प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

युगें, प्रा ची न क ल्प ना.-बहुतेक सर्व धर्मसंप्रदायांतून विश्वोपत्तीची कल्पना आढळून येते. विश्वसंहाराची कल्पना प्राचीन असली तरी ती त्यानंतरची आहे. याच्याहि आणखी पुढची कल्पना, विश्वसंहारानंतर नूतन विश्व जन्मास येतें ही असावी. विश्वाच्या पुनरुत्पत्तीच्या या कल्पनेबरोबरच दुसरी त्यासारखीच सर्वमान्य कल्पना जी सर्वत्र अस्तित्वांत आहे. ती म्हणजे. जलप्रलयानें सर्व पृथ्वीचा या पूर्वींच नाश झालेला आहे ही होय. हा विश्वाच्या युगांचा सिद्धांत याहि पुढें नेऊन असें सांगण्यांत येतें कीं, सध्यांचें युग हें आदि नसून यामागें पूर्वीं पुष्कळ युगें होऊन गेलीं आहेत. ग्रीक, हिंदु, आणि बौद्ध संप्रदायांत असें प्रतिपादिलें आहे कीं, चार युगांचें एक चक्र, याप्रमाणें एक चक्रमालिका असून, या युगांच्या अनंत आवृत्ती झाल्या आहेत व पुढेंहि होणार आहेत.

भा र ती यां ची क ल्प ना.-युगें, मन्वंतरें आणि कल्पें या परिमाणांनीं विश्वाचा काल मापण्यांत येतो. युगें चार कल्पिलीं आहेत; तीं अशीं: कृत, त्रेता, द्वापार, व कलि, हीं नांवें खेळण्याच्या फांशांच्या बाजूंचीं आहेत. कृत ही ४ ठिपक्यांची बाजू (ही विजयी व चांगल्या दैवाची बाजू आहे), त्रेता ही तीन ठिपक्यांची, द्वापार दोन ठिपक्यांची आणि कलि म्हणजे एक ठिपक्याची बाजू (ही कमनशिबाची असून हिच्यायोगानें खेळणारा हरतो). ब्राह्मणग्रंथांतून फांशांच्या दानांचीं हीं नांवें पुष्कळ ठिकाणीं उल्लेखिलीं आहेत. आणि ऐतरेय ब्राह्मणांत एके ठिकाणीं (७.१५) भाष्यकाराने यांचा अर्थ युगें असा घेतला आहे. पुराणांतून आणि महाकाव्यांतून ही चार युगांची कल्पना अतिशय रूढ असलेली दिसून येते. सर्व ब्राह्मणग्रंथांतून याविषयींची सामान्य कल्पना म्हणजे प्रत्येक युगांतील धर्माचें प्रमाण व त्याची कालमर्यादा, ज्या फांशांच्या बाजूवरून त्याला नांव पडलेलें आहे त्या बाजूवरील ठिपक्यांच्या संख्येवर अवलंबून असते. कृतयुगांत धर्म चार खुरांवर उभा होता, त्रेतायुगांत तीन, द्वापारांत दोन व सध्यां कलियुगांत तो एकाच खुरावर आहे. हेंच प्रमाण युगकालांच्या बाबतींत लागू आहे. कृतयुगाचीं संवत्सरें ४०००, यांत संध्या व संध्याशांचीं (युगपूर्वकालाला संध्या व उत्तर कालाला संध्यांश अशीं नांवें आहेत) प्रत्येकी ४०० संवत्सरें मिळवावयाचीं (एकंदर ४८००); त्याचप्रमाणें त्रेतायुगांत ३००० आणि ३०० (एकंदर ३६००); द्वापारांत २००० आणि २०० (एकंदर २४००) आणि कलियुगांत १००० आणि १०० (एकंदर १२००). या चार युगांचें मिळून एक महायुग किंवा चतुर्युग बनतें. सामान्यत: याला युग असेंच म्हणतात. यांत १२००० वर्षें येतात (मनु १. ६९ पासून पुढें; महाभा. ३ १२८२६ पासून पुढें). पण या गणनेंतील हीं वर्षें देवांचीं असून यांचीं मानुष वर्षें करावयाचीं म्हणजे तीं ४३२०००० (१२००० x ३६०) होतील. कृत किंवा सत्ययुगाचें चित्र काढावयाचें म्हणजे, त्यावेळीं मनुष्याच्या सुखास पारावार नव्हता, आयुष्य ४००० वर्षांचें होतें, भांडणतंटे मुळींच नसत, लोक अतिशय धर्माचरणी असत. याच्या उलट चित्र कलि (तिष्य) युगाचें. या युगांत वर्णाश्रमधर्म मुळींच पाळला जात नाहीं, वेदांकडे व नैतिक वर्तनाकडे दुर्लक्ष केलें जातें, सर्व प्रकारचे दुर्गुण बोकाळतात, रोगराई वाढते, आयुष्य कमी कमी होत जाऊन तें फार क्षणभंगुर बनतें, देशांत रानटी लोकांचें वर्चस्व प्रस्थापित होतें व लोकांत एकसारखीं भांडणें सुरू होऊन एकमेकांचा जीव घेण्यांत येतो व शेवटीं एक बलाढ्य राजा उत्पन्न होऊन तो धर्मभ्रष्टांनां नाहींसें करतो. या दोन कडेच्या वर्णनांवरून मधल्या दोन युगांतील अवस्थांची सहज कल्पना येईल [ ‘कल्प’ पहा ].

ज्योर्तिविद्येंत युगाचा अर्थ असा कीं, त्याच्या आरंभीं सूर्य, चंद्र, आणि ग्रह यांचीं क्रांतिवृत्ताच्या आदिबिंदूंत युति होते, आणि युगाच्या शेवटीं ते त्याच बिंदूंत परत येतात. भारतीय ज्योति:शास्त्रापूर्वींहि या कल्पनेवर लोकांची चांगली श्रद्धा होती. चालू युग हें चालू वराहकल्पाचें ४५७ वें व चालू वैवस्वत मन्वंतराचें २८ वें युग आहे; वैवस्वत मन्वंतर हें या कल्पाचें ७ वें मन्वंतर आहे. मागील त्रेतायुगाच्या अंतिम भागांत रामचंद्र होऊन गेले, व मागील द्वापारयुगाच्या शेवटीं भारतीय युद्ध झालें असें समजतात (‘कलियुग’ पहा).

जै नां ची यु ग क ल्प ना.-काल हें बारा आर्‍यांचें एक चक्र आहे असें जैन मानतात. या चक्राच्या उतरत्या अर्ध्याभागाला अवसर्पिणी, चढत्या अर्ध्या भागाला उत्सर्पिणी असें म्हणतात. प्रत्येक अर्धांत सहा युगें (आरे) असतात. अवसर्पिणीमधील आरे:- (१) सुषमसुषमा-याचें स्थायित्व ४०००००००००००००० सागरोपमा, (२) सुषमा ३०० खर्च सागरोपमा, (३) सुषमदुषमा २०० खर्च सागरोपमा (४) दुषमसुषमा १०० खर्च सागरोपमा; उणें ४२००० साधींवर्षें. (५) दुषमा-२१,००० वर्षें; (६) दुषमदुषमा, २१,००० वर्षें. हींच युगें उत्सर्पिणीमध्यें उलटीकडून येतात. पहिल्या युगामध्यें मनुष्याचें आयुष्य तीन पल्य किंवा पल्योपमा होतें (एका पल्यांत अगणित वर्षें येतात. व एक खर्च पल्य म्हणजे एक सागरोपमा असें प्रमाण आहे). त्याची उंची तीन गव्यूती (= ६ मैल) असे. प्राण्यांनां निरुपम सुख असे. अशी स्थिति पहिल्या तीन युगांत उतरत्या प्रमाणांत असे. या तीन युगांशीं कृतयुगाची चांगली तुलना होईल; पुढील तीन युगांशीं त्रेता, द्वापार, व कलि या युगाची तुलना करतां येईल. या युगांत मनुष्याचें आयुष्य व उंची कमी कमी होत जाऊन तीं अनुक्रमें १६ वर्षें व १ हात अशीं होतात. अवसर्पिणीच्या शेवटल्या दोन युगांत तीर्थकर मुळीच नसतो. या पुढील उत्सर्पिणीकालांत हींच युगें उलटीकडून येत जातात. याप्रमाणें असंख्य अवसर्पिणी व उत्सर्पिणी एकामागून एक येतात.

बौ द्धां ची क ल्प ना.-विश्वाच्या युगांविषयीं व कल्पांविषयीं बौद्ध लोकांची समजूत भारतीयांसारखीच आहे; चारहि युगांचीं नांवें तींच आहेत पण त्यांची मांडणी वेगळी आहे. म्हणजे बौद्ध लोक कलियुगापासून आरंभ करून कृतयुगापर्यंत वर जातात व नंतर उलट खाऊन कलियुगाकडे खालीं येतात. याप्रमाणें, यांच्या महायुगांत चारयुगांऐवजीं आठ युगें येतात. या कालाला अंतरकल्प अशी संज्ञा आहे. याची मोजणी अशी:-मनुष्याचें आयुष्य दहा वर्षापासून चढत असंख्येयापर्यंत, (असंख्येय = १०००००००२०) जातें व पुन्हां दहा वर्षांइतकें कमी होतें. त्या अवधीला अंतरकल्प असें म्हणतात. यावरून हा काल किती मोठा असेल तो पहा. कांहींच्या मतें हा काल १६८०००० वर्षांचा असावा. वयाच्या वाढी-उताराबरोबरच मनुष्याच्या नीतीचा चढ-उतार असतो. वीस अंतरकल्पें मिळून एक असंख्येय कल्प होतें. आणि चार असंख्येय कल्पांचें एक महाकल्प बनतें. पहिल्या असंख्येय कल्पाला संवर्त म्हणतात. यांत अग्नि, आप किंवा वायु हीं विश्वाचा संपूर्ण नाश करतात. दुसर्‍यांत (संवर्तस्थायींत) विश्व शून्यस्थितींत असतें. विवर्तांत विश्वाची रचना पुन्हां सुरू असते. आणि चवथ्यांत (विवर्तस्थायींत) विश्व सजीव स्थितींत असतें.

या चवथ्या काळांत आभास्वर-भूवर अवतरलेले ब्रह्मलोकीचे देव-पहिल्यानेंच विश्वांत वस्ती करून असतात. पृथ्वीपासून उत्पन्न झालेला मधुर रस जेव्हां हे स्वयंप्रकाशी देव चाखूं लागले तेव्हां त्यांच्या तेजाला उतरती कळा लागली. त्यांनीं चंद्र, सूर्य, तारे उत्पन्न केले. या देवांची अवनति होत असतांना पृथ्वीवर पहिल्या प्रकारचें अन्न उत्पन्न होण्याचें बंद होऊन साईसारखें अळंबें उगवूं लागलें. यानंतर तरुलता व पुढें निराळ्याच प्रकारचे तांदूळ येऊं लागले. जेव्हां या तांदुळांचा अन्नासारखा उपयोग होऊं लागला तेव्हां संभोगाला सुरवात झाली. पुढें कांहीं काळानें हे तांदूळ येण्याचें बंद झालें व त्याचवेळीं इतर दुर्गुण उद्भूत झाले व सरतेशेवटीं सध्यां आहे तशी मनुष्यांची परिस्थिति बनली. यानंतर वर सांगितलेला वीस अंतरकल्पांचा काल येतो. महाकल्पाच्या अंतापूर्वी एक लाख वर्षें अगोदर एक देव येतो व मानवांनां भावी प्रसंगाबद्दल इषारा देतो व तेव्हांच त्यांनां आपली सुधारणा करून घेण्याचा उपदेश करतो. पुढें एक लाख वर्षें भरल्यावर पृथ्वीचा, नव्हे चक्रवालांचा (महापद्दम विश्वाचा) नाश होण्यास आरंभ होतो. हा नाश अग्नि, आप किंवा वायूच्या योगें होतो.

महाकल्पांचे दोन वर्ग पडतात:- (१) शून्यमहाकल्पें-(यांत बुद्ध देव अवतरत नाहीं,) आणि (२) बुद्धमहाकल्पें. एका बुद्धकल्पांत एक किंवा अधिक बुद्ध अवतरतात. ज्या बुद्धमहाकल्पांत एक बुद्धदेव असतो त्यास सार असें नांव आहे, दोन असले म्हणजे मण्ड, तीन = वर, चार = सारमण्ड आणि पांच बुद्ध असले म्हणजे त्या कल्पाला भद्रकल्प असें म्हणतात. हल्लीं भद्रकल्प चालला आहे; कारण चार बुद्ध होऊन गेलेले आहेत. क्रकुच्छंद, कनकमुनि, काश्यप आणि गोतम; आणि पांचवा मैत्रेय अजून यावयाचा आहे.

बा बि लो नी क ल्प ना.-विश्वचक्राची गति म्हणजेच, प्रकाश आणि अंध:कार, ऊर्ध्व आणि अधोलोक, विश्वाचा उन्हाळा आणि विश्वाचा हिंवाळा अशासारख्या विश्वांतील दोन शक्तींमधील भांडण म्हणतां येईल. दिवसाची आणि रात्रीची कमान, तार्‍यांच्या उन्हाळा आणि हिंवाळा यांतील गती यांमधील फेरफार आणि सृष्टींतील जन्ममरणाचा परस्परसंबंधी फेरफार युगांच्या फेरफाराचा सिद्धांत पुढें आणतो. दिवसामागून रात्र, हा क्रम, एक ऋतु जाऊन त्या जागीं दुसरा ऋतु येणें या क्रमासारखाच आहे. ‘पिंडीं ते ब्रह्मांडीं’ या तत्त्वानुसार वर्ष हें मोठ्या कालाची छोटी आवृत्ति आहे आणि ऋतू हे विश्वाच्या युगांशीं सदृश आहेत.

युगांचे दोन भाग:-जलप्रलयापूर्वीचा काळ व नंतरचा काळ; या काळांचाहि संबंध तार्‍यांच्या गतींशीं येतो. पुरातन काळचें सुवर्णयुग, ज्या काळीं राशिचक्रावरील वसंतसंपात अनूच्या राज्यांतून जात असतो त्या काळाशीं जुळतें.

मनुष्ययोनीच्या अनंतकालाच्या परंपरेला विश्वाचीं युगें असें जें म्हणतात त्याचा संबंध कांहीं विशिष्ट प्रकारें विषुवचलनाचें निरीक्षण करून रचलेल्या पंचांगाच्या अध्यापनाकडे आहे.

मिथुनयुग (ख्रि. पू. ५०००-२८००):-म्हणजे या वेळीं सूर्य मिथुन राशींत होता. या काळीं बाबिलोनची भरभराट झालेली नव्हती; सेमिटिक बाबिलोनियनांची वसाहत होत होती. ही मिथुनराशीपासून पंचागाला आरंभ करण्याची तर्‍हा अजमासें ख्रिस्तपूर्व २८०० मध्यें बदलून, वृषभराशीपासून आरंभ मानण्यांत येऊं लागला.

वृषभयुग:-या पंचागाच्या सुधारणेला त्या वेळच्या परिस्थितीची मदत झाली. या युगाच्या आरंभीं बाबिलोन हें जगाचें नाक बनलें होतें. बाबिलोन शहराचा देव जो मारडुक हा वृषभमूर्ति आहे. हा वृषभ व आकाशांतील वृषभ (रास) सारखेच आहेत. अशा रीतीनें सूर्य-युग अस्तित्वांत आलें. कारण मारडुक म्हणजे सूर्यदेव समजला जातो. मिथुनयुगाला याच धोरणानें चंद्र-युग म्हणतां येईल.

मेषयुग:-मेष हा वसंतसंपात झाल्यावेळीं त्याप्रमाणें पंचाग पुन्हां दुरुस्त करावें लागलें. यायोगानें एरवीं क्षुल्लक असणार्‍या नॅबोनॅसर (नबू-नसिर ख्रिस्तपूर्व ७९७-७३४) राजाला फारच महत्त्व आलें. त्याच्या वेळच्या पंचांगकारांनीं नॅबोनॅसरपासूनच नवीन युगाची स्थापना केली.

या माहितीवरून असें अनुमान निघतें कीं, विश्वयुगांच्या सिद्धांताचा संबंध रक्षकाच्या अपेक्षेशीं आहे. ईश्वरी शक्ति वसंतसंपातांत रक्षक म्हणून अवतरते.

विश्वयुगांच्या सिद्धांताचा रक्षकअपेक्षेशीं येणारा संबंध पुढील स्वाभाविक मतें उद्भूत करतो व तीं मतें आपणाला सूत्रांप्रमाणें ग्राह्य होतात:- (१) संपन्नतेचें युग प्रारंभींचें असतें. (२) दिवस अधिकाधिक वाईट होत चालले आहेत. (३) प्रारंभींचा सुखाचा काळ पुन्हां येतो.

ख्रि स्ती क ल्प ना.-मूर्तिपूजक सुवर्णयुग भूतकाळांत धरतात तर ख्रिस्ती लोक तें भविष्यकाळांत घालतात विश्वाच्या इतिहासाचें वर्णन करतांना तो चढाचा म्हणजे सारखा उत्कर्षाचा व शेवटीं सुख व कल्याणांत लय पावणारा आहे असें ते सांगतात. ख्रिस्तीसंप्रदायाचा पहिला जनक जो सेंट ऑगस्टाईन, त्यानें मनुष्याच्या इतिहासांत सात युगें आहेत असें स्पष्ट सांगितलें आहे व त्याच्या पुढील सर्व धर्मज्ञांनीं हीच कल्पना उचलली आहे.

स्कॉट्स एरिगेना (अजमासें इ. स. ८९०), फ्लोरिसचा जोआचिम (इ. स. १२०२), विको (इ. स. १७४४) आणि ‘असंट ऑफ मॅन’ (मनुष्याची उन्नती) या ग्रंथाचा कर्ता ड्रमंड (१८९४) हे विश्वाचीं तीन युगें मानतात पण प्रत्येकाची दर युगाची आंखणी वेगवेगळी आहे. ड्रमंडच्या मतें, पहिल्या युगांत वनस्पतिसाम्राज्यांत फुलझाडें आलीं. दुसर्‍यांत प्राणिसाम्राज्याचा विकास; यांत सस्तन प्राण्याची पूर्ण वाढ होऊन पुढें ती बंद झाली. शेवटीं तिसर्‍यांत, मानव आणि समाज यांची उन्नति व दुसर्‍यांच्या जीवांकरितां धडपड. विश्वयुगांविषयीं ख्रिस्त्यांची कल्पना पास्कलच्या शब्दांत सांगावयाची म्हणजे, इतक्या अनेक शतकांत झालेल्या मनुष्यांच्या एकंदर वंशाविषयीं असाच विचार केला पाहिजे कीं, तो एकच मनुष्य असून एकसारखा हयात राहून सारखा शिकत असतो.

झो रो ऑ स्ट्रि य नां ची क ल्प ना.-इराणी जगदुत्पत्तिशास्त्रासंबंधीं विस्तृत माहिती बून्दहिश्न नांवाच्या पहलवी ग्रंथांत सांपडते. उत्पत्तीच्या १२०००० वर्षांच्या लांबलचक कालाचे विभाग पाडून चार मोठीं युगें केलीं आहेत. या कालाचा आद्यंत अनंतानें व्याप्त आहे. जग हें तंट्याचें साम्राज्य असून यांत अशुद्धतेची नेहेमीं भीति असते व दैत्य सारखे पाळतीवर असतात. पण एक गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी म्हणजे तंट्याचा व घोंटाळ्याचा काळ म्हणजे चालू काळ नव्हे, झरथुष्ट्राच्या अवताराबरोबरच तो काळ संपला. अहुर्मझ्दच्या विजयी युगांत सध्यां आपण आहोंत. इराणी युगें एकसारखीं पुन्हां पुन्हां येत नाहींत. धातुयुगें व हें लोहयुग फक्त सध्यांच्या मझ्दयश्नसहस्त्रावधींतलें आहे व या सहस्त्रावधी सर्व मिळून अंताला जाऊन भिडतात असें जें झरथुष्ट्रीलोक मानतात त्यासारखें विशिष्टबोधक उदाहरण दुसरें आढळण नाहीं. याविषयीं भारतीय कल्पना म्हणजे सध्यांचें कलियुग धरून चार युगें एकसारखीं पुन्हां पुन्हां येतात व जातात. हिंदुस्थानांतल्याप्रमाणें इराणांतील युगांच्या पद्धतीचा पुनर्जन्माशीं संबंध येत नाहीं.

ग्री क व रो म न लो कां ची क ल्प ना.-या लोकांत विश्वयुगांची चर्चा जवळजवळ एक हजार वर्षें चालली होती असा त्यांच्या ग्रंथांवरून आधार मिळतो. या काळांत युगांविषयीं पुन्हां पुन्हां नवीन सिद्धांत मांडला जाऊन अनेक तत्त्वज्ञानसंप्रदायांतून निरनिराळीं मतें बाहेर येत.

युगाविषयीं प्रत्येक सिद्धांत दोहोंपैकीं कोणत्या तरी एका वर्गांत जाऊन पडतो. पहिल्या वर्गांतले लोक असें समजतात कीं, पूर्वींपेक्षां मनुष्याची उन्नतावस्था आहे; व दुसर्‍यांतले त्याची अवनति झाली आहे असें मानतात. ग्रीकांच्या युगकल्पनेच्या वाढीचा साग्र इतिहास देणें बरेंच अवघड जाईल. हल्लीं प्रचलित असलेलें अमुक मत अमुक काळीं उत्पन्न झालें हें नक्कीं सांगतां यावयाचें नाहीं, तरी प्रत्येक कल्पना फार जुन्या काळची आहे असेंच दिसून येणार आहे. यांत तीन प्रमुख काळ देतां येतात: पहिला हेसिऑडचा, दुसरा स्टोइक आणि त्यांच्या पूर्वगांचा व तिसरा ख्रि. पू. २ र्‍या शतकांतील गूढवाद (‘मिस्टिसिझम’) चा काळ.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .