विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रम्फोर्ड, बेंजामिन थामसन - (१७५३-१८१४) एक अमेरिकन सृष्टिशास्त्रज्ञ व मुत्सद्दी. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धांत हा राजपक्षाच्या बाजूला होता. पुढें बव्हेरियांत जाऊन तो स्थायिक झाला. तेथें त्याला काउंट करण्यांत आलें. १७९५ सालीं तो लंडनमध्यें होता नंतर पॅरिस येथें जाऊन राहिला. ग्रेट ब्रिटनची रॉयल इन्स्टिटयूट स्थापण्याच्या कामीं याचें अंग होतें. याचें उष्णतेसंबंधीं सिद्धांताचें विवेचन, 'विज्ञानेतिहास' विभागांत (पृ. ५३२) सांपडेल.