प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रबर - हा एक झाडें, झुडपें व वेलींपासून निघणारा पांढरा घट्ट चीक आहे. ह्या चिकास लॅटेक्स असेंहि म्हणतात. चांगल्या रबराच्या झाडापासून मिळणार्‍या लॅटेक्सपासून शेंकडा २० ते ५० र्प्यंत रबर मिळतें. हा लॅटेक्स त्या झाडाची बाह्यत्वचा व आंतील लांकूड ह्यांच्यामध्यें असल्यामुळें एखाद्या शस्त्रानें त्वचेवर आंतील लांकडापर्यंत पोंचेल अशा बेतानें घाव मारल्यास त्या चिरेंतून तो बाहेर पडतो. हा लॅटेक्स दुधासारखा असून दाट व स्निग्ध असतो. आणि सूक्ष्मदर्शक यंत्रानें त्याची पहाणी केल्यास त्यांत पाण्यासारख्या द्रवामध्यें पुष्कळ बारीक गोल कण तरंगत असलेले दिसतात. हा लॅटेक्स बाहेर येऊन कांहीं वेळ राहिल्यास या गोल कणांचा त्यावर तवंग जमतो व खालीं द्रव राहातो व हळू हळू हे गोल कण घट्ट होऊन कलचुक किंवा रबरस्वरूपांत जातात. कांहीं वेळेस हे कण घट्ट करण्याकरितां ते खूप हलवितात अगर अम्ल, अल्क किवां इतर रासायनिक द्रव्यांचा ते घट्ट करण्याकडे उपयोग करतात. खालीं राहिलेल्या द्रवामध्यें बरीच नत्रप्रचुर द्रव्यें (प्रोटिड्स), कर्वोज्जितें व कांहीं क्षरांचें द्रावण असे पदार्थ असतात. हा लॅटेक्स हवेंत उघडा राहिल्यास हळू हळू घट्ट होत जाऊन नासण्याचाहि संभव असतो; तें टाळण्याकरितां त्यांत थोडेसें अन्न टाकतात. शिसपेन्सिलीनें लिहिलेलें पुसण्याचा याच्या अंगीं धर्म आहे. म्हणून याला 'रबर' (पुसणारें) असें इंग्रजी नांव पडलें; व वेस्ट इंडीज बेटांत याचा प्रथम शोध लागला म्हणून याला इंडिया रबर म्हणूं लागले. आतांपर्यंत रबर बहुतेक दक्षिण व पश्चिम अमेरिका, पूर्व व पश्चिम आफ्रिका व आशियामधून येत असे पण त्याच्या वाढत्या खपाबरोबर त्याची लागवड सीलोन, मलायाद्वीपसमूह वगैरे भागांत जोरानें होऊं लागली आहे. पण अद्याप या नवीन झाडापासून जुन्या झाडाप्रमाणें चांगलें रबर मिळत नाहीं कारण झाडांच्या जुनेपणावर रबराचा चांगुलपणा अवलंबून असतो. रबराच्या लागवडीबरोबर त्याचा खपहि मोठया प्रमाणावर आहे आणि रबराची किंमत उतरली तरी त्याचा खप होणार नाहीं असें नाहीं. कारण त्याचे नवीन नवीन उपयोग सुचविण्यांत येत असून उतरत्या किंमतीबरोबर रस्ते करण्याकडेहि त्याचा उपयोग करावा अशी एक सूचना आहे.
रबराचीं झाडें.-(१) ब्राझीलमधील हेव्हिआ ब्रॅसिलीन्सिसपासून पॅरा नांवाचें पहिल्या नंबरचें रबर मिळतें. ही झाडें ब्राझीलमध्यें पुष्कळ असून त्यांनीं जवळजवळ १ लक्ष चौरस मैल क्षेत्र व्यापलें आहे. हें झाड उत्तम व गारवा धरणार्‍या जमिनीमध्यें लागतें. सिलोन वगैरे ठिकाणीं ह्याच झाडाची लागवड केलेली आहे. (२) मॅनिकोबा रबर हें मॅनिहट ग्लेझिओव्हाय या झाडापासून मिळतें. याहि झाडाची लागवड ब्राझीलमध्यें बरीच असून इतर ठिकाणींहि आहे. हें झाड कोरडया व खडकाळ पण बर्‍याच उंचीवर असलेल्या व फार पाऊस पडत नसलेल्या जमिनीवर चांगलें येतें. ह्या झाडाची लागवड पूर्व आफ्रिका, सीलोन व दक्षिण हिंदुस्थानांत होत असून त्यापासूनबरें रबर मिळतें. (३) मध्यअमेरिकेतून येणारें 'उल' नांवाचें बरबर कॅस्टिलोआ इलेंस्टिका नांवाच्या झाडापासून काढतात. हें रबर काळसर असून तें टिकण्यासहि पॅरा रबरापेक्षां कमी असतें. ह्या बरराचें झाड सर्द जमिनींतून बरेंच दिसून येतें. ह्यास सुपीक व उत्तम जमीन लागत असून हें नदीच्या कांठीं चांगलें येतें पण दलदलीच्या भागांत याची लागवड होत नाहीं. (४) रामबाँग किंवा आसाम रबर; हें फिकस-इलास्टिका किंवा इंडिया रबराच्या झाडापासून मिळतें. ह्या झाडाची लागवड हिंदुस्थानांत बरीच होते. हिंदुस्थानांतून बहुतेक याच रबराचा पुरवठा हातो. हीं झाडें सर्द हवेंत चांगलीं येतात. व यांचें अस्तित्व डोंगराळ प्रदेशांतून विशेष दृष्टोत्पत्तीस येतें. (५) लेंगोंस नांवाचें रबर आफ्रिकेंतील रेशमी रबराच्या झाडापासून (सिल्क रबर-ट्री) मिळते. या झाडांशिवाय कांहीं झुडपें आणि वेलींपासूनहि रबर मिळतें. त्यांत लॅंडोल्फिआ नावाच्या वेलीपासून बरें रबर मिळते. ह्या वेली आफ्रिकेंतील जंगलामधून झाडावरून चढलेल्या आढळतात.
रासायनिक पृथक्करण.-रबरामध्यें मुख्यत: कलचुक नांवाचें द्रव्य असतें व त्यावरच रबराचा चांगुलपणा अवलंबून असतो. चांगल्या रबरामध्यें याचें प्रमाण शें. ७० ते ८० पर्यंत असतें. रबराचा रंग त्यांत असणार्‍या नत्रप्रचुर द्रव्यावर अवलंबून असून त्यांतील राळ त्याच्या टिकाऊपणास घातक असते. रबर पाण्यामध्यें किंव अल्कहलमध्यें विद्रुत होत नसून त्याचें द्रावण कर्बचतुर्हरिद, कर्बद्विगंधकिद, उदोल (बेन्झाल), नॅप्था व क्लोरोफार्म ह्यांमध्यें मिळतें. रबराची व्यापारी रीत्या किंमत तें न तुटतां किती ताणलें जातें व ताणण्यापूर्वीच्या स्थितींत त्यास येण्यास किती वेळ लागतो त्यावर ठरवितात. अद्याप रबराचे रासायनिक गुणधर्म व सारणी निश्चित ठरविली गेली नाही.

रबर व्यापारोपयोगी करण्याकरितां त्यावर कराव्या लागणार्‍या क्रिया:-कच्चें रबर ऊन पाण्यानें मऊ करून पातळ तुकडे करून खोबणी असलेल्या रुळांत दाबतात. या क्रियेनें त्यांत मिश्रित असलेले वाईट पदार्थ चिरडले जातात व या रुळावरून सारखें पाणी जात असल्यामुळें त्या पाण्याबरोबर ते निघून जातात. ह्या रीतीनें धुतलेल्या रबरामध्यें पाणी सांचतें, तें नाहीसें करण्याकरितां तें उबदार खोलीमध्यें कांहीं दिवस टांगून ठेवतात. हें जलविरहित झालेलें रबर गंधयुक्त करण्यास किंवा दळून (मॅस्टिकेशन) त्याचा गोळा बनविण्यास उपयुक्त होतें. दळून तयार झालेल्या रबराच्या गोळ्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करून त्या पदार्थांतील निरनिराळे भाग रबराच्या उदोल (बेन्झॉल) मधील द्रावणाच्या योगानें चिकटवितात. ह्यानंतर तें गंधकांत सुमारें १ तासभर ठेवून १४०० उष्णता देऊन तापवितात. ह्या रीतीनें ते पदार्थ बरेच टिकाऊ होतात. अलीकडे त्या गोळ्यांतच त्याच्या वजनाच्या १/१० इतकें गंधक घालून मिश्रणकारी रुळाच्या सहाय्यानें मिसळून तयार करतात. हें रबर तापविलें असतां लवकर मऊ होत असल्यामुळें त्याचा आपणांस पाहिजे तो पदार्थ बनवितां येतो. तयार झालेल्या पदार्थांस १५०० ते १६०० पर्यंत उष्णता देऊन तें टिकाऊ झालें किंवा नाहीं हें पहातात. रबर टिकाऊ करतानां गंधकाचा उपयोग जास्त प्रमाणांत केला तर त्यापासून एबोनाईट नांवाचा एक पदार्थ मिळतो. ह्या पदार्थाचा विद्युच्छास्त्रामध्यें बराच उपयोग होतो. शिवाय ह्या पदार्थांपासून तयार केलेल्या भांडयावर बर्‍याच रासायनिक द्रव्यांची क्रिया होत नसल्यामुळें रसायनशाळेंत याचा बराच उपयोग केला जातो. रबरामध्यें हिंगूळ किंवा तत्सम द्रव्यें घालून कृत्रिम दांत करण्याकडेहि त्याचा उपयोग करतात.

रबराचे धर्म.-रबर नरम, लवचिक व स्वत: अत्यंत स्थितिस्थापक असा पदार्थ आहे. रबर चिवट असल्यामुळें त्यास सहज कापतां येत नाहीं. थंडीनें त्याची स्थितिस्थापकता कमी होते, व उष्णतेनें वाढते. रबराची वादी ताणून कांहीं वेळ थंड पाण्यांत ठेवल्यास ती आकुंचित होत नाहीं. परंतु तिला उष्णता लावतांच तिच्या अंगी आकुंचित होण्याचा धर्म येतो. उघडया हवेंत व प्रकाशांत रबर पुष्कळ दिवस ठेवल्यानें त्याच्या अंगीं चिकटपणा येतो व तयाची स्थितिस्थापकता नाहींशी होते. मद्यार्कांत किंवा जलमिश्रित अ‍ॅसिडांत रबर विद्रुत होत नाहीं. ईथर, क्लोरोफार्म, नखतेल, व शुद्ध टरपेन्टाईन यांत रबर वितळतें. रबर कापणें झाल्यास कापतांना त्यावर थोडें पाणी सोडावें म्हणजे तो सहज कापला जातो. रबराचे दोन तुकडे कापून लगेंच ते एकमेकांवर दाबले तर कापल्या ठिकाणीं ते बेमालुम चिकटतात. नखतेल किंवा टरपेंटाईन यांत थोडा वेळ ठेवूनहि त्यास चिकटवितां येतें. रबर दिव्याच्या ज्योतीवर धरल्यास पेटतें. त्याची ज्योत पांढरी, तेजस्वी पण धुरकट असते.

उपयोग.-रबराच्या अंगी स्थितिस्थापकता व लवचिकपणा असून त्यांत पाणी शिरत नाहीं. या त्याच्या गुणामुळें कलाकौशल्यांत व निरनिराळे व्यापारी जिन्नस मोठया प्रमाणावर तयार करण्याकडे त्याचा अतिशय उपयोग होऊं लागला आहे. फण्या करणें, अभेद्य कपडे वगैरे वस्तू, मुलांचीं खेळणीं, अनेक प्रकारच्या वाद्या, गिरणींतले पट्टे, यंत्राच्या आंत बसविण्याकरितां दट्टे, नळ्या, नत्रे, चेंडूसारखे गोल पदार्थ, दवाखान्यांतील जिनसा (गरम पाण्याच्या पिशव्या वगैरे), निरनराळ्या कामांकरितां लागणारें सीमेंट अशा असंख्य जिनसा रबरापासून केल्या जातात. विशेषेंकरून मोटारगाडया, सायकली यांच्या चाकाच्या धावांकडे रबराचा उपयोग होऊं लागल्यापासून या पदार्थांचें महत्तव फार वाढलें आहे.

रबरांत निरनिररळ्या प्रमाणांनीं गंधक मिसळला असतां 'व्हल्कनाइझ्ड' रबर तयार होतें. रबराचा हवा तो जिन्नस तयार करून नंतर तो वितळलेल्या गंधकांत बुडविला म्हणजे त्यामध्यें थोडा महत्त्वाचा फेरफार होतो. या मिश्रणानें रबर पूर्वीपेक्षां जास्त स्थितिस्थापक होऊन थंडीनें ताठर होत नाहीं, व उकळत्या पाण्याच्या उष्णतेनें नरम होत नाहीं. गंधकाबरोबर थोडा अ‍ॅटिमनी मिसळून याच रीतीनें लाल रंगाचा गंधकी रबर करतात. गंधकरबराच्या वायुवाहक नळ्या (हवेच्या गिरद्या) वगेरे सामान तयार करतात. गंधकी रबरास ३०२० अंशापेक्षां जास्त उष्णता लावली म्हणजे त्याचा काळा, कठिण व शिंगासारखा एक पदार्थ बनतो, त्यास एबनाईड म्हणतात. त्याच्या फण्या, कंगवे, घडयाळाच्या सांखळ्या, टांक, टांकांचे दांडे, फाउंटनपेनी, गुंडया, वगेरे अनेक पदार्थ तयार होतात. हा पदार्थ घर्षणानें विद्युज्जागृत होतो. म्हणून विजेच्या यंत्रांत याचा उपयोग करतात.

व्यापार.-दरवर्षी सुमारें २ लाख टन रबराचा जगांत खप होतो. १९०९ सालं एकंदर जगांत सुमारे ७०००० टन रबर तयार झालें, त्यांपैकीं १/२ अमेरिकेंत, १/३ आफ्रिकेंत व बाकीचें सीलोन, मलाया वगैरे पूर्वेकडील देशांत तयार झालें. हिंदुस्थानांत रबराचे कारखाने मुळींच नाहींत, यामुळें रबराचें सामान परदेशाहून मागवावें लागतें. १९१७-१८ सालीं ११६ लाख किंमतीचें रबरीं सामान हिंदुस्थानांत आलें.
१९२० सालीं हिंदुस्थान व ब्रह्मदेश मिळून एकंदर ८९२ रबराचे मळे होते व कंदर २०४६६३ एकर जमीनींत रबराची लागवड झाली होती. एकंदर लागवडीपैकीं शेंकडा ४५ ब्रह्मदेशांत, ३२ त्रावणकोर संस्थानांत, ११ मद्रास इलाख्यांत, ७ कोचीन संस्थानांत, २ आसामांत, व शेंकडा २ कुर्ग संस्थानांत व १ म्हैसूर व बंगाल मिळून, ह्या प्रमाणानें होती. रबराचें १९२० सालचें एकंदर उत्पन्न १,३७,८८,९०८ पौंड झालें. खांचे पाडलेंल्या रबराचें एकरामागें उत्पन्न ब्रह्मदेशांत २४३ पौंड, कोचीनमध्यें २२२ पौंड, त्रावणकोर मध्यें १९९ पौंड, मद्रासमध्यें १४२ पौंड, कुर्गमध्यें १०८ पौंड व म्हैसूरमध्यें ६२ पौंड याप्रमाणें निघालें.

१९२०-२१ सालीं हिंदुस्थानांतून परदेशीं १४० लाख पौंड रबर समुद्रमार्गानें रवाना झालें; त्यांपैकी खुद्द इंग्लंडनें शेंकडा ७७, सिलोननें १२ व अमेरिकेनें १० या प्रमाणांत रबर खरेदी केलें. ह्या एकंदर पैदाशीपैकीं शेंकडा ७० रबर मद्रास इलाख्यांतून व बाकीचें ब्रह्मदेशांतून रवाना झालें. [वाट; ब्रिटानिका; हिंदुस्थानांतील उद्योगधंद्याचे सरकारी रिपोर्ट; सिलोन सरकारचे रिपोर्ट; बोर्ड ऑफ ट्रेडजर्नल; इंडि. फॉर्माकोपिया; राईट-रबर कल्टिव्हेशन इन् ब्रिटिश एंपायर; टाईम्स ऑफ इंडिया-इंजिनियरिंग सप्लिमेंट.]

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .