प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

यादववंश (देवगिरीचा) - महाराष्ट्रात या वंशाचें माहात्म्य अतिशय आहे. यादवांचेच वंशज जाधव होत. हे यादव मूळचे मथुरेचे राहणारे असून, त्यांचीं कित्येक घराणीं प्राचीन काळीं केव्हां तरी गुजराथेंत व महाराष्ट्रांत आलीं. हेमाद्रीच्या व्रतखंडांत ह्या घराण्याची हकीकत दिलेली आहे. यादवांचे दोन वंश प्रसिद्ध आहेत: एक नाशिकजवळ चंद्रादित्यपूर उर्फ चांदवड येथें राज्य करीत होता आणि दुसरा देवगिरि उर्फ दौलताबाद येथें होऊन गेला. पहिल्या वंशाची राजधानी श्रीनगर (सिन्नर) ही सेउण देशांत होती. सुबाहु नांवाचा एक पराक्रमी यादव राजा उत्तर हिंदुस्थानांत झाला. त्याचा मुलगा दृढप्रहार (सुमारें ७९५) ह्यानें प्रथम महाराष्ट्रांत प्रवेश करून आपलें राज्य स्थापिलें. दृढप्रहाराचा मुलगा सेउणचंद्र ह्यानें सेउणपूर शहर स्थापून देशांचेहि नांव सेउणदेश असें ठेविलें. हें खानदेशाचें मुसुलमान येण्याच्या पूर्वींचें नांव होय. देवगिरी शहर सेउणदेशाच्या उत्तर सरहद्दीवर होतें.

पहिल्या सेउणचंद्राच्या पश्चात त्याचा पुत्र धाडियप्पा व नातू भिल्लम (पहिला) हे अनुक्रमें गादीवर आले. पुढें राजगी, वादुगी, धाडियस, भिल्लम वगैरे राजे यादव कुळांत निपजले. हा भिल्लम (दुसरा) पराक्रमी होता. भिल्लमानंतर वेसुगी, अर्जुन व भिल्लम (तिसरा) हे राजे झाले. या भिल्लमानें चालुक्यवंशीय जयसिंहाच्या मुलीशीं लग्न लाविलें. त्यानंतर वादुगी दुसरा, वेसुगी दुसरा, भिल्लम चवथा व सेउणचंद्र दुसरा हे राजे झाले. त्यांत सेउणचंद्र दुसरा (१०६९) हा पराक्रमी राजा झाला. त्यानें चालुक्य राजाविक्रमादित्य यास पुष्कळ मदत केली. पुढें परम्मदेव सिंहराज उर्फ सिंघण, मलुगी अमरगागेय, गोविंदराज, बल्लाळ, अमर मलुगी आणि पांचवा भिल्लम हे राजे यादववंशांत निर्माण झाले. पांचव्या भिल्लमानें चालुक्यांचें राज्य जिंकलें. त्यापूर्वीं हे यादव चालुक्यांचे मांडलिक होते. याप्रमाणें दृढप्रहारापासून पांचव्या भिल्लमापर्यंत तेवीस राजांचीं नांवें आढळतात. सारांश यादवांच्या ह्या पहिल्या वंशानें ७९५ सालापासून ११९१ पर्यंत ३९६ वर्षें राज्य केलें.

पांचव्या भिल्लमानें सोमेश्वर चालुक्याचें मांडलिकत्व झुगारून दिलें व द्वारसमुद्राच्या वीरबल्लाळ यादवाचाहि पराभव करून देवगिरी येथें स्वतंत्र सत्ता स्थापन केली (११८७-९१); देवगिरी शहरहि त्यानेंच स्थापिलें. याच भिल्लमाचा वंश महाराष्ट्रांत पुढें साम्राज्यसत्ताधारी झाला. भिल्लमानें आपणास प्रतापचक्रवर्ती व महाराजधिराज हीं बिरुदें लाविलीं. त्याचा मुलगा जैतुगी उर्फ जैत्रपाळ पहिला (११९१-१२१०) हाहि पराक्रमी होता, यानेंहि ‘समस्त भुवनाश्रय महाराजाधिराज’ हीं बिरुदें आपल्यास लाविलीं. त्याचा सेनापति शंकर नांवाचा ब्राह्मण होता. प्रसिद्ध ज्योतिषी भास्कराचार्य याचा पुत्र लक्ष्मीधर हा जैत्रपाळाचा मुख्य पंडीत होता. जैत्रपाळास वेद, मीमांसा व तर्कशास्त्र यांचें चांगलें ज्ञान होतें. प्रसिद्ध मराठी आद्यकवि मुकुंददराज हा याच्या पदरीं होता (कोणी म्हणतात कीं, मुकुंदराजाचा उल्लेखित जैत्रपाळ हा चांद्याच्या बाजूचा दुसरा कोणी जयपाळ असावा).

सिं घ ण (१२१०-१२४७).- हा पहिल्या जैत्रपाळाचा मुलगा. याच्या कारकीर्दींत यादवांची सत्ता अतोनात वाढत जाऊन त्यानें कुंतल देश काबीज करून माळवा, गुजराथ, चेदि देशांतील छत्तिसगड, इत्यादि ठिकाणच्या राजांस जिंकिलें. पद्मनाल (पन्हाळा) येथें शिलाहार भोज राज्य करीत होता. त्याचें राज्य सिंघणानें आपल्या राजांस जोडलें. कोल्हापूरच्या ताम्रलेखांत शिलाहारांचें नांव पुढें येत नसून यादवांचें येतें. सिंघणानें गुजराथवर अनेक स्वार्‍या केल्या. ह्या स्वार्‍यांत खोलेश्वर नांवाचा ब्राह्मण त्याचा सेनापति होता. गुजराथेंत ह्या वेळेस वाघेल वंशाचा अंमल होता. खोलेश्वरानें ह्या वाघेल राजांचा अनेक वेळां पाडाव केला. कीर्तिकौमुदीचा कर्ता सोमेश्वर यानें अनहिल पट्टणचे राजे वाघेल-चालुक्य व यादव ह्या राजांच्या युद्धांचें वर्णन दिलें आहे. वाघेलराज लवणप्रसाद व त्याचा मुलगा वीरधवल यांनीं सिंघणाशीं तह केला. दुसर्‍या स्वारींत खोलेश्वराचा मुलगा राम हा सेनापति होता. तो वीरधवलाचा मुलगा बीसलदेव याजबरोबर लढत असतां मारला गेला. त्याचा भाऊ बिज्जण, हा सिंघणाचा तिसरा सेनापति होय. यानें कोंकण व दक्षिण महाराष्ट्र हे देश जिंकिले. त्या देशांचा कारभार तोच पहात असे. सातार्‍याच्या आसपास सिंघण हा मोठ्या सैन्यानिशीं पुष्कळ दिवस येऊन राहिला होता. सातारा जिल्ह्यांतील खटाव तालुक्यांत मायणी गांवीं संगमेश्वर म्हणून शंकराचें देवालय आहे तें ह्यानें बांधिलें. ह्यानेंच भूषणगड किल्ला बांधून माण तालुक्यांतील शिखर सिंघणापूर गांव वसविलें. सिंघणापूरचा महादेव हा अनेक मराठा कुलांचा कुलदेव आहे. कोल्हापूरच्या भोज राजांशीं लढत असतां सिंघणापूरची छावणी सिंघणानें वसविली. दक्षिण प्रांतावर यादवांची भक्ति विशेष होती. सिंघण मोठा धार्मिक असून त्याला देवळें बांधण्याचा नाद फार होता. एकंदरींत सिंघण हा त्याकाळीं फार पराक्रमी राजा झाला. पृथ्वीवल्लभ, विष्णुवंशोद्भव इत्यादि विशेषणें त्यानें धारण केलीं होतीं. त्याचा ध्वज सुवर्णगरुडचिन्हांकित असे. यादवांच्या मुख्य मंत्र्यास श्रीकरणाधिप अशी संज्ञा होती. हा कारभार प्रथम सोधल नांवाच्या गृहस्थाकडे होता. सोधलाचा मुलगा शार्ङ्गधर; यानें संगीतरत्‍नाकर नांवाचा ग्रंथ सिंघणाच्या कारकीर्दीत लिहिला. भास्कराचार्याचा नातू (लक्ष्मीधराचा मुलगा) चांगदेव दरबाराचा मोठा ज्योतिषी होता. भास्कराचार्याचा भाऊ त्याचा मुलगा गणपति, त्याचा मुलगा अनंतदेव; हाहि मोठा ज्योतिषी या दरबारांत होता. भास्कराच्या घराण्यास यादव राजांचा उत्कृष्ट आश्रय होता. सिंघणाचा पराक्रमी व विद्वान मुलगा जैत्रपाळ दुसरा, हा बापाच्या मरण पावला होता. सिंघणानंतर त्याचा नातू हा राजा झाला.

हाहि पराक्रमी होता. या स्वार्‍या केल्या आणि पुष्कळ यज्ञ केले. याचा मंत्री लक्ष्मीदेव म्हणून होता, त्याच्या नंतर जल्हण हा मंत्री झाला. हा फार विद्वान होता. याच्या वेळीं संस्कृत विद्येची भरभराट होती.

म हा दे व (१२६०-७१).-हा कृष्णाचा धाकटा भाऊ. यानेंहि तैलंगण, गुजराथ व कोंकणांत स्वार्‍या केल्या. यानें ठाणें येथील सोमेश्वर शिलाहार राजास मारून उत्तरकोंकण आपल्या राज्यास जोडलें. यावेळची लढाई दर्यावर झाली. तींत सोमेश्वराचीं बहुतेक गलबतें बुडालीं. महादेवानें आपणास “चक्रवर्तीं” म्हणविलें. हेमाडपंत हा महादेवाच्या कारकीर्दींत यादव साम्राज्याचा श्रीकरणाधिप झाला.

रा म दे व (१२७१-१३०९).-हा कृष्णाचा मुलगा. याची कीर्ति फार मोठी आहे. याच्या व याच्या पूर्वजांच्या कारकीर्दींत ब्राह्मण सुभेदार, सेनापति व मंत्री बरेच झाले. कृष्ण व अच्युत नांवाचे दोन सुभेदार याच्या वेळीं कोंकण व दख्खन या भागांवर होते. रामचंद्र उर्फ रामदेवराजानें एकदां ५७ ब्राह्मणांस तीन गांवें इनाम दिलीं होतीं (१२७१). त्यांत पुढील शर्ती होत्या:-या ब्राह्मणांनीं व त्यांच्या वंशजांनीं तीं गांवें सोडूं नयेत व गहाण टाकूं नयेत. गांवांत वेश्या राहूं देऊं नये, जुवा खेळूं नये, हत्यारें वापरूं नयेत व सत्कर्मांत वेळ घालवावा. यावरून रामदेवाची सन्मार्गप्रवृत्ति दिसून येते. महाराष्ट्रांतील शेवटचा वैभवशाली सम्राट हा रामदेवरायच होता. पुढें अल्लाउद्दीन खिलजीनें देवगिरीस २५ दिवस वेढा घालून रामदेवरायाचा पराभव करून त्याला आपलें अंकित बनविलें (५ फेब्रुवारी १२९४). अल्लाउद्दीनानें अपार संपत्ति घेऊन दिल्लीस प्रयाण केलें. (अल्लाउद्दीन पहा). पुढें रामदेवराव ठरलेली खंडणी देईना म्हणून मलीक काफरनें पुन्हां त्याच्यावर स्वारी करून त्यास पकडून दिल्लीस नेलें; तेथून ६ महिन्यांनीं परत आल्यावर मात्र तो नियमितपणें दिल्लीस खंडणी पाठवीत असे. नंतर तो २ वर्षांनीं मरण पावला (१३०९). भागवतधर्मा (वारकरीपंथा) चा प्रसार याच्या वेळीं ज्ञानदेव, नामदेव वगैरे संतांनीं केला. ज्ञानेश्वरींत रामदेवास ‘सकलकलानिवास, न्यायानें क्षिति पोसणारा’ अशीं विशेषणें ज्ञानेश्वरानें दिलीं आहेत. मात्र मुसुलमानांपासून त्याला आपल्या साम्राज्याचें रक्षण करतां आलें नाहीं, यावरून तो तितका शूर व दूरदर्शी नसावा असें दिसतें. हेमाडपंथ हा यांचाहि मंत्री होता. त्याच्या राजप्रशस्ति नांवाच्या यादववंशाचा इतिहास आलेला आहे.

शं क र दे व (१३०९-१२).-हा रामदेवरायाचा पुत्र. यानें मुसुलमानांविरुद्ध उचल करून दिल्लीस खंडणी पाठविण्याचें बंद केलें. परंतु इतर हिंदु राजांनीं मदत न केल्यानें हा एकटा पडला. शेवटीं मलीक काफरचें याच्यावर स्वारी करून याला ठार केलें व यादवांचें राज्य खालसा केलें. पुढें अल्लाउद्दीन मेल्यावर दिल्लीस बादशाही जी बंडाळी झाली तिचा फायदा घेऊन रामदेवाचा जावई हरपाळदेव यानें मुसुलमान सुभेदार हांकलून देऊन देवगिरी आपल्या ताब्यांत घेतली. पण मुबारक खिलजीनें स्वत: देवगिरीस येऊन हरपाळाचा पराभव करून त्याचा वध केला. या वेळेपासून महाराष्ट्रांत मुसुलमानांचें राज्य सुरू झालें. [ भांडारकर-हिस्टरी ऑफ दि डेक्कन; राजप्रशस्ति; स्मिथ-अर्लि हिस्टरी ऑफ इंडिया ].

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .