विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रघवी - रजपुतांच्या अनौरस संततीची ही एक जात बनली आहे. आतां हे आपापसांतच लग्नें करून आपली स्वतंत्र जात म्हणवितात. मध्यप्रांतांत हे लोक हुशंगाबाद व नागपूर जिल्ह्यांत आढळतात. तेथें यांची संख्या २४००० वर आहे. छिंदवाडा गांव हें रतन नामक एका रघवीनें वसविलें अशी दंतकथा आहे [रसेल व हिरालाल.]-