विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रतनपूरचे कल्चुरी राजे - मध्यप्रांतांतील रत्नपूर येथें कलचुरी (हैहय) नांवाचें एक राजघराणें नांदत होतें. त्याची वंशावळ आढळते ती:-पहिला पृथ्वीदेव, पहिला नानल्लदेव (११२४), कान्य कुब्ज व जेजाकभुक्ती येथील गोविंदचंद्र व कीर्तिवर्मा हे राजे याचे मित्र होते. नंतर दुसरा रत्नदेव, दुसरा पृथ्वीदेव (११४५), दुसरा जाजल्लदेव (११६८), तिसरा रत्नदेव (११८१) व तिसरा पृथ्वीदेव (११९०) हे राजे झाले. [माबेल फड]