प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

ह्मैसूर, सं स्था न.- हिंदुस्थानांतील एक प्रमुख संस्थान. ह्मैसूर हें नांव महिषासुरमर्दिनी किंवा चामुंडा देवीनें महिषासुराला मारलेल्या प्रसंगाच्या स्मरणार्थ दिलें असें म्हणतात. महिष (म्हैस) + ऊरू (देश) = ह्मैसूर, अशी याची व्युत्पति आहे. उत्तरेस व वायव्येस धारवाड व उत्तरकानडा हे जिल्हे आणि नैर्ऋत्येस कूर्ग संस्थान असून बाकी सर्व बाजूंस मद्रास इलाखा आहे. याचे स्वाभावत:च दोन भूभाग झाले असून त्यापैकीं पश्चिमेकडील डोंगराळ भागास मलनाडा व पूर्वेकडील पठारास मैदान म्हणतात. संस्थानचें क्षेत्रफळ (बंगलोरचें सिव्हिल व लष्करी ठाणें सोडून) २९४६९ चौ. मैल आहे. लोकसंख्या (१९२१) ५९७८८९२ असून त्यांत शेंकडा ९२ हिंदु आहेत. भाषा मुख्यत्त्वें कानडी असून तिच्या खालोखाल तेलगु व तामीळ या आहेत.

सह्याद्रि व पूर्वघाट यांचा संधि नीलगिरी पर्वतानें या संस्थानांत होतो. त्यामुळें संस्थानच्या प्रदेशाची सरासरी उंची २ ते ३ हजार फूट आहे. मलनाडांत सुंदर देखावे असून मैदानांतील जमीन सुपीक आहे. दक्षिण-पश्चिम भागांत कालवे पुष्कळ आहेत, त्यामुळें तांदूळ व ऊंस फार पिकतो. मुलेनगिरी हें पर्वतशिखर संस्थानांत सर्वांत उंच (६३१७) आहे. खेरीज बाबाबूदन (६०००), नंदिदुर्ग, विलीगिरी, श्रावणदुर्ग, शिवगंगा, मद्दगिरी, नागमंगल, निदुगल इत्यादि ६ ते ४ हजार फूट उंचीपर्यंतचीं इतर शिखरें आहेत. नद्या बहुतेक पूर्ववाहिनी आहेत. त्यांत कृष्णा, कावेरी, पेन्नार, पोनियार, पालार, तुंगभद्रा, वेदवती या मुख्य आहेत. पश्चिमेकडे वाहणार्‍या लहान लहान नद्या मिळून गैरसप्पाचा धबधबा बनतो. कृत्रिम तळीं ३० हजार आहेत. सर्वांत मोठें तळें सुळे केरे हें ९० मैल क्षेत्रफळाचें आहे.

मलानाडांत इमारती लांकूड चांगलें होतें; दक्षिण भागांत हत्ती बरेच आहेत. रानटी हत्ती पकडण्याचें एक सरकारी खेड्डा नांवाचें खातें आहे. इकडे जास्तींत जास्त उष्णमान ६४० ते ८४० पर्यंत असतें. पावसाचें मान २० ते ४० इंच (सह्याद्रींत कोठें कोठे ३०० इंचहि आहे) असतें. उन्हाळ्यांत कधीं कधीं आंब्याच्या हंगामांत पाऊस पडतात. सन १७९३ मध्यें या संस्थानांत हवामान जाणण्याचें खातें स्थापन झालें.

इतिहास:-या प्रांताचा प्राचीन इतिहास गुंतागुंतीचा आहे. या प्रांतांतील कांहीं ठिकाणांचा सुगावा रामायण-महाभारतांतहि लागतो. अशोकाच्या राज्यांत ह्मैसूरचा ईशान्येकडील प्रांत येत होता; त्यानंतर आंध्र राज्य झालें. तिसर्‍या ते आठराव्या शतकापर्यंत तीन निरनिराळ्या राजवंशांची सत्ता या प्रांताच्या निरनिराळ्या भागांवर अस; वायव्य भागावर कदंब, पूर्व व उत्तर भागावर पल्लव आणि दक्षिण व मध्यभागावर गंग हे राजे राज्य करीत असत. या घराण्यांची माहिती त्या त्या नांवानें स्वतंत्र दिलेली आहे. अकराव्या शतकांत चोलांचा अंमल बसला, परंतु त्यांनां पुढील शतकांत होयसळांनीं हांकलून दिलें. त्यांनीं दोन शतकें राज्य केल्यावर चौदाव्या शतकांत ह्मैसूर प्रांत विजयानगरच्या साम्राज्यांत समाविष्ट झाला. या शतकाच्या शेवटींच सांप्रतच्या राजघराण्याचा ह्मैसूरशीं प्रथम संबंध आला.

म्हैसूरच्या राजांची वंशावळ आढळते ती अशी:-विजय (१३९९-१४२३), हिरेबेट्टाद चामराज (१४२३-५८), तिम्मराज (१४५८-७८), आरनेरल चामराज (१४७८-१५१३) व बेट्टाद (१५१३-५२); याला तीन मुलगे होते. त्यांत राज्य विभागलें गेलें. वडील, मुलगा आपनतिम्म (१५५२-७१) याला हेमनअल्ली गांव मिळालें. याचा निर्वंश झाला. दुसरा मुलगा कृष्ण याला केंबळ गांव मिळालें, याचाहि, निर्वंश झाला. तिसरा मुलगा हिरे चामराज, (१५७१-७६) याला ह्मैसूर मिळालें. विजयानगर पडल्यावर (१५६४) हा स्वतंत्र बनला. मुप्पिनदेव (१५७६-७८) नंतर उडीयार (१५७८-१६१७) यानें राज्यविस्तार करून श्रीरंगपट्टण काबीज केलें (१६१०). याचा पुत्र नरसराज; हा बापाच्या देखत मेला. नंतर त्याचा मुलगा चामराज (१६१७-३७) राजा झाला. त्याच्यामागें त्याचा भाऊ इम्मदी राजा (१६३७-३८) गादीवर आला परंतु त्याचा खून होऊन त्याचा चुलत भाऊ कंठीरवनरस (१६३८-५९) हा राजा झाला. यानें आदिलशाहीची स्वारी परतवून स्वत:चें नाणें पाडलें व श्रीरंगपट्टणाची तटबंदी केली. हा निपुत्रिक असल्यानें पुढें केंपदेवराज दोड्ड हा राजा झाला (१६५९-७२). बेदनूरचा शिवाप्पा नायक यानें देवराजावर केलेल्या स्वारींत देवराजानें त्याचा पराभव केला आणि मदुरेच्या नायक राजापासून एरोड घेतलें. याचा पुतण्या चिक्कदेव (१६७२-१७०४) यानें लिंगायत धर्म सोडून वैष्णवधर्म स्वीकारला. हा चांगला राजा होऊन गेला. यानेंच तंजावरचा एकोजी (व्यंकोजी) राजा भोंसले याच्यापासून बंगलोर विकत घेतलें व आणीक मुलूख मिळवून राज्य वाढविलें. यानें जमीनमहसुलाची पद्धति सुधारली व टपालाची अंची पद्धत सुरू केली. त्याचा मुलगा कंठीरवराज मुकरसु (१७०४-१४), त्याचा दोड्ड कृष्णराज (१७१४-३१); हा निर्बल असल्यानें राज्यास उतरती कळा लागली. चामराज (१७३१-३३) हा कृष्ण राजामागून राजा झाला. हाहि दुर्बल असल्यानें त्याचा चुलत भाऊ दळवाय देवराज यानें त्याला कैदेंत टाकलें. या घराण्यांत दळवाय म्हणजे सेनापतीचा अधिकार राजघराण्यांतच चालत असे. देवराजाच्या कारकीर्दींत अंदाधुंदी होऊन मुसुलमानांचा वरचष्मा झाला. त्यांनीं राजघराण्यांतील एका नामधारी राजास पुढें करून सर्व राज्यकारभार आपल्या हातांत घेतला. चामराजानंतर चिक्क उर्फ इम्मदी कृष्ण (१७३४-६६), व तिम्मराज (१७६६-७५) हे राजे झाले. तिम्म निपुत्रिक होता म्हणून हैदरनायकानें चामराज नांवाचा एक पुरुष गादीवर बसविला तो सन १७९६ त मेला. परंतु या वेळचे ह्मैसूरचे खरे राजे हैदर (१७६६-८२) व टिप्पू (१७८२-९२) हेच होते.

टिप्पू मेल्यावर इंग्रज कंपनीनें सांप्रतच्या चतु:सीमेंत मोडणारें म्हैसूर संस्थान पूर्वींच्या राजघराण्यांतील महाराज श्रीकृष्णराज वडैय्यर बहाद्दूर (तिसरा) याच्या हवाली केलें. पुढें राज्यांत याच्या उधळेपणामुळें कांहीं बंडाळीं माजल्यानें इंग्रज कंपनीनें म्हैसूरचा कारभार १८३१ मध्यें आपल्या हातीं घेतला. तो १८८१ त राजे चामराजेंद्र वडैय्यर यांच्या हवालीं कांहीं अटीवर करण्यांत आला. या महाराजानें सर शेषाद्री अय्यर (पहा) या दिवाणाच्या मदतीनें आगगाडी, कालवे, सोन्याच्या खाणी उघडणें, शिक्षणसंस्था, दवाखाने स्थापणें, इत्यादि कृत्यांनीं संस्थान पुष्कळ भरभराटीस आणलें. चामराजेंद्र हे १८९४ सालीं वारल्यावर सध्यांचे महाराज कर्नल सर श्री कृष्णराजेंद्र वडैय्यर बहादूर जी. सी. एस्. आय; जी. बी. ई. हे गादीवर बसले. त्यानां १९०२ सालीं राज्याची पूर्ण अखत्यारी मिळाली. सन १९१३ मध्यें १८८१ तील करारनाम्यांत फेरफार करून म्हैसूर व इंग्रजसरकार या दोघांत एक तह झाला व त्यांत परस्परांचे संबंध ठरले गेले.

म्हैसूर संस्थानांत बरेच शिलालेख आहेत; अशोकाचे आज्ञास्तंब, श्रवणबेळगोळचे लेख, सातकरणी, तालगुंद वगैरे ठिकाणचे शिलालेख हे त्यांत मुख्य आहेत. जुनीं रोमन नाणीं मधून मधून सांपडतात; ताडपत्रावरील लेखहि आढळतात. रणांगणांत मेलेल्या माणसांच्या समाधीस वीरकल्लु व सतींच्या थडग्यांस मास्तीकल्लु म्हणतात. अशीं थडगीं बरींच आहेत. देवळांचें शिल्प द्राविड धर्ती वर आहे, यांत उंच गोपूर हा एक विशेष आहे.

संस्थानांत बंगलोर, कोलार, तुमकुर, म्हैसूर, हसन, कडूर, शिमोगा, चित्रदूर्ग हे ८ जिल्हे आहेत. दर चौरस मैलीं १८५ माणसें याप्रमाणें संस्थानांत दाटीचें प्रमाण आहे. पांच हजारांवरील लोकवस्तींचीं गांवें १२५ वर आहेत. हिंदूच्या एकंदर ७२ जाती आहेत, त्यांत बोकलिंग जात शेंकडा ७२ आहे. बाकींच्या जातींत कुरुब, मादीग, बेद किंवा बेदर, ब्राह्मण, बेस्ता, गोल्ला वोडु, बनजिना, पांचाल, उप्पारा या मुख्य आहेत. एकंदरींत लिंगायतांची संख्या जास्त असून त्यांचा मुख्य धंदा व्यापार आहे.

शेतकी व उद्योगधंदे:-मुख्य पीक तांदूळ, रागी, बाजरी इतर उत्पन्नाचे जिन्नस कॉफी व वेलदोडे, मिरीं, विड्यांचीं पानें, ऊंस, हरभरा, कापूस, ताग नारळ, सुपारी. उंसाच्या लागवडीस सरकारी उत्तेजन व मदत मिळतें आणि जनावरांच्या उत्तम अवलादीसाठींहि सरकारी संस्था आहेत. मलनाड प्रांतांत जमीन काळीभोर व फार सुपीक आहे. कावेरी नदीपासून पुष्कळ कालवे काढल्यामुळें व तलावहि बरेच असल्यामुळें बागाइती बर्‍याच झाल्या आहेत. बंगलोरास शेतकीबद्दल शोध, प्रयोग करण्याचें एक सरकारी खातें व शेत आहे; तसेंच प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य शहरीं शेतकी प्रदर्शनें नेहमीं भरवून सरकार शेतीस उत्तेजन देतें. अमृतमहाल नांवाचें एक गुरांच्या पैदासीचें सरकारी खातें आहे; शेतसारा एकरीं ९४६ पडतो. निर्जलकृषी व बहुजलकृषी यांच्या शिक्षणासाठीं सरकारी शिक्षणसंस्था आहेत. मजूरीचे दर वाढते आहेत. इमारती लांकडांत शिसूं हें मुख्य असून साग, शोला, चंदन तसेंच वेलदोडे, सुपारी, मिरीं, कॉफी, बांबू, आंबा, लाख वगैरेंची लागवड चांगली होते. लाकडें वाहण्याच्या कामीं हत्तींचा उपयोग करतात. चंदनाचा मक्ता सरकारकडे आहे. कापडांत बंगलोरच्या सतरंज्या व रेशमी आणि जरीचें कापड, होळे नरसीपूर व दोड्ड बाळापूरचें सुती कापड, चादरी वगैरे प्रख्यात आहेत. रेशमाच्या किड्याच्या पैदाशीचे मागदी, चिक्क बाळापूर या गांवीं कारखाने आहेत. सोन्याच्या उत्पन्नाच्या खालोखाल रेशमाच्या धंद्यांचें उत्पन्न आहे. या शिक्षणासाठीं सहा सरकारी शाळा व एक स्वतंत्र खातें आहे. सोनें काढण्याच्या कंपन्या १५ वर असून १९०२ पासून या कामीं विजेचा उपयोग होऊं लागला. येथील बहुतेक सर्व सोनें इंग्लंडला जातें. लोखंड, मँनेनीज व अ‍ॅसबेस्टहि कोठें कोठें सांपडतें. मागदी, चिक्क नायकन हळळी, मळवल्ली, अर्सीकेरे येथें लोखंडाचे कारखाने आहेत. चन्नपट्टण येथें तंतुवाद्यांसाठीं लागणारी तार तयार होते, ती सार्‍या हिंदुस्थानभर खपते. श्रवण बेळगोळ, सितकल, हसन व तुमकूर भागांत पितळी दिवे, मूर्ती घंटा, वाद्यें इत्यादि वस्तू होतात. म्हैसूरला खोदीव कामहि चांगलें होतें. चंदनी लांकडावरील नकशीचें काम गुढीगर नांवाचे लोक करतात. साखर, कौलें, तेल काढणें, दारू, कातडीं कमावणें वगैरे कामाचे कारखाने आहेत. निर्गत मालांत सोनें, धान्य, सुपारी, कच्चें रेशीम, आगगाडीच्या रुळांखालचे लांकडी स्लीपर्स, गूळ, साखर, कॉफी व नारळ हे जिन्नस आणि आयात मालांत धान्य, लोखंडी सामान, यंत्रें सूत हे जिन्नस येतात. आगगाडीचे रस्ते सर्व जिल्ह्यांतून झालेले आहेत. सडका चांगल्या बांधलेल्या आहेत. सतराव्या शतकापासून अंबी नांवाची टपालाची पद्धत होती ती मोडून सांप्रत इंग्रजी राज्यांतील पद्धत चालू आहे.

रा ज्य व्य व स्था.-महाराजाच्या हातीं पूर्ण राजसत्ता असून दिवाण हा दोन मंत्र्यांच्या (व तिसरा जादा मंत्री असतो त्याच्याहि) सल्ल्यानें कारभार चालवितो. म्हैसूर ही राजधानी आहे तरी कारभार बंगलोरहून चालतो. महाराष्ट्रांतील बलुतेदारांप्रमाणें म्हैसूरराज्यांत पुढील बलुतेदार आहेत:-पाटील, शानभोग (कुळकर्णी), कम्मल (लोहार), वदगी (सुतार), अगस (चौकीदार, वेसकर), पंचांगी (ज्योतिषि), नायींद (न्हावी), मादीग (वांभार), कुंबर (कुंभार), निर्गंधी (कोळी ?) व अक्कसाले (सोनार). १८८७ सालापासून संस्थानांत ज्यूरीची पद्धत सुरू झाली. येथील चीफ कोर्टांत तीन न्यायाधीश असतात; त्यांच्यावर अपील महाराजांकडे होतें. संस्थानांत सांप्रत एक रिप्रेझेन्टेटिव्ह (प्रातिनिधिक) असेंब्ली व लेजिस्लेटीव्ह (कायदे) कौन्सिल अशा राज्यकारभाराच्या दोन संस्था आहेत; पैकीं पहिली १८८१ सालीं स्थापन होऊन तींत उत्तरोत्तर पुष्कळ सुधारणा झाल्या आहेत; १९२३ सालीं तिच्यासंबंधीं सरकारनें एक कायदा करून तिला राज्यकारभाराचें एक मुख्य अंगच बनविलें आहे. मतदारसंघाचें प्रमाण वाढवून स्त्रियांनांहि मताचा हक्क देण्यांत आला आहे. तसेंच सभासदांनां बजेटावर वादविवाद करण्याचा व ठराव आणण्याचा अधिकार मिळाला आहे. नवीन कर बसविणें व कायदे बनविणें झाल्यास तत्पूर्वी असेंब्लीचें मत घ्यावें लागतें. बजेटाच्या वेळीं व दसर्‍याला अशा दोनदां असेंब्लीच्या बैठकी भरतात. कारणपरत्वें खास बैठक बोलविण्याचा सरकारास अधिकार आहे.

लेजिस्लेटिव्ह कौंन्सिलच्या सभासदांची संख्या ३० पासून ५० पर्यंत वाढविण्यांत आली असून त्यांतील ३० बिनसरकारी व २० सरकारी सभासद आहेत. संस्थानच्या बजेटावर चर्चा करणें, लोकोपयोगी जमाखर्चावर ठराव आणणें व बजेटांतील मागण्यांवर मतें देणें हे हक्क कौन्सिलला मिळाले आहेत. रि असेंब्ली व ले. कौन्सिल या दोहोंचाहि दिवाण हा एक्सऑफिशियो प्रेसिडेंट असतो. ले. कौन्सिलमध्यें एक पब्लिक कमिटी व तीन स्टँडिंग कमिट्या असून त्यांमध्यें सर्व कामें वांटून दिलीं आहेत.

१९२२-२३ मध्यें एकंदर लष्कर २७९७. व त्यावर १६ लाख रुपये खर्च. पोलीसखात्याचा एकंदर खर्च १५ लाख. १९२० सालीं संस्थानाचें उत्पन्न ३१३१२६६५ होतें तें १९२५ सालीं ३३५८९००० झालें. औद्योगिक शिक्षण व व्यापार यांचें एक खातें सरकारनें काढलें आहे. खाजगी संस्थांनां व्यापार विषयक माहिती व इतर मदत देणें, त्यांच्यासाठीं निरनिराळ्या प्रयोगांचा खर्च सोसणें हें या खात्याचें काम आहे. चंदनी तेलाचे दोन सरकारी कारखाने म्हैसूर व बंगलोर येथें असून ते भरभराटींत आहेत. बीड, लोणारीकोळसा, लाकडांतून अल्कोहल काढणें व इतर धंद्यासाठीं १७० लाखांची यंत्रसामुग्री आणून भद्रावती येथें सरकारी विजेचा कारखाना काढला आहे.

प्रत्येक जिल्ह्यांत व तालुक्यांत जिल्हा व तालुकालोकलबोर्डें आहेत. एकंदर १५० पर्यंत म्युनिसिपालिट्या असून, काहींचीं यूनियन्स बनविलीं आहेत व प्रत्येक यूनियनला एक पंचायत दिली असून, तींत सरकारनियुक्त सभासदांचें प्रमाण ५ पासून १० पर्यंत ठेविलें आहे.

शिक्षण:- इ. स. १८२६ च्या नंतर हल्लींच्या धर्तीवर शिक्षण देण्यासाठीं प्रथम शाळा स्थापन झाल्या; पुढें १८५७ त सरकारी शिक्षणखातें उघडलें व दुसर्‍याच वर्षीं बंगलोर येथें मद्रास विश्वविद्यालयाला जोडलेली इंग्रजी शाळा सुरू झाली; हिचेंच पुढें हायस्कूल व कॉलेज बनविलें. १८६१ त एक नॉर्मलस्कूल व एक इंजिनिरिंग स्कूल स्थापन झालें. सर्व शिक्षणखात्याचा मुख्य इन्स्पेक्टर जनरल नांवाचा अधिकारी आहे. हल्लीं पहिल्या दर्जाचीं तीन कॉलजें, एक स्त्रियांसाठीं कॉलेज व तीन उच्च दर्जाच्या संस्कृत पाठशाळा आहेत. कामकर्‍यांसाठीं रात्रीच्या शाळाहि आहेत. बंगलोर येथें इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रीसर्च म्हणून टाटानें काढलेली एक शास्त्रीयसंशोधनाची संस्था आहे. मुसुलमान स्त्रियांसाठीं बंगलोर येथें झनानामिशनतर्फें शिक्षणसंस्था आहेत; तसेंच औद्योगिक शाळांची संख्या १८ वर आहे. परदेशी औद्योगिक शिक्षणासाठीं जाणार्‍या विद्यार्थ्यांनां संस्थानकडून शिष्यवृत्त्या मिळतात. म्हैसूर येथें मुक्या, आंधळ्या व बहिर्‍यांची एक शाळा आहे. मुलींनां शिक्षण फुकट आहे. १८९९ त एक सूक्ष्मजंतु शास्त्रशाळा स्थापिली गेली. सन १९१६ मध्यें म्हैसूर संस्थानास स्वतंत्र विद्यापीठ देण्यांत आलें. त्यांत बंगलोरचें सेंट्रल व एंजिंनिअरिंग व म्हैसूरचें महाराजा अशीं ३ कॉलेजें आहेत. म्हैसूर येथें ट्रेनिंग कॉलेज (पुरुषांचें) व महाराणी कॉलेज (बायकांचें) अशीं आणखीं कॉलेजें आहेत. निवडक गांवांत सक्तीचें प्राथमिक शिक्षण सुरू केलें आहे व खेड्यांच्या शाळांची संख्या वाढविली आहे. तसेंच शेतकी, व्यापार व इतर औद्यौगिक शिक्षणाच्याहि शाळा काढलेल्या आहेत. सन १९२३ मध्यें ७८३९ सरकारी व ९५३ खासगी शिक्षणसंस्था होत्या. म्हणजे दर ३.३५ चौरस मैलांतील लोकसंख्येपकीं दर ६६६ माणसामागें एक शाळा पडली.

जि ल्हा.-या संस्थानांत म्हैसूर जिल्हा हा सर्व जिल्ह्यांत मोठा आहे; यांत पर्वत व दाट जंगल बरेंच असून त्यांत हत्ती आढळतात. यांतून वहात जाणार्‍या कावेरी नदीचा गगनचुक्की (भरचुक्की) नांवाचा धबधबा शिवसमुद्र बेटाजवळ आहे. नीलगिरीरंगण (५०९१), गोपालस्वामी, बेत्तदपूर, चामुंडी वगैरे उंच पर्वतशिखरें आहेत. या जिल्ह्यांतील नद्यांनां बारामास पाणी असल्यानें जमीन सुपीक आहे. जिल्ह्यांत २७ बंधारे व ८०० मैल लांबीचे पाण्याचे पाट आहेत.

पुराणवस्तूंत चालुक्यांचें सोमनाथपूरचें, बसरालूचें किक्केरीचें, अग्रहार बाक्खल्लीचें देऊळ आणि श्रीरंगपट्टण, नंजनगुड आणि चामुंडी टेंकडी येथील द्राविडपद्धतीचीं देवळें पहाण्यालायक आहेत. चामराजनगर या तालुक्यांतील व येलंदूर जहागिरीमधील जमीन काळी व सुपीक आहे. या जिल्ह्यांत चंदन, साग, सोनें, लोखंड, इत्यादि सांपडतात व सुती कापड, कांबळीं, पितळी भांडीं, गूळ व रेशमी कापड तयार होतें. रेशमाचे, सुताचे व लोंकरीचे वगैरे मिळून ८ हजारांपर्यंत माग आहेत; तेलाचे व साखर-गुळ तयार करण्याचे छोटे व मोठे मिळून ११०० पर्यंत कारखाने आहेत. म्हैसूर जिल्ह्यांत १४ तालुके व येलंदूर ही एक जहागिरी आहे. म्हैसूर तालुक्यांत कावेरी व लक्ष्मणतीर्थ या नद्या व चामुंडी नांवाचा डोंगर असून, पुष्कळ तलाव व कालवेहि आहेत.

श ह र.-हें म्हैसूरस्टेट रेल्वेवर आहे. याचें महिसूर (रेड्यांचें नगर) असें नांव अशोकाच्या लेखांत आढळतें; महाभारतांत माहिष्मती असें एका शहराचें नांव आढळतें. कांहींच्या मतें तेंच म्हैसूर होय. पुढें ११ व्या व १२ व्या शतकांत म्हैसूरनाड असा प्रांतवाची शब्द आढळतो. येथील किल्ला १५२४ त बांधला गेला; म्हैसूरचें महत्त्व श्रीरंगपट्टणमुळें १६१०-१७९९ पर्यंत नाहींसें झालें होतें, तें हिंदुराज्यस्थापनेमुळें पुन्हां आलें. शहरांत सात पेठा आहेत. सन १९०३ मध्ये सिटी इंप्रुव्हमेंट कमिटी नेमली गेली. तिनें पूर्वींचें अरुंद व गलिच्छ शहर चांगलें व सुंदर बनविलें. शहरांतील सयाजीराव गायकवाड रोड हा प्रेक्षणीय रस्ता आहे. गांवास पाणीपुरवठा. कावेरी नदीपासून काढलेल्या तलावांतून होतो. चामराजपुरा या पेठेनें शहराचा विस्तार दुपटीनें वाढला. पश्चिम भागांत गार्डनपार्क आहे. सरकारी कचेर्‍या, व्हिक्टोरिया ज्युबिली इन्स्टिट्यूट, महाराजा कॉलेज, नवीन राजवाडा (१८७७ मध्यें किल्ल्यावरील जुना राजवाडा जळला), किल्ला इत्यादि पाहण्यासारखीं स्थळें आहेत. म्हैसूर शहराची लोकसंख्या (१९२१) ८३९५१.

[ राईस-ह्मैसूर अँड कूर्ग; विलक्स-ह्मैसूर; इंडि. अँटि पु. ११; ब्राउनिंन-हैदर अँड टिप्पू; बुकॅनन-जर्नी थ्रू ह्मैसूर; एपिग्राफिआ कर्नाटिका पु. १-१२ इंपे ग्याझे. पु. १८; फ्लीट-डिनॅस्टीज ऑफ धि डेक्कन. ]

 

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .