प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रघुनाथ बाजीराव पेशवे (१७३४-१७८३)-हे पहिल्या बाजीरावाचे तिसरे चिरंजीव होत. यांचें पहिलें लग्न बर्वे घराण्यांतील मुलीशीं होऊन तिचें नांव जानकीबाई ठेवण्यात आलें (१७४२). ती पहिल्याच प्रसूतींत वारली (१७५५) व झालेला मुलगाहि लवकरच वारला. पुढें दादांचें दुसरें लग्न ओकांच्या घराण्यांतील मुलीशीं झालें व तिचें नांव आनंदीबाई ठेवलें. हिला गोदुबाई दुर्गाबाई (ही पांडुरंग बाबुराव बारामतीकरास दिली), भास्करराव, बाजीराव, चिमाजीआप्पा व आणखी एक मुलगा अशीं मुलें झालीं. भास्करराव व आणखी एक लहान मुलगा लहानपणींच वारल्यानें, बाजीराव याच्या जन्मापूर्वीच आपल्या शाखेंत पेशवाई निरंतरची यावी म्हणून दादांनीं वसईजवळील पापडीगांवच्या भुस्कुटे घराण्यांतील अमृतराव नांवाच्या मुलास दत्ताक घेतलें (१७६८) आनंदीबाई दादांच्या नंतर १० वर्षांनीं वारली (ता. २७-३-१७९४). सुरतेस येऊन राहिल्यावर दादानीं पेंडशांच्या मथुराबाई नांवाच्या मुलीशीं लग्न लावलें; ही त्यांची तिसरी बायको.

राघोबादादाचें राजकीय चरित्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब), माधवराव बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, माधवराव नारायण, नाना फडणवीस, आनंदीबाई, आनंदवल्ली या लेखांत बहुतेक सर्व दिलें आहे. येथें त्यांचें खाजगी चरित्र देतों. थोरल्या बाजीरावानें दादास लहानपणीं नानासाहेबांसारखेंच सातार्‍यास शाहुछपतीजवळ ठेविलें होतें. यामुळें त्यास राज्यकारभाराचें शिक्षण मिळालें व बाजीरावास आपला एक खात्रीचा माणूस शाहूजवळ ठेवण्यास सांपडला. दादांची मुंज नानासाहेबांनींच लाविली होती. त्यावेळींच सदाशिवरावभाऊंचें लग्नहि झालें. या समारंभास शाहूमहाराज पुण्यास आले होते (१७४०). नानासाहेबानींहि दादांस सातार्‍यास मधून मधून ठेविलें होतें, त्यामुळें राजकीय व्यवहारांत दादांची प्रवृत्ति झाली. बाळाजी विश्वनाथाची पत्‍नी राधाबाई हिनें लहानपणीं दादांनां वळण लाविलें होतें, खुद्द नानासाहेबांनीं दादांनां तत्कालीन शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. दादा आठ वर्षांचे असतांनां त्यानां नानासाहेबांनीं लिहिलेल्या पत्रांत म्हटलें आहे कीं, ''रघुवंश, विदुरनीति, चाणक्य....त्याची नेमपूर्वक चिंननिका करून थोडेबहुत शास्त्री याजवळ नित्य म्हणत जावें ....भारत वाचीत जाणें....केवळ घोडीं फेरावयाचे छंदास न लागणें.....भाऊची मर्जी बहुत प्रकारें रक्षण करीत जाणें.....घोडीं वेगळीं बांधीत न जाणें. क्षुद्र मनुष्याशीं सहवास कोणें प्रकारेंहि न करणें......शरीरप्रकृत नीट रहात नाहीं. यास्तव औषध जेणेकरून घेत जाणें.....सातारियास गेल्यावर दोहीं बाईं (शाहूच्या राण्या) कडे विना बोलाविल्यावांचून न जाणें.....वयास उचित योग्य वेष करीत असावा. देवपूजा थोडीबहुत एकांती न बोलतां करीत जाणें.....गर्व न करावा.....शिष्यधर्मे असलिया फार उपयोग आहे. चिरंजीव जनार्दन.....हरयेक गोष्टींत अधिक जाहल्यास तुमही त्यांस मान्य पुरुष कसें व्हाल ? '' या पत्रावरून दादांच्या स्वभावाची बरीचशी कल्पना होईल. नानासाहेब शिस्तीचे पण मिळत्या स्वभावाचे असल्यानें त्यांचे व दादांचे पुढें जरी खटके उडत तरी पण प्रकरण विकोपास जात नसे. दादा हे लहानपणापासूनच घोडयावर बसणारा जबर होते. त्यामुळें पुढें त्यानां ''राघोभरारी'' हें विशेषनाम पडलें. सदाशिवरावभाऊंचें व दादांचें लहानपणापासूनच पटत नव्हतें; तें इतकें कीं दादा आपलीं घोडींसुद्धां भाऊंच्या घोडयांत बांधीत नसत. त्यावेळेपासूनच शागीर्द व भटभिक्षुक आणि इतर मनानें हलक्या अशा क्षुद्र मनुष्यांचा सहवास दादानां विशेष प्रिय होता. यामुळेंच नाना फडवणीस दादांचा उल्लेख पुष्कळदां 'सांब व त्याचे गण' असा करी. या लोकांच्या शिकवणीवरूनच घरांत व राज्यांत दादानीं गृहकलह पेटविला. तो इतका कीं त्यामुळें मराठी राज्यांत परकीयांचा हात शिरून तें पुढें लयास गेलें. दादांची प्रकृति तापट असून शरीर साधारण व बहुधां रोगानें पीडित होतें. त्यांच्या देवपूजेचं बंड बरेंच असे व त्याचा वाजागाजाहि फार होई; उपासतापास, व्रतकैवल्यें सतत होत. प्रतिबंधांत असतां त्राग्यानें साधा उपास करणें किंवा निश्चक्र उपोषणें करणें, हरणाचें दूध पिणें, शिवीगाळ करणें हे प्रकार नेहमीं घडत. त्यानां गर्वहि बराच असे. उत्तरेकडे झालेल्या स्वार्‍यांत त्यानीं वृद्ध व लढवय्ये मुत्सद्दयांच्या सल्ल्याचा अनेकदां अव्हेर केला होता. आपलेंच म्हणणें खरें करण्यासाठीं वाटेल तें नुकसान झालें तरी त्याची त्यानां पर्वा नसे. लहानपणीं त्यांचे धाकटे भाऊ जनार्दन बाबा हे त्यांच्याहून उत्तम वृत्तीचे बनल्याचा उल्लेख वरील पत्रांतच आढळतो. वडील माणसांनां न विचारतां अथवा मुत्सद्दयांचा सल्ला न घेतां दादा परभारें खटपटी व राजकारणें करीत, पण त्यांत ते बहुधां अपयशी ठरत. नानासाहेबानीं दादांच्या अंगावर मोहिमा करण्याचें व इतर मुत्सद्देगिरीचीं कामें सोंपविली होतीं तरीं बहुधां त्यांच्याबरोबर कोणी जाणता माणूस दिला जाई, कारण दादा व्यवस्था लावण्याऐवजीं उलट गोंधळ करून टाकीत. उत्तरेकडील (१७५५ च्या) स्वारींत दादानीं, तिकडे नानासाहेबानीं लाविलेली व्यवस्था मोडून आपल्या मनानें कारभार केला. त्या वेळचें गोविंदपंत बुंदेल्याचें पत्र वाचण्यासारखे आहे. शिंदे-होळकरांचे विकोपास गेलेले भांडण दादांस मिटवितां आलें नाही. बुंदेले, अंताजी माणकेश्वर, हिंगणे वगैरे जुने सरदार नाराज केले. पातशहा, वजीर, सुजाउद्दौला वगैरे नरम न होता मराठ्यांच्याचेवैरी बनले ! दादांच्या अटकेवरील झेंडे लावण्याच्या स्वारीतंहि ( १७५८ ) घोंटाळाच माजला. पैसा मिळवून आणण्याऐवजी दादानी राज्यास उलट कर्जच केले. दादांस स्वत:चें मत बनवून ते अंमलांत आणावयाचे सामर्थ्य नसून दुस-याच्या तंत्राने चालण्याची सवय होती त्यामुळे त्यांचे नेहमी नुकसान होई. मराठ्यांच्या इतिहासांत त्यांनी 'कलि पुरुष' असें नांव मिळालें आहे, तें त्यांचे साग्र चरित्र लक्षांत आणण्यास समर्पक आहे असेच वाटेल. आपल्यास पुढेंमागें पेशवाई मिळण्याच्या कामी मदत करावी म्हणून दादानीं निजाम, हैदर, इंग्रज वगैरे मराठी राज्याच्या शत्रूंशी नेहमी दुटप्पी वर्तन ठेविलें. कांही कांही प्रसंग असे आले होते कीं दादामध्ये आडवे आले नसते तर या लोकांचा पक्का निकाल लागला असता. यामुळें दादा अडचणींत असतां निजामाशी व म्हैसूरशी केलेल्या तहांत पूर्वी पेशव्यांनी त्यांच्यापासून येतलेला पुष्कळसा मुलुख दादानी त्यांना परत देऊन टाकला, इंग्रजांत तर घरांतच घेतलें व त्यामुळे इंग्रज-मराठे युद्ध उपस्थित झालें.

दादानीं त्र्यंबक-किल्ल्यावर पेठ बसवून तेथें स्वत:साठी वाडा बांधला ( १७६४) होता. नाशकापासून दोन कोसांवरील चावंडस ( आनंदवल्ली) येथें व कोपरगांव येथेंहि दादांचे वाडे होते. साता-यास रघुनाथपुरा म्हणून एक पेठ त्यांनी बसविली. त्यांचा पुराणिक, शास्त्री, गवई हरिदास, खिजमतगार वगैरे आश्रितवर्ग फार मोठा होता. दादांच्या अंगी पेशवाई चालविण्याचे सामर्थ्य नाही अशी ( त्यांचे भगत सोडून दिल्यास) त्यावेळी बहुतेक महाराष्ट्राची खात्री होती. पण शेवटपर्यंत पेशवाई मिळविण्याचा प्रयत्न दादानीं सोडला नाही. साराशं उत्तरमराठेशाहीचा इतिहास बनविण्याचे काम दादानींच केले. नसते कारभार करण्याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अहिल्याबाईवरील स्वारी हे होय. पानपतचें अपयश धुवून काढण्याच्या माधवरावांच्या प्रयत्नांत उत्तरेकडील मोहिमा करण्यांत दादांनी बरीच कामगिरी केली. त्यांच्या अंगी कार्याची चिकाटी व वाटेल त्या अडचणींतून निसटून शत्रूला हुलकावणी दाखविणे. शौर्य वगैरे कांही गुण होते. नारायणरावाच्या वधाबद्दल दादानीं दारणाकांठी सांगवीस प्रायश्चित घेतले. त्यावेळी पुढीलप्रमाणे उच्चार केला. "रायास धरावे असा निश्चय राजकारण करणारांशी केला ते समयी त्यांनी विचारिलें न जाणों, धरुं जाता कलागत धडली आणि त्यांत मारले गेले तर दोष ठेऊं नये. असें सोडऊन घेऊन ते कर्मास प्रवर्तले... तेव्हां धरण्याचे संकल्पांत कलागती पडून मारला गेला." दादांचे सर्वच विलक्षण असे त्याप्रमाणे त्यांचा प्रधानकीचा शिक्काहि चमत्कारिक आकाराचा आहे. त्यांनी सात महिने पेशवाई पदाचा उपभोग घेतला. ( डफ; पेशव्यांची बखर; राजवाडे खंड, १, ३, ६, ११, १२; सं. १-८; मराठीरिसायत म. वि. १-४)

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .