विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
युट्रेक्ट - युट्रेक्ट प्रांताची राजधानी. १९२३ त येथील लोकसंख्या १४८६१० मध्यें होती. हें शहर फार सुंदर व कुतुहलोत्पादक आहे. येथें १६३६ त स्थापन झालेलें विश्वविद्यालय आहे. या विश्वविद्यालयांत कायदा, वैद्यक, गणित, वाङ्मय इत्यादि विषयांच्या शाखा आहेत. विद्यालयाला जोडून एक ग्रंथसंग्रहालयहि आहे व त्यांतील ग्रंथसंख्या २००००० वर आहे. त्याचप्रमाणें सृष्टीशास्त्र, प्राणिशास्त्र, वगैरे शास्त्रांच्या प्रयोगशाळा आहेत. उदयोगधंदेविषकसंस्थांपैकीं प्रमुख म्हणजे विड्या, पितळ, मातीचीं भांडीं वगैरेंचे कारखाने होत. युट्रेक्ट हें फार प्राचीन शहर असून यास यूरोपच्या इतिहासांत महत्त्वाचें स्थान आहे.