प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

मेसापोटेमिया - आशिया. यूफ्रेटीस व तैग्रिस नद्यांच्यामधील प्रदेशाला मेसापोटेमिया असें नांव आहे. याच्या दक्षिणेस बाबिलोनिया, उत्तरेस आर्मेनियांतील टारसचा डोंगराळ प्रदेश, पश्चिमेस सीरियाचा प्रदेश व पूर्वेस ऊसीरिया अशा मर्यादा आहेत. यूफ्रेटिस, तैग्रिस, खाबूर, बेलिख, थरथार या मुख्य नद्या आहेत. करजदाघ हा ज्वालामुखी पर्वत आहे. संसत, रक्का, डेरएझ झॉर, आन, मोसळ, तैक्रित, एडेस्सा, हरान, मार्डिन, निसिबी हीं प्रमुख शहरें आहेत. मेसापोटे मियामधील प्राचीन प्रसिद्ध शहरांचीं स्मृतिचिन्हें अद्यापिहि दृष्टीस पडतात. अद्यापि येथें संशोधन व खनन फारसें झालेलें नाहीं. बेलीख व युफ्रेटीस या नद्यांमधील जमीन फार सुपीक आहे. संजर पर्वताच्या उत्तरेकडील मैदानें लागवडीखालीं आणण्यासारखीं आहेत. या पर्वताच्या दक्षिणेकडील टापूंत माळरान असून त्यांत सेलेनाईट व जिप्सम मुबलक सांपडतें. हिटजवळ बिटुमेनचें अस्तित्वहि दिसून येतें. मेसापोटेमियामध्यें सर्व प्रकारचें हवामान आढळून येतें.

मेसापोटेमियाचें क्षेत्रफळ १४३२५० चौरस मैल व लोकसंख्या २८४९२८२ आहे. राज्यव्यवस्थेसाठीं याचे बगदाद, बस्त्रा व मोसल असे तीन विभाग (विलायत) व १५ जिल्हे (लिवा) पाडण्यांत आले आहेत. या प्रदेशांतील लोक मुख्यत: अरब व मुसुलमान असून त्यांच्या कुर्द, तुर्कोमन, शमर इत्यादि अनेक जाती आहेत. अरबी, तुर्की, कुर्दी, इत्यादि प्रमुख भाषा आहेत. ज्या प्रांतामध्यें ज्या भाषेचे लोक अधिक असतील तेथें त्या भाषेंतून शिक्षण दिलें जातें. मेसापोटेमिया स्वतंत्र झाल्यापासून इराकसरकार शिक्षणाविषयीं अधिक काळजी घेऊं लागलें आहे. सरकारी व खाजगी मिळून सुमारें ३०० प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत. याशिवाय धंदेशिक्षण, कायदा, लष्करी शिक्षण इत्यादिकांच्याहि शाळा स्थापन झाल्या आहेत. बगदाद विश्वविद्यालयाची इमारत बांधली जात आहे. वरिष्ठ व कनिष्ठ न्यायकोर्टें स्थापन करण्यांत आलीं आहेत. १९२३-१९२४ सालीं मेसापोटेमियाचें उत्पन्न ५०३११६४५ रुपये व खर्च ४१२९०७४५ रुपये होता. येथें तेलाचा धंदा मोठ्या प्रमाणावर चालतो. कैयरह व मंडाली येथें पेट्रोलियमच्या विहिरी असून अँग्लोपर्शियन कंपनीचा त्यांच्यावर ताबा आहे. गहूं, खजूर, कापूस, तांदूळ, ही मुख्य पिकें आहेत. १९२३ सालीं १८००९७२१३ रुपयांच्या मालाची आयात व १३४१६७१२८ रुपयांच्या मालाची निर्गत झाली. बस्त्रा हें प्रमुख व्यापारी बंदर आहे.

इ ति हा स.-मेसापोटेमियामधील अगदीं मूळचे रहिवाशी कोणते यासंबंधींची विश्वसनीय माहिती लागत नाहीं. मेसापोटेमियाचा स्पष्ट उल्लेख ख्रि. पू. २५०० वर्षांपूर्वीं सांपडतो. त्या वर्षी बाबिलोनियाचा राजा लुगलझगिसी हा मेसापोटेमियामध्यें आला होता. यानंतरच्या काळांत सेमिटिक, हिटाइट, आर्मेनियन इत्यादि अनेक लोकांनीं मेसापोटेमियावर कांहीं काळ आपली सत्ता गाजविली. पुढें सायरस यानें मेसापोटेमिया आपल्या ताब्यांत आणिला. अलेक्झांडरनें आपल्या स्वारींत मेसापोटेमिया जिंकून घेतला व त्यामुळें मेसापोटेमियामध्यें ग्रीक संस्कृति व ग्रीक राज्यपद्धति बरीच फैलावली. पुढें पार्थियाचा राजा मिथ्रिडेटस याच्या ताब्यांत मेसापोटेमियाचा प्रदेश आला व दुसर्‍या मिथ्रिडेटसच्या पार्थियन साम्राज्यांत त्याचा अंतर्भाव होऊं लागला. पुढें सस्सानियन घराण्यांच्या अमदानींत अर्देसर व शापूर यांनीं मेसापोटेमिया जिंकून आपल्या सत्तेखालीं आणिला. तथापि थोडक्याच काळांत अरबांनीं इराणी लोकांपासून मेसापोटेमिया जिंकून घेतला. पुढें ख्रिस्ती शकाच्या तिसर्‍या शतकांत रोमन लोकांनीं या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. पण ही सत्ता फार वेळ अबाधित राहूं शकली नाहीं. थोडक्यांच काळानंतर रोमन व इराणी लोकांमध्यें लढाया सुरू झाल्या व त्यामुळें मेसापोटेमिया हें जवळ जवळ रणक्षेत्रच बनून गेल्यासारखें झालें. सहाव्या शतकामध्येंहि अशाच प्रकारें रोमन व फारशी यांच्यामध्यें मेसापोटेमिया जिंकण्याबद्दल अहमहमिका सुरू होती. शेवटीं ७ व्या शतकाच्या उत्तरार्धांत अरब लोकांनीं मेसापोटेमियावर स्वारी करून तो सर्व प्रांत आपल्या ताब्यांत आणिला. या अरबी सत्तेचे मेसापोटेमियावर अनेक प्रकारचे परिणाम घडून आले. मेसापोटेमियांतील देशी सीरियाक लीपि जाऊन तिच्याबदलीं अरबी लिपि प्रचारांत आली. अरबी भाषा व वाङ्‌मय यांचा मेसापोटेमियांत प्रसार होऊं लागला व सीरियाक वाङ्‌मयाला ओहोटी लागली. ९ व्या शतकामध्यें कांहीं काळपर्यंत ईजिप्तचा अहंमद इब्न तुलून व त्याचा मुलगा यांच्या ताब्यांत मेसापोटेमिया गेला. तथापि थोडक्याच काळांत अरबांनीं तो पुन्हां जिंकून घेतला. या शतकांत ताघलिब येथील अरब जातींच्या हमदानीद शाखेच्या ताब्यांत मेसापोटेमिया होता. पुढें नासिर अमदौला व सैफ अददौला या बंधूंच्या ताब्यांत तो आला. त्यानंतर ११ व्या शतकामध्यें सेलजूक घराण्यानें या प्रांतावर राज्य केलें. या घराण्याच्या कारकीर्दींत मेसापोटेमियामध्यें लहान लहान राज्यें अस्तित्वांत आलीं. ११४४ सालीं सुलतान झंगीच्या मुलानें सर्वच मेसापोटेमिया आपल्या अंमलाखालीं आणला. ११८५ त सलादिननें या सर्व प्रांतावर ईजिप्तची सार्वभौम सत्ता स्थापन केली. तेराव्या शतकामध्यें मोंगलांची धाड या देशावर येऊन त्यांनीं मेसापोटेमियाचा बहुतेक भाग जिंकला. तथापि चौदाव्या शतकांत आर्टोकिड घराण्यानें पुन्हां अरब सत्तेखालीं हा प्रदेश आणिला. या घराण्याच्या अंमलाखालींच मेसापोटेमियाचा प्रख्यात कवि शफी अददिन हिल्ली हा उदयास आला. पुढें तैमूरच्या स्वारीनंतर करकुयुनली घराण्याच्या ताब्यांत मेसापोटेमिया आला. शेवटीं सोळाव्या शतकामध्यें ओस्मानली येथील तुर्की लोकांनीं मेसापोटेमियावर आपली सत्ता स्थापन केली व अशा रीतीनें आटोमन सलतानांच्या ताब्यांत हा देश आला व विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या कांहीं काळापर्यंत तो तुर्कांच्याच ताब्यांत होता. या अवधींत तुर्कांनीं मेसापोटेमियामध्यें बर्‍याच सुधारणा घडवून आणल्या. बंडखोर अरब जातींचा मोड करून मेसापोटेमियांत शांतता प्रस्थापित केली, शेतकीला योग्य अशी जमीन लागवडीखालीं आणिली, ठिकठिकाणीं लष्करीं ठाणीं बसविलीं व अशा रीतीनें अनियंत्रित कां होईना तथापि निश्चित अशी राज्यपद्धति सुरू केली. विसाव्या शतकाच्या सुरवातीस तुर्की साम्राज्यांतच बरेचसे कलह उपस्थित झाले व तरुण तुर्क पक्ष अधिक बळावत चालला. त्यामुळें जुन्या राजपक्षामध्यें व या नवीन पक्षामध्यें झगडे सुरू झाले. शेवटीं १९०८ सालीं हा नवीन पक्ष अधिकारारूढ झाला. त्यामुळें इतर तुर्की साम्राज्याबरोबरच मेसापोटेमियाला थोडे फार फायदे झाले. त्यांतल्या त्यांत नांव घेण्याजोगे फायदे म्हणजे मेसापोटेमियांतील लोकाप्रीत्यर्थ तुर्क सरकारनें केलेली शिक्षणयोजना व पाणीपुरवठ्याची योजना हे होत. याशिवाय मेसापोटेमियांतील प्रांतिक कौन्सिलांच्या ताब्यांत शिक्षण व आरोग्य हीं खातीं देण्यांत आलीं. त्यामुळें मेसापोटेमियाचा बराच फायदा झाला. मेसापोटेमियांत ब्रिटिशांचें हितसंबंधहि बरेच होते. पण तुर्की सरकार हें ब्रिटिशांचें हितसंबंध जेणेंप्रकारें कमी होतील असें धोरण ठेवीत असे. या धोरणाला जर्मन लोकहि अंतस्थ रीतीनें पाठिंबा देत असत. महायुद्ध सुरू होतांच प्रथम प्रथम तुर्की सरकारनें तटस्थपणा राखला होता. तरी पण त्यांची वृत्ति ब्रिटिशांच्या विरुद्ध होती. पण थोडक्याच दिवसांत जर्मनीची बाजू तुर्कस्ताननें स्वीकारली व ब्रिटिशांशीं उघडपणें वैर सुरू केलें. मेसापोटेमियांतील ब्रिटिश हिंदी लोक पकडून त्यांची मालमत्ता हिरावून घेण्यांत आली. बगदादची वकिलांत ही ताब्यांत घेण्यांत येऊन तेथील ब्रिटिश वकिलाला गचांडी देण्यांत आली. तेव्हां ब्रिटिशसरकारनें हिंदुस्थानांतून आपलें सैन्य मेसापोटेमियांत धाडलें. या सैन्यानें फाओ व बस्त्रा हीं ठाणीं ताब्यांत घेतलीं. यानंतर हळू हळू ब्रिटिशांनीं मेसापोटेमियाचा सर्व भाग आपल्या ताब्यांत आणला व आपली राज्यव्यवस्था सुरू केली. तथापि मेसापोटेमियांतील असंतुष्ट अरब लोकांनीं ब्रिटिशसत्तेपुढें सहजासहजीं मान वाकविली नाहीं. महायुद्ध संपतें न संपतें तोंच या अरब लोकांनीं बंड उभारलें. या बंडाचीं कारणें काय होतीं याबद्दल निरनिराळीं मतें प्रतिपादन करण्यांत येतात, पण त्यांतील मुख्य व सयुक्तिक कारण म्हणजे अरब लोकांची स्वातंत्र्य मिळविण्याची प्रबळ इच्छा हें होय. मेसापोटेमियामध्यें अरबांचें स्वतंत्र राज्य असावें अशी अरबांची इच्छा असणें स्वाभाविकच होतें व त्यामुळें त्यांनीं हें बंडाचें निशाण उभारलें असावेंसें दिसतें. पण हें बंड ब्रिटिशांनीं सहज शमविलें. १९१८ च्या नोव्हेंबर महिन्यांत इंग्रज व फ्रेंच सरकारांनीं असा जाहीरनामा काढला होता कीं, मेसापोटेमियांत व त्याचप्रमाणें तुर्कांच्या सत्तेखालीं असणार्‍या इतर राष्ट्रांनां तुर्कांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त करून त्यांच्या इच्छेप्रमाणें राज्यकारभाराचें धोरण आंखण्यांत येईल. अर्थात या जाहीरनाम्याप्रमाणें वागणें हें लोकलज्जेस्तव कां होईना इंग्लंडला भागच होतें. तेव्हां राज्यकारभाराच्या बाबतींत लोकांचें मत काय आहे हें अजमावण्याकरितां इंग्रज सरकारनें मेसापोटेमियांतील लोकांच्या पुढें (१) मोसलचा मेसापोटेमियांत अंतर्भाव व्हावा किंवा नाहीं, (२) मेसापोटेमियाचा राज्यकारभार अमीर नेमून चालवावा कीं काय (३) व तसें असल्यास कोणाला अमीर नेमावें, असे तीन प्रश्न ठेवले होते. पहिल्या प्रश्नाला लोकांनीं अस्तिपक्षी उत्तर दिलें. पण पुढील दोन प्रश्नांसंबंधीं लोकमत पाहातां, निदान कांहीं वर्षें तरी अमीर नेमण्यांत येऊं नये असें लोकमत दिसून आलें. पुढें मेसापोटेमियाचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या देखरेखीखालीं रहावा असें यूरोपमधील प्रमुख राष्ट्रांनीं ठरविलें, व तो कोणत्या तत्त्वांवर चालविला जावा याचा कच्चा मसुदा बाल्फोर साहेबानें राष्ट्रसंघाच्या संमतीकरितां पाठवून दिला. या मसुद्यांत, परराष्ट्रीय राजकारणाचीं सूत्रें ब्रिटिशसरकारच्या ताब्यांत रहावयाचीं, इतर कोणत्याहि परक्या राष्ट्राला मेसापोटेमियाच्या राज्यकारभाराच्या बाबतींत ढवळाढवळ करूं द्यावयीचा नाहीं, मेसापोटेमिया हें स्वतंत्र राष्ट्र समजलें जावयाचें, राष्ट्रसंघात सामील असलेल्या सर्व राष्ट्रांनां मेसापोटेमियांत सारख्या सवलती मिळावयाच्या, इत्यादि महत्त्वाचीं कलमें आहेत. या मसुद्याला राष्ट्रसंघानें संमति दिली आहे. यानंतर मेसापोटेमियाचा राज्यकारभार पहाण्याकरितां एका सभेची निवडणूक होईपावेतों, तेथील राज्यकारभार पहाण्याकरितां एक ब्रिटिश हायकमिशनर व त्याच्या हाताखालीं एक अरब मंत्रिमंडळ नेमण्यांत आलें. १९१९ सालीं अमीर नेमण्याच्या विरूद्ध लोक होते पण १९२१ सालीं अमीर निवडण्याबद्दल लोकमत अनुकूल झालें व त्याप्रमाणें फैजलची प्रचंड बहुमतानें निवडणूक होऊन स. १९२१ च्या आगस्ट महिन्याच्या २३ व्या तारखेस बगदाद येथें फैजलला राज्याभिषेक झाला. १९२१ सालच्या नंतरच्या इतिहासाबद्दल ‘इराक’ पहा.

[ संदर्भग्रंथ:-बेव्हन-दि लँड ऑफ दि टू रिव्हर्स (१९१७); लायेल-दि इन्स अँड औट्स ऑफ मेसापोटेमिया (१९२१); मॅक्सवेल-ए ड्वेलर इन मेसापोटेमिया; मोबर्ले- दि कँपेन इन मेसापोटेमिया; सोन-टु-मेसापोटेमिया अँड कुर्दिस्तान इन डिसगाइज (१९२१); स्टीव्हन्स-बाय टैग्रिस अँड युफ्रेटिस (१९२१); बेल-रिव्ह्यू ऑफ दि सिव्हिल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ मेसापोटेमिया (१९२०). ]

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .