विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यिप्रेस - बेल्जन. हें पश्चिम फ्लँडर प्रांतांत एक शहर आहे. लोकसंख्या सुमारें १८०००. १४ व्या शतकांत हें घेंट व बर्जेस यांच्या तोडीचें शहर, असून याची लोकसंख्या २००००० पर्यंत गेली होती. येथील व्यापाराची पेठ फारच सुंदर आहे. ती १३०४ सालीं वसविली गेली. येथें लोण्याचा फार मोठा व्यापार चालतो. हें तागाचें कापड व फितीचा व्यापार यांकरितां प्रसिद्ध आहे. गेल्या महायुद्धांत हें नाकें म्हणून युद्धस्थान झालें होतें.