेच्या उदरतलभागीं असलेल्या ज्ञानपेशीसमूहांच्या जोड्यांशीं जोडलेले असतात. ह्या दोन जोड्या म्हटल्या म्हणजे पादज्ञानपेशीसमूह अथवा पादज्ञानकंद व अंतरिंद्रियज्ञानपेशीसमूह किंवा अंतरिंद्रियज्ञानकंद यांच्या झालेल्या असतात. ह्या एकमेकांशीं ज्ञानरज्जूनें पूर्णपणें जोडलेल्या असतात व या सर्वांपासून ज्ञानरज्जू निघून त्या वर नामनिर्देश केल्याप्रमाणें शरीराच्या निरनिराळ्या सर्व भागांवर पसरलेल्या असतात. या प्राण्यांत मुख्यत: विशिष्ट ज्ञानेंद्रिय म्हटलें म्हणजे नलिकासमगात्रांच्या लांब जोडीच्या टोंकाला असलेले दोन चक्षू होत.

सर्व उदरतलमृदुकायप्राण्यांमध्यें जननेंद्रियसमूहाची रचना सारखी झालेली नसते. गोगलगाई व तसे दुसरे प्राणी म्हणजे वातश्वासीप्राणी उभयलिंगी असतात. परंतु ह्या वर्गातील दुसर्‍या काहीं प्राण्यांत लिंगभेद झालेला असतो जसें लिंपेट, कवडी, शंखु इत्यादि. गोगलगाय ही प्रतिरूप कल्पून वरील वर्णन दिलेलें आहे, तेव्हां गोगलगाईमध्यें जननेंद्रियांची रचना पुढें दिल्याप्रमाणें असते. हिच्या जननेंद्रियांची रचना श्रमविभागणीच्या तत्त्वावर केलेली दिसून येते. उभयलिंगी मुख्य जननेंद्रिय पांढुरक्या रंगाचें एकच असून तें यकृतसमपिंडाबरोबर शरीराच्या सुळक्याच्या टोंकाच्या भागांत झालेलें असतें. त्याला मुष्कांडकोश म्हणतात. याच्यामध्यें निरनिराळ्या वेळीं शुक्रबीज व अंडीं हीं तयार होतात. तेव्हां अर्थात एकच व्यक्तीच्या शरीरांतील शुक्रबीज व अंडीं यांचा संयोग होऊन तीं अंडीं फलद्रूप होऊं शकत नाहींत. अंडीं फलद्रूप होण्याकरितां नर आणि मादी अशी स्थितींत असलेल्या दोन व्यक्तींचा संयोग झालाच पाहिजे. या मुष्कांडकोश अथवा उभयलिंगी जननेंद्रियापासून एक पांढरें नागमोडी रीतीनें वेटाळलेलें असें उभयलिंगी श्रोतम निघालेलें असतें व तें एका पिंवळट रंगाच्या जिव्हाकृति बलकपिंडामध्यें शेवट पावतें. हें बलकपिंड शरीराची कमीजास्त प्रमाणानें जशी पक्व दशा असेल त्याप्रमाणें विकास पावलेलें असतें. त्यामध्यें एक स्निग्धबलकमय म्हणजे अल्ब्युमिनस रस बनतो व तो अंड्यांनां पोषक होतो. बलकपिंडापासून दुबारी नलिकेप्रमाणें एक श्रोतस बनतें व तें शरीराच्या पूर्वभागीं गति घेत जातें. या दुबारी स्त्रोतसाचा वरचा भाग चिंचोळ्या नलिकेप्रमाणें असून त्यांतून शुक्रबीजें पुढें वहात जातात. त्याचा खालचा भाग जाडा चुणीदार अथवा चुण्या पडल्यासारखा असून त्यांतून अंडीं पुढें येतात. या दोन्ही नलिकांच्या आंत रसविमोचक पेशी लागलेल्या असतात. शरीराच्या पूर्वभागीं शुक्रबीज ज्याच्यामधून पुढें येतें तो दुबारीस्त्रोतसाचा भाग त्याच्यापासून अलग होऊन व बराच आकुंचन पावून एक वेटोळें घेतो व मग शेंवटीं शिश्नामध्यें अंतर्भूत होतो. या आकुंचन पावलेल्या भागाला शुक्रस्त्रोतस म्हणतात. शिस्त्राचा भाग जननेंद्रियरंध्रावाटें बाहेर पडूं शकतो. हें जननेंद्रियरंध्र ज्या बाजूला फुफ्फुसमुख असतें त्या बाजूला त्याच्यापुढें चक्षुयुक्तगात्राच्या तळाजवळ असलेलें दिसतें. दुबारीनलिकेचा चुणीदार असलेला भाग-ज्याच्यामधून अंडीं पुढे येतात तो-बहुतेक सारखा सरळ जननेंद्रियरंध्राकडे जातो व त्या सर्वसाधारण छिद्रावाटे बाहेर उघडतो. या अंडस्त्रोतसाच्या भागापासून एक कमीजास्त प्रमाणानें विकास पावलेला शुक्रकोशाचा भाग त्याला लागून झालेला असतो. यांत संयोगकालीं दुसर्‍या व्यक्तिच्या शरीरांतून आलेलें शुक्रबीज सांठलें जातें. या शुक्रबीजाचा पुढें अंडीं घालतांना तीं फलद्रुप करण्यांत उपयोग केला जातो. शेवटीं एक अति विलक्षण असें इंद्रिय-जरी तें सर्व उदरतलमृदुकायामध्यें नसलें तरी-गोगलगाईंत झालेलें असतें व तें हेंच कीं जननेंद्रियरंध्रामध्यें उघडणारी एक थोडी साधारण मांसल व थोडी टणक अशी अंधनलिका अंडस्त्रोतसाच्या बाजूला असलेली अशी झालेली असते. तिला स्मर-शर-कोश असें म्हणतात. तिच्यामध्यें एक रतिकंटक तयार होऊन तो संयोगकालीं कामोद्दीपनार्थ एकमेकांच्या अंगांवर फेंकला जातो, अंडीं जमिनींत टाकलीं जातात व प्रत्येक अंडें लवचिक व चुनखडीक्षारयुक्त अशा कवचानें आच्छादिलेलें असतें. गोगलगाईंत अंडीं विकास पावतांना त्यांचीं रूपांतरें होत नाहींत. तसेंच गोगलगाईप्रमाणें या वर्गांतील स्थलचर प्राण्यांत रूपांतरें झाल्याशिवाय सरळ रीतीनें अंडीं विकास पावतात. जलचरांमध्यें रूपांतरें होतात.

प त्र स म श्वा सें द्रि य मृ दु का य, अ थ वा द्वि पु ट क व च मृ दु का य.-यास परशुसमपादमृदुकाय असेंहि म्हणतात. यांत शिंप, शुक्ति कालवे, हे प्राणी येतात. हा अपृष्टवंशांतील मृदुकायसंघाचा वर्ग आहे. पत्रसमश्वासेंद्रियमृदुकाय प्राणी जलचर असल्यामुळें ते समुद्रांत किंवा गोड्या पाण्यांत आढळतात. या वर्गांतील प्राण्यांचें शरीर सरळ राहून दोहों बाजूंनीं चपटलेलें असें वाढतें व त्यामुळें तें पार्श्वभागीं आकारशुद्ध अथवा उभयांगसदृश असें असतें. या वर्गांतील प्राण्यांत शीर्षाचा भाग निराळा व्यक्त होऊन बनलेला नसतो. त्यामुळें गोगलगाईप्रमाणें त्या शीर्षाला लागून झालेले अवयव म्हणजे गात्रांच्या जोड्या, वरचा जबडा, मुखक्रोडकोश, त्यांतील जिव्हा व तीवरील जिव्हाकानस व लालापिंड हीं या प्राण्यांत झालेलीं नसतात. यांचा आयुष्यक्रम रेतींत अथवा चिखलांत रूतून बसून बहुधां कंठिला जातो, त्यामुळें यांच्या अंगीं चपलता मुळींच नसते व त्या कारणानें यांच्या शरीराच्या उदरतलापासून वाढलेला मांसलपादाचा भाग जो असतो, त्याची आकृति परशु किंवा पाचराप्रमाणें बनलेली असते. व त्या पादाचें जें लाक्षणिक चिन्ह श्लेष्मपिंड, तो यांत झालेला असतो व त्यापासून चिकटणारे तंतू निघतात त्यामुळें हा प्राणी दुसर्‍या पदार्थाला चिकटून राहूं शकतो. कालव हा प्राणी आयुष्यभर समुद्रकिनार्‍यावर एखाद्या खडकाच्या दगडाला चिकटून रहातो व त्यामुळें कालवांत या पादाचा भाग वाढलेला नसतो. मृदुकायांचें जें एक महत्त्वाचें लाक्षणिक चिन्ह पृष्ठत्वचावरण तें प्रथमत: शरीराच्या पृष्ठभागापासून दोहों बाजूंवर त्वचेचा भाग शरीराच्या अलग असा वाढून उदरतलभागीं पसरून झालेलें असतें व उदरतलभागीं असलेल्या पादाला वेष्टण करतें. या पृष्ठत्वचावरणापासूनच शिंपला तयार होतो. या वर्गांतील प्राण्यांचें शरीर सरळ परंतु दोन्ही बाजूंनीं चपटलेलें असें झालेलें असल्यामुळें पृष्ठत्वचावरणाच्या उजवीकडील एक व डावीकडील एक असे दोन पडद्यांप्रमाणें भाग पडतात. यामुळें या वर्गांतील प्राण्यांत शिंपला दोन पुटांचा होतो व पृष्ठत्वचावरणाच्या कांठापासून शिंपल्याच्या पुटांची वाढ होत असते. तसेंच शरीराच्या पश्चिमशेवटीं या पृष्ठत्वचावरणाच्या कांठापासून या वर्गांतील पुष्कळ प्राण्यांत एकाखालीं एक अशा दोन उत्क्षेपणी मांसल नलिका तयार होतात. त्यांपैकीं खालचींतूनहि या पृष्ठत्वचावरणविवरामध्यें श्वासोच्छवासाची क्रिया होण्यास पाणी आंत येऊं शकतें व वरलींतून तें पाणी बाहेर जाऊं शकतें. उदाहरणार्थ “तिसरी” नांवाचा शिंपला. या उत्क्षेपणीनलिका एकमेकीपासून दूर किंवा एकमेकीस लागलेल्या अशा वेळेवर आलेल्या असतात. जे द्विपुटकावचमृदुकाय प्राणी रेतींत किंवा पंकामध्यें रुतून बसलेले असतात त्यांत या नलिका विशेष लांब वाढलेल्या असतात. त्यामुळें त्यांचीं टोंकें फक्त रेतीच्या किंवा पंकाच्या बाहेर पाण्यांत आलेलीं असतात. यायोगें श्वासोच्छावासाला लागणारे पाणी त्वचावरणविवराच्या आंतबाहेर येऊं शकतें. या पाण्याच्या प्रवाहांत तरंगणारे अन्नाचे कण सुद्धां या प्राण्याला अशा रीतीनें बसल्या जागीं मिळूं शकतात. कारण या प्राण्यांचें भक्ष म्हटलें म्हणजे पाण्यांत तरंगणारे सुक्ष्म प्राणी ( जीव ), वनस्पती किंवा अन्नमय पदार्थांचें कण होत. या मांसल उत्क्षेपणीनलिका प्राण्याच्या जीवास कांहीं धोका वाटल्यास ताबडतोब संकोच पावून कवचाच्या आंत ओढून घेतल्या जातात व कवचाचीं दोन्हीं पुटें एकदम मिटलीं जातात. कालवे वगैरे कांहीं प्राण्यांत डावीउजवीकडले त्वचावरणाचे पडदे अगदीं एकमेकांपासून निराळे असतात व त्यांच्यांत उत्क्षेपणीनलिका झालेल्या नसतात. या दोहोंमधली मध्यम स्थिति या वर्गांतील कांहीं प्राण्यांमध्यें आढळून येते ती ही कीं, ते दोन पडदे शरीराच्या पूर्वशेंवटीं व उदरतलभागीं त्यांच्या कांठांनीं एकमेकाला चिकटून रहातात व शेंवटीं त्यांचे कांठ अशा रीतीनें एकमेकाला चिकटतात कीं त्यामुळें तात्पुरतीं दोन उत्क्षेपणींछिद्रें एकावर एक अशीं तयार होतात व त्यांतून वर सांगितल्याप्रमाणें पाण्याचा प्रवाह चालू होतो. कवच किंवा शिंपला दोन पुटांचा झालेला असतो व तीं पुटें साधारणत: अगदीं एकसारखीं समान असून एकमेकाला पृष्ठभागावरील सांध्यानें जोडलीं जातात. या वर्गांतील कांहीं प्राण्यांत हीं दोन पुटें थोडीशीं लहान मोठीं अशीं असतात. परंतु कालव्यांमध्यें तर उजवें पुट अंतर्बाह्यकटाहाकृति बनून दगडाला नित्य चिकटलेलें असतें व डावें पुट सपाट असून झांकणाप्रमाणें झालेलें असतें. या वर्गांतील कांहीं प्राण्यांमध्यें हीं दोन पुटें पृष्ठावरील संधिरेषेच्या ठिकाणीं झालेल्या त्यांच्याधमील एका स्थितिस्थापक संधिवंधनानें नुसतीं जोडलेलीं असतात तर दुसर्‍यांमध्यें या संधिबंधनाशिवाय पुटांच्या पृष्ठकांठावर दांतरे व उथळी झालेल्या असून तीं एकमेकांशीं जुळून हा सांधा झालेला असतो. हीं कवचाचीं दोन पुटें एकमेकांशीं जुळून हा सांधा झालेला असतो. हीं कवचाचीं दोन पुटें एकमेकांशीं जुळून कवच बंद झालें म्हणजे हें संधिबंधन ताणलें जातें, व हीं कवचाचीं दोन पुटें त्याच्या स्थितिस्थापकत्वामुळें उघडलीं जातात. हें संधिबंधन पुटांच्या पृष्ठकांठावरील त्यांच्या चोंचीच्या पश्चिमभागीं झालेलें असतें. चोंच प्रत्येक पुटाला असून तिची दिशा शरीराचा पूर्व भाग दर्शविते. कवचाचीं दोन पुटें हीं त्यांच्या मध्यंतरी झालेले दोन गोलाकार संघट्टन मांसगुच्छ किंवा स्नायू यांच्या संकोचपावण्यानें मिटलीं जातात, व जेव्हां हे मांसगुच्छ किंवा स्नायु शिथिलता पावतात तेव्हां तीं संधिबंधनाच्या स्थितिस्थापकत्वानें उघडतात. हे संघट्टनस्नायु शरीराच्या पूर्व व पश्चिमशेवटीं बहुतकरून सारख्या प्रमाणानें विकास पावलेले असतात. परंतु कांहीं प्राण्यांमध्यें पूर्वसंघट्टनस्नायु कमी प्रमाणानें वाढलेला असतो व त्यामानानें पश्चिम-संघट्टन-स्नायु जास्त वाढलेला असतो. कित्येकांत तर पूर्वसंघट्टनस्नायु मुळींच झालेला नसतो व पुटें मिटण्याचें काम फक्त पश्चिमसंघट्ट्न-स्नायु एकटाच करतो. कालवांमध्यें हा पश्चिमसंघट्टन-स्नायु एकटाच झालेला असून विशेष विकास पावलेला असतो व तो त्यांच्या शरीराच्या मध्यभागीं झालेला दिसतो. हे संघट्टनस्नायू कवचपुटांच्या आंतल्या बाजूस मोतीशिंपल्यांच्या भागावर लागलेले असतात व त्यामुळें त्यांचे मोतीशिंपांच्या भागावर वर्तुळाकार वण उठलेले असतात. तसेंच या दोन पूर्व व पश्चिमशेवटीं असणार्‍या वणांनां जोडणारी एक वणरेषा प्रत्येक पुटावर खालच्या बाजूला दिसते, ती पृष्ठत्वचावरणाच्या खालच्या कांठामुळें पुटांवर झालेली रेषा होय. ही त्वचावरणदशावरणरेषा पश्चिम संघट्टनस्नायूजवळ कित्येक शिंपांच्या पुटांमध्यें कमानदार झालेली असते तर कित्येकांत ही कमान मुळींच झालेली दिसत नाहीं. ही त्वचावरणदशावरणरेषेची कमान होण्याचें कारण उत्क्षेपणी नलिका होत. त्या ज्या प्रमाणांवर झालेल्या असतील त्याप्रमाणें त्यांच्या संकोचविकास पावण्यानें ही रेषा कमानदार झालेली असते. याशिवाय कांहीं दुसरे लहान लहान व्रण पुटांवर संघटनस्नायूवणाजवळ झालेले असतात.

प्रत्येक पूटतीन घटकथरांचें झालेलें असतें. पुटाच्या बाहेरचा पृष्ठघटकभाग शृंगमयच पातळ पदार्थाचा झालेला असून तो पापुद्र्याप्रमाणें पुटाच्या बाहेरचा पृष्ठभाग आच्छादितो. त्याच्या आंतील दुसरा घटक भाग चुनखडीक्षारयुक्त किंवा खडूसारख्या पदार्थाचे चतु ष्कोणाकृति सूक्ष्म ( स्फटिक ) परमाणू रचून झालेला असतो. पुटांचे हे दोन घटकभाग पृष्ठत्वचावरणाच्या उदर तलाच्या कांठावरील रसविमोचक पेशींमुळें बनले जातात. पुटाचा यांच्या आंतील तिसरा घटक भाग म्हटला म्हणजे पुटाचा आंतील पृष्ठभाग होय. तो मोतीशिंपाचा झालेला असतो व त्याला चमक असते. हा मोतीशिंपल्याचा भाग पृष्ठत्वचावरणाच्या (बहि:पृष्ठाच्या) एकंदर भागावरील रसविमोचक पेशींमुळें तयार होतो. यामुळें कित्येक द्विपुटकवचकांमध्यें एखाद्या वेळीं एखादा अतिसूक्ष्म रेतीचा कण पुटाच्या व ह्या त्वचावरणाच्या बहि:-पृष्ठाच्या भागामध्यें सांपडला गेल्यास त्या कणासभोंवतीं मोतीशिंपल्याचें वेष्टण तयार होतें व अशा रीतीनें कांहीं जातींचीं मोतीं विशेष जातीच्या शिंपल्यामध्यें तयार होतात. परंतु मौल्यवान मोतीं कांहीं जातीच्या या वर्गांतील प्राण्यांच्या शरीराच्या मृदु भागांत तयार होतात. तीं सुद्धां शिंपल्याचें वेष्टण होऊनच झालेलीं असतात. परंतु तें वेष्टण त्या प्राण्यांच्या शरीरांतील एखाद्या परिपूर्तितावस्थेंत असलेल्या परान्नपुष्ठ जीवाच्या सभोंवतीं झालेलें असतें. पुटांच्या बाह्यपृष्ठावर एकाखालीं एक अशा मंडलाकार असलेल्या रेषा, या पुटांची वाढ त्वचावरणाच्या उदरतलकांठापासून कशी क्रमाक्रमानें सारखी झाली हें दर्शवितात.

पूर्व व पश्चिम संघटनस्नायूंचा छेद केला असतां हीं दोन कवचांचीं पुटें उघडतात. तीं तशीं उघडलीं असतां पृष्ठत्वचावरणाचा भाग प्रत्येक पुटाच्या आंतील पृष्ठाला लागलेला दिसतो. व त्याच्या पश्चिमशेवटीं उत्क्षेपणीनलिका असल्यास दिसून येतात. त्वचावरणाचा हा शरीरावरील पडदा वर उचलला असतां त्याच्या खालीं दोन जलश्वासेंद्रियें पापुद्र्याप्रमाणें शरीराच्या प्रत्येक बाजूला लागलेलीं दिसतात. या पापुद्र्याप्रमाणें असणार्‍या जलश्वासेंद्रियांच्या मधून थोडासा पूर्वभागीं पादाचा भाग बाहेर आलेला दिसतो. हा पाद खालच्या बाजूला मांसल असा झालेला असतो. हृतकलाविवर हें पृष्ठाच्या मध्यभागीं संधिबंधनाच्या खालीं दिसतें व त्यांत असलेला हृदयाचा नि:सारकर्णकप्पा बहुतकरून दिसूं शकतो. पूर्वसंघट्टणस्नायूखालीं मधोमध मुखद्वाराचें छिद्र असतें व त्या मुखद्वारछिद्राच्या दोन्ही बाजूंनां दोन जोड्या साधारण त्रिकोनाकृति अशा चेतनाधरपत्रांच्या लागलेल्या असतात. आंत्राचें शेवट म्हणजे मलद्वाराचा भाग, हा पश्चिमसंघट्टणस्नायूवर टेकून असतो. पृष्ठत्वचावरणाच्या दोन्ही पडद्यांच्यामधील पोकळीला त्वचावरणविवर म्हणतात. जलश्वासेंद्रियें या विवरांत शरीराच्या प्रत्येक बाजूला झालेलीं असतात व तीं प्रत्येक बाजूस शरीराला अशा तर्‍हेनें लागलेलीं असतात कीं त्यामुळें या विवराच्या प्रत्येक बाजूवरील पोकळीचे दोन भाग झालेले दिसतात. एक मोठा भाग, ज्याच्यांत जलश्वासेंद्रियें लोंबत राहिलेलीं असतात, वं ज्यांत खालची उत्क्षेपणीनलिका आंतून उघडते तो होय, व दुसरा भाग म्हटला म्हणजे जलश्वासेंद्रियें उगम पावलेल्या शरीराच्या पृष्ठाच्या कांठावरचा त्वचावरणविवराचा राहिलेला अरुंद भाग-ज्याच्या पश्चिमशेवटीं वरची उत्क्षेपणीनलिका आंतून उघडते व जिच्यामधून पाण्याचा प्रवाह बाहेर काढून टाकण्यांत येतो तो-होय. या प्राण्यांचें अन्न म्हटलें म्हणजे पाण्यावर अति सूक्ष्म तरंगणारे प्राणी ( जीव ) किंवा वनस्पती किंवा अन्नमय पदार्थांचे कण होत. ते खालच्या उत्क्षेपणीनलिकेंतून त्वचावरणविवरांत आलेल्या पाण्याच्या प्रवाहानें मुखद्वाराकडे लोटले जातात व नंतर मुखद्वारानें पचनेंद्रियांत शिरतात.

पचनेंद्रियाची रचना म्हणजे मुखापासून लहानशी अन्ननलिका निघते ती जठरामध्यें विस्तार पावते या जठरासभोंवतीं दोहों बाजूवर उदी रंगाचें पाचक पिंड लागलेलें असतें व त्याला प्रत्येक बाजूस एक एक अशीं दोन स्त्रोतसें असतात व तीं या जठरांत उघडतात. जठराच्या पुढच्या टोंकापासून आंत्राचा भाग निघतो व शरीरांत त्याचे बरेच वेटाळे झालेले असतात. नंतर त्या आंत्राचा शेवट वरच्या पृष्ठभागाकडे वळून बहुतकरून हृतकलाविवरांमधून हृदयाच्या नि:सारकर्णाला वेधून पश्चिमशेवटीं संघट्टणस्नायूला टेकून वरच्या उत्क्षेपणी नलिकेच्या आंतल्या टोंकाजवळ मलद्वारानें उघडतो.

हृदय हें शरीराच्या पृष्ठावर मध्यभागीं हृतकलाविवरांत असतें. त्याला एक नि:सारकर्णकप्पा असतो व या नि:सारकर्णाला उजव्या बाजूनें जोडलेलें एक उजवें संचयकर्ण व डाव्या बाजूनें जोडलेलें एक डावें संचयकर्ण असे दुसरे दोन कप्पे असतात. प्रत्येक संचयकर्णकप्पा पातळ असून एका पडद्यानिशीं छिद्रानें नि:सारकर्णांत उघडतो. नि:सारकर्णकप्पा विशेष मांसल असून आंत्राच्या शेवटल्या पृष्ठावरच्या भागासभोंवतीं परिपूर्तितावस्थेत विकास पावतो व त्यामुळें आंत्राचा हा शेवटचा भाग नि:सारकर्णाला वेधून बाहेर पडल्याप्रमाणें दिसतो. कालवें व कांहीं इतर जातींमध्यें हृदय हें आंत्राच्या शेवटच्या भागाखालीं विकास पावतें तर इतर कांहीं जातींमध्यें त्याच्यावर झालेलें असतें. नि:सारकर्णाच्या पूर्वटोंकापासून पूर्वरक्तवाहिनी निघते व ती आंत्राच्यावरून गति घेत रंगरहित रक्त शरीराच्या पूर्वभागाला आपल्या शाखांनीं पुरविते. तसेंच हृदयाच्या पश्चिमटोंकापासून पश्चिमरक्तवाहिनी निघते व ती आंत्राच्या खालून गति घेत शरीराच्या पश्चिमभागाला रक्त पोहोंचविते. रक्तवाहिन्यांच्या बारीक शाखा सर्वत्र बनलेल्या नसून त्या शरीरांत एकदम शेवट पावतात. त्यामुळें रक्त अंतरिंद्रियांच्या मध्यंतरांतील कोनाकोपर्‍यांतून जशी जागा मिळेल तसें अभिसरण पावतें. शेवटीं हें सर्व रक्त हृतकलाविवराच्या खालीं दोहोंबाजूंनां असलेल्या वृक्कांच्या उदरतलभागीं एका मध्यवर्ती शिरेमध्यें एकवटून वृक्कांमध्यें जातें. तेथें रक्तांतून अशुद्ध मूत्रद्रव्यें काढून टाकण्यांत येतात. वृक्कांमधून अभिसरण पावून रक्त श्वासेंद्रियांत जातें. श्वासेंद्रियांतून अभिसरण पावतांना तें शुद्ध होतें व नंतर तें संचयकर्णांमध्यें सांठतें व त्यांच्यांतून नि:सारकर्णांमध्यें येतें. पुष्कळसें रक्त पृष्ठत्वचावरणामध्यें अभिसरण पावतें व पृष्ठत्वचावरणामधून अभिसरण पावलेलें रक्त एकदम संचयकर्णांमध्यें जातें. तेव्हां पृष्ठत्वचावरणांत अभिसरण पावत असतांना रक्त शुद्ध होतें. रक्ताला रंग नसून त्यांत पुष्कळ श्वेतपेशी असतात.

जलश्वासेंद्रियें हीं जाळीदार दोन पापुद्र्यांप्रमाणें शरीराच्या बाह्यभागीं प्रत्येक बाजूला पृष्ठत्वचावरणाच्या पडद्यानें आच्छादित अशीं झालेलीं असतात. त्यांच्या पृष्ठावर केशयुक्त पेशी लागलेल्या असतात. या केसांच्या संकोचविकासानें पाण्याचा प्रवाह आंत येतो व बाहेर जाऊं शकतो. तेव्हां पाणी श्वासेंद्रियांवरून वहात गेल्यामुळें पाण्यांत विरघळलेला प्राणवायु श्वासेंद्रियांतून अभिसरण पावणार्‍या रक्ताला शोषून घेतां येतो. तसेंच रक्तांतील कर्बाम्ल ( कर्बानिकल अ‍ॅसिड ) वायु रक्तांतून बाहेर पडून पाण्यांत मिसळतो. अशा तर्‍हेनें रक्ताची शुद्धि होते. पाण्याचा प्रवाह खालच्या उत्क्षेपणीनलिकेंतून त्वचावरणविवराच्या श्वासेंद्रियें असलेल्या खालच्या भागांत प्रथम येतो व नंतर तो शरीराच्या पूर्वशेवटीं मुखावरून परत फिरून श्वासेंद्रियांच्या वरील त्वचावरणविवराच्या अरुंद भागांतून जाऊन वरच्या उत्क्षेपणीनलिकेंतून बाहेर पडतो. श्वासेंद्रियें जाळीदार असल्याकारणानें त्यांच्या जाळींतून पाणी निघून एकदम त्वचावरणविवराच्या वरच्या अरुंद भागांत जाऊं शकतें. श्वासोच्छावासाची क्रिया होण्यास पृष्ठत्वचावरणाचा बराच उपयोग होतो कारण त्यांतून अभिसरण पावणारें रक्त या पाण्याच्या प्रवाहानें शुद्ध होतें. या पाण्याच्या प्रवाहाचा दुसरा असा एक उपयोग होत असतो तो हा कीं, यांत तरंगणारे अन्नरूपी कण मुखद्वाराकडे लोटले जातात. या वर्गांतील कांहीं जातींच्या प्राण्यांच्या माद्यांमध्यें जलश्वासेंद्रियांच्या बाह्य पापुद्र्याला परिपूर्तितावस्थेंत असून विकास पावत असलेली प्रजा चिकटून राहिलेली असते; तेव्हां या पृष्ठत्वचावरणविवरांत प्रजेचें रक्षण होतें व पोषणहि होतें.

ज्ञानेंद्रियव्यूह बहुतकरून ज्ञानपेशीसमूहांच्या अथवा ज्ञानकंदांच्या तीन जोड्यांचा झालेला असतो. पहिली ज्ञानकंदांची जोडी म्हणजे शीर्षज्ञानकंदांची जोडी, ही मुखाच्या वरच्या बाजूला झालेली असते. ती ज्ञानरज्जूंनीं एकमेकींशीं संलग्न असून मुखाच्या सभोंवतालच्या शरीराच्या भागाला ज्ञानरज्जू पुरविते. त्यांतील प्रत्येक ज्ञानकंदापासून दोहोंबाजूंवर एकएक पार्श्वज्ञानरज्जु निघते व त्या दोन पार्श्वज्ञानरज्जू पादज्ञानकंदांच्या जुळलेल्या जोडीला दोन्हीं बाजूंनीं जोडल्या जातात. यामुळें अन्ननलिकेसभोंवतीं ज्ञानरज्जूंचें वलयाकार वेष्टण होतें. पादज्ञानकंदांची जुळलेली जोडी पादाचा मांसल भाग जेथें सुरू होतो तेथें मधोमध असते. त्यांतून पादाच्या भागाला ज्ञानरज्जू जातात. तिसरी अंतरिंद्रियज्ञानकंदांची जुळलेली जोडी पश्चिमसंघट्टनस्नायूच्या खालीं लगत झालेली असते. तींतून ज्ञानरज्जू निघून सर्व इंद्रियांवर पसरलेले असतात. व ही ज्ञानकंदांची जोडी पहिल्या दोन जोड्यांशीं ज्ञानरज्जूंनीं जोडलेली असते.

या वर्गांतील प्राण्यांत मुख्यत: विशिष्ट ज्ञानेंद्रिय म्हटलें म्हणजे प्रत्येक बाजूवर एक एक लहान ज्ञानकंद किंवा लहानसा ज्ञानपेशीसमूह जलश्वासेंद्रियांच्या पश्चिमशेवटीं जेथें खालच्या उत्क्षेपणीनलिकेचें आंतलें टोंक असतें तेथें झालेला असतो हें होय. त्याला उदकपरीक्षासाधन किंवा उदकनिकषेंद्रिय अथवा मृदुकायघ्राणेंद्रिय असें म्हणतात. याच्यामुळें जलश्वासेंद्रियांवर वहाणार्‍या पाण्याचें गुणावगुण समजतात. या वर्गांतील प्राण्यांच्या प्रजोत्पादनाची क्रिया बहुधा लिंगभेंद होऊन झालेली आढळते. नर आणि मादी अशा निरनिराळ्या व्यक्ती असतात. परंतु कांहीं जातींत उभयलिंगी प्राणी आढळतील व जननेंद्रियहि एकच असतें. तरी उभयलिंगी प्राण्यांत शुक्रबीज व अंडीं एकाच वेळेस त्या एकट्या जननेंद्रियांत तयार होत नाहींत. उदा. कालवे. बहुतकरून हें जननेंद्रिय प्रथमत: विकास पावलें असतां पुंजननेंद्रियाप्रमाणें वागून त्यांतून शुक्रबीज बाहेर टाकतें, व नंतर तें स्त्रीजननेंद्रियाप्रमाणें वागून अंडीं बाहेर टाकूं लागतें. कोणताहि प्रकार घडत असला तरी त्याचें बाह्यरूप दिसण्यांत सारखें रहातें व तें पाचकपिंडासभोंवतीं प्रत्येक बाजूस झालेलें असतें व त्याला प्रत्येक बाजूस एक बारीक स्त्रोतस असतें. याशिवाय दुसरा कोणताहि सहकारी भाग जननेंद्रियाला लागून झालेला नसतो. बहुतकरून अंडीं वरच्या उत्क्षेपणीनलिकेंतून बाहेर जाणार्‍या पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर पडतात व तेथें तशाच रीतीनें बाहेर आलेल्या शुक्रबीजाशीं संयोग पावून फलद्रुप होतात. फलद्रुप झालेलीं अंडीं विकास पावतात व तीं विकास पावतांना त्यांच्यांत रूपांतरें झालेलीं दिसून येतात.

या वर्गांतील गोड्या पाण्यांत रहाणार्‍या कांहीं प्राण्यांत जेव्हां मादी अंडीं घालू लागते तेव्हां तीं अंडीं बाहेर निघून न जातां पृष्ठत्वचावरणविवरांत बहि:श्वासेंद्रियांच्या बाह्यपृष्ठभागाला चिकटून रहातात. व जेव्हां मादी श्वासोच्छवासाकरितां पाणी आंत खालच्या उत्क्षेपणीनलिकाद्वारें घेते तेव्हां त्या पाण्याच्या प्रवाहांतून नराच्या शुक्रबीजासुद्धां तीं आंत येतात. अशा प्रकारानें त्वचावरणविवरांत अंडीं शुक्रबीजाशीं संयोग पावून फलद्रूप होतात. फलद्रूप पावलेलीं अंडीं नंतर त्वचावरणविवरांतच श्वासेंद्रियांच्या बहि:पृष्ठाला चिकटून राहून विकास पावतात. हीं विकास पावत असलेलीं अंडीं परिपूर्तितावस्थेंतून जात असतांना रूपांतर पावतात. शेवटलें रूपांतर पावल्यावर मादी, एखादा मासा तिच्या जवळून जात असल्यास या रूपांतर पावलेल्या प्रजेला ताबडतोब स्वत:च्या श्वासोच्छवासाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर काढून टाकिते. शेवटलें रूपांतर पावलेलें परंतु परिपूर्तितावस्था अजून पूर्ण झाली नाहीं अशा तर्‍हेचे हे प्रजारूप शैशव जेव्हां बाहेर पाण्यांत येतात तेव्हां ते चटकन त्या माशाच्या शेपटाला किंवा त्याच्या परांनां बाह्यपरान्नपपुष्ट प्राण्यांप्रमाणें बिलगून राहतात व तसेच लागलेले असतांना पूर्णत्व पावल्यावर ते माशाला सोडून अलग होतात. मासे पाण्यांत जवळून जात असतांना ह्यांनां लगेच त्यांच्या सान्निध्याचें ज्ञान होतें. माशाच्या भागांना चिकटण्याची संधि त्यांनीं जर गमाविली तर ते पाण्यांत तळाला जाऊन मरुन पडतात.

शी र्ष पा द मृ दु का य अ थ वा म्हा कू ल स मू ह.-शीर्षपादमृदुकाय हा अपृष्ठवंशांतील मृदुकायसंघाचा एक वर्ग आहे. या वर्गांतील मृदुकाय प्राणी जलचर असून ते सर्व समुद्रवासी आहेत व त्यांपैकीं कांहीं फार खोल पाण्यांत रहातात. यांच्यांत शरीराची रचना उच्च दर्जाची झालेली दिसून येते. या वर्गांतील प्राण्यांमध्यें शरीराला शीर्षाचा भाग चांगला स्पष्टरीतीनें झालेला असून तो कबंधापासून मानेच्या भागामुळें व्यक्त होतो. शीर्षाला एक चक्षूंची जोडी चांगल्या रीतीनें विकास पावलेली अशी लागलेली असते. तसेंच तोंडाच्या भागाला पक्ष्यांच्या सारखे चंचुवत मजबूत जबडे लागलेले असून मुखक्रोडांत जिव्हाकानस झालेली असते. हे प्राणी फार खादाड असून मांसभक्षक आहेत. हा शीर्षाचा भाग मधोमध अलग राहून त्याच्या सभोंवतीं गात्रें झालेलीं असतात. हीं गात्रें या वर्गांतील कांहीं प्राण्यांत आठ असतात व कांहींमध्यें दहा असतात. दहा असलीं तर त्यापैकीं आठ आंखूड असून दोन त्यांच्यापेक्षां जास्त लांब असतात. म्हाकूळाला दहा गात्रें असतात.

मृदुकायप्राण्यांतील एक लाक्षणिक चिन्ह म्हणजे उदरतलाच्या भागापासून वाढलेला मांसलपाद हें होय. या प्राण्यांत हा पाद झालेला असतो. या पादाचा पूर्वभाग शरीराच्या या पूर्वशेवटीं मानेच्या भागासभोंवतीं पृष्ठावर जणूं कांहीं वाढूनच विभागला जातो व त्याच्या या विभागून झालेल्या मांसल भागांचें गात्रांत रूपांतर होऊन हीं गात्रें झालेलीं असतात. या प्राण्यांनां भक्ष पकडण्यास हीं गात्रें उपयोगीं पडतात. या गात्रांनां पादशुंडा म्हणतात. ह्या पादशुंडा बहुतकरून मुखाच्या सभोंवतीं मध्याच्या डाव्या व उजव्या बाजूस जोडीनें झालेल्या असतात. प्रत्येक पादशुंडिकेला तुंबड्याप्रमाणें पुष्कळ लहान लहान चोषण-वाट्या लागलेल्या असतात. प्रत्येक चोषणवाटीचा मोकळा कांठ थोडासा पातळ पापुद्र्याप्रमाणें असतो व वाटीच्या आंत एक गोलाकार वरखालीं हलूं शकेल असा घट्ट दट्ट्या झालेला असतो. या दट्ट्याच्या हालचालीमुळें पाण्याच्या दाबानें कोणत्याहि बाह्य पदार्थाला चोषणवाटी लागली असतां तुंबडीप्रमाणें चिकटून राहूं शकते. या वर्गांतील प्राणी अशा रीतीनें दुसर्‍या प्राण्याला चिकटून राहूं शकतात किंवा आपल्या भक्षाला चोषणवाट्या चिकटवून तें तोंडाजवळ आणूं शकतात. या वर्गांतील म्हाकूळाप्रमाणें कित्येक प्राण्यांचें शरीर इतकें प्रचंड वाढलेलें असतें कीं ते प्राणी या चोषणवाट्यांमुळें मनुष्याला सुद्धां पाण्यांत बुडवूं शकतात.

या पादाचे पश्चिमशेवटाचे कांठ जणूं कांहीं उदरतलभागीं वळून जाऊन एकमेकांशीं संयोग पावलेले दिसतात व त्यामुळें शरीराच्या उदरतलभागीं एक प्रकारची गळणी बनलेली दिसते. या गळणीची तोटी कबंधाच्या भोंवतीं असलेल्या मृदुकायाच्या लाक्षणिक पृष्ठत्वचावरणविवराच्या बाहेर आलेली असते व हें पृष्ठत्वचावरणविवर शरीराच्या पूर्वशेवटीं उघडें असून पश्चिमशेवटीं बंद झालेलें असतें. कबंधाभोंवतीं असलेलें हें लाक्षणिक पृष्ठत्वचावरण या वर्गांतील प्राण्यांत मांसल असून तें कबंधाच्या पश्चिमशेवटापर्यंत पसरलेलें असतें व गळणीचा आंतील मुखाचा भाग यानें आच्छादिलेला असतो. त्यामुळें गळणीच्या आंतील मुख या पृष्ठत्वचावरणविवरांत उघडतें. ह्या पृष्ठत्वचावरणाचा पूर्व कांठ मोकळा असून त्याच्या परिघाला या शेवटीं आंतून अशा रीतीनें उंचवटे झालेले असतात कीं ते पादाच्या गळणीच्या बाजूच्या भागांतील उथळ्यांत बरोबर बसूं शकतात. या योजनेमुळें जेव्हां पृष्ठत्वचावरणाचे स्नायू संकोच पावतात, तेव्हां पृष्ठत्वचावरणविवरांत बाहेरून आलेलें पाणी त्याच्यांतून ( त्याच्या आंता मिटलेल्या काठांतून ) बाहेर जाऊं शकत नाहीं; पण तें गळणीवाटे फक्त बाहेर जाऊं शकतें. तेव्हां हे प्राणी अशा रीतीनें पृष्ठत्वचावरणविवरांत आलेलें पाणी गळणीच्या तोटीच्या द्वारें पुष्कळ जोरानें बाहेर काढून टाकतात. बाहेर काढून टाकलेल्या या पाण्याच्या वेगामुळें असा परिणाम होतो कीं, ह्या प्राण्यांनां त्यामुळें उलट दिशेस जाण्यास गति मिळते व अशारितीनें या प्राण्यांनां पाण्यांत हालचाल करण्याचें हें एक साधन होतें. म्हाकूळासारख्या प्राण्यांत त्वचेचा भाग कबंधाच्या दोन बाजूंस परांप्रमाणें वाढलेला असतो व त्याच्या हालचालीमुळें म्हाकूलाला पाण्यांत तरंगण्याचें दुसरें साधन झालेलें असतें. हे प्राणी समुद्रांत कुशलतेनें पोहूं शकतात; तसेंच खडकामध्यें दबा धरून सरपटूं शकतात. म्हाकूळाच्या त्वचेमध्यें कामरूप रंगपेशी पसरलेल्या असतात त्यामुळें बाह्य परिस्थितींत फरकझाल्यानें किंवा प्राण्याच्या मनाचा क्षोभ झाल्यानें कातडीच्या रंगांत बदल होऊं शकतो.

या वर्गांतील प्राण्यांत शरीराच्या कबंधाचा भाग सरळ, लांबट गोलाकार असा झालेला असतो व तो गोगलगायीप्रमाणें वेटाळला गेला नसल्यामुळें या प्राण्यांच्या शरीराची ठेवण बहुधा पार्श्वभागीं आकारशुद्ध अथवा उभयांगसदृश अशी झालेली असते. शरीराला कवच असतें किंवा नसतें. म्हाकूळाप्रमाणें या वर्गांतील प्राण्यांत कवच अंतरभागीं पृष्ठत्वचावरणांत झालेलें असतें. म्हाकूळाच्या कवचाला समुद्रफेंस, समुद्रफेन किंवा डिंडीर असें म्हणतात. परंतु या वर्गांतील नॉटीलस नांवाच्या प्राण्यांचें शरीर बाह्यत: कवचानें आच्छादित झालेलें असतें व त्यामुळें त्यांच्या शरीराचें संरक्षण होतें.

या वर्गांतील प्राण्यांच्या अंतरिंद्रियांचीं रचना साधारणत: म्हाकूळाच्या अंतरिंद्रियांप्रमाणेंच असते, तेव्हां म्हाकूलांच्या अंतरिंद्रियांचें संक्षिप्त वर्णन दिलें असतां चालेल. तें वर्णन पुढीलप्रमाणें आहे:- या प्राण्यांत ज्ञानेंद्रियसमूह गोगलगायीप्रमाणें तीन ज्ञानपेशीसमूहांच्या किंवा ज्ञानकंदांच्या एकमेकांशीं संयुक्त असलेल्या जोड्यांचा झालेला असतो. या ज्ञानकंदांच्या तीन जोड्या मुखक्रोड कोशाच्या पाठीमागें लगतच अन्ननलिकेसभोंवतीं एकवटून कंकणाप्रमाणें तिच्याभोंवतीं लागून झालेल्या असतात. शीर्षज्ञानकंदांची जोडी पूर्वपृष्ठभागीं असून पादज्ञानकंद व अंतरिंद्रियज्ञानकंद यांच्या जोड्या उदरतलभागीं असतात परंतु त्या एकमेकींशीं इतक्या गुंतून बनलेल्या असतात कीं त्यांचीं एकमेकीची मर्यादा स्पष्टपणें एकदम कळणें कठिण पडतें. या वर्गांतील ज्ञानेंद्रियसमूहासंबंधीं एक मुख्य गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे ती ही, कीं हें ज्ञानेंद्रियकंकण एका टणक संयोजक धातूनें आच्छादिलेलें असतें व हे संयोजकधातू तंतुमय तरुणास्थीचे बनलेले असल्यामुळें जणूं कांहीं ज्ञानेंद्रियसमूहासभोंवतीं एकाप्रकारची करोटी झालेली आहे असा भाग होतो. विशिष्ट ज्ञानेंद्रियें म्हटलीं म्हणजे चक्षूंची एक जोडी होय. हे चक्षू शीर्षाच्या दोहोंबाजूंस झालेले असतात व ते सपृष्ठवंश प्राण्यांच्या चक्षूंप्रमाणें असलेले दिसतात. म्हाकूळ हा प्रकाशप्रिय आहे. तो दिव्याच्या उजेडानें पाण्याच्या पृष्ठावर येतो.

या प्राण्यांच्या पचनेंद्रियांची रचना थोडीबहुत गोगलगाईच्याप्रमाणें झालेली असते. या प्राण्यांचें भक्ष अशा प्रकारचें असतें कीं त्याचे तुकडे करून चर्वण होणें इष्ट असतें व त्यामुळें यांच्या तोंडाला एका टणक धातूचे दोन जबडे झालेले असतात व ते स्नायूंच्या योगानें हालवितां येतात. तसेंच मुखक्रोडांत जिव्हेवर जिव्हाकानस झालेली असते. मुखक्रोडकोशाचें बाह्यछिद्र म्हणजे तोंडाचा भाग हा पादशुंडेच्या मधोमध झालेला असून वर सांगितलेले दोन मजबूत जबडे शुक्रचंचूच्या आकृतीप्रमाणें त्याला लागलेले असतात व ते एकमेकांवर हलूं शकतील असेच बसलेले असतात. मुखक्रोडांत एक मांसल जिव्हा झालेली असून तिच्यावर जिव्हाकानस बसलेली असते. या जिव्हाकानसेमुळें अन्नाचें चर्वण होतें. मुखक्रोडापासून सरळ अरुंद अशी एक अन्ननलिका ज्ञानेंद्रियकंकणाच्या आंतून निघून कबंधाच्या शेवटीं एका रुंद जठरामध्यें उघडते. या जठरामध्यें यकृतसम पाचकपिंडाचे स्त्रोतस उघडतात. जठरापासून अन्नाचा भाग निघतो. व तो पूर्व दिशेस वळण घेतो व त्याची गति शरीराच्या पूर्वशेवटीं असून तो पृष्ठत्वचावरणविवरांत गळणीच्या आंतील मुखाजवळ मलद्वारांत शेवट पावतो. ज्या ठिकाणीं जठरापासून आंत्राचा भाग निघतो त्या ठिकाणीं एक रुंद असा अंधांत्राचा भाग झालेला असतो. एक लहानसें द्वित्तलालापिंड मध्याच्या प्रत्येक बाजूस एक एक भाग असें शीर्षाच्या भागांत झालेलें असून त्याच्या प्रत्येक भागापासून एकएक अशीं निघालेलीं दोन स्त्रोतसें एकवटून मुखक्रोडामध्यें उघडतात. नॉटीलस प्राण्यांत लालापिंड झालेलें असतें.

यकृतसमपाचकपिंड उदी रंगाचें, मोठें वाढलेलें व दोन भागांचें मिळून झालेलें असून कबंधाच्या बहुतेक मध्यभागाच्या शेवटपर्यंत पसरलेलें असतें. त्याचा प्रत्येक भाग स्वतंत्र असून त्या प्रत्येक भागापासून एक एक स्वतंत्र स्त्रोतस निघून ज्या ठिकाणीं जठरांत्र व अंधांत्र हीं संयुक्त झालेलीं असतात त्या ठिकाणीं दोहोंबाजूंवर तीं दोन्ही जठरामध्यें उघडतात. या स्त्रोतसांच्या या अंतिम शेवटाच्या भागाला पुष्कळ लहान लहान अंधनलिकांप्रमाणें भाग वाढून त्यांचा एक गुच्छ होऊन तो लागलेला असतो. हा गुच्छ रसविमोचक असल्यामुळें त्याला ‘पक्वपिंड’ असें म्हणतात.

एक चमत्कारिक रसविमोचक कोश, या प्राण्यांत व या वर्गांतील नॉटीलस खेरीजकरून बहुधा सर्व प्राण्यांत जठराच्या बाजूला परंतु त्याच्यापासून अलग असा झालला असतो व त्यांत एक अगदीं काळ्याकुट्ट रंगाचा पदार्थ तयार होतो. याला ‘मसीकोश’ असें म्हणतात. याचा अन्नाच्या पचनक्रियेशीं कांहीं संबंध नसतो. या कोशापासून एक स्त्रोतस निघून तें पूर्वशेवटीं आंत्राच्या मलद्वाराच्या छिद्रांत उघडतें. जेव्हां हा प्राणी भय पावतो किंवा त्याचा दुसर्‍या प्राण्यानें पाठलाग केलेला असतो तेव्हां तो हा काळ्याकुट्ट रंगाचा पदार्थ गळणीच्या पृष्ठत्वचावरणविवरांतून बाहेर पाण्यांत टाकतो. त्यामुळें आजूबाजूचा सर्व पाण्याचा प्रदेश काळाभोर होऊन जाऊन कांहींहि दिसेनासें होतें. ही संधि साधून हा प्राणी अशा रीतीनें शत्रूपासून आपला बचाव करतो व सुटका करून घेऊन संरक्षण पावतो. हा काळ पदार्थ घट्ट काळ्या शाईप्रमाणें असून त्याची एक प्रकारची काळी शाई बनवितात. खोल पाण्यांत रहाणार्‍या या वर्गांतील प्राण्यांवर कांहीं जातीचे देवमासे आपली नेहमींच उपजीविका करतात. हेच ह्या प्राण्यांचे मुख्य शत्रू होत. नाहींतर हे प्राणी साधारणत: खादाडच असून पुष्कळ निरनिराळ्या प्राण्यांचा संहार करतात.

या प्राण्यांत रुधिराभिसरणाची क्रिया हृदयामुळें होते. हृदय हृतकलेनें आच्छादित असतें व तें कबंधाच्या पश्चिमभागीं झालेलें असतें. हृदयाला मधोमध एक नि:सारकर्ण असून त्याच्या प्रत्येक बाजूला एक एक संचयकर्ण लागलेलें असतें. नि:सारकर्णांतून एक पूर्वगामी धमनी निघून तिच्या शाखांतून शरीराच्या पूर्व भागाला रुधिर पोंचविलें जातें. तसेंच नि:सारकर्णाच्या पश्चिमभागांतून एक पश्चिमगामी धमनी निघून शरीराच्या पश्चिमभागीं रुधिर पोंचविते. रक्तवाहिन्या पूर्णपणें सर्व शरीरभर तयार झालेल्या नसल्यामुळें रुधिर अंतरिंद्रियांच्यावरून तर त्यांच्या मध्यंतरांतील कोनाकोपर्‍यांतून अभिसरण पावतें. शीर्षाच्या भागांतून अभिसरण पावून अशुद्ध झालेलें रक्त प्रथमत: पादशुंडांच्या तळाशीं असलेल्या एका कंकणाकार शिरापात्रांत एकवटतें व नंतर एका मुख्य मध्यवर्ती शिरेच्यामार्गें पश्चिमभागीं गति घेत येतें. ही मुख्य मध्यवर्ती. शीर वृक्काच्या भागांत दुभागून जाऊन तिची प्रत्येक शाखा वृक्काच्या प्रत्येक बाजूच्या भागांतून बाहेर निघून त्या त्या बाजूच्या जलश्वासेंद्रियाकडे वळते व जलश्वासेंद्रियांत रक्त नेते. तेथें रक्त शुद्ध होतें. जलश्वासेंद्रियांतहि शीर शिरण्यापूर्वी तिला शरीराच्या पश्चिम भागांतून अभिसरण पावून अशुद्ध झालेलें रक्त आणणार्‍या दुसर्‍या शिरा जोडल्या जातात. ही संयुक्तश्वासेंद्रियप्रति शीर जलश्वासेंद्रियांत शिरतांना प्रत्येक बाजूच्या जलश्वासेंद्रियाच्या तळाशीं थोडीशी फुगते व या फुगलेल्या भागाचें हृदयाच्या एखाद्या कप्प्याप्रमाणें एका अधिक संकोचविकासच कप्प्यामध्यें रूपांतर होतें. या अधिकतर कप्प्याला हृदयाचा श्वासेंद्रियकर्ण म्हणतात. अशा रीतीनें हे दोन श्वासेंद्रियकर्ण झालेले असतात. यांच्यामुळें सर्व शरीरांतून अभिसरण पावून आलेलें अशुद्ध रक्त जलश्वासेंद्रियांत अभिसरण पावतें व तेथें शुद्ध होऊन एका श्वासेंद्रियानि:सारशिरेवाटें हृदयाच्या प्रत्येक बाजूवरल्या संचयकर्णांत जातें व या दोन्हीं संचयकर्णांमधून रक्त निःसारकर्णात येतें व नंतर सर्व शरीरभर वर सांगितल्याप्रमाणें अभिसरण पावतें. हृदयामध्यें पडद्यांची रचना झालेली असल्यामुळें रक्त एकाच दिशेनें वहात असतें. हें रक्त रंगविहीन असतें.

या प्राण्यांत पृष्ठत्वचावरणविवरामध्यें पृष्ठ्त्वचावरणाला लागून मध्याच्या प्रत्येक बाजूस एक, अशीं दोन जलश्वासेंद्रियें झालेलीं असतात. तीं उभी, पसरट पापुद्र्याप्रमाणें असून थोडीशीं पक्ष्यांच्या पंखांप्रमाणें दिसतात. पृष्ठत्वचावरणविवरांत त्यांच्या मोकळ्या कांठांतून आलेलें पाणी या जलश्वासेंद्रियांत खेळत असतें, व त्यामुळें या पाण्यांत विरघळलेल्या प्राणवायूनें या जलश्वासेंद्रियांत अभिसरण पावणार्‍या रक्ताची शुद्धि होते. नॉटीलस प्राण्यांत हीं जलश्वासेंद्रियें चार असतात व जलश्वासेंद्रियांच्या तळाला लागलेले हृदयाचे श्वासेंद्रियकर्ण झालेले नसतात.

या प्राण्यांत वृक्काची रचना नेहमींप्रमाणें नसून वृक्क हें एका मोठ्या दुहेरी पोकळ पिशवीप्रमाणें झालेलें असतें. या पिशवीची प्रत्येक बाजू एका छिद्रानें मलद्वारछिद्राजवळ उघडते व पिशवीच्या प्रत्येक भागांतून वर सांगितल्याप्रमाणें मुख्य शीर दुभागून गेलेली असते.

या वर्गांतील प्राण्यांत जननेंद्रियांसंबंधीं पाहातां लिंगभेद आढळून येतो. परंतु नर व मादी यांत बाल्यावस्थेंत बाह्यत: फारसा फरक दिसून येत नाहीं. तथापि म्हाकूळ व त्यासारखे इतर प्राणी यांच्यामध्यें परिणतदशा प्राप्त झाली असतां नराच्या डावीकडील पांचव्या पादशुंडेमध्यें बाह्यत: फरक झालेला दिसतो व त्यामुळें तो ओळखतां येतो. हा फरक या पादशुंडेला शुक्रबीजगुच्छ चिकटतात त्यामुळें होतो. नरामध्यें शरीराच्या पश्चिमशेवटाच्या भागांत शरीरगुहेंत एका कोशाप्रमाणें मुष्क झालेला असून त्याच्यापासून एकच शुक्रस्त्रोतस निघतें. हें शुक्रस्त्रोतस प्रथमत: वेंटाळलेलें असून पुढें तें थोडेसें लांबवर फुगतें. ह्या फुगलेल्या भागाला शुक्राशय म्हणतात व याच्यांत शुक्रबीज सांठून त्याचे गुच्छ तयार होतात. हें शुक्राशय पुढच्या भागाला आणखी जास्त फुगून एखाद्या कोशाप्रमाणें बनतें. या जास्त फुगून कोशाप्रमाणें झालेल्या भागाला शुक्रबीजकोश किंवा नीढ्याम कोश असेंहि म्हणतात. याच्यांत शुक्रबीजगुच्छांचा संचय होतो. त्याच्या पुढचा स्त्रोतसाचा भाग शरीराच्या पूर्वशेवटीं गति घेत पृष्ठत्वचावरणविवरांत मध्याच्या डावीकडे शिश्नद्वारां उघडतो.

मादीमध्यें मुष्काच्या ऐवजीं त्याच ठिकाणीं एक अंडकोश झालेला असतो व त्यापासून सुद्धां एकच स्त्रोतस निघतें. हें स्त्रोतस रुंद असून शरीराच्या पूर्वशेवटीं गति घेत पृष्ठत्वचावरणविवरांत मलद्वाराच्या डाव्या बाजूस उघडतें. मादीमध्यें दुसरे सहकारी पिंडरूपी कोश असतात, त्यांपैकीं एक मुख्य जोडी मसीकोशाच्या दोहोंबाजूंस लागलेली असते. याच्यांतल्या रसानें अंडीं बाहेर टाकिलीं म्हणजे ती एकमेकांस चिकटून राहूं शकतात. परिपूर्तितावस्थेंत अंडीं रूपांतरें न पावतांना सरळ सारख्या रीतीनें विकास पावतात. या वर्गांतील प्राण्यांचे मुख्य दोन गण आहेत: एक द्वि:श्वासेंद्रियशीर्षपाद व दुसरा चतु:श्वासेंद्रियशीर्षपाद. पहिल्या गणांत म्हाकूळ व त्यासारखे नेहमीं आढळणारे शीर्षपाद प्राणी मोडतात दुसर्‍या गणांत आजच्या कालांत जिवंत आढळणारे शीर्षपादप्राणी म्हणजे नॉटीलस हे येतात. [ ले. प्रो. वि. ना हाटे. ]

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .