प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

यंत्रशास्त्र - यंत्र या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. याची व्याख्या करणें देखील फारसें सोपें नाहीं. आज जगांत जो यंत्रांचा प्रसार झालेला आहे तो अगदीं अलीकडचा आहे. मनुष्यप्राणी रानटी स्थितींतून सुधारलेल्या स्थितींत जसजसा येऊं लागला तसतशी त्यास कराव्या लागणार्‍या क्रियांसाठीं किंवा त्या सुलभ करण्यासाठीं अधिकाधिक गुंतागुंतीचीं उपकरणें निघालीं. त्यांचाच विकास हल्लींची यंत्रपद्धति होय. विशिष्ट यंत्र म्हणजे विशिष्ट क्रियेसाठीं जी रूपांतरित पद्धति आली तिचा अंश होय. प्रत्येक कार्यांत होणार्‍या क्रियापरंपरेचें पृथक्करण करणें आणि प्रत्येक अंगांत सुधारणा करणें, आणि नवीन उत्पन्न होणार्‍या कार्यासाठीं साधनयोजना करणें, या तीन प्रकारांनीं अर्वाचीन यंत्रपद्धति विकसली आहे. अगदीं पुरातन काळीं धनुष्याचा (स्प्रिंग) उपयोग करीत असत. आत्मसंरक्षण, युद्ध, किंवा श्रम वांचविणें या तिन्ही कामासाठीं या एकाच यंत्राचा उपयोग होत असे. अद्यापपावेतों या यंत्राचा उपयोग शिकारीसाठीं कांहीं लोक करणारे आहेतच. यंत्रविकास हा इतर सांस्कृतिक विकासावर अवलंबून असतो; उदाहरणार्थ शिकारी स्थितींत मानव असतां त्यास जात्याचें कारणच नाहीं. पण धान्याच्या उपयोगापासून जातें वापरण्याची क्रिया हळू हळू वाढली असली पाहिजे. धान्याहारास मानवजातीनें सुरवात केल्यानंतर पहिल्यानें ओलीं धान्यें म्हणजे हुरडा, ओंब्या हीं दातांनीं चाऊन खात असत. त्यानंतर वाळलेलीं धान्यें चाऊन खाणें कठिण पडूं लागल्यामुळें त्यांचें पीठ करण्याची जरूर पडली. हें पीठ करण्याचें काम प्रथम दोन दगडानीं करीत असत. हल्लीं देखील सुपारी फोडण्यासाठीं दोन दगडांचा उपयोग करतात. धान्याचें पीठ करण्याचें काम अगदीं पहिल्यानें ठेंचून करीत असावेत. या ठेंचण्याच्या कामांत दाणे आजूबाजूस उडून जाऊन नुकसान होत असे; याला उपाय म्हणून एक दगड खोल करून त्याच्या बुडाशीं धान्य ठेवण्याचें काम होऊन बाजूंनीं अडविण्याचें काम करून घेण्यांत येई, या तर्‍हेचें खलबत्ता हें यंत्र आज प्रचारांत आहेच. यानंतर धान्य न ठेचतां तें वाटून बारीक करण्याची युक्ति निघाली. ही युक्ति म्हणजे पाटावरवंटा होय. पाटावरवंटा हें एक त्या काळचें श्रम वाचविणारें यंत्र होय. यानंतर जातें आलें. हें जातें आज कित्येक वर्षें एकसारखें चालू आहे. यानंतर यंत्राचें जातें झालें. याप्रमाणेंच बहुतेक यंत्रांची वाढ झालेली आहे.

यंत्रविकास कांहीं अंशीं यद्दच्छेनें झाला म्हणजे मनुष्य अडचण आली असतां युक्त्या काढीत गेला, व अशा तर्‍हेनें त्याच्या उपकरणांत व उपभोगाच्या वस्तूंत पालट होत गेला. आज यंत्रशोधन हा धंदा झाला आहे व यंत्रशोधन याच हेतूनें माणसें कार्यप्रवृत्त होत आहेत. आज जगावर जीं अनेक यंत्रें दिसत आहेत तीं या स्थितींत येण्यास निरनिराळ्या देशांतील हजारों लोकांचे श्रम व पैसे खर्च होऊन आलेलीं आहेत यंत्रें प्रयोगावस्थेंत असतांना तीं चालवून पाहतांना कितीतरी लोक मेले आहेत. कित्येकांनीं आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप येऊन आपण श्रीमंत होऊं या आशेंनें आपली सर्व धनदौलत खर्च करून, अखेर ते दारिद्र्यावस्थेंत मरण पावले आहेत. तर कांहींनीं सर्व इस्टेट खर्च करून अगदीं शेवटचा पैसा खर्च केला तेव्हांच त्यांनां यश आल्यामुळें पुढें श्रीमंती उपभोगावयास सांपडली. अशा दोन्ही प्रकारचीं उदाहरणें पहावयास सापडतात.

येथें ही गोष्ट नमूद करून ठेविली पाहिजे कीं या यांत्रिक वाढींत महाराष्ट्रीय लोकांनीं कांहींच केलेलें नाहीं. अत्यंत प्रचलित जुनीं यंत्रें म्हणजे रहाट वगैरे हीं तरी महाराष्ट्रीय म्हणतां येतील किंवा नाहीं, किंवा यांत कांहीं सुधारणेचे प्रकार पेशवाईपूर्वींच्या महाराष्ट्रानें वापरले किंवा नाहीं हें समजत नाहीं. मराठे म्हणजे लढवय्ये; तर लढाईच्या उपकरणांत त्यांनीं स्वत:ची सुधारणा काय केली हें सांगतां येत नाहीं. त्यांनीं मुसुलमानी सुधारणा घेऊन यूरोपीय सुधारणेचा थोडा अंश घेतला असणें शक्य आहे. किल्ले वगैरे बांधण्यांत कांहीं कौशल्य दाखविलें गेलेंहि असेल. पण मुसुलमानी किल्ल्यापेक्षां किंवा देवगिरीसारख्या जुन्या किल्ल्यापेक्षां मराठ्यांच्या किल्ले बांधण्याच्या कलेंत निश्चित विकास होता असें आज खात्रीपूर्वक सांगतां येणार नाहीं. आजचें महाराष्ट्रीयांचे यांत्रिक ज्ञान बाल्यावस्थेंत आहे. आज यंत्रें तयार करणें व तीं विकून तो धंदा फायदेशीर करणें हें काम अत्यंत मोठ्या भांडवलाचें आहे व याला ज्ञानहि मोठेंच पाहिजे. हें भांडवल व ज्ञान या दोन्हीहि गोष्टी आमच्यांत नाहींत इतकेंच नाहीं तर विलायतेंत तयार झालेलीं यंत्रें इकडे आणून तीं त्यांच्याइतक्या वाकबगारीनें व काटकसरीनें वापरणें हें देखील आम्हांस अद्याप पुरतेपणीं साधलें नाहीं. या तर्‍हेनें आजच्या महाराष्ट्रीय यांत्रिक कौशल्याविषयीं म्हणतां येईल यंत्रें वापरणारा वर्ग बर्‍याच अंशीं निरक्षर आहे आणि त्यांस हुकूम देणारा एंजिनिअर हाहि शास्त्रज्ञ नसून सांगितलेल्या गोष्टी कशाबशा करणारा आहे.

यूरोपांतील यांत्रिक विद्येस एंनजिनिअरिंग म्हणतात.

इं जि नि य रिं ग.-लढाईंतील एंजिनें तयार करण्याचें व लष्करी कामकाज करण्याचें काम ज्यांच्याकडे असे त्यांच्या (एंजिनियरांच्या) एकंदर कार्याला-विशेषत:पूर्वींच्या काळींएंजिनियरिंग असें नांव देण्यांत येई. तसेंच त्या काळीं फक्त हें काम करणार्‍या लोकांनांच म्हणजे लष्करी इंजिनियरांनांच इंजिनियर हें नांव मिळे परंतु १८ व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास इंजिनियरांचा एक दुसराच वर्ग तयार झाला. हे लोक, लष्करी इंजिनियर जसे रस्ते तयार करीत तसेच आपणहि करूं लागले. मात्र ते रस्ते केवळ लष्कराच्याच उपयोगी पडणारे नसत व शिपायांकडूनहि तयार केलेले नसत. अशा लोकांनां तेव्हांपासून सिव्हिल इंजिनियर असें म्हणूं लागले. यांच्या कामाचें व ध्येयाचें खरें स्वरूप व माहिती लंडन येथील “इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स” या संस्थेच्या (१८२८ च्या) सनदेंत थोडक्यांत पुढीलप्रमाणें दिलेलीं आढळतात: ‘इंजिनियरिंग या कलेनें सृष्टींत असलेल्या निरनिराळ्या नैसर्गिक शक्तींचा भरपूर उपयोग मनुष्याच्या सोयीकडे व सुखाकडे करतां आला पाहिजे. देशांतील आयात व निर्गत व्यापारासाठीं, रहदारीसाठीं व मालाची नेआण करण्यासाठीं मोठमोठ्या सडका, पूल, बंधारे, कालवे बाधणें, नदींतून जहाजानें व्यापार करतां येईल अशी व्यवस्था करणें, गोद्या बांधणें, बंदरें तयार करणें, त्यांवर धक्के बांधणें, पाण्याला बांध घालणें, दीपस्तंभ बांधणें, दर्यावर्दीपणांत अनेक कृत्रिम शक्तींचा उपयोग करून व्यापार चढाओढीचा करणें, यंत्रें निर्माण करणें व तीं योग्य प्रकारें चालू करणें आणि शहरांतील गटारें बांधणें इत्यादि कामें एंजिनियरिंगशास्त्रांत येतात.’ या व्याख्येंत अनेक गोष्टींचा समावेश केलेला आहे. आणि त्याप्रमाणें १९ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत सिव्हिल इंजिनियर लोक या यादींतील अनेक गोष्टी करीतहि असत. परंतु पुढें हळू हळू निरनिराळ्या शाखा व निरनिराळ्या ठराविक बाबी व त्यांतील तज्ज्ञ निर्माण होऊं लागले. प्रथम जी शाखा निघाली ती बहुधां मेक्यानिकल इंजिनियरांची असावी. यांचें काम वाफेचीं इंजिनें, यांत्रिक, हत्यारें, गिरणींतील काम व सर्वमान्य चलयंत्रें हीं चालविणें व त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था करणें हें होय. यानंतरची दुसरी शाखा मायनिंग इंजिनियरिंगची होय. यांचें काम कोळसा, अशोधित लोखंडी दगड व खनिज पदार्थ यांचीं स्थानें म्हणजे खाणी शोधून काढणें व ते खाणींतून बाहेर काढणें हें होय. या खेरीज अनेक लहानमोठ्या इंजिनियरिंगच्या शाखोपशाखा निघाल्या आहेत. नौकाबंधनशास्त्री “नेव्हल आर्किटेक्ट” यांचें काम म्हणजे फक्त जहाजांची बांधणी करणें हें आहे. मरीन इंजिनियर यांचें काम आगबोटींतील एंजिनें व इतर यंत्रें चालविणें हें आहे. सॅनिटरी इंजिनियर हा गांवांस पाण्याचा पुरवठा करण्याची व सांडपाणी व इतर मैला वगैरे गांवाबाहेर नेण्याची व्यवस्था करतो. “ ग्यास एंजिनियरिंग” मध्यें दिवाबत्तीस लागणारा ग्यास उत्पन्न करीत असत. परंतु त्याचा अलीकडचा विकास म्हटला म्हणजे ग्यास उत्पन्न करण्याकरितां निराळें साहित्य वापरून सवंग ग्यास करणें व तो करण्याकरितां निराळी यंत्रयोजना करणें या दिशेनें झाला आहे व होत आहे. या विकासाचें मुख्य कारण हें कीं, ग्यासनें चालणारीं इंजनें तयार झाल्यामुळें दिवाबत्तीस वापरल्या जाणार्‍या शुद्ध व महाग ग्यासपेक्षां लांकडें, कोळसा गवत व गांवांतील कचरा जाळून त्यापासून दिव्याच्या कामाला अयोग्य पण शक्ति तयार करण्याच्या कामास सोईस्कर व बराच स्वस्त असा ग्यास तयार करणारे ग्यासजनरेटर तयार झाले. दिवाबत्तीच्या कामासाठीं आतां नवीन ग्यास तयार करणारी यंत्रसामुग्री बहुधां कारखानदार तयार करीत नाहींत. कारण विजेच्यायोगानें दिवाबत्ती करणें फार सोपें झालें आहे. सध्या ग्यास एंजिनिअरिंग हा शब्द दुसर्‍या एका शक्ति तयार करण्याच्या पद्धतीस लावतात. या पद्धतींत ग्यास जनरेटर, ग्यास इंजिनें, पेट्रोल व ऑईल इंजिनें हीं येतात. केमिकल एंजिनियरिंग” मध्यें अल्कली, अम्ल व रंग हे रासायनिक पदार्थ तयार करणार्‍या औद्योगिक क्रियांस उपयोगी पडणार्‍या निरनिराळ्या यंत्रपद्धतीचा विचार केलेला असतो. सांप्रत इलेक्ट्रिकल एंजिनियरिंग म्हणून एक नवीन शाखा निघाली आहे. पण तींत बहुतेक सर्व जुन्या शाखांचा अभ्यास करावा लागतो, म्हणून आतां पाश्चात्य देशांत अशी म्हण पडली आहे कीं, सर्व प्रकारचे एंजिनिअर्स हे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असलेच पाहिजेत.

आज जगांत ज्या अनेकविध क्रिया होतात त्यांपैकीं बर्‍याचशा क्रियांसाठीं यंत्रयोजना झाली आहे. शेतकीसाठीं थ्रशिंग मशीन, बाइंडरसारखीं मोठालीं पुष्कळ काम करणारीं यंत्रें अमेरिकेंत वापरलीं जातात. विणणें, सूत काढणें इत्यादि क्रियांसाठीं यंत्रयोजना आपल्याकडे सर्वपरिचित आहेच. जेव्हां उत्पादनाचा धंदा मोठ्या प्रमाणावर करावा लागतो तेव्हां त्या धंद्यांतल्या अनेक क्रियांचें पृथक्करण होऊन प्रत्येक क्रिया जास्त लवकर, पद्धतशीर, आणि जास्त बरोबर करण्यासाठीं यंत्र वापरलें जातें. छापखान्यामध्यें छापणें, घड्या घालणें, कापणें, पुस्तकें शिवणें, पुस्तकांनां पाठी काढणें इत्यादि गोष्टींसाठीं यंत्रयोजना उत्पन्न होते. एवढेंच नव्हे तर टाईप जुळविण्याचें कामहि यंत्रानें होऊं शकतें. यंत्रानें डोक्याचें काम होत नाहीं असें नाहीं, कां कीं बेरजा, गुणाकार, भागाकार करण्याचींहि यंत्रें आहेतच. विक्री करण्यासाठीं म्हणजे पैसे घेऊन माल देण्यासाठींहि यंत्रें आहेतच. या सर्व क्रिया पाहिल्या म्हणजे नवखा मनुष्य अगदीं बुजल्यासारखा होतो आणि ही यंत्रपद्धति म्हणजे कांहीं तरी गूढ मायावी विद्या आहे असेंच त्यास वाटूं लागतें. पण तो यंत्रांच्या शास्त्राशीं परिचय करून घेऊं लागला म्हणजे त्यास असें दिसूं लागतें कीं, सामान्य परिचित क्रियांचाच यंत्रपद्धति हा विकास आहे, आणि तो विकास होतांना पौन: पुन्य सुलभ करण्याची किंवा जें इंद्रियगोचर होण्यास कठिण जाईल तें इंद्रियगोचर करण्याची क्रिया होऊनच हें यंत्रशास्त्र वाढलें आहे.

यंत्रशास्त्रामध्यें जे सर्वसामान्य सृष्टिनियम असतात त्यांचा फायदा घेऊन काहींतरी योजना केलेली असते. जसजसें भौतिक वस्तूंत असलेल्या गुणधर्मांचें व शक्तींचें अधिकाधिक ज्ञान होत जातें तसतसा यंत्रांत फरक केला जातो किंवा नवीन नवीन यंत्रें तयार होतात. सामान्य घर्षणाची गोष्ट घ्या. घर्षणामध्यें अधिक कठिण अशा वस्तूंचें घर्षण करून पात्यांस वगैरे धार लावतां येते. त्यांत सुधारणा होत जावयाची म्हणजे घर्षणासाठीं निरनिराळ्या वस्तू शोधावयाच्या, वाळू, कुरुंद, पोलादी पट्टी, हिरकणीची भुकटी इत्यादि निरनिराळ्या घर्षणोपयोगी जिनसा आहेत, त्यांपैंकीं कोणती वस्तु विशिष्ट घर्षणासाठीं नक्की वापरावी हें निरनिराळ्या वस्तूंच्या उपयोगाच्या अनुभवानेंच ठरणार. ही माहिती जमविणें व तिचा निश्चित उपयोग करणें हें अधिक सुशिक्षित एंजिनीअर करूं शकतो. घर्षणपद्धतींत सुधारणा करावयाची म्हणजे केवळ घर्षणसाहित्य बदलावयाचें असें नाहीं तर वस्तूंचा उपयोग कोणत्या पद्धतीनें करावयाचा यांतहि जी वस्तु घर्षणासाठीं वापरावयाची तिचा एक थर जर चाकासारख्या फिरत्या वस्तूवर दिला तर घर्षण किती सुधारेल, सुधारणार असल्यास चाक कशा प्रकारचें असावें इत्यादि विचार करून ज्या योजना उत्पन्न होतात त्या घर्षणाचीं यंत्रें होत.

यं त्रा चें का र्य.-मनुष्य जीं कामें स्वत: करीत असे किंवा जनावरांकडून करून घेत असे त्यांपैकीं पुष्कळ कामें हल्लीं यंत्रांनीं करून घेण्यांत येतात. मनुष्य व जनावरें सजीव आहेत परंतु यंत्रें निर्जीव आहेत. यामुळें सजीव प्राण्यांनीं केलेलीं कामें व निर्जीव यंत्रांनीं केलेलीं कामें यांत फरक पडतो. याचे प्रकार पुढें दिले आहेत:-

यंत्रांनीं केलेलीं कामें सजीव प्राण्यांनीं केलेल्या कामापेक्षां कांहीं प्रसंगीं कमी प्रतीचीं ठरतात. याचीं उदाहरणें पुष्कळ सांपडतील. दळण्याच्या यंत्रास गहूं दळावयाचें काम दिलें असतां त्या गव्हांत जर दगड, माती पडली तर यंत्र गव्हाबरोबर या दगड मातीस दळण्याचा प्रयत्‍न करतें. उंसाच्या चरकांत ऊंस लावतांना जर माणसाचा हात पुढें गेला तर उंसाबरोबर हाताचाहि रस निघतो. चरक, हात आहे कां ऊंस आहे याची पर्वा करीत नाहीं. जात्याच्या दगडांमध्यें किंवा चरकाच्या रुळांमध्यें जें सापडेल त्याला दाबून टाकणें हें काम हीं दोन्हीं यंत्रें अगदीं हुकुमाबरहुकूम म्हणजे लष्करी शिस्तीनें करतात. अशींच सर्व यंत्रें काम करतात.

यंत्रांनीं केलेलीं कामें सजीव प्राण्यांनीं केलेल्या कामापेक्षां जास्त चांगल्या प्रतीचीं ठरतात. सजीव प्राणी काम करीत असतांना भोंवतालच्या परिस्थितीचा त्याच्या मनावर परिणाम होत असतो. यामुळें सजीव प्राण्याच्या कामांत चुका होत असतात. यंत्राच्या कामांत भोंवतालच्या परिस्थितीचा परिणाम होत नाहीं. पातळ पदार्थ मोजीत असलेल्या मनुष्याजवळ आवाज झाला तर तो दचकून हातांतील भांडें सोडून देईल. ही चूक यंत्र करणार नाहीं. परंतु याला अपवाद आहे तो हा कीं: शरीराचें स्वास्थ हें सजीव प्राण्यांप्रमाणें यंत्रांनांहि लागू आहे. घोडा चालतांना त्याच्या पायांत खिळा शिरल्यास तो लागलाच लंगडावयास लागतो. त्याचप्रमाणें मोटारगाडीच्या चाकांत खिळा घुसला तर तें चाक गाडी चालविण्यास निरुपयोगी होतें. फिरणार्‍या भागांचीं आवणें तेलाच्या अभावीं तापून जाऊन यंत्रें बंद पडतात. माणसांपेक्षां यंत्राच्या कामांत चुका कमी होतात. यामुळें माल जास्त चांगला निघतो. परंतु यालाहि अपवाद आहे. यंत्र लावतांना जर चूक झाली तर त्या यंत्रामधून जो माल बाहेर पडतो त्यांत ती चूक सारखी होत असते. कागद तयार करण्याच्या गिरणींत ठराविक अंतरावर खूण करण्याची यंत्रांत व्यवस्था केलेली असते. हें यंत्र लावतांना जर चूक झाली तर इच्छित लांबीचे तुकडे न होतां निराळ्या मापाचे तुकडे होतील. व एकदां यंत्र सुरू झाल्यावर मग ती चूक ध्यानांत येईपर्यंत तें यंत्र चुकलेल्या मापाचेच तुकडे कापीत जाईल.

शेंकडों सजीव प्राण्यांच्या एकवटलेल्या प्रयत्‍नानें जीं कामें कधींच झालीं नसतीं तीं फक्त यंत्रें करूं शकतात. आज जगावर जी व्यापारी भरभराट झाली आहे ती सर्व यंत्रामुळेंच आहे. मोठमोठ्या शक्तीचीं एंजिनें निघाल्यामुळें वाटेल तितकीं यंत्रें चालवून पुष्कळ कच्चा माल बदलून त्याचा पक्का माल तयार करतां येतो. एंजिनें लावून आगबोटी व आगगाड्या चालवून मालाची नेआण करतां येते. बैलगाडीनें किंवा शिडाच्या तारवांनीं हें काम कधींच झालें नसतें. दरतासास १०० मैलप्रमाणें हवेंत उडणें माणसांनां यंत्राशिवाय कधींच शक्य नव्हतें. अशा प्रकारचीं आणखींहि कामें पहावयाचीं झाल्यास पुष्कळ सांपडतील. दगड फोडून त्याचे बारीक तुकडे करून काँक्रिटमध्यें घालतात. भाटघर (भोर) धरणासारख्या कामावर असें काम एकसारखें चालू असतें. दगड फुटतांना पाहिल्यावर हा दगडच आहे का मातीचें ढेंकूळ आहे असा क्षणभर मनाला संदेह होतो. कारण हें काम करण्यासाठीं जें यंत्र योजलेलें आहे तें यंत्र हें काम इतकें सहज करत कीं, दगडाचा कठिणपणा हा त्या यंत्राला क:पदार्थ आहे असें वाटतें. अशीं कामें ठिकठिकाणीं पहावयास सांपडतील.

सजीव प्राणी आणि यंत्रें यांच्यामध्यें एक साम्य आहे तें हें कीं, दोन्हीहि जें काम करतात तें शक्तीच्या योगानें करतात. यंत्र जितकें जास्त मोठें करावें तितकी जास्त शक्ति घेऊन तें जास्त काम करतें. पण याच्या पलीकडे प्राण्यांनां जें ज्ञान आहे तें यंत्रांनां नाहीं. यामुळें यंत्रांनां कांहीं अंशी बिकट परिस्थितींत काम करीत रहावें लागतें. याकरितां, यंत्र चालू असतांना, तें सुरू करतांना, किंवा बंद करतांना, त्याला माणसाची जरूर लागते. हल्लीं यंत्रांचें जें काम दृष्टीस पडतें तें यंत्र व मनुष्य यांच्या जोडकर्तबगारीचें फळ आहे. यंत्राला मनुष्याची जशी जोड मिळेल त्यावर यंत्राचें काम चांगलें होणें किंवा वाईट होणें हें अवलंबून असतें. यामुळें एकसारखें एक अशीं यंत्रें असलीं तरी त्यांचें काम सारखेंच होतें असें नाहीं.

कितीहि हुशार सजीव प्राणी जें काम करूं शकत नाहीं तें काम यंत्र सहज करूं शकतें. ज्या ठिकाणीं गतीचा संबंध येतो त्या ठिकाणीं प्राण्यांची गति कुंठित होते. अतिशय जलद फिरणार्‍या यंत्राचे फेरे मोजण्याचें काम म्हणजे दर मिनिटास किती फेरे होत आहेत हें दाखविणें किंवा यंत्र सुरू झाल्यापासून एकंदर फेरे किती झाले हें सांगणें, हें माणसाच्या शक्तीच्या बाहेर आहे. साधारणपणें मंदगतीनें चालणारीं यंत्रें-म्हणजे ज्यांचे दर मिनिटास १५०-१७५ फेरे होतात-अशा यंत्रांचे फेरे मनुष्य मोजूं शकतो पण दरमिनिटास ५००|१०००|१५००|२५०० फेरे करणार्‍या यंत्राचे फेरे मोजणें माणसाच्या शक्तीच्या बाहेर आहे. व या फेर्‍यांची दर मिनिटास बेरीज करण्याचा विचार तर करावयासच नको. मोटारगाडी किती चालली हें एका यंत्राकडे पाहिल्याबरोबर सहज समजतें, कापड तयार करतांना ताणा करावयाचा असतो. या कामाचें यंत्र अतिशय चलाख असतें. सूत मोकळें करून एका रुळावर गुंडाळून घ्यावयाचें असतें. कापडाची रुंदी जितकी जास्त असेल तितके जास्त दोरे या रुळावर गुंडाळावयाचे असतात. हे दोरे गुंडाळतांना जर एखादा दोरा तुटला तर मनुष्याला डोळ्यानें पाहून ताबडतोब समजणें सोपें नाहीं. पण या यंत्रांत जी सोय करून ठेविली आहे तीमुळें एक दोरा तुटल्याबरोबर यंत्र आपोआप बंद पडतें व यंत्र बंद पडलें म्हणजे मग माणसाचें लक्ष तिकडे जाऊन तो तुटलेला दोरा सांधतो व यंत्र सुरू करतो. केवळ माणसाच्या नजरेवर हें काम असतें तर किती तरी दोरे अपुरे राहिले असते.

यं त्रा चा थ क वा.-सजीव प्राणी काम करून थकतात व विश्रांति मिळाल्यावर पुन्हां ताजेतवाने होतात त्याप्रमाणें यंत्रें काम करून थकतात. व कांहीं वेळ विश्रांति मिळाली म्हणजे पुन्हां ताजीतवानी होतात. हा थकवा यंत्रें करण्यासाठीं जी धातु वापरलेली असते त्या धातूला येतो. व यंत्र करतांना जरी बळकट केलेलें असतें तरी थकव्याचा परिणाम यंत्राच्या कामावर होतो.

यं त्रा चे प्र का र.-यंत्रांमध्यें अनेक प्रकार आहेत. ते येणेंप्रमाणें:- (१) शक्ति तयार करणारीं यंत्रें; एंजिनें व बॉयलर वगैरे (वाफ, ग्यास वगैरेंचीं). (२) शक्ति एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीं नेणारीं यंत्रें, हैड्रोलिक, न्युमाटिक व इलेक्ट्रिकशाफ्टिंग पुली इ. (३) वस्तूंचें रूपांतर करणारीं यंत्रें. (४) स्थलांतर करणारीं यंत्रें. (५) नियामक यंत्रें. व (६) प्रत्यक्षाचा विस्तार करणारीं यंत्रें, उदाहरणार्थ दुर्बीण, मायक्रास्कोप, टेलिफोन व मापक यंत्रें, सिनेमा, रेडिओ वगैरे, हे मुख्य भेद आहेत. या प्रत्येकाचे पोटभेद आणखी पुष्कळ आहेत. परंतु कोणतेंहि यंत्र घेतलें तरी तें बहुतकरून या विभागांपैकीं एखाद्या विभागांत येतें. हे विभाग देखील एकमेकांहून पूर्णपणें स्वतंत्र नाहींत. कृत्रिम शक्ति तयार करणारीं यंत्रें बरींच आहेत. तथापि अनेक गुंतागुंतीच्या रचनेचीं यंत्रें मनुष्याच्या किंवा पशूंच्या शक्तीनेंहि चालतात.

(१) शक्ति तयार करणारीं यंत्रें:-आजकाल जगावर जी घडामोड चालू आहे तीपैकीं बराच भाग यांत्रिक शक्तीवर अवलंबून आहे. पूर्वी एकाकाळीं मनुष्यें व जनावरें यांची शक्ति हीच घडामोड करणारी मुख्य शक्ति होती. त्यावेळीं बैल व घोडे, हत्ती, उंट, खेचरें, गाढवें, टोणगे, हेंच वाहतुकीचीं साधनें असत. जंगलांतून तोडलेलीं मोठमोठीं लांकडें ओढण्यास हत्तींचा उपयोग होत असे. शेतें नांगरण्यास बैलांचा व घोड्यांचा उपयोग करीत असत. पाणी उपसण्यास जे पंप वापरीत त्यांनां गाढवें लावीत असत, यामुळें अशा पंपाला डाँकी पंप म्हणत (मुंबईस गिरणींतील पंपाबद्दल प्रचारांतील शब्द डंकी हा आहे व हा डंकी शब्द डाँकी याचा अपभ्रंश आहे.) धान्याची मळणी करण्यासाठी खळ्यावर कणसें टाकून तीं बैलांच्या पायांनीं तुडवून, त्यांतील धान्य मोकळें करून घेत असत. घोड्याच्या पाठीवर बसून लढाई करीत असत किंवा प्रवास करीत असत. इत्यादि अनेक प्रकारांनीं निरनिराळ्या देशांतील लोकांनीं जनावरांच्या शक्तीचा उपयोग करून घेतला. यासाठीं घोड्यांच्या व बैलांच्या शक्तीनें चालणारीं यंत्रें तयार केलीं. अद्यापहि हीं मूळ यंत्रें किंवा युक्त्या उपयोगांत आहेत. परंतु यापुढें आणखी नवीन वाढ झाली आहे ती यांत्रिक शक्तीची आहे. ही शक्ति यंत्राच्या साहाय्यानें तयार करतात. शक्ति तयार करण्याच्या कामांत उपयोगी पडणार्‍या बहुतेक यंत्रास एंजिन हा एक सर्वसाधारण शब्द आहे.

एंजिनें:-यासंबंधीं माहिती एंजिन या लेखांत दिली आहे.

पाणचक्क्या:-नदीचा प्रवाह तात्पुरता बांध घालून अडवून त्या पाण्यानें ओबडधोबड पाणचक्की चालवून लहानसहान कामें करून घेणारीं यंत्रेंहि पुरातन काळीं होतीं. यांची अगदीं अलीकडे फार मोठी वाढ झालेली असून टाटा कंपनीसारख्या वीज उत्पन्न करणार्‍या कंपनीच्या कारखान्यांत या जातीच्या पाणचक्क्यांचा उपयोग होतो.

पवनचक्क्या:- वार्‍याचा प्रवाह चालू असतांना त्याच्या जोराचा उपयोग करुन घेऊन मोठा पंखा (चाकासारखा) फिरवून त्यापासून काम करून घेणें. कृत्रिम शक्तीनें हवा दाबून ती टांकींत सांठवून ठेवून तिच्या जोरानें चालणारीं एंजिनें खाणीच्या कामांत व बोगदे खणण्यास उपयोगी पडतात.

जनावराच्या शक्तीनें यंत्रें फिरविण्यास उपयोगीं पडतील अशीं यंत्रें, म्हणजे बुलकगीअर्स, हॉर्सपॉवर्स इत्यादि होत. बैलांच्या शक्तीनें पाणी काढणें, पंप चालविणें इत्यादि कामास बुलकगीअर्स वापरतात दोन, चार किंवा सहा घोडे जोडून एक दांत्यांचें चाक फिरवून त्यावरून दुसरीं चाकें फिरवून घोड्यांची शक्ति पाणी काढणें, मळणी करणें, लोणी काढणें, धान्य, किंवा पेंड दळणें, कपडे धुण्याचीं यंत्रें चालविणें इ. कामें अमेरिकेंत या रितीनें शेतकरी लोक करून घेतात. चार किंवा सद्दा हॉर्सपॉवरचें ऑईल एंजिन चालविण्यापेक्षां सहा घोडे जोडणें व त्यांची शक्ति एकवटून कामास लावणें हें कांहीं शेतकर्‍यांस (अमेरिकेंतील) जास्त सोपें वाटतें. कुत्रा, बोकड इत्यादि जनावरांची शक्ति उपयोगी पडेल अशीं यंत्रें वरीलप्रमाणें (अगदीं लहान) कांहीं ठिकाणीं तयार केलेलीं आहेत.

रासायनिक शक्ति तयार करणार्‍या यंत्रांत विजेची बॅटरी येते. या बॅटरींत दोन धातू घेऊन त्यांत अ‍ॅसिड टाकून शक्ति तयार होते. सूर्याचे किरण एका ठिकाणीं जमवून त्या उष्णतेनें पाणी तापवून वाफ तयार करणारें यंत्र प्रयोगावस्थेंत आहे. समुद्राच्या भरतीओहोटीमुळें पाण्याच्या उंचींत पडणार्‍या फरकाचा फायदा घेऊन त्यामुळें शक्ति उत्पन्न करणें ही रीत सध्यां प्रयोगावस्थेंत आहे.

(२) शक्तीचें स्थलांतर करणारीं यंत्रें:-शक्ति ज्या ठिकाणीं उत्पन्न होते त्या ठिकाणींच तिचें कार्य होत नाहीं. जेथें तिचा उपयोग व्हावयाचा त्या जागेशीं संयोजक कांहीं तरी लागतें. उदाहरणार्थ सुरुंगांत शक्तीचा त्या जागींच उपयोग होतो, तर तोफेंत तो अन्यत्र होतो. यांत्रिक शक्ति विजेच्या साहाय्यानें अनेक मैल काटकसरीनें नेतां येते. कारखान्यांत कांहीं फुटांवर किंवा यार्डावरच अन्य कामें करण्यासाठीं शक्ति न्यावयाची असते व यासाठीं झालेल्या यंत्रयोजना मुख्यत्वेंकरून येणेंप्रमाणें:- (१) दांत्यांचें चाक व (२) पट्टे, दोर व चाकें; या दोन तर्‍हेच्या साधनांनीं जेव्हां शक्तीचें स्थलांतर होतें तेव्हां त्यास “मेकॅनिकल” म्हणतात. पण शक्तीचें स्थलांतर करण्याचीं साधनें दुसरींहि आहेत. हैड्रॉलिक म्हणजे दाबलेल्या पाण्याच्या योगानें स्थलांतर. शक्तीचें स्थलांतर घनवस्तूनेंहि होईल. एकीकडून घनवस्तु ढकलली म्हणजे दुसरीकडे सरळ रेषेंत जाईल पण पाणी वाटेल तिकडे जाईल. शिवाय प्रवाही पदार्थ वापरण्यांत दुसराहि फायदा होतो. पाणी सिलेंडरमध्यें दाबून पंपानें भरावयाचें. दाब ठेवणारा दट्ट्या जास्त घेराचा असल्यामुळें व जेथून पाणी सोडवयाचें तें भोंक कमी घेराचें असल्यामुळें त्या भोंकांतून पुष्कळ काळपर्यंत प्रवाहाच्या दाबाची शक्ति घेतां येते.

न्यूम्याटिक:-म्हणजे दाबलेली हवा. हिचाहि उपयोग पाण्याप्रमाणें करून शक्तीचें स्थलांतर करणारें यंत्रांग करतां येतें. यांत फरक एवढाच होतो कीं, पाणी दबत नाहीं पण हवा दबते. त्यामुळें हवेच्या संचयाच्या कोठीच्या सर्व भिंती न हलणार्‍या असाव्या लागतात. आणि पाण्याच्या यंत्रांत एक भिंत (दट्ट्या) सरकणारी ठेवावी लागते.

वि जे चें स्थ लां त र.-यांत्रिक शक्तीचें रूपांतर विजेंत करून वीज शेंकडों मैल दूर नेतां येते व त्या ठिकाणीं तिची पुन्हां शक्ति (उष्णता, उजेड किंवा नाद) करतां येते. यांत्रिक शक्तीचें विजेंत रूपांतर करणार्‍या यंत्रास डायनामो म्हणतात व विजेची शक्ति करणार्‍या यंत्रास मोटर म्हणतात.

यांत्रिक शक्ति ईथरनेंहि नेतां येते. आवाज टेलिफोनमध्यें घातला तर विजेच्या साहाय्यानें तो जसा दूर नेतां येतो तसा रेडिओपद्धतीनें आवाज यांत्रिक माध्यमाशिवाय हजारों मैलांवर नेतां येतो. स्वाभाविक आवाज थोड्या अंतरावर ऐकतां येतो, तो ईथरमुळें ऐकतां येतो. सामान्य आवजाचें रूप कृत्रिम पडद्यामुळें विकृत होतें आणि त्या पडद्यास जोडलेल्या विद्युद्यंत्रामुळें त्याचें वैद्युत लाटांत रूपांतर होतें व तें रूपांतर ईथरमुळें अनेक मैल जातें. त्या रूपांतरामुळें तो आवाज कानास अगोचर होतो पण तोच आवाज उलट क्रियेनें म्हणजे वैद्युत लाट “ग्राहकानें” धरून सामान्य स्वरूपांत आणतां येतो. येणेंप्रमाणें ईथर दूर शक्ति नेण्यास उपयोगी पडतो.

(३) वस्तूचें रूपांतर:-हें निरनिराळ्या धंद्याखालीं येऊन गेलेंच आहे. वस्तूंचें रूपांतर करण्याच्या क्रियांमध्यें निरनिराळ्या शाखांच्या वाढीमुळें कसकसा फरक होत जातो याचेंहि विवेचन प्रसंगानुरूप आलेंच आहे.

(४) स्थलांतर करणारीं यंत्रें:-यांमध्यें लोकोमोटिव्ह एंजिनें, आगबोटीचीं आणि मोटारगाड्यांचीं यंत्रें, विमानें वगैरे येतात. शिवाय बायसिकल, ट्रायसिकल वगैरे मानवी शक्तीनें स्थलांतर सुलभ करणारीं यंत्रें येतात. यांपैकीं लोकोमोटिव्हचें वर्णन “एंजिन” या सदराखालीं आलेंच आहे [ विमान पहा ]. या सर्वांचीं मुख्य तत्त्वें सारखींच. परिस्थितीप्रमाणें फरक होतो तो असा: स्थिर जागेवरील एंजिन वाटेल तितकें जड चालतें पण मोटारगाडीचें या मानानें बरेंच हलकें लागतें व हवेंत उडणार्‍या विमानाचें एंजिन हार्सपावरच्या मानानें फारच कमी वजनाचें असतें.

(५) नियामक यंत्रें:- कांहीं यंत्रांचा उपयोग चालू क्रियांस नियमितपणा आणण्याकडे असतो. अशांत “गव्हर्नर” मोडतात.

(६) प्रत्यक्ष विस्तारक:-प्रत्यक्षामध्यें जिव्हा आणि घ्राणेंद्रिय यांचें विस्तरण करणारीं यंत्रें फारशीं नाहींत. स्पर्शज्ञान, दृष्टि, आणि श्रवणेंद्रिय यांचें विस्तरण करणारीं यंत्रें आहेत. दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, क्यामेरा व सिनेमोटोग्राफ, स्पेक्ट्रोस्कोप हीं दृष्टीचें विस्तरण करतात. श्रवणेंद्रियांचें विस्तरण करणारीं यंत्रें म्हणजे ग्रामोफोन, टेलिफोन, रेडिओफोन, हीं होत. तशीं व निरनिराळीं मापकें हीं दर्शन किंवा श्रवण यांचींच विस्तारक होत.

यांत्रिक युक्त्या (चित्रांचें स्पष्टीकरण).

१ खुला पट्टा:-दोन साध्या चाकांच्या (पुल्यांच्या) साहाय्यानें आणि एका लाटेवरील (शाफ्टिंगवरील) शक्ति दुसर्‍या लाटेवर नेतां येते. ही अगदीं साधी व सोपी रीत आहे. यांत पट्टा सरळ असतो. फिरविणारें चाक जसें फिरत असेल तसेंच फिरणारें चाक फिरतें.

२ आढी पट्टा:-साधीं चाकें वापरून एका लाटेवरील शक्ति दुसर्‍या लाटेवर नेऊन त्या लाटेची गति उलटी करावयाची असते. तेव्हां पट्ट्याला आढी दिल्यानें फिरणार्‍या चाकाची गति फिरविणार्‍या चाकाच्या गतीच्या उलट होते.

३ काटकोन पट्टा:-एक लाट आडवी फिरत असून दुसरी लाट जेव्हां उभी फिरावयाची असते तेव्हां साधीं चाकें व पट्टा वापरून शक्तीचें संवहन करण्याची ही एक रीत आहे. पट्ट्याच्या दोन बाजू ज्या ठिकाणीं एक झालेल्या दिसतात त्या ठिकाणीं दोन लहान सुटीं चाकें (लूझ पुली) असून एका सुट्या चाकावरून घट्ट पट्टा येतो व दुसर्‍या सैल चाकावरून सैल पट्टा परत येतो. या चाकांनां वळणचाकें (गाईडपुल्या) म्हणतात. भोंक पाडणाच्या यंत्रांत असा पट्टा असतो.

४ अर्धवलित पट्टा:-चित्र नंबर तीन प्रमाणें म्हणजे काटकोनांत शक्तिसंवहन करावयाचें असेल तेव्हां पट्टा लावण्याची ही एक निराळी रीत आहे. यांत वळणचाकें (गाईड पुल्या) लागत नाहींत. दळणाच्या यंत्रांत व तांदूळ तयार करणार्‍या गिरणींत घरट्या (शेलर) व सडणारें यंत्र (पालीशर) यांनां अशीं चाकें लावतात.

५ विरुद्धगति संच:-या चित्रांत वरच्या बाजूस एक रुंद चाक असून त्यावरून खालीं पट्टा आला आहे. या ठिकाणीं ३ निरनिराळीं चाकें आहेंत; पैकीं दोन बाजूचीं चाकें a आणि b हीं घट्ट असून मधलें चाक (हें पट्ट्याखालीं झाकलेलें आहे) सुटें आहे. a, a, ही एक लाट (शाफ्टिंग) असून तिच्या डाव्या हाताच्या टोंकावर A हें दांत्याचें चाक बसविलें आहे. पट्टा उजव्या हातास सरकविला म्हणजे तो a या चाकावर येऊन त्याला फिरवितो व त्यामुळें a, a, शाफ्ट फिरूं लागते व a, a, शाफ्टच्या टोकावरील दात्यांचें चाक A फिरतें. A बरोबर C फिरतें. परंतु जेव्हा पट्टा b या चाकावर असतो तेव्हां B, b, हें शाफ्ट फिरते (हें शाफ्ट पोकळ असून याच्या आंतून a a हें शाफ्ट जातें) त्याबरोबर B हें दांत्याचें चाक फिरावयास लागतें व B बरोबर C फिरतें पण तें यावेळीं उलट फिरतें. या युक्तीच्या योगानें गति पाहिजे तशी उलट सुलट करतां येते. वर्कशापमध्यें प्लेनिंग मशीनमध्यें अशी योजना असते.

६ चढउतरगति संच:-यांत दोन चित्रें आहेत; पैकीं डाव्या बाजूच्या चित्रांत पायरीप्रमाणें उतरती चाकें आहेत; अशीं चाकें लेथ व वर्कशापचीं यंत्रें चालविण्यास वापरतात. याच्या साहाय्यानें गतीचें प्रमाण ४ प्रकारांनी बदलतां येतें. उजव्या हाताच्या चित्रांत शंक्वाकार (तिरपीं, गायदूम) चाकें दाखविलीं आहेत (कापसाच्या गिरणींत अशीं चाकें वापरतात) वरील दोन्ही चित्रांत पट्टा जितका डाव्या बाजूस सरकवावा तितकी फिरणार्‍या चाकाची गति फिरविणार्‍या चाकाच्या गतीपेक्षां जास्त होते. दुसर्‍या प्रकारांत पट्टा पाहिजे त्या ठिकाणीं ठेवून गति कमीजास्त करतां येते.

७ दांत्याची चाकजोडी:-यांत दांत्याचीं दोन चाकें आहेत. दोहोंनांहि बाहेरच्या बाजूस दांते पाडलेले आहेत. व ते एकमेकांत अडकविले आहेत यामुळें एक चाक फिरविलें तर दुसरें त्याच्या उलट फिरतें. दोन्हीं चाकांनां दांते सारखे असल्यास दोहोंची गति सारखी राहील. चालविणारें चाक कमी दांत्यांचें असून चालणारें चाक जास्त दांत्यांचें असेल तर चालविणार्‍या चाकाचे फेरे होत असतील त्यापेक्षां चालणार्‍या चाकाचे फेरे कमी होतील. तसेंच चालविणार्‍या चाकाचे दांते जास्त असल्यास चालणार्‍या चाकाचे फेरे जास्त होतील (चित्र नंबर १२ पहा).

८ घर्षणगति संच:-यांत शंक्वाकार दोन चाकें (पुल्या) उलटसुलट बसविलीं आहेत. यामध्यें थोडें अंतर असून त्या फटींत एक कातड्याचा पट्टा बसविलेला आहे. हा पट्टा स्क्रूनें मागेंपुढें सरकवितां येतो. एक चाक फिरूं लागलें म्हणजे त्याच्या घर्षणानें पट्टा फिरतो व पट्टा दुसर्‍या चाकावर दाबलेला असल्यामुळें तेंहि फिरतें. पट्टा ज्या जागीं असेल त्या ठिकाणच्या परिघांच्या प्रमाणांत गति एका बाजूनें दुसर्‍या बाजूवर जाते. हें इव्हॅननें तयार केलें.

९ बेव्हल गीअरिंग:-तिरप्या दांत्यांचीं चाकें, जेव्हां दोन लाटा (शाफ्टिंग) एकमेकाला समांतर नसतात तेव्हां अशीं चाकें वापरतात. बहुधां काटकोनांत गति न्यावयाची असल्यास अशीं चाकें लावतात. पण काटकोनाशिवाय इतर कोनांत गति न्यावयाची तेथें त्या कोनांत बसतील असे दांते तयार करून कोणत्याहि दिशेनें गति नेतां येते.

१० नाग व चक्र:-स्कू व चक्र यांच्या योगानें गतींत फार फरक करतां येतो. स्क्रू असलेल्या शाफ्टिंगवरून दांत्याच्या चक्रावर गति नेतांनां शाफ्टिंगच्या दर फेर्‍यास चाकाचा फक्त एक दांता फिरतो.

११ चलगति:-यांतील दांत्यांचीं चाकें गोल नसून अंड्याच्या आकाराचीं दीर्घवर्तुळ असतात. ज्या वेळीं गति कमी जास्त लागत असेल तेव्हां अशीं चाकें वापरतात.

१२ अंतर्दंतीचक्र:-यांत दांत्याचीं चाकें दोन आहेत. पैकीं एकाला बाहेरून दांते असून दुसर्‍याला आंतून आहेत. याच्या योगानें फिरण्याची दिशा बदलत नाहीं. चित्र ७ मध्यें जीं चाकें आहेत त्यांनां दांते बाहेर असल्यामुळें गति उलट होतें.

१३ तिर्यक् दंतीचक्र:-यांत दोन जातींचें दांते दाखविले आहेत. हे तिरपे आहेत. चित्र ७ यांतील दांते सरळ असल्यामुळें चाकें फिरतांना थोडाफार सैलपणा असतो. यांत त्या मानानें फारच कमी सैलपणा असतो.

१४ घर्षणशक्तिसंवहन:-यांत तिरप्या शाफ्टिंगनां गति देण्यासाठीं घर्षणाचा उपयोग केला आहे.

१५ दांत्यांचे आकार:-यांत तिरप्या शाफ्टिंगला गति देण्यासाठीं दात्यांच्या चक्राचे निरनिराळे आकार दिले आहेत.

१६ सर्वोंपयोगीसांधा:-यांत दोन जातींचे सर्वोपयोगी सांधे (युनिव्हर्सल जाइंट= भोरकडी) दाखविले आहेत. यंत्ररचनेंत अडचणीच्या जागा असतात तेथें सांधा वापरून शक्ति नेतात.

१७ विरुद्धगति:-काटकोनांत असलेल्या शाफ्टिंगला दांत्यांचीं चाकें लावून उलट सुलट गति केलेली आहे (चित्र ५ पहा). यांत मध्यभागीं एक कचाटें (क्लच) आहे. हें ज्या बाजूस ओढावें त्या बाजूच्या दांत्यांच्या चाकास तें घट्ट धरून त्या चाकावरून आडव्या चाकास गति देतें (दुसरें चाक सैल असल्यामुळें फिरत राहतें). आडव्या शाफ्टिंगवर चावीचा गाळा पाडून त्यांत लांब चावी बसविलेली असते. या चावीवर कचाटें डाव्या किंवा उजव्या हातास सरकविता येतें.

१८ चलगतिसंच:-दांत्यांच्या चाकाच्या साह्यानें यांत दोन प्रकारची गति देतां येते. डाव्या बाजूचीं दांत्यांचीं चाकें ज्या मानानें लहानमोठीं आहेत त्यापेक्षां उजव्या बाजूच्या चक्रांत बराच फरक आहे. मध्यें असलेल्या ३ पुल्यांपैकीं डाव्या बाजूची पुली सैल आहे. चित्रांत या चाकावर पट्टा दाखविलेला आहे. दुसरें चाक बारीक शाफ्टवर घट्ट बसविलेलें आहे. त्यावर पट्टा असतो तेव्हां डाव्या हातचीं चाकें फिरतात. तिसर्‍या चाकावर पट्टा नेला म्हणजे त्याच्या योगानें जाड (पोकळ) शाफ्ट फिरतें व गति उजव्या हाताच्या चाकास मिळते.

१९ चलगति संच:-ही पट्टे व साधीं चाकें यांनीं २ प्रकारची गति देण्याची योजना आहे. वरच्या चाकावर असलेल्या २ पुल्या लहानमोठ्या असल्यानें त्यांच्यावरून येणारी गति कमी जास्त येईल. खालच्या शाफ्टवर ४ पुल्या आहेत; पैकीं आंतील बाजूस असलेल्या दोन्ही घट्ट आहेत. व बाहेरच्या दोन्हीं सैल आहेत. चित्रांत डाव्या हातचा पट्टा सैल चाकावर आहे त्यामुळें त्या पट्ट्यानें गति दिलेली नाहीं. उजव्या बाजूचा पट्टा घट्ट चाकावर असल्यानें त्या बाजूनें गति मिळत आहे. हे पट्टे सरकविण्याची जी यंत्रयोजना असते तींत दोन्ही पट्टे समांतर ठेवण्याची सोय असते. यामुळें एक पट्टा सरकवून घट्ट चाकावर घेतला तर दुसरा सैल चाकावर आपोआप जातो.

२० तुटक गोल गति:- कांहीं ठिकाणीं अशी जरूर असते कीं चाक थोडें फिरल्यावर थोडें थांबलें पाहिजे. यासाठीं ही योजना आहे. A हें दांत्यांचें चाक आहे, B हा कुत्रा आहे, D ही आडवी दांडी आहे. व C हा एक सरळ हालणारा दांडा आहे. C जेव्हां वर सरकतो तेव्हां B हा कुत्रा मागें येतो. व कोणत्या तरी दांत्यांत अडकतो. नंतर C वरून खालीं येऊं लागला म्हणजे D दांडीचें टोंक वर जाऊं लागतें पण B हा कुत्रा दांत्यांत अडकलेला असल्यामुळें तो आपल्याबरोबर A चाक थोडेसें वर फिरवितो.

२१ हातोडा:-A हा एक गज असून त्याच्या खालच्या टोंकास वजन लाविलेलें आहे. A या गजावर B हा एक उंच भाग आहे. त्याला (B ला) कए अटक अडकली आहे. या अटकेला २ टोंकें असून ही अटक फिरणार्‍या शाफ्टवर फिरत असते. अटकेचें टोंक जेव्हां उंचवट्यास अडकतें तेव्हां तो गज वर उचलला जातो परंतु फिरत असलेली अटक त्या उंचवट्यापासून सुटल्याबरोबर तो गज खालीं पडतो.

२२ अविरत गति:- उजव्या बाजूस उभा गज आहे. हा सरळ रेषेंत खालींवर होतो या गजाला एक काटकोनी दांडी जोडलेली असून ती बिजागरीप्रमाणें थोडी फिरते. यामुळें एक कुत्रा दांत्यांच्या चक्रास मागें ओढतो. हा कुत्रा आहे त्या ठिकाणाहून काढून उलटवून मागें टाकला तर चाक दुसर्‍या दिशेनें फिरतें. वर्कशापमध्यें चालणार्‍या प्लेनिंगमशीनला अशी योजना असते.

२३ क्रँक:-वाफेच्या एंजिनांतील पिस्टन व पिस्टनचा दांडा यांची सरळ गति बदलून वाकडा दांडा व गोल दांडा यामुळें गोल गति होते. पिस्टन रॉड व क्रँक जोडणारा दांडा चित्रांत दाखविलेला नाहीं.

२४ संत्री:-वाफेच्या इंजिनांतील संत्री (एक्सेंट्रीक) यानें कँकशाफ्टची गोल गति बदलून सरळ गति होते. इंजिनांतील सरकपडदा (स्लाइडव्हाल्व्ह) सरकविण्यास याचा उपयोग फार ठिकाणीं करतात.

२५ रॅचेट:-ही भोकें पाडावयाच्या रँचेटची रचना आहे. रॅचेट एका दिशेंनें फिरतें, उलट येऊं शकत नाहीं. मागें येतांना स्प्रिंग दबतात व कुत्रे मागें येतात.

२६ घर्षण रॅचेट:-याची रचना चित्र नं. २० च्या रचनेसारखी आहे. पण यांत दांत्यांचें चाक न वापरतां साधें चाक व कुत्रे वापरले आहेत. घर्षणानें कुत्रे चाकाला फिरवितात.

२७ हार्टकॅम:-हा आपल्या आसांभावतों फिरला म्हणजे याला टेकून धरलेल्या दांडीला सारखी आडवी गति मिळते.

२८ शीघ्रमंद गति:-पुढें जातांना हळू जाऊन मागें एकदम येणारीं ही कँकची योजना आहे. वर्कशॉपमधील शेपिंग मशीनला ही वापरतात. ही समजण्यास फार सोपी आहे.

२९ शून्यलांबी जोडदांडा:-कँकची गति कनेक्टिंगरॉड शिवाय सरळ करण्याची योजना आहे. कँकची पिन गाळ्यांत मागेंपुढें होते

३० पंचिंगप्रेस:-स्क्रूचा दाब उपयोगांत आणून तुकडे कापण्याचें किंवा ठसे उठविण्याचें यंत्र. याच्या स्क्रूची गोल गति असते, तिची यांत सरळ गति होते.

३१ आटे कापण्याचें व स्क्रू तयार करण्याचें यंत्र:-यांत एक स्क्रू मूळ असून त्याला हत्यारे पक्कें धरलेलें आहे. व ज्यावर स्क्रू कापावयाचा तो दांडा समोर धरला आहे. दोहोंनां दांत्यांच्या चक्रांनीं गति दिलेली आहे. म्हणून एक फिरल्याबरोबर दुसरा देखील ठराविक प्रमाणांत फिरतो. व कापणारें हत्यार याच वेळीं मध्यें गाळा कापून काढतें. मूळ स्क्रूपेक्षां कमी अधिक मापाचा स्क्रू कापावयाचा असल्यास दांत्यांचीं चक्रें बदलून योग्य आकाराचा स्क्रू तयार करतात.

३२ सैल हेडस्टॉक:-लेथचा सरकणारा हेडस्टॉक. मध्यें असलेला बोलट सैल करून इच्छित ठिकाणीं हा सरकवून ठेवून बोलट घट्ट करून पक्का करतात. व मग उजव्या हातचें चाक फिरवून डाव्या हातचें टोंक (आंतील स्क्रूनें) मागें किंवा पुढें सरकवितां येतें.

३३ गाडी-सुकाणू:-गाडीचीं चाकें (पुढचीं) वळविण्याची युक्ति. हींत एक स्क्रू व दांत्यांच्या चाकाचा भाग आहे (चित्र १० पहा). दांत्यांच्या चाकाला कँक जोडलेले असून तें सरकेल तशीं गाडीचीं पुढचीं चाकें समोर किंवा बाजूस वळतात.

३४ त्रिगतिक:-एक हँडल फिरविल्यानें तीन ठिकाणीं सारखी गति देण्याची योजना. मध्यें स्क्रू (नाग) असून त्याला तीन चाकें लावलेलीं आहेत. स्क्रू जितका फिरवावा तितकींच तीन चाकें फिरतात.

३५ जलद बसणारा स्क्रू:-यांत स्क्रूचा कांहीं भाग व तो ज्यांत बसतो त्या नटचा कांहीं भाग घांसून काढलेला असतो. यामुळें तो स्क्रू आंत सरकवून जातो. व थोडा फिरविला कीं घट्ट होतो. तोफेच्या मागच्या भागांत हीं योजना असते.

३६ चलतत्रिज्यातरफ:-उजव्या हातास असलेल्या कँकवरून डाव्या हातास असलेल्या झुलल्या दांड्यास गति घेतली आहे. ह्या दांड्यास मध्यें असलेल्या स्क्रूवर जोडणार्‍या दांड्याचें टोंक असल्यानें हें टोंक खालींवर सरकविल्यास झुलणार्‍या दांड्याच्या वरच्या टोंकाची गति कमीजास्त होते.

३७ ड्रिल किंवा दुसर्‍या यंत्राला हातानें किंवा आपोआप सरकविण्याची योजना:-ही नेहमीच्या प्रचारांत आहे.

३८ दुप्पट गति:-खाली व वर दांते पाडलेले पट्टे असून मध्यें दांत्यांचें चाक आहे. पैकीं खालचा पट्टा पक्का बसविलेला असतो व वरचा सरकणारा असतो. हे पट्टे सपाट असून मधील चाक सपाट असतें (दांत्यांशिवाय असतें). तर मागील दांड्यानें ढकलल्याबरोबर हें चाक जितकें ढकलावें तितकें पुढें गेलेलें असतें परंतु दांते असल्यामुळें, दांत्यांचें चाक मागून ढकलण्यानें पुढें जातांना आपल्या आंसाभोंवती फिरूं लागतें व या फिरण्यानें वरचा पट्टा पुढें सरकतो; तो जितकें दाबलें असेल त्याच्या दुप्पट असतो.

३९ कोपर सांधा:- (टॉगल जाईंट) उजव्या हातचा दांडा दाबल्यानें डाव्या हातास असलेला कोपर-सांधां सरळ होऊन त्याच्या खालच्या टोंकास असलेला पंच खालीं उतरतो व दांडी वर करण्यानें पंच वर जातो.

४० दगटकुट्या:-यांत वरीलप्रमाणेंच यंत्रयोजना असून कडक पाणी दिलेले पोलादी दांत असतात. या दांतांत दगड सांपडला कीं, त्याचे बारीक तुकडे होतात.

४१ दीर्घवर्तुळ लेखक:-हें दीर्घवर्तुळ काढण्याचें यंत्र असून यांत आडवा व उभा गाळा पाडलेला असून त्यांत २ ठेपी लावून एक पट्टी बसविलेली असते. या पट्टीच्या टोंकाला पेन्सील असते. या दोन्ही ठेपी गाळ्यांत ठेवून पट्टी सरकविली म्हणजे दीर्घवर्तुळ निघतें.

४२ विरुद्धगति संच:-एंजिन कोणत्या दिशेनें चालावयाचें हें त्याच्या सिलेंडरांत वाफ सोडणार्‍या सरकपडद्यावर (व्हाल्व्हवर) अवलंबून असतें. एंजिन थांबतांना जर सिलेंडरचें तोंड बंद असेल तर वाफ आंत जात नाहीं. अशा वेळीं दुसर्‍या बाजूनें (मागच्या बाजूनें) सिलेंडरांत वाफ सोडून एंजिन मागें चालवितात व मागें चालू झाल्यानंतर ती पुढें चालवितात. या कामासाठीं ही योजना आहे. उजव्या हातास दोन संत्र्या (एक्सेट्रिक्स) आहेत. त्यांचे दांडे एका कडीला बसविलेले आहेत. डाव्या बाजूस असलेल्या दांड्यानें ही कडी खालीं सोडतां किंवा वर उचलतां येते. या कडींत एक सरकणारा तुकडा असतो. हा तुकडा मध्यावर असला तर व्हाल्व्हला गति मिळत नाहीं. हा तुकडा मध्यापासून जितका दूर असेल त्या मानानें जास्त वेळ वाफ सिंलेडरांत सुटेल.

४३ जॉयचे व्हाल्व्हगीअर:-ही यंत्रयोजना कनेक्टिंग रॉडनें हालते (निराळ्या संत्र्या नसतात). बाकीची रचना वरीलप्रमाणें.

४४ साईड शाफ्ट:-ऑईल एंजिन, ग्यास एंजिन, मोटारचीं एंजिनें यांतील व्हाल्व्ह, कार्लीस व्हाल्व्ह जातीच्या पडद्यांनां किंवा उचलणार्‍या पडद्यांनां उचलण्यासाठीं या प्रकारानें गति दिलेली असते.

४५ जिनोव्हास्टॉप:- घड्याळाची स्प्रिंग गुंडाळण्याचें प्रमाण ठरविण्याची अटक किल्ली देतांनां वरच्या चाकाचा a, b हा भाग खालच्या चाकाला अडकवून पुढें जाऊं देत नाहीं.

४६ गतिनिरोधक अथवा ब्रेक:-या प्रकारचे ब्रेक डिगली (क्रेन) मध्यें वापरतात. ज्यावर दोरखंड गुंडाळावयाचें असतें तें पिंप घट्ट धरून ठेवण्यासाठीं एका बाजूस असा ब्रेक बसवितात. यांत एक चाक असून त्याच्या भोंवतीं पट्टा आहे. याचीं दोन टोकें एका दांड्यास लावलेलीं आहेत. हा दांडा दाबला म्हणजे पट्ट्याचीं टोंकें जवळ येऊन आतील पिंपाला (ड्रमला) फिरूं देत नाहींत.

४७ शक्तिमापक:-शक्ति उत्पन्न करणार्‍या यंत्रांत बाहेरच्या कामास किती शक्ति उपयोगी पडेल हें दाखविणारें यंत्र. डाव्या बाजूस A हें लहान चाक असून तें एंजिनाच्या कँक शाफ्टवर किंवा समोरच्या शाफ्टवर शक्य तितकें एंजिनाजवळ बसविलें आहे. या चाकाच्या बाहेर एक दोर किंवा लोखंडी पट्टा असून त्यास आंतून लांकडाचे ठोकळे बसविलेले आहेत. हे ठोकळे असे आहेत कीं, हा पट्टा किंवा दोर ताणून घट्ट केला तर हे सर्व ठोकळे मधील चाकास दाबून धरून फिरण्यास फार अडथळा करतील. या दोराच्या टोंकांस स्क्रू असून D या दांड्याला भोंकें पाडून त्यांतून हे स्क्रू वर काढून चाक्या लावून घट्ट करतां येतात. D च्या उजव्या हातच्या टोंकास एक पारडें बसविलेलें असून त्यांत वजनें ठेविलेलीं आहेत. पारड्याच्या जवळच D च्या खालींवर C C या दोन खुंट्या असून त्या त्याला खालीं जाऊं देत नाहींत. A चाक फिरावयास लागलें म्हणजे स्क्रू घट्ट करतात यामुळें लांकडाचे ठोकळे A चाकास दाबून बसतात. पारड्यांत वजनें अशा बेतांनें घालावयाचीं कीं हा दांडा दोन्हीं खुंट्यांस चिकटूं नये. एंजिने दर मिनिटास जितके फेरे करतें तितकीच गति यावेळीं A चाकाला देतात. पारडें जेथें टांगलें असेल त्या बिंदूला जी गति असेल तिचा व पारड्यांतील वजनांचा गुणाकार केला म्हणजे एंजिनाच्या उपयोगीं पडणारी शक्ति समजते. गतीचा निरोध करून शक्ति मोजतात म्हणून यास गतिनिरोधक (ब्रेक) असें म्हणतात. व ब्रेक लावून मोजलेली हॉर्सपावर ती ब्रेक-हॉर्सपावर होय.

४८ बॉलबेअरिंग अथवा गोलकावण:-याच्या निरनिराळ्या रचना आहेत. त्यांपैकीं एकीचें हें चित्र आहे. बॉल (गोळा) कोठें टेकले पाहिजेत हें रेघांनीं दाखविलें आहे.

४९ रोलर बेअरिंग अथवा फिरकींचें आवण:-उभ्या शाफ्टच्या खालच्या टोंकास आधार देणारे रोलर बेअरिंग. याच्या मध्यभागीं असलेलें उभें शाफ्ट असून त्याच्या खालचें (टेकणारें) टोंक जास्त मोठें केलें असून तें खालीं निमुळतें (गायदूम-टेपर) केलें आहे. याला आधार तितक्याच निमुळत्या फिरक्यांचे दिलेले असून फिरक्यांचीं टोंकें ज्यांत फिरतात त्या ठिकाणीं बॉल बेअरिंग बसविले आहेत.

५० रोलर बेअरिंग:-मोठ्या गाड्याच्या चाकांतील रोलरबेअरिंग. यांत रोलर सुटे राहण्यासाठीं व त्यांचें घर्षण होण्यासाठीं टोंकास बॉलबेअरिंग बसविलेले आहेत. यांत दोन चित्रें आहेत; डाव्या हाताच्या चित्रांत टोंकाकडून पाहिलें असतां कसें दिसेल तें दाखविलें आहे. यांत जे दोन पांढरे भाग आहेत ते बॉल आहेत. व त्यांच्या बाजूला असलेले तीन रोलर आहेत.

५१ रीकॉईल एस्केपमेंट:-घड्याळाचा लंबक झुलत असतांना त्याच्यायोगें H, L, K हा नांगर a या आसावर झुलावयास लागतो. A हें एक निसटतें चाक आहे. या चाकाचे दांते H, L, K नांगराच्या H व K या फाळांच्या आंतल्या व बाहेरच्या बाजूस आलटून पालटून चिकटतात. फाळांची गोलाई a या आसाला समानकेंद्र नाहीं. म्हणून दांत्यांमधून फाळ सुटल्याबरोबर या चाकाची स्प्रिंग थोडीशी सुटते. फाळ दांत्यांतून जेव्हां सुटतात तेव्हां चाकाचे दांते त्याच्या टोंकावर घसरतात व यामुळें लंबकाला थोडी गति मिळते.

५२ डेडबीट एस्केपमेंट, (मोठ्या घड्याळाची):- यांतील नांवें चित्र ५१ सारखींच आहेत. यांत नांगराचे दोन फाळ समानकेंद्र आहेत. यामुळें जेव्हां दांता फाळाला चिटकलेला असतो तेव्हां चाक हालूं शकत नाहीं.

५३ लिव्हर एस्केपमेंट (खिशांतील घड्याळाची) :-B हा नांगर असून तो E,c या लिव्हरला (तरफेला) जोडलेला आहे. या लिव्हरला E या टोंकास E ही खांच आहे. बॅलेन्स व्हीलच्या आंसावर D ही एक चकती आहे व हिच्यावर एक उंचवटा आहे. हा उंचवटा प्रत्येक झोक्याच्या मध्यावर E या खांचेंत जातो. यामुळें फाळाला दांत्यांच्या आंत घुसून बाहेर यावें लागतें. यावेळीं चाक एकएका फाळास आळीपाळीनें धक्का देतें. यावेळीं एक एक फाळास आळीपाळीनें धक्का देतें. यावेळीं एक एक दांता फाळ सरकतें. या फाळाला मिळालेल्या धक्का देतो.

५४ क्रोनोमीटर एस्केपमेन्ट:-तिरानें दाखविल्याप्रमाणें जेव्हां बॅलेन्स व्हील फिरतें तेव्हां V हा दांता स्प्रिंगलिव्हरवर दाबतो. यामुळें लिव्हर बाजूला हटून दांत्यांच्या चाकाला लागलेली अटक बाजूस होते. बॅलेन्सव्हील परत येतें तेव्हां V हा दांता स्प्रिंगवरून जातो पण लिव्हर हालवीत नाहीं व लिव्हरला अडकून राहतो.

५५ समांतर गती (पॅरलल मोशन) चा एक प्रकार:-मध्यभागीं एक लहान हालणारा दांडा असून त्याच्या डाव्या टोंकास रेडीयस रॉड व उजव्या टोंकास बीम जोडलेली आहे. व मध्यभागीं पिस्टनरॉड जोडलेला आहे.

५६ आडवी गति:-या चित्रांत २ चाकें आहेत. पैकीं उजव्या हाताच्या चाकास एक खांच पाडली असून ती वरती एका बाजूस सुरू होऊन खालीं दुसर्‍या बाजूला आलेली आहे. न दिसणार्‍या अर्ध्या भागांत हा खोबण अशीच मागून वरच्या टोंकास मिळाली आहे. या खोबणींत एक खुंटी असून ती वरच्या शाफ्टला अडकविली आहे. खालचें चाक एक फेरा फिरविल्यास ही खुंटी डावीकडून उजवीकडे ओढली जाते व पुन्हां उजवीकडून डावीकडे पूर्वस्थलीं येते.

५७ सामता-यंत्र अथवा ड्रिलिंग मशीन:-उजव्या हाताच्या हँडलनें गति दिल्यानें सामता बसविलेला दांडा दांत्यांच्या चाकांनीं फिरावयास लागतो. यांतील आडव्या चाकास चावीचा गाळा पाडलेल्या दांड्याला चावी बसविलेली असते. दांडा खालींवर सरकला तरी या चावीमुळें दांत्यांचें चाक त्यांत नेहमीं अडकलेलेंच असतें. खालीं असलेल्या आडव्या दांडीनें सामता खालीं दाबतां येतो.

५८ आटे आखणी:-उंसाच्या चरकाच्या रुळाला खांच पाडण्यासाठीं खुणा आंखण्याचें हें साधन आहे. उजव्या हातास असलेले हँड्ल फिरविल्यानें दांत्यांचें चाक फिरतें. यामुळें त्याच्याबरोबर दांत्यांचा पट्टा खालींवर होतो. या पट्ट्याला खाली पेनसिल असते. तिच्या योगानें जी रेघ पडते ती चित्रांत दाखविली आहे.

५९ कॅपस्टन:-दोर गुंडाळावयास व आगबोट धक्क्याला लावण्यास कॅपस्टनचा उपयोग होतो. यांत दांत्यांच्या चक्राच्या योजनेनें दोर गुंडाळलेला पिंप व दोर गुंडाळणारें शिर (ड्रमहेड) हीं दोन्हीं एकदम किंवा अलग अलग फिरवितां येतात. ड्रमहेड हें शाफ्टिंगला जोडलेलें असून तें व पिंप ए बोल्ट अडकवून एकमेकांस पक्के करतां येतात. अशा स्थितींत दोन्हीं एका चालीवर चालतात. बोल्ट अडकविलेला नसेल तेव्हा चाकांचा उपयोग होऊन ड्रमहेड व पीप हे एकमेकांच्या उलट दिशेनें फिरावयास लागतात. व यावेळीं ड्रमहेडच्या गतीच्या तिसरा हिस्सा गति पिंपाची असते.

६० सेंट्रीक्यूगल गव्हर्नर-नियामक:-मध्यें एक सळई असून तिच्या वरच्या टोंकाला बिजागरीनें २|३|४ काड्या टांगलेल्या असतात. या काड्यांच्या टोंकांनां वजनदार गोळे बसविलेले असतात. एंजिनाच्या गतीनें सळई फिरूं लागली म्हणजे वरच्या टोंकास टांगलेल्या काड्या दूर दूर जाऊं लागतात व हे गोळे जड-हलके असतील त्यामानानें त्यांनां अडथळा करून पहिल्या जागीं आणण्याचा प्रयत्‍न करतात. एंजिनाची गति जास्त झाल्यास हे गोळे बाहेर फेंकले जातात. व त्याच्या कांडीला जोडलेल्या दांड्याच्या योगानें एंजिनांतील वाफ जाण्याचें प्रमाण कमी होतें. एंजिनाची गति कमी झाल्यास गोळे जवळ येऊन जास्त वाफ येण्याची योजना होते.

६१ कँकशाफ्टवर बसवितां येणारा नियामक:-याच्यायोगें पंचपात्रांत (सिलेंडर) जाणारी वाफ बंद करतां येते. वाफ बंद करणार्‍या संत्र्यांनां (एक्सेंट्रिक) दोन वजनें बिजागरीनें टांगलेलीं असतात. फिरण्याच्या गतीवर हीं वजनें बाहेर फेंकलीं जाऊन त्याच्यायोगें संत्र्या मागें किंवा पुढें होतात व वाफ बंद करण्याच्या वेळेस फरक करतात. वजनें परत जागेवर आणण्यासाठीं स्प्रिंग योजितात.

६२ ग्यासएंजिन चा नियामक:-एंजिनाची गति वाढली म्हणजे फिरणारा कॅम बाजूच्या दांड्याला जोरानें फटका मारतो. या फटक्याच्या जोरानें ग्यास सोडणारां नळ बंद होतो.

६३ पाणचक्की:-हिच्यामध्यें पाणी मध्यभागीं येतें. या ठिकाणीं वाकण असलेलें गाळे (शूट) असून यांतून पाणी बाहेर पडतें. या गाळ्यांचा आकार वर्तुळाकार असल्यानें पाण्याला तशीच गति येते. या गाळ्यांतून पाणी बाहेर पडतें तेथें बकेटें आहेत. यांचा आकारहि गाळ्यांनां बरोबर येईल असा आहे म्हणून तें तेथें बकेटांत आल्यानें बकेटांस गति देतें. या ठिकाणीं बकेटें बसविलेलीं दाखविलेलीं आहेत.

६४ जुव्हेल पाणचक्की:-हा एक ड्रम (पीप) असून याच्या बाहेरच्या बाजूस गाळे (शूट) पाडलेले आहेत. हा ड्रम पंचपात्रासारख्या नळांत पक्का बसविलेला आहे. पाणी आंत येण्याचा नळ उजव्या हातास आहे व त्यांत बाण दाखविला आहे. याच्या वरच्या भागांत पाणी आलें म्हणजे तें गाळ्यांतून खालीं येतें तेथें C हें चाक आहे. त्या चाकाला बकेट केलेले आहेत. गाळ्यांतून पाणी बकेटांत आलें कीं बकेटांनां तें पुढें दाबतें व यामुळें बकेट व चाक हीं फिरावयास लागतात.

६५ माँटगोलीअर्स हैड्रॉलिक रॅम:-याच्या योगें थोड्या उंचीवरून पडणारें पुष्कळ पाणी उपयोगांत आणून त्यामानानें बरेंच थोडें पाणी वर चढवितां येतें.

६६ उचल्या पंप:-दट्ट्या वर जातांना खालचें व्हाल्व्ह उघडतें व दट्ट्यांतील व्हाल्व्ह बंद होतें, यामुळें आंत निर्वात पोकळी होऊन पाणी आंत भरतें. दट्ट्या खालीं येतानां दाबानें खालचें व्हाल्व्ह बंद होतें व दट्ट्याच्या आंतील व्हाल्व्ह उघडून पाणी दट्ट्याच्या वरच्या बाजूस जाऊन तोटींतून बाहेर पडतें.

६७ चढव्या पंप:-पाणी उचलून वर चढविणारा पंप. याला दोन व्हाल्व्ह आहेत; एक पाणी आंत घेणारें व दुसरें बाहेर सोडणारें. जेव्हां दट्ट्या वर जातो तेव्हां खालचें व्हालव्ह उचलून पाणी आंत येतें. व पिस्टन खालीं येऊं लागला म्हणजे वरचें व्हाल्व्ह उघडून पाणी वर जातें. उंच नळ असेल तितक्या उंचीवर या पंपानें पाणी रेटतां येतें.

६८ दुहेरी पंप:-यांत दोन्हीं बाजूंनीं पाणीं खेचलें व वर चढविलें जातें. यास ४ व्हाल्व्ह लागतात; २ पाणी आंत घेणारे व २ पाणी बाहेर सोडणारे.

६९ हैड्रॉलिक प्रेस:-उजव्या हाताच्या चित्रांत पाणी दाबणारा पंप असून डाव्या हाताच्या बाजूस या दाबलेल्या पाण्यानें वर उचलणारा एक रॅम आहे. हा पंचपात्रांत असतो. पंपानें पुष्कळ वेळ काम केलें. म्हणजे रॅम थोडा वर उचलतो. कापसाचे गठ्ठे बांधावयास अशा प्रेसचा उपयोग होतो.

७० प्रेशर गेज अथवा दाब दाखविणारें यंत्र:-B ही वाटोळी वांकविलेली नळी आहे. हिचीं दोन्हीं टोकें बंद आहेत. नळीचा मध्यभाग हा घट्ट बसविलेला आहे. नळीचीं टोंकें ज्याला जोडलेलीं आहेत तो एक मोठ्या दांत्यांच्या चाकाचा तुकडा आहे. या तुकड्याला दांत्यांचें लहान चाक लावलेलें आहे व या चाकाला काटा जोडलेला आहे. वाफ आंत आली म्हणजे तिच्यायोगानें नळी सरळ होऊं लागते परंतु मधला भाग घट्ट धरलेला असल्यामुळें फक्त टोंकें बाहेर फांकतात. या टोकांच्या गतीनें अखेर कांटा सरकतो. हें सरकण्याचें प्रमाण नळीच्या आंतील जोरावर अवलंबून असतें जोर जास्त असलातर नळी जास्त फांकते व कांटा जास्त दूर जातो.

७१ हवेचा पंप:-याला खालचें व्हाल्व्ह व वरचें व्हाल्व्ह अशीं दोन व्हालव्ह आहेत.

७२ रोटचें रोटरी एंजिन:-याचा उपयोग पंपासारखा किंवा हवा फेंकण्यासाठीं भात्यासारखा (ब्लोअर) होतो. याचे दोनं भाग असून ते असे केलेले आहेत कीं त्यांच्या फिरण्यानें त्यांत हवा व पाणी अडकून पुढें जाते; परत मागें जाऊं शकत नाहीं.

७३ हैड्रॉलिक लिफ्ट:-चित्र नं. ६९ मध्यें गठ्ठे बांधण्याचें काम होतें, यांत ओझें वर उचलण्याचें काम होतें. यांत ओझें वर उचलण्याचें काम होतें. उजव्या हातास A हें एक सिलेंडर आणि रॅम आहे व डाव्या हाताला बी हें सिलेंडर व रॅम आहेत. डाव्या हातच्या सिलेंडरचें व रॅमचें जितकें वजन आहे तितकेंच (सरासरी) उजव्या हातच्या सिलेंडरचें वजन उचलण्यांत फुकट जाणारी शक्ति वांचविली आहे. दाबाचें पाणी आंत सोडल्यास ओझें उचलण्याचें काम होतें.

७४ एपीसायक्लीक ट्रेन:-A हें दांत्यांचें चाक C या चौकटीला समानकेंद्र आहे. मध्यभागी E व F हीं दांत्यांचीं चाकें असून तीं एका दांड्यावर पक्कीं बसविलेलीं आहेत. A चे दांते F च्या दांत्यांत बसविलेले आहेत, E चे दांते B व D च्या दांत्यांत बसविलेले आहेत पैकीं D व A हीं एकाच शाफ्टवर आहेत. गति चौकटीला किंवा A अथवा D यापैकीं एका चाकाला देऊन तीमधील चक्रांच्या साहाय्यानें ही गति B या चाकापर्यंत नेतां येते. किंवा बाहेरील बाजूच्या चाकांनां गति देऊन चौकटीला गति देतां येते.

७५ एपीसायक्लीक ट्रेन:-A, A हें शाफ्ट असून त्यावर C, D हीं दांत्यांचीं चाकें सैल आहेत. F, G हा एक दांडा (आर्म) असून त्यावर B हें सैल चाक आहे. C, D चाकें फिरविल्यास दांडा (आर्म) फिरतो. व एका चाकास व दांड्यास गति दिल्यास दुसरें चाक फिरतें.

७६ साधा सरकपडदा:-दोन बाजूंस असलेले दोन गाळे वाफ आंत घेण्याचे आहेत. मधला गाळा वाफ बाहेर सोडून देणारा आहे. चित्रांत डाव्या बाजूची वाफ बाहेर जात आहे व उजव्या बाजूनें जोरदार वाफ पंचपात्रांत जाण्याचा रस्ता उघडा आहे.

७७ समतोल सरकपडदा:-चित्र ७६ पेक्षां निराळी रचना पंचपात्रावर सरकपडदा वाफेच्या दाबानें दाबलेला असतो परंतु या जातीच्या पडद्याच्या दोन्हीं बाजूंस (अदमासें) सारखी वाफ असल्यानें या वाफेच्या जोरानें येणारा दाब थोडा कमी होतो. वाफ आंत जाणें व बाहेर जाणें हें बाणांनीं दाखविलें आहे.

७८ दुभागी सरक पडदा:-इंजिनाच्या गतीनें हे दोन्ही पडदे सरकतात. एका पडद्यानें वाफ तोडणें चांगलें साधत नाहीं म्हणून ही योजना आहे. वरच्या पडद्याचे दोन तुकडे असून ते ज्या दांड्यावर बसविले आहेत त्या दांडीला स्क्रू आहेत. हा दांडा हातांनीं फिरवून हे तुकडे मागें पुढें सरकवितां येतात.

७९ डबल बीटव्हाल्व्ह:-उचलण्यानें उघडझांक होणार्‍या पडद्याचा आकार मोठा असल्यास त्याला जास्त उचलावें लागतें. त्याची रचना अशी केली तर दोन भागीं उघडत असल्यानें निम्मी उचल पुरी होते.

८० दाब कमी करण्याचें व्हाल्व्ह:-याला वर असलेला आडवा दांडा वजन ठेवून जड करतां येतो. वजन डाव्या हाताकडे नेलें तर व्हाल्व्हवर दाब कमी होतो.

८१ समतोल पडदा:-पडद्याच्या एकाच बाजूला दाब असला तर तो खालीं घट्ट दाबून बसतो. यांत खालच्या बाजूस अंतरावर एक उपपडदा ठेवून त्यावर दाब घेऊन वरच्या बाजूचा दाब नाहींसा केला आहे.

८२ रबराचें व्हाल्व्ह:-मध्यें जाळी असून तिच्या खालीं एक रबराची चकती सपाट बसविली आहे. निर्वात जागा झाली म्हणजे खालच्या पाण्याच्या जोरानें रबराची चकती उचलली जाते व मधल्या उघड्या पडलेल्या जागेंतून पाणी वर येतें.

८३ द्विशक्तिजल यंत्र:-चार व्हाल्व्ह उपयोगांत आणून कमी अधिक शक्तीचें हॅड्रॉलिक सिलेंडर करतात. यामध्यें पिस्टन पोकळ असून त्याच्या आंतील बाजूस दाबाचें पाणी घेतां येतें. कमी शक्ति पाहिजे असेल तेव्हां आंत दाबाचें पाणी घेतात. खूप जोर पाहिजे असेल तेव्हां आंतील बाजू उंच्छवासास जोडून एका (मोठ्या, बाहेरच्या) बाजूनें पाणी घेतात.

८४ कारलीस व्हाव्ल्ह:-यांत वाफ आंत घेणारे दोन व्हाल्व्ह आहेत व वाफ बाहेर सोडणारे दोन आहेत. या व्हाल्व्हचा आकार पंचपात्रासारखा असतो व हे आपल्या आसाभोंवतीं फेर्‍यांचा थोडा भाग मागेंपुढें सरकतात. ही गति एका तव्यासारख्या पत्र्यावरून दिलेली आहे. हा पत्रा रुंदीच्या योगानें थोडाफार झुलतो. या झुलण्यानें व्हाल्व्हला गति मिळते.

८५ कारलीस व्हाल्ह:-याचा मधला दांडा चौकोनी आहे. या दांड्यावर तें झुलतें.

८६ आगबोट एंजिन:-हें फार प्रचारांत आहे. याला एक, दोन किंवा तीन पंचपात्रें असतात. तीं वर असतात. व एंजिनाच्या रुंदीपेक्षां उंची बरीच जास्त असते म्हणून यास उभें एंजिन असें म्हणतात.

८७ चौभागी आवण:-या आवणांत चार भाग असून ते स्क्रूच्या योगानें घट्ट करतां येतात.

८८ दाबलेल्या तेलावर उभे शाफ्ट:-उभ्या शाफ्टिंगच्या खालचें टोंक जेथें टेकतें तेथें वजन फार येतें व त्या ठिकाणीं वंगण चांगलें राहिलें पाहिजे म्हणून चित्रांत दाखविलेल्या गाळ्यांत पंपानें तेल दाबून या टोंकाखालीं घालतात. जास्त झालेलें तेल बाहेरच्या बाजूस जाऊन पडतें; तेथें तें जमा करून पुन्हां उपयोगांत आणतां येतें.

८९ क्रॉसहेड:-याला खालीं वर आधार असून त्यावर हें घसरत असतें. झीज भरून काढण्यासाठीं याची खालची वरची बाजू तिरपट केलेली असून स्क्रूच्या योगानें ती सरकवून योग्य ठिकाणीं घेतां येते.

९० समतोलतरफ:-आगगाडीच्या डब्याच्या खालच्या स्प्रिंग जोडण्याची रीत. यामुळें दोन स्प्रिंगवर वजन वाटलें जातें.

९१ कोर्टींग कंडेन्सर:-यांत एका बाजूनें वाफ व दुसर्‍या बाजूनें पाण्याचा फवारा येतो. पाण्याच्या संयोगानें वाफेचें पाणी होतें याला फक्त ३ फूट उंचीचें पाणी पुरतें.

९२ आपोआप ओतणारी तराजू:-उजव्या हातास वजनें टांगलेलीं आहेत, डाव्या हाताचें पारडें वजनाइतकें भरलें म्हणजे खालीं असलेल्या अटकेस टेकून उलटून माल बाहेर टाकतें व पुन्हां पहिल्या जागीं येतें व पुन्हां भरतें.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .