प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

युराग्वे - दक्षिण अमेरिकेंतील लहान स्वतंत्र संस्थान. हें ब्राझीलच्या दक्षिण सरहद्दीवर आहे. या देशाचा दक्षिणेकडील भाग गवतानें आच्छादिलेला आहे व उत्तरेकडील प्रदेश खडकाळ आहे. जंगल मुळीच नाहीं. नद्यांच्या दर्‍यांमध्यें सागवान सांपडतें. निग्रो, युराग्वे, सँटा लुंशिया, क्वेग्वे सेबोलॅटी वगैरे नद्या आहेत. जगांत सर्वांत आरोग्यकारक हवा या देशाची आहे. भूगोलविषयक परिस्थितीमुळें येथील हवा सबंध वर्षभर सारखी राहते. अटलांटिक महासागरावरून येणार्‍या वार्‍यांनीं उन्हाळ्याची उष्णता कमी झाली आहे व हिवाळ्यांत कडक थंडी पडत नाहीं, सांथीचेरोग नाहीत. दरवर्षी सुमारें ४३इंच पाऊस पडतो. या देशाचें क्षेत्रफळ ७२१५३ चौरस मैल आहे व लोकसंख्या (१९२२) १५६४६२०. याचे १९ डिपार्टमेंट (विभाग) केलेले आहेत. स्पानियर्ड, ब्राझीलियन, अर्जेन्टाइन व फ्रेंच, कांही थोडे ब्रिटिश, स्विस व जर्मन वगैरे परकी लोकांची वस्ती या देशांत आहे. युराग्वेचे मूळचे लोक अर्जेन्टाइन लोकांप्रमाणें आहेत. येथे शेंकडा १६ मुलें अनौरस निपजतात. माँटेव्हिडिओ, साल्टी, पेसँडू व सानजोसे मुख्य शहरें आहेत.

शेतकी.- शेतकीची स्थिति बरीच समाधानकारक आहे. गहूं, ओट, जव, मका, गळिताचीं धान्यें व वर्डसीड येथें पिकतात. द्राक्षें पुष्कळ होत असून त्यांची दारूहि मोठया प्रमाणांत तयार करतात. ऑलिव्हची झाडें येथें होतात. तंबूखूची लागवड होते. गुरें व मेंढया पाळणें हा मुख्य धंदा आहे. या देशाच्या उत्तरेकडील भागांत खनिज पदार्थ आहेत. सोनें अल्प प्रमाणावर खाणींतून काढतात. रुपें, शिसें तांबें, मॅग्नेशियम व लिग्नाइट कोळसा हीं खनिज सांपडतात.

व्यापार.-यंत्रें, कापड, कपउे, खाण्याचे पदार्थ दारू व जनावरें परदेशाहून येथें येतात व गुरें व शेतींत उत्पन्न होणारा माल येथून बाहेर देशीं रवाना होतो. या देशांतून व याच्या हद्दीवरून वाहणार्‍या नद्यांनीं नैसर्गिक दळणवळणाचे मार्ग सुलभ झाले आहेत. शिवाय २२४० मैल लांबीचा सरकारी रस्ता व ३१०० मैल डिपार्टमेंटल रस्ता आहे. १६२५ मैल रेल्वेरस्ता असून आणखी वाढत आहे. १७० मैलांपेक्षां जास्त ट्रॉम्बे आहे.
राज्यकारभार.-१९ व्या सभासदांचें एक सीनेट व १२४ प्रतिनिधींचें एक चेंबर अशा दोन मंडळांच्या हातीं कायदे करण्याचें एक करण्याचें काम आहे. १२००० पुरुषांमागें एक प्रतिनिधी तीन वर्षेंपर्यंत निवडला जातो; सिनेटर इलेक्ट्रोरल कॉलेज निवडून देतें. प्रत्येक डिपार्टमेंटकरितां एकेक सिनेटर निवडला जातो, हे सिनेटर सहा वर्षांकरितां निवडलेलें असतात. कार्यकारी सत्ता लोकांनीं प्रत्यक्ष चार वर्षांकरितां निवडलेल्या अध्यक्षाच्या हातीं असते. याच्या मदतीला एक नऊ मंत्र्यांचें कार्यकारी मंडळ असतें. प्रत्येक प्रांतांवर एक गव्हर्नर असतो. न्यायसत्ता हायकोर्ट व इतर कनिष्ठ कोर्टे यांच्या हातीं आहे. युराग्वेचा राज्यकारभार फार दिवसांपासून अव्यवस्थित होता. तो १९०७ सालीं वर सांगितल्याप्रमाणें सुधारण्यांत आला.

शिक्षण.-शिक्षणाची फार हयगय केली जाते. येथील सार्वजनिक शाळांची पद्धत चांगली नाहीं. शाळेंत फार थोडी मुलें येतात व त्यांनां फारच हलक्या प्रतीचें शिक्षण मिळतें प्राथमिक शिक्षण सक्तीचें आहे. तथापि विसाव्या शतकाच्या आरंभीं सहा वर्षांच्या वयावरची अर्धी अधिक लोकसंख्या अशिक्षित होती. माँटेव्हिडियो येथें एक विश्वविद्यालय, कांहीं शाळा व सरकारी खर्चानें चालविलेली धंदेशिक्षणाची शाळा एक लष्करी शाळा असून बर्‍याच धार्मिक शाळाहि आहेत.

सैन्य.-शिपाई व अधिकारी मिळून १०००० लोकांचें खडें सैन्य शांततेच्या वेळीं तयर असतें. वरकरणीं सैन्यांतील नोकरी खुषीची आहे. परंतु कांहींशी सक्तीहि करण्यांत येते. याशिवाय १७ व ३० वर्षांमधील वयाच्या पुरुषांस नॅशनल गॉर्डमध्यें नोकरी करावी लागते. ३० पासून ४५वर्षें वयाच्या माणसास डिपार्टमेंटल सर्व्हिस सक्तीनें करावयास लावतात. व ४५ ते ६० वर्षे वयाच्या लोकांस स्थानिक शिबंदीमध्यें सक्तीनें नोकरी करावी लागते. सैन्य व गार्ड हे आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज केलेले असतात.

जमाबंदी व व्यापार.-राष्ट्रीय उत्पन्नावर सरासरी अर्धाभाग जकात, मक्त्याचे कर, स्टांप, तंबाखू व इतर कर यांच्यापासून वसूल झालेला असतो. १/२ उत्पन्न कर्जाच्या फेडींत खर्च होतें व बाकीच्यांतून राज्यकारभार, सैन्य, अंतरराष्ट्रीय व्यवस्था वगैरेंचा खर्च भागविण्यांत येतो. १९२२-२३ सालीं उत्पन्न पाऊण कोटी पौंडाचें होते. १८९६त 'रिपब्लिक' पेढी स्थापण्यांत आली. या पेढीलाच नोटा काढण्याचा सरसकट अधिकार आहे. जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच व कित्येक ब्रिटिश पेढयांच्या शाखा माँटेव्हिडियो येथें आहेत.

युराग्वेचें सोन्याचें नाणें नाहीं. १.६९७ ग्रॅम वजनाचा पेसो नॅशनल हें सोन्याचें काल्पनिक नाणें (मॉनिटरी युनिट) आहे. रुप्याच्या पेसोचें वनज २५ ग्रॅम आहे. १/२, १/५ व १/१० पेसो रुप्याचे केलेले असतात. शिवाय ब्रॉझची नाणीं आहेत.

इतिहास.-१५१२मध्यें ज्वान (जुआन) डिआझ डिसोलिस हा पारानग्वाझूमध्यें शिरला व माँटेव्हिटियोपासून ७० मैलांवर उतरला. योवळीं या देशांत इंडियन लोक राहत असत. १५१५-१६ मधील सफरींत सोलिस याला चारुअस लोकांनी मारलें. सेबॅस्टियन कॅबटचा लेफ्टनंट रामोनचा या लोकांनी पराभव केला होता. यानंतर पन्नास वर्षांत स्पॅनिश लोकांनीं हा प्रदेश जिंकण्याचा तीन वेळ प्रयत्‍न केला परंतु तो फसला. तिसर्‍या फिलिपच्या वेळीं जेसुइट लोकांनीं युराग्वे जिंकण्यास आरंभ केला. पुढें पोर्तुगीज व्यापारी आणि लष्करी लोक, स्पॅनिश लोक यांनीं हा देश पूर्ण जिंकला. १७२६ सालीं स्पॅनिश लोकांनीं ब्युनॉसआरीसचा गव्हर्नर झाव्हाला याच्या आधिपत्याखालीं कायमचें ठाणे वसविलें. १७७७ त कोलोनिया मधील पोर्तुगीज वसाहत जमीनदोस्त करून टाकली. १७५० पासून माँटेव्हिडियोला ब्यूनॉसआरीसपासून स्वतंत्रपणें राज्यकारभार चालविण्याचा अधिकार प्राप्त झाला. रायोबि लाफ्टावरील स्पॅनिश सत्ता, अमेरिकन बंड, फ्रेंच राज्यक्रांति, माँटेव्हिडियो व ब्यूनॉसआरीसवरील ब्रिटिशांच्या स्वार्‍या या सर्वांनी नष्ट केली. १८१४ सालीं ब्यूनॉसआरीसच्या सेनापतीनें माँटेव्हिडियो काबीज केलें. ब्राझील व ब्यूनॉसआरीसनें सरकार यांच्यामध्यें युराग्वेमधील वर्चस्वासंबंधी भांडण चाललें होतें. याचा ग्रेटब्रिटनच्या मध्यस्थीनें निकाल होऊन युराग्वे हें स्वतंत्र संस्थान आहे असें जाहीर करण्यांत आलें (१८२८).

स्वातंत्र्य जाहीर केल्यानंतरचा या देशाचा इतिहास कट, पैशाचा नाश, राजकीय मूर्खपणा व गुन्हे यांची कहाणी होय. कोलोरॅडो व ब्लँकोज हे दोन राजकीय पक्ष होते. राजकीय मतांच्या दृष्टीनें हे दोन्ही पक्ष एकच आहेत; फरक मुळींच नाहीं. प्राचीन काळापासून कोलोरॅडो पक्षाचें हातीं सत्ता होती व ती त्याच्या हातून काढून घेण्याचा प्रयत्‍न ब्लँको पक्षानें केल्यामुळें निरनिराळ्या राज्यक्रांत्या झाल्या. लष्करी पक्षानें बर्‍याच वेळां आपल्या मागण्या देणारे प्रेसिडेंट निवडण्याचे कट केले होते.

स. १९०७-१९११ च्या दरम्यान क्लाडियो विल्लीमन हा अध्यक्ष होता. याच्या कारकीर्दीत शिक्षणविषयक व इतर बर्‍याच सुधारणा घडून आल्या. माँटेव्हिडियो व रायोडि जनीरो यांच्या दरम्यान रेल्वे सुरू झाली. १९११-१९१५ च्या दरम्यान जोसे बॅटल इओर्डोनेझ हा अध्यक्षस्थानापन्न झाला. याच्या कारकीर्दीत मजुरांच्या तासांचे नियमन, नॅशनल इन्शुअरन्स बँकची स्थापना, औद्योगिक शिक्षणामध्यें सुधारणा इत्यादि गोष्टी घडून आल्या. १९१३ सालीं साउथ अमेरिकन इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल डिफेन्सची बैठक माँटेव्हिडियो येथें भरली व त्या परिषदेंत शेतकर्‍यांनां बीं फुकट देण्याचा ठराव पास झाला. १९१३ सालीं युराग्वे व ब्राझील यांच्यामध्यें तह होऊन मिरीम व यग्वरॉन या दोन सरोवरांमध्यें जहाजांची नेआण करण्याची परवानगी यूराग्वेला मिळाली. १९१५-१९ च्या दरम्यान फेलीसियानो व्हीरा हा अध्यक्ष झाला. याच्या कारकीर्दीतहि युराग्वेची भरभराट झाली. महायुद्धामध्यें युराग्वे सरकारनें दोस्तांची बाजू पत्करिली तरी युराग्वेनें प्रत्यक्ष सैन्याची अगर पैशाची मदत दोस्तांनां मुळींच केली नाहीं म्हटलें तरी चालेल. जर्मनीचीं माँटेव्हिडियो बंदरांतील ७.८ व्यापारी जहाजें मात्र युराग्वेनें पकडून आपल्या ताब्यांत घेतलीं व इंग्लंडला १५ दशलक्ष पेसो कर्जाऊ दिले. १९१५-२१ च्या दरम्यान माँटेव्हिडियो येथें चार पांच बँका उघडण्यांत आल्या, व त्यामुळें युराग्वेचा व्यापार बराच वाढला. १९१९ सालीं युराग्वेमध्यें पूर्वीच्या शासनघटनेमध्यें पुष्कळच फेरफार घडून आले. पैकीं महत्त्वाचा फेरफार म्हणजे धर्मखातें स्वतंत्र करण्यांत येऊन प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देण्यांत आलें हा होय. तसेंच राज्यकारभाराचीहि अध्यक्ष व एक नऊ लोकनियुक्त लोकांचें कार्यकारी मंडळ यांच्यामध्यें विभागणी करण्यांत आली. स्त्रियांनां मतदानाचा हक्क देण्यांत आला. १९१९ सालीं बल्तझार झुम हा अध्यक्ष झाला. त्यानें व्हर्सेलिसच्या तहाला मान्यता दिली; व ग्रेटब्रिटन व इटली या राष्ट्रांशी सलोख्याचा तह केला.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .