विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यानान - मद्रास इलाखा, गोदावरी जिल्ह्यांतील एक फ्रेंच वसाहत. क्षेत्रफळ ५ चौरस मैल असून वसाहतीची लोकसंख्या (१९२३) ४६९९. १७५० सालीं फ्रेंचांनीं येथें एक वखार स्थापिली. यानान वसाहत पांडिचेरी येथील फ्रेंच गव्हर्नरच्या अमलाखालीं आहे