विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
म्हैसाणा - बडोदें राज्याच्या चार प्रांतांपैकीं कडी प्रांताचें मुख्य स्थळ हें अहमदाबाद-दिल्ली लाईनवर अहमदाबादच्या उत्तरेस ४० मैलांवर रेल्वेचें मोठें जंक्शन आहे. लोकवस्ती १२०००. मुख्य वस्ती जैन व हिंदु. महाराष्ट्रीय वस्ती सुमारें ३००. येथें महाराष्ट्रीयांनीं वीस वर्षांपासून चालविलेली एक सार्वजनिक संस्था आहे. आंधळे व बहिरेमुके यांची शाळा, हायस्कूल, मराठी व गुजराथी शाळा, सार्वजनिकपुस्तकालय, वाटरवर्क्स, म्युनिसिपालिटी, डिस्ट्रिक्ट व तालुका लोकलबोर्डे या संस्था व बडोदें सरकारचा राजवाडा, जैन देवालयें वगैरें इमारती आहेत.