प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रंगद्रव्यें - जीं द्रव्यें सूर्यकिरणांचा कांहीं विशिष्ट भागच फक्त आरपार जाऊं देतात अथवा परावृत्त करितात व बाकीचा भाग नष्ट करूं शेकतात त्या सर्वांस रंगद्रव्यें म्हणतात. रंग (फक्त डोळ्यांनां दिसणारीं किरणें) हा फक्त एकाच जातीच्या किरणांचा गुच्छ अथवा एकाहून जास्त जातींच्या किरणांचा समूह असूं शकतो; उदाहरणार्थ निळीचा रंग म्हणजे जांभळ्या व तांबडया किरणांचें मिश्रण असतें. ''कॉपर ऑक्साइड-अमोनियम-सल्फेट'' या रंग म्हणजे जांभळ्या आणि किरमिजी (व्हायोलेट) किरणांचें मिश्रण होय. तसेंच तांब्यानें रंगविलेल्या कांचांतून फक्त तांबडीं किरणेंच आरपार जाऊं शकतात. इतर सर्व रंगांचे पदार्थ त्यांतून पाहिल्यास काळे दिसतात. पिवळ्या रंगाच्या मेणबत्तीच्या उजेडांत, हिरव्या रंगाच्या ''विद्युत्-कमान-ज्योतींत, बरेचसे इतर रंगीत पदार्थ सूर्यकिरणांत दिसतात त्याहून भिन्न दिसतात. निरनिराळ्या किरण-पडद्यांच्या योगानें ही भिन्नता नष्ट करता येतो. उदाहरणार्थ विद्युत्-कमान ज्योतीसाठीं जांभळा-हिरवा असा कांचेचा पडदा समोर ठेवून त्यांतून निघणारीं किरणें सूर्य किरणांशीं तंतोतंत समाधानकारक परिणाम देणारी दिसतात. पुष्कळ वेळां आरपार निघणारीं व परावर्तन पावणारीं किरणें अगदीं भिन्न असूं शकतात. या चमत्कारास ''फ्लयुओरेस'' असें म्हणतात व असलें चमत्कार दाखविणार्‍या पदार्थांस ''फ्लयुओरेमेन्ट'' पदार्थ असें म्हणतात. उदा. ''फुक्सीन'' नांवाच्या पदार्थांचे कण अथवा भुकटी तांबडया रंगाची दिसे, तसेंच पदार्थ एखाद्या द्रव्यांत विरघळविल्यास त्यापासून होणारे मिश्रण देखील आरपार पाहिल्यास तांबडें दिसतें, परंतु या प्रत्येक बाबतींत म्हणजे खडे, भुकटी अथवा मिश्रण यांपासून परावर्तन पावलेली किरणें दाट हिरव्या रंगाचीं दिसतात. ह्या जातींतील कित्येक ''इओसिन'' सारखे पदार्थ तर हा दुरंगीपणाचा धर्म ह्यापासून रंगविलेल्या कपडयांनां देखील देतात. अत्यंत बारीक केलेली भुकटी साधारणत: नेहमी सफेद रंगाची दिसतें; कारण तिच्यामधील बारीक कण सूर्याचीं किरणें तशींच परावर्तन पावूं शकतात. तेलाचा थेंब पाण्यावर अथवा जमिनीवर पडल्यास तो पसरतो व तेथून परावर्तन पावणारी सूर्यकिरणें अनेक रंगांच्या छाया दाखवितात, याचें कारण त्या तेलाच्या थराच्या योगानें सूर्यकिरणांचें पृथक्करण होतें हेंच होय. हेच चमत्कार साबूच्या पाण्याच्या फुग्यापासून अथवा अगदीं पातळ कांचेच्या तुकडयावर देखील दिसतात.

रंगपदार्थाचे पढीलप्रमाणें निरनिराळे भाग करण्यांत आलेले आहेत, (१) कापड छापण्याचे अथवा रंगविण्याचे, कतडीं रंगविण्याचे, व कागद रंगविण्याचे रंगपदार्थ, (२) चोपडण्याचे अथवा ब्रशानें लावण्याचे रंगपदार्थ, लाख, वार्निश, पुस्तक व शिळाप्रेसचे रंग, आणि (३) कांच व चिनीमातीचीं भांडी यांमध्यें उपयोगांत येणारे रंगपदार्थ, इत्यादि. यांतील कपउे रंगविण्याचे म्हणजे बहुतेक सर्व ऑर्गनिक (सेंद्रिय) पदार्थ असून ते पाण्यांत विद्रुत होतात (क्वचित यासाठीं सोडयाचें पाणी वापरणें जरूर असतें,) व अशा स्थितींत ते कपडयाच्या तंतूंवर चढविण्यांत येतात. साबू व मेणबत्तीच्या कामांत येणारीं द्रव्यें मद्यार्कांत द्रवणारीं असल्यास जास्त सोयीस्कर असतात. चितारी वापरण्यांत ते ब्रशनें देण्यांत येणारें रंगपदार्थ साधारणत: अविद्राव्य उद्धिज रंगपदार्थ असतात. उदा.-लोखंडापासून केलेला तांबडा अथवा शिशापासून केलेला पांढरा वगैरे. हे ऑर्गॉनिक द्रव्यापासून केलेले पदार्थ असतात. उदा-''कारमीन'', लाख इ. हे रंग जर अळशीच्या तेलांत मिश्र करून देण्यांत येत असले तर त्यास ''ऑईल-कलर्स'' म्हणजे तेलियारंग, व पाणी अथवा चुन्याबरोबर मिश्र करून देण्यांत येत असल्यास ''वाटर-लाईम-कलर्स'' म्हणजे पाणी-चुना-मिश्रित-रंग असें म्हणतात. चितारी-रंग जर त्याखालील रंग झांकून टाकीत असले तर त्यांस झांकणार (कव्हर) अथवा जाड (हेवी) रंग, व ह्या गुणाच्या अभावी त्यास (लाझूर-ट्रान्स्पेरेन्ट) पारदर्शक अथवा पातळ रंग असें म्हणतात. कांच व चिनीमातीच्या भांडयावर उपयोगांत येणारे रंगपदार्थ म्हणजे जड धातू अथवा त्याचें सिलिकेट्स (सिलिकॉनयुक्त द्रव्यें) असतात. रंगपदार्थांच्या मूळ उगमावरून त्यांचे इनऑरगॅनिक (निरिंद्रिय) अथवा ऑरगॅनिक (सेंद्रिय) आणि नैसर्गिक अथवा कृत्रिम असें भेद करण्यांत आलेले आहेत. कृत्रिम ऑरगॅनिक रंगास ''कोलटार कलर्स'' म्हणजे कोळशाच्या डामराचे रंग असे म्हणतात. कारण ते सर्व पदार्थ या डामरापासून करण्यांत येतात.

रंगपदार्थांचा खरेपणा म्हणजे त्यांत सर्वांत महत्त्वाचा गुण होय. उजेड आणि हवा यांनां खरे असलेले म्हणजे यांच्या मार्‍याने न बिघडणारे रंग असे इन्ऑरगॅनिक (निरिंद्रिय) व अलीकडे तयार करण्यांत येणारे ऑरगॅनिक (सेंद्रिय) रंग असतात. कपडयाला देण्यांत येणारे रंग, पाणी, अम्ल, साबू, सोडा इत्यादिकांच्या योगानें अक्षय रहावयास पाहिजेत. लोंकरीच्या रंगावर साबू आणि सोडा यांच्या योगें तिजवर होणार्‍या परिणामापासून नुकसान होतां कामा नये. सर्वांत उत्तम कापडी रंग म्हणजे निळीचे रंग, अ‍ॅलिझरीनरंग, क्युपेन (जर्मन शब्द) रंग, क्रोमरंग आणि इन्डानग्रीन रंग हे आहेत. रोझ अनिलीन रंग जरी वरील रंगापेक्षां जास्त उठावदार दिसतात तरी ते हलक्या प्रतीचे असतात. व त्यांच्या किंमतींतहि पुष्कळ फरक असतो. पुष्कळसे इनऑरगॅनिक (पिरिंद्रिय) रंग, तसेंच तांब्याचे, शिशाचे आणि सोमल (अर्सेनिक) पासून तयार झालेले रंग विषारी असतात; यामुळें यांचा उपयोग खाण्याच्या पदार्थांत तसेंच लहान मुलांचीं खेणीं करण्याके सक्तीनें बंद करण्यांत येतो.

(१) इन्ऑरगॅनिक (निरिंद्रिय) रंगपदार्थ, (अ)सफेत रंग:- (१) व्हाईटलेड अथवा शिशापासून केलेला पांढरा रंग-सफेता-सर्व प्रकारच्या तेलिया रंगांत तसेंच चितारी रंगांत हा रंग अत्यंत महत्त्वाचा आहे. सफेता अथवा हाईटलेड आणि बेसिक लेडकार्बोनेट हे तयार करण्याकडे जगांत सांपडणार्‍या शिशाचा पांचवा भाग खर्च केला जातो. हा रंग नेहमीं तेलाबरोबरच वापरण्यांत येतो. याचे इतर रंग झांकून टाकण्याचे व टिकण्याचे गुण फार महत्त्वाचें आहेत. तेलाबरोबर याचें मिश्रण फार चांगलें होत असून यावर हवेपासून फरक होत नाहीं. तथापि सल्फ्युरेटेड हायड्रोजन (द्विउज्ज-गंधक) वायूमुळें त्यांतील शिशाचें गंधकाबरोबर मिश्रण होऊन कांहीं काळानंतर हे रंग काळे झालेले दिसतात. रंग तयार करण्यांत कोरडा आणि ओला असे दोन प्रकार आहेत. शिवाय त्यांत बारीक बारीक अनेक भेद आहेत. करण्याच्या कृतींत विषारी वायूपासून बरेंच जपावें लागतें. यांत बेरियमसल्फेट्ं, खडू, कॅलशियम सल्फेट व अल्युमिनियमची माती वगैरे पांढर्‍या वस्तूंची भेसळ करण्यांत येते. (२) व्हाईट झिंक-जस्तापासून केलेला पांढरा रंग-हें जस्ताचें प्राणवायूबरोबर झालेलें मिश्रण, ज्यास झिंकऑक्साईड म्हणतात तें होय. याचा सफेत्यासारखाच तेलाबरोबर उपयोग करण्यांत येतो. मात्र सफेता जसा गंधकामुळें काळा पडतो तसे हे रंग काळे पडत नाहींत. कारण झिंक सल्फेट याचा रंगहि पांढराच असतो. याचा चित्रें काढण्याच्या कामीं जास्त उपयोग होतो. पिंवळा, तांबडा अथवा इतर रंग फिकट करावयाचे झाल्यास यालाच मिश्रणांत घ्यावें लागतें. याचा उपयोग कागद, पडदे आणि इंडिया रबरचें सामान रंगविण्याकडे विशेष महत्त्वाचा आहे. हा रंग तयार करण्यातहि विषारी वायूंचे फारसें भय नसतें. मात्र हा रंग व्हाईटलेड पेक्षां जास्त महाग असतो. (३) लिथोफोन:-झिंकसल्फेट आणि बेरियमसल्फेट यांचे मिश्रण. हें वरील दोन्ही रंगांपेक्षां गुणांत कमी असतें परंतु त्यांच्यापेक्षां किंमतींत कमी असल्यामुळें तें बरेंच जास्त प्रमाणांत उपयोगांत येतें. हें सूर्यकिरणानें थोडें काळवट होतें परंतु काळोखांत राहिल्यास पुन्हां उजळते. भिंतींनां वगैरे तेलिया रंग द्यावयाचे झाल्यास या रंगाचाच पहिला हात देण्यांत येतो व त्यानंतर सफेती अथवा इतर भारी रंगाचा हात देतात. (४) बेरिट व्हाईट-बेरियमसल्फेट:-याचा तेलाबरोबर उपयोग होत नाहीं. हें वजनांत फार जड असतें व मुबलकतेमुळें किंमतींत देखल नैसर्गिक स्थितींत वाटेल तितकें सांपडतें. याचाहि तेलाबरोबर उपयोग होत नाहीं. बेरिटव्हाईट आणि खडू हे पाण्याचे रंग म्हणून वापरले जातात.

(आ) तांबडे व गेरूरंगाचे रंगपदार्थ:-(१)हिंगूळ-झिनोबर (जर्मन)-सिनाबर अथवा सिनाबारीस (इंग्रजी)-यांत पारा आणि गंधक या प्रत्येकांच एकेक परमाणु असतो. हे नैसर्गिक आणि कृत्रिमहि असूं शेकतें. (शेंदूर:-मिनियम् अथवा शिशाच्या प्राणवायूबरोबर झालेलें एक द्रव्य याचें प्रमाण:-शिसें ३ प्राणवायु ४. हें हिंगुळापेक्षां थोडे कमी तांबडें असून त्यांत थोडी पिंवळट झांक मारते. याचा तेला-बरोबर उपयोग करण्यांत येतो व हें विशेषत: तेलांत मिश्र करून लोखंडावर फांसण्यांत येतें. यायोगानें लोखंडाच्या बाहेरील भागावर पाणी, हवा यांचा उपद्रव होऊं शकत नाहीं व त्यावर गंज चढत नाहीं. दुर्बिणी वगैरेंच्या भारी कांचा करण्यांत शिशाचा उपयोग करण्यांत येतो तेथें कांचेच्या रसांत शेंदूरच टाकतात. (३) लोखंड आणि प्राणवायु यांपासून झालेला तांबडा रंग (प्रमाण: लोखंड२ प्राणवायु३) यास इंग्रजींत 'आयर्नरेड' अथवा 'आयर्न ऑक्साईड' असें म्हणतात. याचें 'इंग्लिश रेड' असेंहि एक नांव प्रचारांत आहे. हा चिकणमाती (क्ले)बरोबर निरनिराळ्या प्रमाणांत मिश्र करून ह्यापासून पिवळे, बदामी, तांबडे असे गेरू तयार होतात. पाणी, तेल, अथवा चुना यांबरोबर मिश्र करून हे रंग लोखंड, लांकूड, जहाजें, भिंती वगैरे रंगविण्याकडे वापरले जातात. (४) सोनेरी गंधक:- अ‍ॅन्टिमनी आणि गंधकाचें मिश्रण (प्रमाण: ऍन्टिमनी२ गंधक७). याचा मुख्य उपयोग रबराचे पदार्थ रंगविण्यांत आणि रबर व गंधक यांचे मिश्र पदार्थ तयार करण्याकडे केला जातो.
(इ) पिवळे रंगपदार्थ:- (१) क्रोमपिवळा:-लेडक्रोमेट-कृत्रिम तयार करावयाचा असल्यास पोटॅशियम बायक्रोमेटचें मिश्रण लेड-नायट्रेट, असिटेट, सल्फेट, क्लोरेट अथवा व्हाईट या बरोबर केल्यास लेडक्रोमेट अलिप्त होऊन खालीं असतें. निराळें प्रमाण व निरनिराळीं उष्णमानें वापरून निरनिराळ्या छटा तयार करण्यांत येतात. ''बर्लीनर वायु'' याजबरोबर मिश्र केल्यास त्यापासून हिरवा रंग तयार होतो. यांत तीव्र सोडियमहायड्रोक्साईड अथवा चुन्याचें पाणी टाकल्यास त्यापासून क्रोम-तांबडा (क्रोमरेड) रंग तयार होतो. (२) कॅड्मियम नारिंगाप्रमाणें पिवळा दिसतो. हा फार किंमतीचा असून चित्रकला अथवा अंगास लावण्याचे साबू तयार करण्याकडे फार उपयोगी पडतो. याशिवाय (३) नेपल्स पिंवळा (लेड अन्टिमनेट), (४) झिंक पिंवळा (झिंकक्रोमेट) आणि (४) मसीव गोल्ड (प्रमाण जस्त१ गंधक२) हे प्रमुख पिंवळे रंग आहेत.

(ई) जांभळे आणि हिरवे रंगपदार्थ:- (१)अल्ट्रामरीन, (२) बर्लीनरब्ल्यू, (३) स्माल्ट, (४) कोबाल्टब्ल्यु (कोबाल्ट ऑक्साईड आणि क्लेचें मिश्रण), (५) कॉपर ब्ल्यू, (६) ब्रेमर ब्ल्यू (कॉपर ऑक्साईड्स) आणि ईजिप्शियनब्ल्यू (चुना, तांबें यांचें सिलिकेट) हे जांभळे रंगपदार्थ आहेत. हिरव्या रंगांत (१) तांब्यापासून झालेले मॅलाचिट् रंग, (२) तांबें आणि सोमल यांच्या प्राणवायूबरोबर झालेले रंग (३) ब्रेमर हिरवा, (४) क्रोमहिरवा (पोटेंशियम बायक्रोमेट आणि बोरिक-आम्ल यांचें मिश्रण) आणि (५) व्हेरोन हिरवा (चिनीमाती असलेलें आयर्न सिलिकेट) हे प्रमुख रंग होत.

बदामी व काळे रंगपदार्थ.:-(१) मँगेनीज व प्राणवायु द्रव्यें अथवा त्यांची लोखंड-प्राणवायूबरोबर झालेलीं मिश्रणें. हीं ''उंब्रा'' नांवाखालीं बदामी रंग म्हणून करण्यांत येतात. काळ्या रंगांत नैसर्गिक ग्रॅफीट कोळसा आणि काजळी हे प्रसिद्ध आहेत.

नैसर्गिक ऑरगॅनिक (सेंद्रिक) रंगपदार्थ.-हे रंगपदार्थ प्राणिराज्यांतून अथवा वनस्पतिराज्यांतून तयार स्थितींत मिळविले जात असून ते आज कित्येक शतकें अथवा हजार वर्षांपासून कपडे रंगविण्याच्या अथवा छापण्याच्या कामीं उपयोगांत येत आहेत. अलीकडे गेल्या अर्धशतकापासून कृत्रिम रंग तयार करण्यास सुरवात झाल्यापासून यांचें बरेचसें उच्चाटन झालें आहे. तरी पण कित्येक ठिकाणीं हे उपयोगांत येतातच.
जांभळा रंग:-(१) नैसर्गिक नीळ. (२) ब्ल्यू वुड (कॅंपेच वुड-हेमाटोक्झिलॉन कॅंपेचियानुम) ही वनस्पति विशेषत: मध्यअमेरिकेंत फार मोठया प्रमाणांत होते आणि हिच्यापासून निघणार्‍या मळकट तांबडया रंगास व्हायोलेट फुलासारखा वास येतो. निरनिराळ्या इतर धातू द्रव्याबरोबर मिश्र केल्यास त्यापासून निरनिराळे रंग तयार करण्यांत येतात.

तांबडा रंग:-(१)''क्राप'' नांवाची वनस्पति (रुबिया टिन्क्टो रम्) फ्रान्समध्यें अ‍ॅव्हिग्नॉन व अलसेस या प्रांतांत या ३-३॥ फूट उंच वाढणार्‍या या वनस्पतीची बरीच लागवड होत असे. हिच्या मुळांत साखर जातीच्या म्ल्युकोसाइंड्स असतात. व यापासून '' अ‍ॅलीझरीन'' आणि परप्युरीन रंग काढण्यांत येतात. (२) रेड वुड (ब्राझीलवुड) यापासून निघणारे 'ब्राझीलिन'. (३)चंदनाच्या झाडांतून निघणारे 'सॅन्टालीन.' (४) शेवळ रंगपदार्थ:-भुमध्यसमुद्राच्या किनार्‍यावर व कॅनरीबेटांत होणार्‍या 'रोसेला टिन्क्टोरिया आणि 'लेकानोरा टार्टारिया' या वनस्पतीपासून निघणारे ''ओर्साईल'' व त्यापासून होणारे रंग. (५) लिट्मस-वर ४ मध्यें सांगितलेल्या दोन वनस्पतींपासून पोटॅश व अमोनिया यांच्या मिश्रणानें व एका विवक्षित निराळ्या प्रयोगानें हे रंग तयार करण्यांत येतात. याखेरीज एका स्कॉटिश शेवाळापासून काढण्यांत येणारे रंग (६) पर्शीओ; तसेंच (७) साफ्लोर, (८) कार्थामीन, (९) कॅरोटीन, (१०) अल्काना, इ. नैसर्गिक वनस्पतिज तांबडे रंग आहेत. (११) कोचनील हा एक प्राणिराज्यांतून मिळणारा तांबडा रंग आहे. मेक्झिको देशांतील ''कोकुस कॅक्टी'' नामक किडयांत असणार्‍या (शें. १०) कॅरमिन नांवाच्या अम्लाचा रंग, यास कोचनील म्हणतात. या रंगाच्या तांबडया भडकपणामुळें चित्रकलेंत तसेंच इतर अनेक बाबतींत ह्यास बरेंच महत्तव आहे.

पिवळा रंग:- (१) पिवळें लांकूड. ब्राझीलमध्यें होणारे ''मोरूस टिक्टोरिया'' नामक वनस्पतींतून निघणारे मोरीन; (२) उत्तार अमेरिकेंतील क्केकर्स टिन्क्टोरियामधील ''क्वेरसिट्रीन'' व त्यापासून केलेली ''क्केर्सेटीन,'' ''फ्लावीन,'' ''आयसो उल्सीट'' इत्यादि रंगपदार्थ; (३) रेसेडा लुटिओलामधील ''लुटिओलीन;'' (४) हळद (कुरकुमालोगा), ''बिक्सा-ओरेलाना'' फळांच्या गीरांतून निघणारे ओर्लियान; (६) पिवळें केशर; (७) 'बर्बेरिट' मुळांतील बर्बेरीन आणि इन्डियन यलो हे मुख्य होत.

बदामी रंग:-अकाशिया जातींतून निघणारा कात व त्यापासून करण्यांत आलेले रंगपदार्थ.
:-क्लोरेफील-वनस्पतिपल्लवांतील हिरवा रंग. मद्यार्काबरोबर पानें उकळविल्यास क्लोरोफील मद्यार्कांत निघून येते. या रंगापासून मद्यें व तेलें रंगविण्यांत येतात. हा रंग काळोखांत अथवा उजेडांत तसाच कायम राहतो.
(३) कृत्रिम ऑरगॅनिक रंगनपदार्थ (कोलटार कलर्स):-या पदार्थांच्या इतिहासाला १८३४ सालीं ''रुंगे'' यानें फेनोल व अनिलीन हीं दोन द्रव्यें तयार केल्यापासून सुरवात झाली. अनिलीनपासून पर्क्रीन यानें १८५६ सालीं पहिले रंगपदार्थ काढले व त्यास ''माव्हेईन'' रंग असें नांव दिलें. पुढें १८५९ सालीं बेर्गुईन यानें अनिलीन व टिनक्लोराईड यांच्या मिश्रणापासून ''फुक्सीन'' तयार केलें. त्यानंतर १८६३ सालीं हॉफमान यानें ''अनिलीन ब्ल्यू'' हा जांभळा रंग तयार केला व त्याच्या मागोमाग ''अनिलीनव्हायोलेट'' आणि ''रोझ अनिलीन'' रंग तयार झाले. पुढें १८६९ सालीं ग्रेडबे आणि लिबरमान यांच्या संयुक्त मानें अन्ध्रासीनपासून 'अलिझरीन' रंग करण्याची कृति अवगत झाली. १८७४ सालीं बायर यानें ''प्थालेईन'' शोधून काढलें. १८७६ सालीं इ. फीशर आणि ओ. फीशर यांनीं रोझअनिलन रंगाच्या रचनेचें पृथक्करण केलें. त्याच वर्षी अझो रंगपदार्थांचा शोध लागला. १८८४ सालीं कापसाचे रंगपदार्थ व १८९३ सालीं गंधकमिश्रित रंगपदार्थ तयार झाले. १८९७ सालीं ''वाडिशे अनिलीन आणि सोडा फाब्रिक'' या कंपनीनें कृत्रिम नीळ तयार करून नैसर्गिक रीतीनें तयार होणारे रंग करण्यास सुरवात केली. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकांत आणखी अनेक रंग तयार करण्यांत आले. आणि हे नवे रंग तयार करण्याचे उद्योग एकसारखे चाललेले आहेतच. हे रंग पूर्वीच्या रंगांपेक्षां जास्त चांगले व जास्त टिकणारे असून त्यांची माहिती अगदीं संपूर्ण असल्यामुळें हल्लीं ह्यांचाच उपयोग जास्त होत असतो. दरवर्षास सुमारें ३० कोट रुपये किंमतीचे कृत्रिम रंग तयार करण्यात येतात व त्यांपैकीं एकटया जर्मनींतच २३ कोट रुपये किंमतीचे रंग तयार होतात. जर्मनींत आज एकंदर लहान मोठे असे १० रंग तयार करण्याचे कारखाने आहेत. त्यांत (१) वाडिशे अनिलीन सोडा फाब्रिक, (२) फ्रा. बायर आणि मंडळी, आणि (३) हयोक्स्टर फार्ब वेर्के हे तीन अत्यंत प्रसिद्ध आहत. रंगाच्या बाबतींत जर्मनीशीं स्पर्धा करण्यास कोणताही देश आशा करीत नाही व हा रंग तयार करण्याचा मक्ता आपणाकडेच ठेवून घेण्यांत जर्मनीचे आटोकाट प्रयत्‍न चाललेले असतात. आणि या बाबतींत त्या देशाला आजपावेतों तरी चांगलेंच यश आलेलें आहे यांत शंका नाहीं.
या रंगांची संख्या आज हजाराजवळ येऊन ठेपली आहे. त्यांतील ठळक गोष्टींसंबंधानें विवेचन करावयाचें झाल्यास त्याचेंच एक पुस्तक व्हावयाचे. त्यांच्यांतील भेदहि इतके बारीक आहेत कीं ते द्यावयाचें झाल्यास त्यांची रासायनिक रचना लक्षांत घेणें अगदीं जरूर आहे आणि हें सर्व येथें अशक्य असल्यामुळें ह्या बाबतींत जास्त खोल न जातां मुख्य मुख्य गोष्टींचाच उल्लेख केलेला आहे.
डामरापासून तयार करण्यांत आलेले हे कृत्रिम रंगपदार्थ खालीं दिल्याप्रमाणें मुख्यत: विभागिलेले आहेत (अ) ट्रायफेनील मेथेन व त्यापासून झालेले रंग, रोझअनिलीन रंग, फेनोल रंग, प्थालिक अम्लापासून झालेले रंग. (आ) अझोरंग, डायअमीन रंग, मॉर्डन्ट (अथवा रंगबंधकर पदार्थांच्या साहाय्यानें देण्यांत येणारे रंग). (इ) अन्ध्रासीन रंग. (ई) निळीचे रंग. (उ) गंधकामिश्रित रंग. (ऊ) इतर; नायट्रोरंग, क्किनोलीन रंग, मेथिलीन ब्ल्यू रंग, साफ्रानीन रंग, इंडुलीन रंग, अनिलीन ब्लॅक रंग इत्यादि.

ट्रायेफेनील मेथेनरंग.- (१) रोझ-अनिलीन रंग-यांतील मुख्य द्रव्यें म्हणजे अनिलीन, टोलुइडील, मेथील अनिलीन, आणि त्यांच्या जातींतील बेन्झोल व मेथॉक्सी श्रेण्यांच्यापासून झालेली द्रव्यें इत्यादि होत. उदाहरणार्थ नायट्रोबेन्झोल, अनिलीन अथवा अमिनो बेन्झोल, नायट्रो टोलुओल, फुक्सीन, क्रिसानिलीन, फॉस्फीन, मारोन, इंडुलीन, पॅरा-रोझ-अनिलीन, न्यु-फुक्सीन, अनिलीन व्हायोलेट, मेथील-व्हायोलेट, अनिलीन ब्ल्यू, क्रिस्टल व्हायोलेट, अल्कली ब्ल्यू, मॅलाचिट् ग्रीन, ब्रिलांट ग्रीन, पेटन्ट ब्ल्यू, औरामीन इत्यादि. (२) फेनोल रंग-औरीन आणि रोझोल अम्लें हीं पॅरोरोझअनिलीन व रोझ-अनिलीनसारखींच असून त्यांत फक्त अनिलीन श्रेण्यांच्या ऐवजीं फेनोलश्रेण्यां यांचा त्यांत समावेश केला असतो. उदाहरणार्थ क्रीम-व्हायोलेट इत्यादि. (३) प्थालिक अ‍ॅसिड रंग अथवा प्थालेईन्स-फेनोल प्थालेईन, रिसॉसीन प्थालेईन, एरिथ्रेसीन, रीझबेंगाल, प्लोक्सीन साफ्रोसीन, र्‍हेडामीन, गालेईन, क्युरेलेईन इत्यादि.

अझो रंगपदार्थ.-अझो रंग शोधून काढण्याचें मुख्य श्रेय पी. ग्रीस नामक जर्मन शास्त्रज्ञास आहे. एकंदर निरनिराळ्या रंगद्रव्यांत फक्त अझो रंगाचीच गणना जवळ जवळ अर्धी होते व उरलेल्या अर्ध्यांत इतर सर्व रंगांचा समावेश होतो. हे पदार्थ म्हणजे मुख्यत: डायअझो (द्विनत्र) द्रव्यें व अमीन अथवा फेनोल्स यांच्या मिश्रणापासून तयार होतात. डायअझो द्रव्यें स्फोटक असल्यामुळें या कृतींत उष्णमान वाढूं न देण्याविषयीं विशेष लक्ष द्यावें लागतें व थंडपणा कायम ठेवण्यासाठीं बहुतेक सर्व प्रयोगांत बर्फाचें साहाय्य घ्यावें लागतें. (१) क्रायसो इडीन, अनिमो अझोबेन्झोल, मेथल ऑरेंज, डायनिक अ‍ॅसिड, विटा-नाफ्थोलिडीन-सल्फोनिक अ‍ॅसिड, नाप्थीयोनिक अ‍ॅसिड, बिटा-नाफ्थोल ऑरेंज, पान्सो, शार्लाख, बोडों इत्यादि. (२) डाय-अमीन रंग-बेन्झिडीन, टोलिडीन, डायअनीसिडीन, एथॉक्सी बेन्झिडीन, कान्गोरेड, बेन्झो पर्पूरीन, क्रायसामीन, इत्यादि. (३) मॉर्डन्ट रंग आणिक्रोमयुक्त अझो रंग-अलीझरीन रंग, क्रोमोट्रोप, पॅलाटीनक्रोम रंग, अन्ध्रासीनक्रोम रंग, एरिओक्रोम, सॅलिसीन रंग इत्यादि.

अन्ध्रीसीन रंगपदार्थ.-निळीच्या रंगाप्रमाणेंच कपडयांच्या वगैरे कामांत अत्यंत उपयोगी असे दुसरे रंग म्हणजे अलिझरीन रंग होत. हे रंग प्रथम नैसर्गिक क्रॅप नामक वनस्पतीच्या मुळापासून काढीत असत नंतर १८६९ सालापासून अन्ध्रासीन द्रव्यापासून हे रंग तयार करतां येऊं लागले. अलीझरीन, आयसो-अन्ध्रा आणि प्लावो-पर्पूरीन, पर्पूरीत, अन्ध्रागॅलोल, अलिझरीनब्ल्यू, इन्डान्ध्रीन, फ्लाबान्ध्रीन, गॅलोफ्लाबीन इत्यादि.
निळीचे रंगपदार्थ.-हिंदुस्थान, जाव्हा बेटें, ग्वाटेमाला देशांत होणार्‍या 'इंडिगोफेरा टिन्क्टोरिया' वनस्पतींतून निघणार्‍या इंडिकान नांवाच्या द्रव्यापासून नीळ तयार होत असे. पुढें १८७८ सालीं बायट यानें निळीची रासायनिक रचना शोधून काढली. नंतर १८९७ सालीं कृत्रिम नीळ बाजारांत आली व तिनें थोडयांच दिवसांत नैसर्गिक निळीस खो दिला व स्वत: तिची जागा पटकाविली. अशा कृत्रिम रंगांपैकी इन्डिगोराईन, इन्डिगोब्ल्यू, इन्डिगोव्हाईट, टेट्राब्रोम इन्डिगो अथवा सिबाब्ल्यू, थायोनइन्डिगो, इन्डिगो शार्लाख हे होत.

गंधकमिश्रित रंगपदार्थ:-रंग स्वस्त असून दुसर्‍या कोणाच्याहि मदतीशिवाय कापसाबर बसूं शकतात. व ह्या गुणामुळें त्यांस विशेष महत्त्व आलेलें आहे. सोडियम सल्फेट रंगांत ते सहज विरघळतात. व त्यांत अम्ल टाकिल्यांत ते पुन्हां पृथक् होतात. कापसावर ते अगदीं पक्के बसतात.

इतर रंगपदार्थ:-(१) नायट्रो रंग- हे बहुतकरून पिंवळे अथवा नारिंगी असतात. पिक्रीक अम्ल, डायनायट्रोअल्फा-नॅफ्थोल अथवा मार्टीयस यलो. (२) क्किनोलीन रंग-क्किनोलिन यलो, क्किनोलीन रेड, सियानीन इत्यादि. (३) सॅफ्रानीन रंग-मॉव्हेईन, मॅग्डाला रेड, अझो कार्मीन, इत्यादि. (४) मेथिलीन ब्ल्यू, इन्डुलिन ब्ल्यू, पॅराफेनिर्लीन ब्ल्यू, इत्यादि. (५) अनिलीन ब्लॅक-अनिलीन, पोटॅशियम बाय क्रोमेट आणि गंधकाम्ल अथवा कॉपरक्लोरेट यापासून तयार होतें.

[संदर्भग्रंथ]:-झेर ऊंड रूबेन कांफ-फार्बेन फाब्रीकाटशिओन; रूपे-डी शेमी डर नटुरलिशेन फार्ब स्टोफे; निश्चकी-शेमी डर ऑरगानिशेन फार्ब स्टोफे; शुल्झ-शेमी डर स्टाईन कोहलेन टियर्स ऊंड डर कुन्स्टलिशेन ऑर्गानिशेन फार्ब स्टोफे; ओस्ट-लेहरबुख डर शेमीशेन टेश्नोलोगी.] (ले.-उॉ. वा. द्वा. कोर्डे.)

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .