प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रशिया - सामान्यत: यूरोपमध्यें व आशियामध्यें उत्तरेस हा देश पसरलेला आहे. अलीकडे रशिया शब्द संकुचित अर्थी उपयोगांत येतो व यांत फिनलंड व पोलंड खेरीजकरून केवळ यूरोपीय रशियाचाच समावेश होतो. आठराव्या शतकापर्यंत यूरोपीय रशिया मास्कोव्ही म्हणत असत. तत्कालीन मास्को या ह्या राजधानीच्या ठिकाणावरून हें नांव पडलें होतें. परंतु एकोणिसाव्या शतकामध्यें झालेल्या राज्यविस्तारानंतर ह्या प्रांतास सर्वत्र रशिया या नांवानें संबोधूं लागले. महायुद्धापूर्वीच्या रशियन साम्राज्याचें क्षेत्रफळ ८४१७११८ चौरस मैल असून पृथ्वीवर असलेल्या जमीनीचा १/७ भाग त्यानें व्यापिला आहे. विस्ताराच्या मानानें देशांतील वस्ती विरळ आहे. महायुद्धाच्या सुमारास येथील लोकसंख्या (१९१५ सालीं) १८२१८२६०० होती. तींत यूरोपियन रशियाची १३१७९६८००, कॉकेशसप्रांताची १३२९१००, सैबेरियाची १०३७७९०० आणि मध्यआशियाची ११२५४१०० होती. सांप्रत सोव्हिएट रशियन प्रजासत्ताक संघाचें क्षेत्रफळ ८०६३७७१ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२४) १३४९३८००० आहे; यांपैकीं खुद्द रशियाचे क्षेत्रफळ ७७९२८३८ चौरस मैल असून लोकसंख्या सुमारें दहा कोटी आहे.

उत्तरेस आर्टिक समुद्रापासून दक्षिणेस काळ्या समुद्रापर्यंत यूरोपांतील रशिया पसरलेला आहे. आशियांतील रशियाचे कॉकेशिया, सैबेरिया व रशियन तुर्कस्तान असे तीन भाग पडतात. महायुद्धापूर्वी यूरोपांतील रशियाची लांबी व रुंदी सारखीच (१६०० मैल) होती. जमिनीचा पृष्ठभाग ५०० ते ९०० फूट उंचीचा आहे. मधून मधून नद्यांची मोठमोठी खोरीं आहेत. यांत कार्पेथियन, क्रीमियन, काकेशस, युरल इत्यादि पर्वत आहेत. देशाभोंवतीं आखातें बरींच असून त्यांत बरींचशीं बेटें आहेत.

नद्या.-डोंगरसपाटीच्या मैदानाच्या व लहान लहान पठारांच्या अस्तित्वामुळें रशियांतील सर्व नद्या पर्वतांतून किंवा उंच टेंकडयांतून उगम पावून निरनिराळ्या डोंगरांनां वांकडीतिकडीं लांबलचक वळणें घेत घेत संथ प्रवाहानें समुद्रास जाऊन मिळतात. व्होल्गा, नीपर आणि डॉन ह्या नद्यांची लांबी अनुक्रमें २३२५, १४१०, १३२५ मैल आहे. व्होल्गा, नीपर आणि ड्वीना ह्या नद्यांचा उगम जवळजवळ आहे. सर्व नद्यांचे प्रवाह वळणावळणाचे, वांकडेतिकडे, व बहुतेक जवळ जवळ वहात असल्यामुळें अतिशय जुन्या काळापासून स्थलांतराच्या व देशांतराच्या कामास व व्यापारी दळणवळणास त्यांचा उपयोग कालव्यासारखा होत असतो. पुष्कळ नद्यांच्या लहान लहान शाखा कालव्यांनीं जोडल्या असून रशियाचा बहुतेक सर्व अन्तर्गत व्यापार या कालव्यांनींच चालतो. निसर्गत:च कालव्यांच्या उत्तम सोयीमुळें आगगाडयांपेक्षां रशियांत कालव्यांचेंच फार महत्त्व वाढलें आहे. आर्टिक समुद्राच्या पाणलोटाच्या प्रदेशांत पेचोरा, मेझेन, उतरडि्वना व ओनेगा या नद्या वाहातात. बाल्टिक-पाणलोटांत नेव्हा, व्हालकोव्ह, दक्षिणडि्वनी वगैरे नद्या आहेत. कॉस्पियन पाणलोटांत व्होल्गा, उरल या दोन मुख्य नद्या आहेत.

जमीन:-रशियांतील पुष्कळसा भाग लागवडीस अगदीं निरुपयोगी आहे. यूरोपीय रशियाची एकोणीसशतांश जमीन (पोलंड आणि फिनलंड खेरीजकरून) सरोवरें, दलदल व रेताड मैदानें यांनीं व्याप्त आहे. ३९/१०० जंगलांनीं व्यापलेली व १६/१०० निरुपयोगी असून १६/१०० फायती लागवडीखालीं आलेली आहे. कार्पेथियन पर्वतापासून उरलपर्वतार्यंतची जमीन काळी आहे. कूरलंड व कोन्हनोमध्यें कांहीं ठिकाणीं काळी जमीन आहे. आग्नेय, पश्चिम, वायव्य, कास्पियन समुद्राची बाजू व उरलपर्वताची दक्षिण बाजू यांत रेताड मैदानें असल्यामुळें त्या बाजूला शेती करणें फार कठिण जातें. आर्टिक प्रांतांत जंगलें नाहींत परंतु जमिनी झुडपाच्या व गवताळ असल्यामुळें शेती करणें अशक्य असतें.

हवामान:-रशियाचा उत्तरेकडील भाग जरी शीतकटिबंधांत आहे तरी हवेसंबंधी जितकी तीव्रता भासावी तितकी भासत नाहीं. कारण समुद्राचा हवेवर परिणाम होऊन समुद्रावरून वाहणारे वारे हवेंतील तीव्रता बर्‍याच प्रमाणावर कमी करीत असतात. अटलांटीक महासागरांतील चक्रवात रशियाच्या मध्यमैदानांपर्यंत जातात व त्यामुळें रशियांतील तीव्रतर थंडी बरीच कमी होते. सर्व रयिाशभर थंडी बरेच दिवस टिकते. एप्रिल व कधीं कधीं तर मेमध्यें सुद्धां हिमतुषार पडत असतात. रशियांतील वसंतऋतु अत्यंत आल्हादजनक असतो. ह्याच सुमारास झाडें, पालेभाजी, व फुलझाडें यांनां बहर येतो, तीव्रतर थंडीमुळें गोठलेल्या नद्यांचें बर्फ वितळूं लागतें, नद्यांनां पूर येतो व नौकानयन सुरू होतें. ह्या सर्व गोष्टीमुळें रशियांतील हा काल विशेष रमणीय असतो. जुनमध्यें उन्हाळा सुरू होतो. तो व साधारण जुलईच्या अखेरपर्यंत टिकतो. सप्टेंबरच्या सुरवातीला उरलपर्वतांवर बर्फ पडूं लागतें. आक्टोबरच्या सुमारास पश्चिम व दक्षिण रशियांत, व नोव्हेंबरमध्यें कॉकेशस पर्वतावर थंडी असते. नद्या गोठूं लागतात. डिसेंबरच्या अखेरीस सर्व लहान मोठया नद्या गोठतात. व्होल्गा, डॉन, नीपर आणि ड्वीना ह्या नद्या अनुक्रमें १५०, ११०, १२० व १२५ इतके दिवस गोठलेल्या असतात. साधारणत: फेबु्रवारी-मार्चअखेरपर्यंत थंडीचा भर असतो.

रशियांतील लोक.-पाषाणयुगाच्या वेळेचे अवशेष रशियामध्यें मुळींच सांपडत नाहींत. अलीकडे पोलंडमध्यें कांहीं प्राचीन अवशेष सांपडले आहेत. परंतु सरोवरांच्या प्रदेशांमध्यें व इतर ठिकाणीं प्रास्तरयुगानंतरचे अवशेष बर्‍याच विपुल प्रमाणांत आढळतात. रशियन दानांमध्यें हजारों निरनिराळ्या जातींनीं देशांतर करून तेथें वस्ती केली होती. त्यांच्या वेळचीं हजारों आयुधें, बरेचसे किल्ले, प्राचीन थडगी सांपडतात. प्रास्तरयुगानंतरच्या अवशेषांमध्यें दोन निरनिराळ्या जातींचें अवशेष दृग्गोचर होतात; कांहीं अरुंद कवचीचे व लांब चेहर्‍याचे, आणि कांहीं रुंद कवचीचे व आंखुड चेहर्‍याचे. ह्या दोन जातींमध्यें हजारों पिढयांचें अंतर पडल्यामुळें ह्या दोन जातींविषयीं कांहींहि माहिती उपलब्ध होणें अशक्य आहे. स्लाव्ह लोकांचे पूर्वज सॅमॅरिटन लोक होते कीं सिंथियन लोक होते ह्याविषयीं रशियन पुराणवस्तुसंशोधकांचें अजून ऐकमत्य झालें नाहीं. सातव्या शतकामध्यें हूण लोकांचे वंशज खाझर लोक ह्यांची वस्ती दक्षिण रशियांत होती. ह्या खाझर लोकांनी बल्गेरियनांनां व उत्तरीय फिन लोकांनां पश्चिमेकडे हांकलून दिलें. आठराव्या शतकाच्या आरंभीं स्लाव्ह लोकांनीं डान्यूब नदी ओलांडून रशियाच्या नैर्ऋत्तयेस वस्ती केली. ह्याच सुमारास उत्तरेकडूनहि एक स्लाव्ह टोळी आली. नवव्या शतकाच्या शेवटी थेट दक्षिणेपर्यंत हें लोंक पसरलें.

इतर जातींप्रमाणें रशियन लोकहि सर्वस्वी अमिश्रित राहिले नाहींत. तरीहि बव्हंशी स्लाव्ह लोकांनीं आपलें वैशिष्टय कायम राखिलें आहे. जातिसंघ करून रहाणें व स्वजातिबाह्य त्यांचें वैशिष्टय कायम राहिलें आहे. रशियन मनुष्य एकआ सहसा स्थलांतरकरीत नाहीं. आपल्या जातीचें संघ करून ते देशांतर करतात. इतर देशांत गेलेला रशियन पुरुष दुसर्‍या स्त्रीशीं लग्न लावील परंतु रशियन स्त्री अशा तर्‍हेचा मिश्रविवाह करण्यास कधींहि धजणार नाहीं. रशियन लोक ज्या लोकांमध्यें मिसळतात त्यांच्याप्रमाणें ह्यांच्याहि चालीरीती बदलत जातात. रशियांत पुढील लोक आहेत.:- (१) मोठे रशियन, (२) धाकटे रशियन, (३) पांढरे रशियन, (४) फिनिशियन, (५) तुर्कस्तानांतील तार्तार, (६) मंगोलियन, (७) ज्यू, (८) जर्मन, (९) लिथुआनियन. जर्मन लोकांनां प्रथम १७ व्या व १८ व्या शतकांमध्यें वसाहती करण्यास बोलाविलें होतें. यांनां मोठमोठया जमिनी अतिशय कमी दरानें दिल्या होत्या. त्यामुळें ते मोठमोठे जमीनदार बनले होते, व महायुद्धापूर्वी त्यांनां अन्तर्गत पूर्ण स्वातंत्र्य मिळालें होतें. रशियांतील शेंकडा ८१.६ लोक शेतकरी, १.३ बडे सरदार, .९ धर्मोपदेशक, ९.३ व्यापारी व ६.१ लष्करी आहेत. म्हणजे रशियांत साधारणत: ८८०००००० शेतकरी आहेत. त्यांच्यापैकीं अर्धे शेतकरी पूर्वी गुलाम असत. गुलामगिरीची पद्धत रशियामध्यें पहिल्यांदा १६ व्या शतकांत सुरू झाली. व १८६१ मध्यें ती अजिबात बंद झाली. इतिहासाच्या सुरवातीपासून रशियन लोकांची सहकारितेविषयीं बरीच प्रसिद्धि आहे. ह्या सहकारित्वाचें दृश्या स्वरूप म्हटलें म्हणजे रशियन 'आर्टेल' होत. ह्या आर्टेल म्हणजे पश्चिम यूरोपांतील सहकारी पतपेढया होत. जेव्हां जेव्हां रशियन लोक खेडयांतून मोठया शहरीं गिरणीमध्यें मजूरकाम करण्यासाठीं जात तेव्हां ते पांचपन्नास मनुष्यांचा संघ स्थापन करीत. त्यांचें रहाणें, जेवणखाण सर्व एकेठिकाणीं चाले. अशा संघास 'आर्टेल' म्हणत. सर्व रशियाभर अशा आर्टेलांचीं जाळीं पसरलीं होती. व्यापारी 'आर्टेल' सुद्धां बरींच होती. १०० गवंडयांचें आर्टेल, २०० सुतारांचें आर्टेल अशा तर्‍हेचीं हजारों आर्टेलें प्रत्यहीं रेल्वेच्या कामाच्या ठिकाणीं पहावयास सांपडत. अशा आर्टेलांवर व्यापारी लोकांचा विश्वास बसला म्हणजे ते त्यांच्याशीं व्यवहार सुरू करीत व अशा तर्‍हेनें सहकारी पतपेढया उत्पन्न होत.

शेतकी.-उत्तरेकडील दलदलीच्या जागीं शेतकीचा धंदा मुळींच चालत नाहीं. तिकडे सांबरें पकडून त्यांच्या मांसावर उदरनिर्वाह होतो. दक्षिणेकडील दलदलीच्या अरण्याच्या प्रांतांत जव, ओट वगैरे शेतकीचा धंदा अत्यंत कष्टानें होतो. शिकार करणें व मासे धरणें हीं लोकांची उपजीविकेचीं साधनें आहेत. मध्यवर्ती प्रदेशांत शेतकी हा मुख्य धंदा आहे. मुख्य धान्यें जव, राय, ओट आणि गहूं. बाल्टिक प्रदेशांत शेती अगदीं नवीन तर्‍हेनें करतात व उत्पन्नहि इतर प्रांतांपेक्षां जास्ती होतें. गहूं आणि जवस हीं येथील मुख्य धान्यें आहेत. येथें बटाटयाची लागवड होते व गुरांची पैदासहि चांगल्या तर्‍हेनें झाली आहे. कृषिकर्मास लागणार्‍या नवीन यंत्रांचा येथें उपयोग करतात. हवामान मध्यम असल्यामुळें येथें निरनिराळ्या तर्‍हेच्या धान्यांची पैदास होते. गहूं, साखर व निरनिराळीं फळें यांची लागवड चांगली होते. गुरांची पैदास भरभराटीची आहे. बेसारेबियांत गहूं, जव, मका, दारू, जवस, जवसाचें तेल व फळफळावळ चांगली होते. रशियांत सागवानी लांकूड फार होतें. १९२३ साली एकंदर १७०३९४६४०८ एकर जमिनींत सागवान होतें. हें सागवान लांकूड तोडण्याचा आणि विकण्याचा धंदा फार मोठा आहे. येथें घोडे आणि मेंढया यांची पैदास भरभराटीची आहे. महायुद्धापूर्वी रशियांतील शेतकीची स्थिति फार कनिष्ठ दर्जाची असे. शेतकरी लोक गरीब असून त्यांची स्थिति खालावत चालली होती. करांचें ओझें शेतकर्‍यांवर प्रमाणाबाहेर लादल्यामुळें त्यांची पैशाच्या बाबतींत सुधारणा होईना. लोकसंख्या मात्र सपाटून वाढे.

खनिज आणि तत्संबंधी उद्योगधंदे.-खनिज द्रव्याच्या बाबतींत रशिया हा फार संपन्न देश आहे. सरकारनें ह्या बाबतींत सुधारणा करण्याचे बरेच प्रयत्‍न केले आहेत. महायुद्धापूर्वी सर्व जगाविरुद्ध इतकेंच नव्हे तर फिनलंडच्या विरुद्ध देखील कर बसविला होता परंतु ह्या धंद्यांत जितकी परिणति व्हावी तितकी झालेली नव्हती. कारण खाणी या व्यापारी शहरांपासून अत्यंत दूर असत. देशांत शास्त्रीय शिक्षणाचा व भांडवलाचा अभाव असून जुलमी कायदे व अशांतता होती. खाणीची मुख्य ठिकाणें दोन आहेत: (१) उरल, एकाटेरीनोस्लाव आणि खारकोव्ह; (२) डॉन नदीच्या भोंवतालचा प्रदेश उरल मधील खाणी फार जुन्या आहेत. तेथें लोखंउ, कोळसा, सोनें, फ्लातिन, तांबें, मीठ आणि मौल्यवान दगड हीं खनिज द्रव्यें मुख्यत: सांपडतात. सोळाव्या शतकापासून उरल पर्वतावर मिठाचा कारखाना चालू आहे. पूर्वी सर्व रशियाभर हेंच मीठ उपयोगांत येई, परंतु अलीकडे येथून फारच थोडें मीठ बाहेर निघतें. दक्षिण रशियांतील खाणी फारच महत्त्वाच्या ओत. त्या अलीकडे चालू करण्यांत आल्या. महायुद्धापूर्वीपासून फ्रेंच आणि बेल्जियन भांडवलानें व आधुनिक यंत्रकलेच्या साहाय्यानें हे कारखाने चालत आहेत. कॉकेशियामध्यें पेट्रोलियमच्या पुष्कळशा खाणी आहेत. सैबेरिया आणि पोलंडमध्यें पुष्कळ तर्‍हेचीं खनिज द्रव्यें सांपडतात.

कारखाने आणि इतर लहान धंदे:-पीटर दि ग्रेटपासून राष्ट्रीय धंदे ऊर्जितावस्थेस आणण्यासाठीं रशियन सरकारचे प्रयत्‍न चालले आहेत. परराष्ट्रीय मालावर कर बसवून व पुष्कळ ठिकाणीं सरकारी मदत देऊन अंशत: प्रयत्‍न केले पण त्यांस यावें तसें यश आलें नाहीं. ही चळवळ १८६३ पासून जोरानें सुरू झाली. १८२० सालीं यंत्रसाहाय्यानें व शास्त्रीयरीत्या चालविलेले कारखाने पोलंडमध्यें स्थापन झाले. लोड्झ व वार्सामध्यें मोठमोठया कापसाच्या गिरण्या आहेत. लोंकरीचे, रेशमाचे व कापडाचे कारखाने खेरीजकरून औषधाचे, यंत्राचे, धातूकामाचे, चाकुकात्र्याचे व दारूचे पुष्कळच कारखाने चालू आहेत. पूर्वी एकेका शहरीं किंवा खेडयांत एकच प्रकारच्या वस्तू होत असत. एखादें खेडें मूर्तीचें खोदकाम करी, दुसरें एखादें मुलांच्या खेळण्यांच्या वस्तूच तयार करी, व तिसरे लांकडी सामान करी; ह्यामुळें अलीकडे त्या त्या विशिष्ट शहरीं त्या त्या विवक्षित तर्‍हेचेच कारखाने उपस्थित झाले आहेत. आज उद्योगधंद्याची व्यवस्था अशा रीतीनें होत आहे कीं, त्याची मालकी राष्ट्राची असावी. याप्रमाणें व्यवस्था करण्यास रशियांत ४५८ संघ ट्रस्ट व २८ 'कंबाईन्स' संघ आहेत.

आगगाडया.-एकोणिसाव्या शतकाच्या शेंवटी, व्यापारी व राजकीय दृष्टींनीं महत्त्वाच्या अशा आगगाडया चालू झाल्या. सैबेरियांतील मुख्य महत्त्वाचा फांटा चेलियाबिन्स पासून ओमस्कपर्यंत गेला आहे. पॅसिफिक महासागराच्या किनार्‍याला व्ल्हाडिव्होस्टॉकपासून खाबारोव्हस्कपर्यंत ४७९ मैलांचा एक फांटा आहे. १८९६ सालीं चीनसरकारच्या परवानगीनें मँच्यूरियामधून व्ल्हाडिव्होस्टाकपासून तो कारिमस्कायापर्यंत एक फांटा नेला आहे. १९२४ सालीं रशियांत ४५०४४ मैल लांबीची रेल्वे उपयोगांत होती.

राज्य व्यवस्था, जुनी:-पूर्वी झारच्या राज्यपद्धतीस एकतंत्री राज्यपद्धति हें नांव देण्यांत येई. १९०५ च्या पूर्वी झारची सत्ता अगदीं अमर्यादित असे परंतु १९०६ सालीं ड्यूमा सभा स्थापन झाल्यानंतर सत्तेचा अमर्यादितपणा जरी पूर्णांशानें नाहीसा झाला नाही तरी कांही सत्ता झारनें आपल्या हातानें सभेच्या हातांत दिली व तेव्हांपासून लोकसत्ताक होईपर्यंत या राज्यपद्धतीस नियंत्रित राज्यपद्धति म्हणूं लागले. झारच्या वेळीं राज्यांतील सर्व सत्ता त्याच्याच हातांत असे, व राज्यकारभाराच्या सर्व शाखांवर त्याचाच अधिकार चाले. १९०५ सालीं डयूमा सभेच्या विचाराशिवाय कोणताच कायदा अमलांत येऊं नये असा नियम झारनेंच स्वत: घालून दिला. त्याप्रमाणें झारच्या मंत्रिमंडळाच्या संबंध डयूमाशीं आला व तेव्हांपासून ह्या सभांच्या सम्मतीनें व अनुरोधानें झार कायदे पास करी व अमलांत आणी. डयाूमाशिवाय इंपीरियल कौन्सिल म्हणून एक वरिष्ठ मंडळ पहिल्याप्रथम कायदे पास करण्यासाठीं स्थापन झालें. ह्यांत ९८ सरकारनियुकत व ९८ लोक नियुक्त सभासद असत. मंत्रिमंडळ हें सरकारनियुक्त असून त्यांतील सर्व सभासद इंपीरियल कौन्सिलचे सभासद असत. डयूमाइतकाच ह्या सभेलाहि कायदे करण्याचा अधिकार असे. डयूमा ही सभा रशियाच्या पार्लंमेंटचें हाऊस ऑफ कामन्स असे. ह्यांत ४४२ सभासद असत. निवडणुकीची पद्धति अशा तर्‍हेची ठेवलेली होती कीं, तीमुळें जमीनदार किंवा श्रीमंत लोकच निवडून यावेत. त्याचप्रमाणें इतर जातींपेक्षां रशियन लोंकच जास्ती निवडून यावेत. जमीनदार, नागरिक आणि शेतकरी हे लोक आपले प्रतिनिधी प्रथमत: इलेक्टोरल असेंब्लींत पाठवीत. ह्यांतून निवडून आलेले प्रतिनिधी इलेक्टोरल कॉलेजकडे पाठवीत. व या मंडळांतून निवडून आलेले लोकच प्रतिनिधी ह्या नात्यानें डयूमामध्यें बसत. सेंटपीटर्सबर्ग (पेट्रोग्राड, लेनीनग्राड), मॉस्को, कीव्ह, ओडेसा, रिगा, वार्सा आणि लोड्स हीं शहरें आपले प्रतिनिधी एकदम सरळच डयूमामध्यें पाठवीत. सैन्य आणि आरमारासंबंधीं कसलाहि अधिकार डयूमासभेच्या हातीं नसे. कायदा करण्याचा पूर्ण अधिकारहि तिच्या हातीं नसून मंत्रिमंडळाच्या हातीं असे. डयूमाचा कोणताहि सभासद कायद्यासंबंधीं ठराव आणूं शके. परंतु तो ठराव प्रथम मंत्रिमंडळाकडे जाई. त्या ठरावावर मंत्रिमंडळ एक महिनाभर विचार करून तें मंडळ आपला स्वत:चा एक मसुदा तयार करून डयूमाकध्यें आणी व नंतर त्या मसुद्यावर डयूमासभेस जबाबदार नसून राजास जबाबदार असे. बजेटावर सभेचा अत्यंत मर्यादित अधिकार असे व कार्यकारी व इतर राज्यकारभारविषयक बाबतींत तर हिचा मुळींच हक्क चालत नसे. स. १९०५ मध्यें बादशहास मदत करण्यासाठीं एक मंत्रिमंडळ स्थापन झालें. निरनिराळ्या खातयांचे दहा मुख्य अधिकारी ह्या मंडळांत असत. याखेरीज सीनेट म्हणून एक सरकारनियुक्त मंडळ असे. पीटर दि ग्रेटनें याची प्रथम स्थापना केली. ह्या मंडळाच्या हातांत बर्‍याच महत्त्वाच्या बाबी असत. वरिष्ठ न्यायकोर्ट, जमाबंदी तपासणें, नोंदणी-खातें हीं कामें ह्या मंडळाकडे असत. झारच्या वेळीं राज्यव्यवस्थेसाठीं रशियाचे ७८ सरकार, १८ प्रांत, १ जिल्हा असे विभाग केले होते. यांवर गव्हर्नर जनरल, व गव्हर्नर यांसारखे अधिकारी असत. स्थानिक राज्यव्यवस्थेसाठीं त्यावेळीं पुढीलप्रमाणें संस्था असत:-(१) शेतकरी संघ, (२) झेम्स्टव्होज आणि (३) म्युनिसिपल डयूमा. शेतकरी संघामध्यें मोठमोठया जमीनदारांचा व जहागीरदारांचाच भरणा जास्ती असे. हा संघ कांहीं गोष्टींत निवाडे देऊं शकेत्र. चवतीस सरकारांमध्यें ज्या स्थानिक स्वराज्यसंस्था असत त्यांस झेमस्टव्होज म्हणत. त्यांतील कार्यकारी मंडळांत पुढील लोकांचे प्रतिनिधी नेमीत; मोठे व लहान जमीनदार, श्रीमंत व गरीब नागकि आणि शेतकरी संघाचे प्रतिनिधी. झारनें या सभांचे १८९० सालीं अधिकार कमी केले होते. १८७० मध्यें झेमस्चव्होजसारख्या म्युनिसिपल डयूमासभा स्थापण्यांत आल्या. घरमालक, व्यापारी, कारागीर आणि मजूर प्रतिनिधी या सभेंत असत. १८९२ व १८९४ मध्यें ह्याहि सभेचे अधिकार झारनें काढून घेतले.

नवी:-आज रशियाचे बरेच प्रजासत्ताक विभाग पडले आहेत. या प्रत्येक विभागांवर एक मध्यवर्ती कारभारी मंडळ व प्रतिनिधींचें एक मंडळ राज्य चालवीत असतें. सोव्हिएट लोकांची स्थानिक काँग्रेस कारभारी मंडळातींल सभासद निवडतात. खुद्द रशियाची राजसत्ता ऑल रशियन काँग्रेसच्या हातीं आहे. काँग्रेसमध्यें नागरिक सोव्हिएटनीं निवडलेले प्रतिनिधी असतात. त्या सोव्हिएटमधील प्रतिनिधीचें प्रत्येक २५००० लोकांमागें एक प्रतिनिधि असें प्रमाण आहे. प्रांतिक काँग्रेसचे प्रतिनिधी दर १२५००० लोकांमागे एक अशा प्रमाणांत निवडलेले असतात. ऑल-रशियन सेंट्रल एक्झेक्युटिव्ह कमिटींत ३८६ सभसद असून तिच्या हातीं सर्व कारभार असतो. सामान्य कारभारासाठीं या कमिटीनें निवडलेलें एक कौन्सिल ऑफ पीपल्स कमिसरीज नांवाचें लोकमंडळ असतें. त्यांत १२ सभासद असतात. प्रत्येक सभासदाच्या मदतीला एक बोर्ड असतें.

उत्पादक कामांत पडलेले १८ वर्षे वयावरील सर्व लोक, लष्कर आणि आरमार यांतील शिपाई व खलाशी या सर्वांना सर्हहा मत देण्याचा अधिकार असतो. फायद्याकरितां दुसर्‍यांनां राबवून घेणारे किंवा स्वत: न मिळविलेल्या उत्पन्नावर राहणारे, सर्व धर्मांतील भिक्षुक आणि आचार्य पूर्वीच्या पोलीस, गुप्तखातें वगैरेतील एजंट व नोकर, मागील राजकुलांतील लोक, वेडे व अज्ञानी, गुन्हेगार यांनां मत नसे.
स्थानिक सोव्हिएट प्रत्येक गावांत व शहरांत-इकडील स्थानिक स्वराज्यसंस्थेप्रमाणें-असतें. त्यावर जिल्हा-प्रांतिकविभाग काँग्रेस असतात. प्रत्येक काँग्रेसची एक कार्यकारी कमिटी असून ती पुढील काँग्रेस येईपर्यंत सर्व कारभार पहाते.

न्यायपद्धति'-१८६४ च्या पूर्वीची न्यायपद्धति अतिशय गचाळ व सदोष होती. दिवाणी आणि फौजदारी दोन्ही खटले गुप्तपणेंच चालत असत. कधीं कधीं तर खटल्यांत गुंतलेल्या इसमांचीं तोंडेहि न्यायधिशास पहावयास मिळत नसत. न्याय आणि अंमलबजावणीखात्याची फारकत नव्हती म्हणून सर्वत्र जुलमी कारभार पसरला होता. १८६४ नंतर त्या पद्धतींत पुढील सुधारणा करण्यांत आल्या:-न्याय आणि अंमलबजावणी खात्याची फारकत, न्यायाधीश व कोर्ट यांस लोकांची समता, ज्यूरीची पद्धत, न्यायाधीश सरकारनियुक्त न राहतां लोकनियुक्त असणें वगैरे. न्यायाच्य कामांत शेवटचें अपील सिनेटकडे असे.

सन १९१७ व १९१८ च्या डिक्रींच्या अन्वयें पूर्वीची न्याय देण्याची पद्धत पार बदलली. दिवाणी व किरकोळ फौजदारी खटले जनता-न्यायकोर्टांत चालत. त्यांत एक न्यायाधीश व दोन लोकनियुक्त असेसर असत. या कोर्टावर अपील जिल्हामंडळाकडे असे. फौजदारी खटले प्रांतिक क्रांतिकारक ट्रिब्युनलकडे चालविण्यास जात. ट्रिब्युनलमध्यें एक न्यायाधीश व सहा असेसर असत. या ट्रिब्युनलवर अपील मध्यवर्ती कार्यकारी कमिटीकडे करावयाचें असे. आज वरील पद्धत बहुतेक कायम आहे. मात्र सर्व कोर्टांवरील अपीलें सुप्रीम ज्युडिशियल सेंट्रल बोर्डाकडे करावयाची असतात. प्रत्येक प्रजासत्ताक विभागांत एक मुख्य पब्लिक प्रोक्युरूर व त्याच्या हाताखालीं प्रांतिक प्रोक्युरूर असतात. त्यांचें काम न्यायदान बरोबर चाललें आहे कीं नाहं हें पहाव्याचें आहे.

शिक्षण-१९०५ सालीं झालेल्या क्रांतीपूर्वी शिक्षणाची व्यवस्था चांगली नव्हती. शिक्षणाच्या सर्व सोयी श्रीमंत लोकांसाठी राखून ठेवल्या होत्या. दुय्यम शिक्षण घेणें सुद्धां गरीब लोकांस अशक्य होतें. परंतु १९ व्या शतकाच्या अखेरीस सरकारनें सर्व देशभर धंदेशिक्षणाच्या व कलाविषयक प्राथमिक व दुय्यम शाळा काढल्या. शाळांनां जोडून एखादा बगीचा किंवा शेत असे. १००० शाळांतून मधमाशीं पाळून मध काढण्याची कला, ३०० शाळांतून रेशमाच्या किडयांची जोपासना व ९०० शाळांतून निरनिराळ्या धंद्यांचें व कलांचें ज्ञान शिकवीत. शिक्षकवर्गांपैकी शेंकडा ५० स्त्रिया असत. उच्च शिक्षण देण्यासाठीं १९०४ मध्यें एकंदरींत ९ विश्वविद्यालयें होतीं. त्यांत वैद्यकी, धर्म, व्यापार, लष्करी, भाषा कायदा, शेतकी व कला वगैरे विषय शिकवीत. स्त्रियांसाठीं दोन विश्वविद्यालयें होती. ही विश्वविद्यालयें जर्मनींतील विद्यालयांच्या तोडीचीं होती. रशियांतील शैक्षणिक चळवळीचें वैशिष्टय म्हटलें म्हणजे स्त्रियांसाठीं उच शिक्षणाचा मार्ग खुला करून देणें हें होय. स्त्रियांकरितां व्यायामाचें आखाडे व तशाच शाळाहि पुष्कळ होत्या. त्याचप्रमाणें सृष्टि व समाजविषयक ज्ञान देण्यासाठीं विद्यालयें स्थापन केली होती. आज शिक्षण सक्तीचें केलें असून खाजगी शाळा काढण्याची मुळींच परवानगी नाहीं. मुलें व मुली एकत्र शिक्षण घेतात. प्रत्येक शाळेंत 'मजुर' शिक्षण देण्याचें तत्त्व अवलंबिलें आहे. पूर्वीचीं सर्व विद्यालयें कायम ठेवून नवीनहि बरींच स्थापन केलेलीं आहेत. आज सुमारें २० विश्वविद्यालयें असून त्यांत (कॉलेजें धरून) १९२२ सालीं १३०००० विद्यार्थी होते. शिक्षणखातें एका कमिसरिएटच्या हातांत असून या खात्याला (१) सरकारी नाटकगृहें, कलागृहें, इंपीरियल म्युझिकल (संगीत) सोसायटी व इतर अनेक कलासंस्था, (२) विशिष्ट शैक्षणिक संस्था, (३) म्युनिसिपल व 'झेम्स्ट्व्हा' शाळा यांचा कारभार पहावा लागतो. 'यूरि फाईट लेबर स्कूल' (सांघिक मजूरशाळा) या प्रकारची संस्था उघडून या खात्यांत नवीन शिक्षणाचा उपक्रम केला आहे.

सैन्य.-१८७४ मध्यें सक्तीची लष्करी शिक्षणपद्धति अमलांत आली. पूर्वी सहा वर्षे शिक्षण घ्यावें लागत असे. ती मुदत कमी करून पांच वर्षांवर आणली. दुसर्‍या निकोलसच्या अमदानींत लष्करामध्यें बर्‍याच सुधारणा झाल्या. झारच्या वेळीं सैन्याचे तीन भाग होते: (१) रेग्युलर्स, (२) कोझॅक्स. (३) मिलीशिया. शांततेच्या वेळीं रशियांत ११००००० सैन्य असे तर लढाईच्या वेळीं रशिया समरागणांत ४५००००० सैन्य आणूं शके. आज कामकर्‍यांचें व शेतकर्‍यांचें 'रेड आर्मी' म्हणून लष्कर आहे. याला जोडून सक्तीच्या लष्करी नोकरीच्या तत्त्वावर उभारलेलें सैन्य आहे. १८ व्या वर्षी या नोकरीला सुरवात करावी लागते. सध्या रशियांत फारसें सैन्य बाळगीत नाहींत. १९४२ सालीं एकंदर ५६२९६७ सैनिक होते.

आरमार.-रशियाच्या राज्याचें एक मोठें वैशिष्टय हें आहे कीं, त्यास आरमाराच्या वाढीसाठीं मोकळा समुद्रच नाहीं. आर्क्टिक समुद्र व पांढरा समुद्र हे नेहमी बर्फाच्छादित असतात. बोथनिया व फिनलंडच्या आखातांभोंवती तर फिनिशियन लोकांचा प्रांत आहे. परंतु रशियन लोकांनां आपल्या राजधानीचें ठिकाण फिनलंड आखाताच्या तोंडाशींच वसविलें असल्यामुळें तेवढाच काय तो थोडासा भाग त्यां चळवळ करण्यास उरला आहे. रिगाचें आखात व बाल्टिक समुद्र यांच्याभोंवती फिनिशियन आणि जर्मन लोक राहतात. त्यांमुळें तेथें आरमाराचें ठिकाण ठेवणें कठिण आहे. काळ्या समुद्राच्या उत्तर भागांवर व अझोव्हच्या समुद्रावर काय तो रशियाचा पूर्ण ताबा आहे. काळ्या समुद्राचा पूर्वेकडील भाग ट्रान्सकॉकेशियाच्या हद्दींतला आहे. राजकीय दृष्टया महत्त्वाची असलेली बास्फोरसची सामुद्रधुनी परकीयांच्या ताब्यांत आहे. कास्पियन समुद्र अतिशय उथळ असल्यानें आरमारी दृष्टया त्याला कांहींच महत्तव नाहीं.

जपानबरोबर झालेलया लढाईच्या पूर्वी रशियन आरमाराचे चार भाग होते: (१) बाल्टिक काफिला; (२) काळ्या समुद्रांतील काफिला; (३) पॅसिफिक कॉफिला आणि (४) कास्पियन कॉफिला. पोर्ट आर्थर आणि सुशिमाच्या लढाईमध्यें रशियन आरमाराचा अगदीं नाश झाला त्यानंतर रशियाजवळ लढाऊ जहाजें फारच थोडीं राहिलीं होतीं. १९०४ सालापासून नवीन तर्‍हेची लढाऊ जहाजें, व क्रुझारें बांधण्याचा उपक्रम सुरू झाला. बाल्टिकमधील क्रानस्टड्ट, काळ्या समुद्रातील सेव्हासटोपूल व पॅसिफिकमधील व्ल्हाडोव्होस्टाक हीं आरमाराचीं मुख्य ठिकाणें आहेत. आज बाल्टिक व काळ्या समुद्रांत दोन लढाऊ जहाजें व कांहीं क्रूझरें आहेत. आरमाराची नवीन रचना करण्याचा बेत बरेच दिवसांचा आहे पण तो अंमलांत येत नाहीं.

इतिहास.-नवव्या शतकाच्या सुमारास लॅडोगा सरोवराच्या भोंवती राहणार्‍या स्लाव्ह व फिनिशियन लोकांनीं आपपसांतील तंटे मोडण्यासाठीं उत्तरेच्या बाजूला असलेल्या रूस लोकांनां पाचारण केलें. त्याप्रमाणें रूरिक, सिन्यूस आणि द्रुव्होर ह्या तिघां रूस बंधूंनीं रशियांत येऊन तीन निरनिराळीं घराणीं स्थापन केलीं. रशियाचें माजी झार घराणें ह्या रूस रक्ताचेंच असल्याबद्दल अभिमान बाळगतें. रूरिक यानें नोव्हगोरॉड येथें आपलें घराणें स्थापिलें. स्लाव्ह व फिनिशियन लोकांचें तंटे सोडविण्याच्या भानगडींत न पडतां ह्यानें आपल्या राज्याच्या मर्यादा वाढविणें सुरू ठेविलें व कीव्ह ही राजधानी केली. ह्याच्या मरणानंतर रूरिक घराण्यामध्यें फाटाफुटी झाल्या व त्यांच्या वंशजांनीं चारहि बाजूंनां लहान लहान स्वतंत्र राज्यें स्थापिली. यारोस्लाव्ह धी ग्रेटनें हीं सर्व राज्यें आपल्या वर्चस्वाखालीं ठेवलीं होतीं परंतु त्याच्या मरणानंतर पुढील १७० वर्षांच्या कालांत (१०५४-१२२४) ह्या राज्यांत पुन्हां फाटाफुटी झाल्या व त्यांचीं ६४ निरनिराळीं चिमकुलीं राज्यें झालीं. ह्या सर्व लहान राज्यांमध्यें वारंवार भांडणें होत असत. ह्या अंदाधुंदीच्या काळांत कीव्हचें वर्चस्व मानणार्‍या राज्यांपैकी व्लाडिमीर, व्हर, र्‍हाझान आणि मास्को हीं महत्त्वाचीं होत. नोव्हगोरॉड शहरानें आपलें वर्चस्व बरेच दिवस कायम राखिलें. ह्याच्या राजयव्यवस्थेमध्यें लोकसत्ताक राज्यपद्धतीचीं बीजें रुजत होतीं परंतु रशियन राष्ट्राच्या दुर्देवानें नोव्हगोरॉडचा पडता काळ येत चालला होता व पुढील सर्व राज्यसूत्रांचें केंद्रस्थान मास्को शहर उदयास येत होतें.

मोंगल किंवा तार्तार साम्राज्य (१२३८ ते १४६२):- नोव्हगोरॉड आणि मास्को या दोन स्वतंत्र शहरांमध्यें पुष्कळ दिवसांपासून लढा पडला होता व वारंवार कुरापती काढून त्यांचीं भांडणें बरींच विकोपास गेलीं होतीं. परंतु तेराव्या शतकाच्या प्रारंभी पूर्वेकडून मोंगल व तार्तार लोकांच्या टोळ्या रशियावर चाल करून येऊं लागल्यामुळें वरील भांडणें कांहीं वेळ थांबली. १२३८ सालीं मुसुलमानांची दुसरी टोळी आली व रशियांतील सर्व लहान लहान राज्यांस आपले अंकित करून व्होल्गा नदीवर सराई येथें तिनें आपलें ठाणें दिलें. हे लोक मंगोलियांतील कडवे लढवय्ये होते. यांचा सुप्रसिद्ध सेनानायक वेंगीझखान यानें चीनच्या किनार्‍यापासून तो यूरोपांत बाल्टिक समुद्रापर्यंत आपलें राज्य प्रस्थापित केलें होतें. चेंगीझखानाच्या मरणानंतर ४० वर्षांनीं त्याच्या अवाढव्य राज्याचे पुष्कळसे तुकडे पडले. त्या प्रत्येक तुकडयाचें आधिपत्य खानाकडे असल्यामुळें त्या भागांनां खानेट म्हणत. सराई येथें स्थापन झालेल्या तार्तार राज्याचें आधिपत्य एका खानाकडे होते. हा खान आमूरच्या खोर्‍यामध्यें वसाहत करून रहात असलेल्या वरिष्ठ खानाचा एक प्रतिनिधि असे. तार्तार लोक वास्तविक पहातां स्वभावानें दुष्ट नव्हते. ते एका ठिकाणीं वसाहत करून राहणारे नसल्यामुळे खेडयांतील लोकांशीं व शेतकर्‍यांशीं त्यांचा क्चवितच संबंध येई. प्रथम हे लोक जेव्हां आले तेव्हां ते मूर्तिपूजक होते. म्हणून धर्माच्या बाबतींत ते कोणावर जुलूम करीत नसत. कालांतरानें ते ख्रिस्ती धर्माचे अनुयायी झाल्यावर सुद्धां ते धर्माच्या बाबतींत ढवळाढवळ करीत नसत. यांची सत्ता उलथून पाडण्याचा पहिला प्रयत्‍न मास्कोच्या राजानें केला. भोंवतालच्या राज्यांकडून व जमीनदारांकडून गोंगल खानासाठीं खंउणी व महसूल गोळा करण्याचे काम त्यानें आपल्याकडे घेतलें. अशा तर्‍हेनें मोंगलखानाचा विश्वास संपादन करून कांहीं काळानें हा राजा खानाचा लेफ्टनेंट जनरल झाला. पुढें गोळा केलेली खंडणी त्यानें स्वत:च दाबली. सरतेशेवटीं (१३८०) डिमिट्र डॉनस्कॉय यानें सर्व रशियन संस्थानिकांच्या साहाय्यानें सैन्याची जमवाजमव केली व गोल्डॅन होर्डच्या ममईखानावर कुलिकोव्हो येथें मोठा विजय संपादन केला. त्यानंतर कांहीं काळपर्यंत त्या तार्तार टोळ्या मधून मधून येऊन बराच त्रास देत असत.

परंतु एका खानेटला दुसर्‍या खानेटविरुद्ध चिथाऊन देऊन ह्या तार्तार लोकांची संघशक्ति मास्कोच्या राजानें कमी केली. परचक्रांची वावटळ अशा तर्‍हेनें परतवून लावल्यावर मास्को शहरानें भोंवतालच्या लहान लहान राज्यांवर आपलें वर्चस्व प्रस्थापित केलें व १२२ वर्षांनीं तिसरा आयव्हॅन, त्याचा मुलगा वेसील आणि चवथा आयव्हॅन यांनीं मस्कोव्हीची बादशाही स्थापन केली.

मस्कोव्ही येथील झार बादशाही:-तिसरा आयव्हॅन (१४६२-१५०५) गादीवर आला तेव्हां पुढील नेव्हगोराड, स्कोव्ह, व्हर, आणि र्‍याझन ही संस्थानें स्वतंत्रेतेनें रहात असत. आयव्हॅननें नोव्हगोराड ताब्यांत घेऊन आपलें राज्य पूर्वेस उरलपर्वतापर्यंत वाढवून व्हर संस्थानहि खालसा केलें. आयव्हॅनचा मुलगा तिसरा बसील (१५०५-१५३३) ह्यानेंहि हेंच धोरण पुढें चालू ठेविलें. नोव्हगोराडप्रमाणेंच स्कोव्ह ह्या शहराचीहि स्थिति झाली. क्रिमीयांतील तार्तार लोकांशीं खलबतें केल्याबद्दल र्‍याझानचीहि तीच गत झाली. अशा तर्‍हेनें एकामागून एक संस्थानांनां मास्कानें आपल्या वर्चस्वाखालीं आणलें; बसीलनंतर त्याचा मुलगा चवथा आयव्हेंन (१५३३-८४) हा लहान असल्यामुळें त्याची आई व दोन इतर सरदार कारभार पाहूं लागते. ह्या सरदारांचें प्राबल्य दिवसेंदिवस वाढत चाललेलें पाहून आयव्हॅननें यांपैकीं एकास पकडून कैदेंत ठेविलें. पुढें (१५४७) आयव्हॅन सतरा वर्षांचा झाल्यानंतर स्वत:स सर्व रशियाचा झार (सीझरचा अपभ्रंश) म्हणून अभिषेक करण्याबद्दल त्यानें सरदारांच्या मागें लकडा लाविला. पहिल्याप्रथम हा आपल्या राजकीय कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असे. परंतु पुढें एक दिवस मास्को शहरांत अतिशय भयंकर आग लागली तेव्हां हा आपल्या कर्तव्यहीनतेबद्दलचा परमेश्वरी कोप समजून त्या दिवसापासून तो दरबारचीं कामें पाहूं लागला. अशा तर्‍हेनें १४ वर्षे सुरळीतपणें राज्य केल्यानंतर त्यानें एकाएकीं जुलमी राज्यपद्धतीचा अंगिकार केला. मास्कोंतील लोकांनीं जरी उघडपणें बंड केलें नव्हतें तरी यावेळीं पुष्कळ लोक फांसावर चढविले गेले. अंतर्गतव्यवस्थेमध्यें जरी जुलमीपणा चालला होता तरी राज्यविस्ताराचें काम झपाटयानें चाललें होतें. गोल्डन होर्डचें मुसुलमानी राज्य मोडकळीस आल्यामुळें त्या राज्याचे लहान लहान खानेट बनले होते. यांपैकी काझन आणि अस्ट्राखान हे दोन भाग बर्‍याच उलाढाली करून आयव्हॅननें आपल्या राज्यास जोडले. दक्षिणेस व्होल्गा आणि नीपर नद्यांच्या आसपास कोझॅक लोकांनीं आपलें स्वतंत्र राज्य स्थापिलें होतें. हे लोक वारंवार मास्कोच्या राज्यांत येऊन लुटालूट करीत. आयव्हॅनशीं कांहीं दिवस लढल्यानंतर या लोकांनीं त्याचें मांडलिकत्व पत्करलें. पाथेस्ट आणि गेडीमीन यांनीं लिथुआनिया आणि पोलंड या दोन भागांत आपलीं घराणीं स्थापिलीं होतीं. १४ व्या शतकांमध्येंही हीं दोनहि राष्ट्रें एका सत्तोखालीं आलीं व ह्या एकत्र झालेल्या राज्याचा विस्तार बाल्टिक समुद्रापासून तों काळ्या समुद्रापर्यंत पसरला. मस्कोव्हीच्या महत्त्वाकांक्षेंत अशा तर्‍हेनें एक अडचण उत्पन्न झाली. लिथुआनी-पोलिश आणि मास्कोव्हो हीं दोन्हीं राष्ट्रें महत्त्वाकांक्षी असल्यामुळें साहजिकच त्यांच्यामध्यें लढा पडला. आयव्हॅनला व्यापारी व राजकीय प्रगतीसाठीं बाल्टिक समुद्र पाहिजे होता. परंतु तो गांठावयाचा म्हणजे स्वीडिश, नार्वेजियन, पोलिश व टयुटॉनिक ह्या लोकांशीं लढण्याशिवाय अन्य मार्गच नव्हता. आयव्हॅननें एका इंग्रजी व्यापार्‍यास आपल्या राज्यांत आणून इंग्रजांशीं व्यापारी दळणवळण सुरू केले. परंतु पांढर्‍या समुद्रांतून इंग्लंडशी व्यापार करणें फार धोक्याचें असल्यामुळें बाल्टिकसुद्रापर्यंत राज्यमर्यादा वाढविण्याचा प्रयत्‍न त्यानें मोठया नेटानं सुरू केला. वाटेवरच लिव्होनियन लोकांशीं कुरापत निघाल्यामुळें पर्यायानें मास्कोला पोलंडशीं सात वर्षे लढावें लागले (१५६३-७०). पोलंडशीं तह केल्यानंतर आयव्हॅननें स्वीडनशीं लढाई सुरू केली (१५७२-८३). पुन्हां पोलंडशीं युद्ध करणें भाग पडलें (१५७९-८१). अशा तर्‍हेनें एकदां ह्या राष्ट्रांशीं तर एकदां त्या राष्ट्रांशीं लढाई देऊन त्यानें आपला बेत तडीस नेण्याचा प्रयत्‍न केला. परंतु १५४४ सालीं, अशाच एका लढाईच्या तयारींत असतां तो मृत्यु पावला. अंतर्गंत बंडें व दंगेधोपे तो अतिशय क्रूरतेचें प्रदर्शन करी; त्यामुळें त्याचें 'क्रूर आयव्हॅन' असें नांव पडलें. ह्याच्यामागून ह्याचा मुलगा थिओडोर (फियोडोर १५८४-९८) गादीवर आला. हा स्वभावानें गरीब होता परंतु राज्यशकट हांकण्याच्या कामीं तो अगदीं निरुपयोगी होता. थिओडोरवर त्याचा मेहुणा बोरीस गोडूनोव्ह याचें फार वर्चस्व होतें व बहुतेक सर्व राज्यकारभार तोच पहात असे. बोरीस यास रशियांतील गुलामगिरीचा पुरस्कर्ता म्हणतात. ह्यानें ती पद्धति सुरू केली नाहीं परंतु गुलामगिरीस तत्कालीन स्वरूप देण्यास हाच बव्हंशीं कारणीभूत झाला. थिओडोरनंतर त्याला मुलगा नसल्याकारणानें नॅशनल असेंब्लीनें बोरीस गोडूनोव्ह (१५९८-१६०५) यास राजा नेमिलें. गुलामगिरीच्या पद्धतीचा कांहीं काळ पुरस्कार केल्यामुळें कांहीं उमरावांनां त्यानें खूष केलें परंतु हा गादीवर येतांक्षणींच राज्यांत कट, बंडाळ्या सुरू झाल्या. कोझॅक वगैरे लोकांनी उघडपणें दंगेधोपे केले. ह्या सुमारास थिओडोरचा धांकटा भाऊ डिमिट्री याचा एक तोतया उभा राहिला. त्याला लोकांची सहानुभूति मिळाल्यामुळें तो परराष्ट्रीय सैन्य घेऊन राज्यांत शिरला. ह्याच सुमारास बोरीस मृत्यु पावला व तोतया डिमिट्री गादीवर बसला. ह्यानें एक वर्षभर राज्य केलें. पुढें त्याच्या विरुद्ध कट होऊन तो ठार मारला गेला. आणि ह्या कटाचा नायक बासील शुईस्की ह्यानें गादी पटकाविली (१६०६-१६१०). ह्याच सुमारास आयव्हॅन झारचा तोतया मुलगा दुसरा डिमिट्रीस हा गादीवर हक्क सांगूं लागाल. तिकडे पोलंडच्या राजानें सुद्धां आंतून गादी बळकाविण्याचा प्रयत्‍न चालू ठेविला. तेव्हां लोकांनीं राष्ट्रीय बंड उभारलें व सर्व लफंग्या आणि लुच्च्या लोकांस राज्याबाहेर हांकलून देऊन मास्को शहरच्या फायलारेटचा मुलगा मायकेल रोमॅनोव्ह १६१३-४५ यास गादीवर बसविलें. ह्याच जुन्या घराण्याशीं दूरचा संबंध असल्यामुळें सर्व लोकांस ही नेमणूक पसंत पडली. यानें देशाची गैरव्यवस्था दूर केली व १६२८-२९ मध्यें पोलंडवर चढाई केली परंतु त्याला अपयश आलें. डॉनकोझॅकसनीं अ‍ॅझोव्ह जिंकलें पण मायकेलनें तें तुर्क लोकांनां परत दिलें. मायकेल नंतर अलेकझीयस (१६४५-७६) हा गादीवर आला. ह्यानें चढाईचें धोरण स्वीकाररून लिव्होनिया, लिथुआनिया आणि लहान रशिया ह्याच्या भोंवतालच्या राष्ट्रांवर हक्क चालविणें आरंभिलें. तेव्हां लिव्होनिया स्वीडनच्या रक्षणाखालीं गेला व लिथुआनिया आणि पोलंड हे एकत्र झाले. नीपर नदीच्या भोंवतालच्या प्रदेशांस लहान रशिया किंवा युक्रेन म्हणत असत. येथें कोझॅक लोकांनीं वस्ती केली होती. कांहीं काळ हे लोक लिथुआयिाच्या अंमलाखालीं होते परंतु पोलंड आणि लिथुआनिया एक झाल्यानंतर पोलिश सरकारनें ह्या लढवय्या लोकांस आपल्या ताब्यांत आणण्याचा प्रयत्‍न केला. पोलिश लोकांशीं बरेच दिवस लढल्यानंतर ह्या लोकांनीं मास्कोची मदत मागितली व बरेच दिवस बंद पडलेलें पोलिश युद्ध पुन्हां सुरू झालें. ह्या लढाईंत रशियन लोकांनां जय मिळाला व कोझॅक त्यांचे मांडलिक बनले. परंतु थोडयाच काळांत कोझॅक लोकांस पारतंत्र्यांत रहाणें न आवडून त्यांनीं स्वतंत्रतेची चळवळ चालविली. अशा परिस्थितींत झारला तह करणें इष्ट वाटल्यावरून त्यानें पोलंडशीं तहं केला व मध्यनीपर नदी ही दोन्ही राष्ट्रांची सरहद्द ठरली. अलेकझीयसच्या कारकीर्दीत त्याचें व शहर पॅट्रिआर्कला हद्दपार केलें. पोलिश व इतर राष्ट्रांनी मास्कोप बाल्टिकप्रांतापर्यंत न येऊं देण्याविषयीं निश्चय केला होता. इंग्लंड हॉलंड, फ्रान्स, स्वीडन आणि तुर्कस्तान यांनीं मास्कोशीं व्यापारविषयक बोलणीं चालविलीं. ह्याचा व्हावा तसा उपयोग झाला नाहीं. तरी रशियाच्या भावी प्रगतीस ह्यापासून फायदा झाला. अलेकझीयसच्या मागें त्याच्या १०।१२ मुलांत गादीसाठीं तंटे लागून तिसरा थिओडोर (१६७६-८२) हा झार झाला. ह्याच्या राज्यांत कांहीं म्हणण्यासारख्या गोष्टी झाल्या नाहींत. हा निपुत्रिक मेल्यानंतर त्याचा भाऊ पीटर हा झार झाला. परंतु त्याची अत्यंत महत्त्वाकांक्षी व इतिहासप्रसिद्ध सावत्र बहीण सोफिया हिनें सैन्यास फितवून आपला अज्ञान भाऊ आयव्हॅन यास गादीवर बसवून आपण रीजंट ह्या नात्यानें कारभार पाहूं लागली. तिनें सात वर्षे (१६८२-८९) राज्य केलें. शेवटीं तिनें पीटरच्या विरुद्ध कट केला. परंतु तो उघडकीस येऊन सोफियाच्या जागीं पीटरच्या आईची नेमणूक झाली. या काळांत पीटर दूरदेशीं जाऊन पाश्चात्त्य लोकांकडून सैन्य व आरमारविषयक शिक्षण घेत होता. पीटरचें चरित्र ज्ञानकोश वि. १७ मध्यें दिलें आहे. पीटरच्या मरणानंतर पुन्हां गादीसंबंधानें भांडणें सुरू आहे. सन १७२५ पासून १७६२ पर्यंत मधून मधून रोमनोव्ह घराण्याचा गादीवरील वारसा स्त्रियांकडे चालू होता. या स्त्रियांनीं जर्मन लोकांशीं लग्न केल्यामुळें जर्मन लोकांचें प्रस्थ राज्यांत बरेंच माजलें होतें. पीटरचा अलेकझीयस नांवाचा मुलगा फार कोत्या विचाराचा आणि हट्टी होता. बापाच्या नवीन सुधारणा त्याला आवडत नसल्यामुळें बापाच्या रोषास्तव त्याला आस्ट्रियांत पळून जावें लागलें. कांहीं दिवसांनीं तो रशियांत आल्यानंतर राजद्रोहाबद्दल त्याच्यावर खटला झाला व अत्यंत हालअपेष्टा सोशीत तो तुरुंगातच मरण पावला (१७१८). पीटरनंतर त्याची बायको पहिली फॅथॅराईन (१७२५-२७) ही गादीवर आली. तिच्यानंतर अलेकझीयसचा मुलगा दुसरा पीटर (१७२७-३०) हा गादीवर बसला. पहिल्याप्रथम तो मेशीकोव्ह नांवाच्या सरदाराच्या पूर्ण वर्चस्वाखालीं होता. परंतु कांहीं दिवसांनी पीटरनें त्यास पकडलें व सैबेरियाच्या तुरुंगात पाठवून दिलें. पीटरच्या मरणानंतर पांचव्या आयव्हॅनची मुलगी ऍनी (१७३०-४०) ही गादीवर आली. ह्याच सुमारास मास्कोला राजधानी आणण्याचा व चालू राज्यपद्धतीला आळा घालण्याचा प्रयत्‍न कांहीं सरदारांनी केला. परंतु तो निष्फळ ठरला. ही राणी फार आळशी असल्यामुळें राज्यांत बरेच विस जर्मन सरदारांचें प्राबल्य होतें. हिच्या मरणानंतर हिच्या बहिणीचा नातू सहावा आयव्हॅन गादीवर आला परंतु त्यानें थोडेच दिवस राज्य केल्यानंतर पीटर धी ग्रेटची मुलगी इलिझाबेथ हिच्या लोकांनीं त्याला पदच्युत केलें व इलिझाबेथ (१७४१-६१) ही राज्यावर आली. हिचें चरित्र ज्ञानकोश वि. ९ मध्यें दिलें आहे आपल्या मरणानंतर पूर्ण रशियन रक्ताचा असा गादीचा कोणीच वारस नाहीं असें पाहून तिनें आपल्या बहिणीचा मुलगा तिसरा पीटर (१७६१-६२) यास वारस नेमिलें. त्याच्या चालीरीती वगैरे परदेशी असल्यामुळें इलिझाबेथनें त्यास रशियन बनविण्याचा प्रयत्‍न केला. परंतु फ्रेडरिक धी ग्रेट वगैरे जर्मन राजांबद्दल त्यास अत्यंत आवड असल्यामुळें तो लोकांच्या मर्जीतून उतरला व थोडयाच दिवसांनीं त्याच्या बायकोच्या पक्षाच्या लोकांनीं त्यास ठार मारलें. नंतर त्याची स्त्री दुसरी कॅथॅराईन (१७६२-९६) [ज्ञानकोश विभाग १० 'कॅथेराईन' पहा.] व तिच्या नंतर तिचा मुलगा पॉल (१७९६-१८०१) हा गादीवर आला. हा एककल्ली स्वभावाच असल्यामुळें राष्ट्राच्या भावनेबद्दल तो बेपर्वा असे. पॉल हा नेपोलिवनचा मोठा चहाता होता. नेपोलियनबरोबर सख्य करून इंग्रजांच्या हातून हिंदुस्थान हिसकावून घेण्याचा त्याचा विचार होता. परंतु तो सफळ होण्यापूर्वीच १८०१ सालीं शहरांतील कटवाल्यांनी त्याला ठार मारलें. त्याचा मुलगा पहिला अलेक्झांडर (१८०१-२५) हा गादीवर बसला. याचें चरित्र ज्ञानकोश विभाग ७ मध्यें दिलें आहे. १८२५ सालीं झार मेल्यानंतर त्याच्या वडील मुलानें राज्यपद नाकारलें म्हणून झारचा दुसरा मुलगा पहिला निकोलेस (१८२५-५५) गादीवर आला. तरीहि गुप्त कटवाल्यांनीं सेंटपीटर्सबर्ग मधल्या शिपायानां चिथावून बंड केलें. परंतु लवकरच तें मोडलें. याचें चरित्र ज्ञानकोश वि. १६ मध्यें दिलें आहे.

ह्यानें अंर्तव्यवस्थेमध्यें बर्‍याच सुधारणा केलया परंतु लोकांच्या सहानुभुतीच्या अभावी त्याचा फारसा उपयोग झाला नाहीं. १२२६ मधील पर्शियन लढाईंत रशियाला कांहीं प्रांत मिळाले. त्याचप्रमाणें लढाईची भीति घालून त्यानें माल्डोव्हिया, बालेशिया, आणि सर्व्हिया या प्रांतांचे स्वातंत्र्य संपादन केलें. सुलताननें १८२७ सालच्या लंडनच्या तहाच्या अटी न पाळल्यामुळें इंग्रज, फ्रेंच व रशियन यानीं नव्हॅरिओ येथें तुर्की आरमाराचा फडशा पाडला. ह्या लढाईमुळें रशियास काळ्या समुद्रांत पूर्णपणें वावरतां येऊं लागलें. पुढें तुर्कस्तानच्या सुलतानशी रशियानें तह केला. त्यांतील अटीप्रमाणें दार्दानेल्सची सामुद्रधुनी सर्व राष्ट्रांस बंद करण्यांत आली. १८५२ सालीं रशियानें तुर्कस्तानशीं पुन्हां कुरापत काढली. जेरुसलेमवर सर्व हक्क रशियाचा असावा असा हट्ट झारनें धरल्यानें क्रिमियनवार सुरू झाली. ह्या लढाईंत तुर्कांनां इंग्रजांनीं व फ्रेंचांनीं मदत केली. १८५५मधील सेव्हासटोपलच्या तहानें व १८५६ मधील पॅरीसच्या तहानें रशियाला काळ्या समुद्रावरील बरेंच आरमार कमी करावें लागलें. निकोलस मेल्यानंतर त्याचा वडील मुलगा दुसरा अलेक्झांडर (१८५५-८१) हा गादीवर आला. ह्यानें न्याय, शिक्षणप्रसार, स्थानिकस्वराज्य आणि आर्थिक शास्त्रीय बाबींत बर्‍याच सुधारणा केल्या. परंतु ह्या सर्व गोष्टींपासून जितकी शांतता रहावी तितकी न रहातां प्रजेच्या विचारामध्यें भयंकर क्रांति होऊं लागली. स्वातंत्र्यवाद फार माजला. सुशिक्षित लोकांमध्यें परिस्थितीची जाणीव उत्पन्न होऊन अतिशय असंतोष, व अस्वस्थता माजली, गुप्त मंडळ्या स्थापन झाल्या; राजद्रोही व क्रांतिकारक हस्तपत्रकें व जाहीरपत्रकें शेतकर्‍यांपासून तो अमीरउमरावांपर्यंत वाटण्यांत आलीं. सुशिक्षित लोक खेडयापाडयांतून जाऊन समाजसत्ताक तत्त्वांचा प्रसार करूं लागले. तेव्हां सरकारनें पुष्कळसें गुप्त कट पकडले. पुढार्‍यांनां जबरदस्त शिक्षा ठोठावल्या, छापखान्यांवर व वर्तमानपत्रांवर शक्य तितकीं दडपणें टाकण्यांत आलीं. भर दिवसाढवळ्या अधिकार्‍यांचे खून करण्यांत येऊं लागले. त्यामुळें बादशहालाहि ह्या अस्वस्थतेचा परिणाम जाणवला. अलेक्झांडर लष्करी परेडवरून आपल्या महालाकउे परत येत असतां बाँबच्या भडक्यामुळे भयंकर जखमी झाला व लवकरच मरण पावला. क्रिमियन युद्धामुळें रशियाचें यूरोपांतील प्रस्थ बरेंच कमी झालें. त्यानंतर कांहीं दिवस रशिया व फ्रान्स हे दोस्त बनले. परंतु पोलिश लोकांच्या बंडाला फ्रेंच सरकारनें मदत केल्यामुळें पुन्हां दोघांमध्ये वैमनस्य आलें. या सुमारास बिस्मार्कनें रशियाला मदत केल्यामुळें रशियाचें व जर्मनीचे हितसंबंध जुळले. १८७८ पर्यंत हें सख्य टिकल्यामुळें जर्मनीची बरीच प्रगति झाली. क्रिमियन युद्धामध्यें गेलेले कांही प्रांत जर्मनीच्या मदतीनें रशियानें मिळविले. परंतु येवढयावरच संतुष्ट न राहून रशियानें १८७७-७८ मध्यें तुर्कस्तानशीं लढाई सुरू केली. ह्या लढाईनंतर रशियाला जरी बेसारेबिया परत मिळाला तरी इतर दृष्टींनीं त्याला फारसा फायदा झाला नाहीं. १८५८ मधील ऐगनच्या तहानें आमूरच्या भेंवतालचा प्रदेश चीनकडून रशियाला मिळाला. सहा वर्षांनंतर आशियांतील रशियाचा मुलूख वाढूं लागला. अलेक्झांडर (दुसरा) याच्या कारकीर्दीनंतर सैबेरिया आणि इराण व अफगाणिस्तान यांच्या उत्तरेकडील प्रदेश रशियाच्या ताब्यांत आला. अलेक्झांडर मेल्यानंतर त्याचा मुलगा तिसरा अलेक्झांडर (१८८१-९४) झार बनला. बापाचा सूड उगविण्यासाठी अलेक्झांडरनें प्रथम दडपशाहीचें धोरण चालू ठेविलें. बापाच्या वेळेस झालेल्या गुलामांच्या सुटकेपासून आर्थिकदृष्टया कांहीं फायदा होत नाहींसा पाहून त्यानें ती पद्धति पुन्हां सुरू करण्याचा प्रयत्‍न चालू केला. रशियाच्या निरनिराळ्या भागांत हजारों जाती असून त्या निरनिराळ्या भाषा बोलत असत. अलेक्झांडरनें रशियन भषाच सर्वत्र प्रचारांत आणण्याचे कायदे केले. सर्वांनी एकच धर्म पाळला पाहिेजे व सर्वत्र एकच तर्‍हेच्या राज्यविषयक संस्था असल्या पाहिजेत असा निर्बंध करण्यांत आला. अशा रीतीनें अर्न्तव्यवस्थेमध्यें सर्व गोष्टी रूसमय करून टाकण्याचें ध्येय अलेक्झांडरनें पुढील राज्यकर्त्यांकरितां आखून ठेविलें. दुसर्‍या अलेक्झांडरचें परराष्ट्र्रीय धोरण पुढीलप्रमाणें होतें:-पश्चिमेकडे जर्मनीशीं हितसंबंध जोडून क्रिमियन युद्धांत गेलेला प्रांत परत मिळवावायाचा, तुर्की सुलतानची सत्ता कमी करून स्लाव्ह राष्ट्रांवरील आपलें वर्चस्व जास्ती वाढवावयाचें व आशियामध्यें राज्याच्या मर्यादा जास्ती वाढवावयाच्या; ह्यांपैकी पहिलें कलम तिसर्‍या कलम तिसर्‍या अलेक्झांडरनें पाळण्याचें साफ नाकारिलें. कारण जर्मनीनें रशियाच्या मर्जीविरुद्ध १८७० सालीं आस्ट्रियाशीं तह केला. परंतु पुढें सन १८८४ मध्यें जुने हितसंबधं जोडले जाऊन तीन वर्षांसाठी तीन बादशहामध्यें (आस्ट्रिया, रशिया आणि जर्मनी) दोस्ती झाली. ह्यानंतर पुष्कळ कारणांमुळे जर्मनीबद्दल रशियाचा संशय वाढतच गेला. व १८८७ मध्यें तहांचा काल संपल्यानंतर पुन्हां सख्य करण्याचें रशियानें नाकारलें. फ्रेंचांची सत्ता करण्यांत आले हितसंबंध नाहींत हें पाहून रशिया फ्रेंचांशीं सलोख्याचें बोलणें लावूं लागला. तिकडे जर्मनी, आस्ट्रिया व इटली यांचा त्रिकुटी समेट झालेला पाहून फ्रेंच व रशियन लष्करी तज्ज्ञांनी १८९१ मध्यें वरील समेटाच्याविरुद्ध दुसरा संघ स्थापण्याचा बेत केला. दक्षिण रशियामध्यें अलेक्झांडरनं चढाईचें धोरण जरा कमी करून काळ्या समुद्रांतील आरमारी तांडा वाढविला. बर्लिनच्या तहाविरुद्ध बॉटुमला कोट बांधण्यांत आला. मात्र पराराष्ट्राच्या व्यवहारामध्यें त्यानें ढवळाढवळ केली नाही. ह्याच्या कारकीर्दीत आशियांत राज्याचा विस्तार फारच झपाटयानें झाला. टेक्के-तुर्कोमनचा प्रदेश रशियानें आपल्या ताब्यांत घेतल्यानंतर १८८५ मध्यें रशिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्यें पंजंडेह येथें लढाई झाली. तीमुळें इंग्रजांनीं रशियास आपला राज्यविस्तार तेथेंच थांबविण्यास सांगून लढाईची तयारी चालविली. पण १८८७ मध्यें सेंटपीटर्सबर्ग येथें तह होऊन रशियानें आपल्या मर्यादा थांबविण्याचें कबूल केलें. हिरातच्या बाजूला प्रगति थांबलेली पाहून रशियानें पामीरच्या बाजूला चळवळ सुरू कली, परंतु १८९५ मध्यें झालेल्या तहाच्या वाटाघाटींत तिकडेहि रशियाची गति कुंठित झाली. १८९४ सालीं अलेक्झांडर मरण पावला व त्याचा मुलगा दुसरा निकोलस (१८९४-१९१७) हा गादीवर येऊनत्यानें बापाचेंच धोरण चालू केलं. याचें चरित्र ज्ञा. वि. १६ मध्यें दिलें आहे. यानें साधारण जुलुमी राज्यपद्धतीच चालू ठेवली होती. त्यानें फिनलंडच्या लोकांच्या तक्रारीकडें दुर्लक्ष केलें, बाल्कनप्रांतांत हात घालून बल्गेरिया व तुर्कस्तानशीं सख्य केलें, क्रांतिकारकांच्या चळवळीनें जपानशीं चाललेलें युद्ध त्यास आंखडतें घ्यावें लागलें (१९०५). नंतर (१९०६) झारनें पहिली डयूमा सभा बोलाविली, परंतु ती सरकारी नियंत्रण आपल्या हातीं घेऊं लागल्यानें मोडून टाकण्यात आली.

त्यानंतर (१९०७ मार्च) पुन्हां दुसरी डयूमा सभा भरविली पण तींत क्रांतिकारक लोक आल्यानें ती मोडून त्याच सालीं (नोव्हेंबर) तिसरी बोलाविली. तिनें सैन्य व कायदे केले. यानंतर इंग्लंड व रशिया यांची दोस्ती होऊन इराणमधील परस्परांच्या वर्चस्वाखालील प्रांतांची भानगड मिटली (१९०८). यापुढील (१९१०-२१ च्या) रशियाच्या इतिहासावर पुन्हां बंडाची छाया पडलेली दिसते. १९१० च्या सुमारास रशियांतील बुद्धिमान लोकांमध्ये व जनतेमध्यें अनेक पक्ष उत्पन्न होऊन झार व झारशाहीबद्दल सर्वत्र असंतोष पसरविण्यांत येत होता. तो शमवून पुन्हां सुसंघटित शक्ति निर्माण करण्याचे प्रयत्‍न करण्यांत आले पण ते अयशस्वी झाले. राजकीय बंडखोर पुढार्‍यांचे तुरुंगात अतिशय हाल करण्यांत यत म्हणून विद्यार्थिवर्गानें या गोष्टींचा तीव्र निषेध केला; त्यामुळें सरकारनें युनिव्हर्सिटीचें स्वातंत्र्य नष्ट करून टाकलें व विद्यार्थ्यांचे वर्ग बंद केले. तसेंच आपल्या ताब्यांतील इतर छोटया राष्ट्रांनां स्वराज्य देण्याऐवजीं त्यांनां अधिकच अपमानास्पद स्थितीमध्यें ठेवण्याचें सरकारनें ठरविलें, व डयूमा सभेनें या गोष्टीचा इनकार केला असतांहि बादशाही जाहीरनामा काढून व्हेटोनें तो मंजूर केला. त्यामुळें डयूमासभेंत प्रतिकारकात्मक चळवळ सुरू झाली. तथापि सरकारनें आपलें जुलुमी धोरण तसेंच चालू ठेवलें. परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतींत मात्र रशियन सरकार व डयूमा यांची एकवाक्यता होती. या सुमारास खोल्म टापूचा स्वतंत्र प्रांत बनविण्यांत आल्यामुळें पोल लोकांमध्यें व रशियन सरकारमध्यें बेबनाव उत्पन्न झाला. बाल्कनयुद्धामध्यें त्या टापूंत जे महत्त्वाचे प्रादेशिक फेरफार करण्यांत आले त्यासंबंधी सरकार व लोक यांची एकवाक्यता होती. मात्र अंतर्गत राजकीय कारभारांत उत्तारोत्तर सरकार व लोकपक्ष यांच्यामध्यें बेबनाव वाढत चालला व बंडाच्या पूर्वतयारीची चिन्हें दृग्गोचर होऊं लागलीं. इतक्यांत महायुद्ध सुरू झालें. त्यामुळें कांही काळपर्यंत इतर राष्ट्रांतील लोकांप्रमाणेंच रशियांतील लोकांचे लक्ष महायुद्धाकडे वेधलें व त्यामुळें अंत:स्थ पक्षभेद तात्पुरते जिरल्यासरखे झाले. सर्व पक्षांनी रशियानें दोस्तांची बाजू घेतल्याबद्दल त्याचें अभिनंदन केलें व सर्वतोपरी मदत करण्याचें कबूल केलें. त्यांतच पोल लोकांनां स्वातंत्र्य देण्याचें वचन दिल्यामुळें तर सरकारची लोकप्रियता अधिकच वाढली. मितमद्यपानाचा जाहीरनामा काढल्यानें या लोकप्रियतेला विशेष जोर चढला. तथापि ही परिस्थिति फारच थोडा वेळ टिकली. पोल लोकांनां स्वातंत्र्याचें दिलेले वचन थोडा वेळ टिकली. पोल लोकांनां दिलेलें वचन कागदावरच राहिले. दरबारांत लांचलुचपतीचे प्रकार पुन्हां सुरूं झाले. सैन्याची व दारूगोळ्याची उत्कृष्ट तयारी राहीना. लोकपक्षामध्यें व सरकारमध्यें वारंवार विरोध उत्पन्न होऊं लागले व त्यामुळे सरकार उलथून पाडण्याकडे लोकांची मनोवृत्ति, वळली. त्यावेळीं रशियामध्यें अनेक पक्ष स्थापित झाले होते. परंतु त्या सर्वांची एकवाक्यता रशियांतील झारशाही नष्ट करण्याकडे होती. १९१५-१६ सालीं झिमरवाल्ड चळवळीच्या पुढार्‍यांनीं एक जाहीरनामा काढून ही सुलतानशाही उलथून पाडण्याविषयीं व देशांतील भांडवलवाल्यांचा जुलूम नष्ट करण्याबद्दल लोकांनीं प्रयत्‍न करावे असें त्यांनीं जाहीर केलें. १९१७ सालीं रशियामध्यें व खुद्द राजधानीमध्यें बेबंदशाही माजली व राजधानींतील सरकारी कचेर्‍या वगैरे बंडवाल्यांच्या ताब्यांत आल्या. नंतर एक तात्पुरतें सरकार निवडण्यांत आलें. पण या सरकारची सत्ता कोणीच मान्य करीना. खुद्द राजधानींत मजुरांनीं आपले प्रतिनिधी निवडून देऊन ते तात्पुरत्या स्थापन झालेल्या सरकारामध्यें सामील करून घेण्याबद्दल चळवळ करण्यांत आली. त्याच सुमारास झारनेंहि स्वखुषीनें बादशाहीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळें रशियन बंड पूर्णपणें यशस्वी झालें असें म्हणावयास हरकत नाहीं. तथापि झारनें राजसंन्यास करतांच रशियांतील कारभार सुरळीत चालूं लागेल अशी जी लोकांची कल्पना होती ती मात्र खोटी ठरली. कारण रशियांतील बंड हें केवळ झारच्या सुलतानशाहीविरुद्धच बंड नव्हतें तर जुन्या गंजलेल्या तत्त्वांविरुद्ध होतें. त्यामुळें झारच्या राज्यत्यागाबरोबर झारच्या कारकीर्दीतल्या जुन्या संस्थाहि मोडूं लागल्या. प्रथमत: लष्करखात्याची मोडतोड होऊन त्याच्या जागीं लष्करी शिपायांच्या निरनिराळ्या कमिट्या स्थापन झाल्या, झारशाहींतल्या अधिकार्‍यांच्या हातांतलीं शस्त्रास्त्रें काढून घेण्यांत आलीं. लष्करी खात्यानंतर परराष्ट्रीय खात्याचा शेवट झाला, अशा रीतीनें रशियामध्यें बेबंदशाही माजली असतां तिच्या जनकांपैकी सर्वांत योग्य मणूस जो केरेन्स्की याच्या शिरावर रशियाची पुनर्घटना करण्याची जबाबदारी पडली. हें काम सोपें नव्हतें. जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्याविरुद्ध टक्कर देत देत केरेन्स्कीला रशियांतील अंतर्गत सुधारणा घडवून आंणावयाची होती. रशियांतील मोडकळीस आलेल्या सैन्याचें जर्मनी व आस्ट्रिया यांच्या सैन्यापुढें कांहींच चाललें नाहीं. खुद्द रशियाच्या ताब्यांतील परतंत्र राष्ट्रांनी यावेळी बंड केलें, अशा पेंचांत केरेन्स्की सांपडला असतां त्याच्या हातून आपल्या हाती सत्ता आणण्याचें बोल्शेव्हिक पक्षानें ठरविलें. बोल्शेव्हिकांनीं दोनदां प्रयत्‍न केले पण त्यांत त्यांनां यश आलें नाहीं. तथापि १९१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यांत ट्राट्स्कीच्या नेतृत्वाखालीं एक लष्करी बंडाची कमिटी स्थापण्यांत आली, व पेट्रोग्राड येथील लष्करी त्या कमिटीला मान्यताहि दिली. त्यानंतर थोडक्याच दिवसांनीं बोल्शेव्हिकांनीं बंड उभारून केरेन्स्कीची सत्ता शेवटास नेली व आपलें सोव्हिएट सरकार प्रस्थापित केलें. हें सरकार प्रस्थापित होतांच बोल्शेव्हिक अधिकार्‍यांनीं खासगी मालमत्ता जप्त केली. युध्यमान राष्ट्रांनां खलिते पाठवून आपल्याशीं तह करण्यास कळविलें. अंतर्गत कारभारांत २० वर्षांवरील सर्वांस भाग घेण्यास मोकळीक दिली. पुढें लवकरच ज्या निवडणुकी झाल्या त्यांमध्यें बोल्शेव्हिकांनां जय न मिळतां समाजांतील जे बंडखोर लोक होते त्यांच्या बाजूला बहुमत मिळालें. त्यामुळें बोल्शेव्हिकांच्या हातांत फारशी सत्ता राहिली नाहीं, अर्थांत बोल्शेव्हिकांनां पुन्हां बंड करण्याशिवाय गत्यंतर उरलें नाहीं.

त्यांचें बंड यशस्वी झाल्यानंतर त्यांनीं जर्मनीशीं ब्रेस्ट लिटोव्हस्क येथें तह केला. तथापि या तहामुळें लेनिन प्रभृतींनीं आपल्यावर अपमानकारक अटी मात्र लादून घेतल्या. याचा सूडच म्हणूनच की काय, लेनिनच्या पक्षांतील कामकर्‍यांनीं रशियांतील श्रीमंत व कुलीन घराण्यांतील लोकांचा अतोनात छळ करण्यास सुरवात केली. सैन्यातील शिपायांनीं आपल्या सेनापतींचे खून केले व अशा रीतीनें बोल्शेव्हिकांची संक्रांत सर्व रशियाभर पसरली. तथापि याला प्रतिक्रिया होण्यास सुरवात झाली. उत्तार कॉकेशसमधील टापूंत कांहीं सेनापतींनीं व सरदारांनीं कांहीं निवडक सेना तयार करून त्या भागावर आपला अंमल चालू केला. तथापि बहुतेक सर्व रशियावर बोल्शेव्हिकांचेंच राज्य होतें. जर्मनीशीं रशियानें तह केल्यामुळें दोस्तराष्ट्रांनां भय पडलें, व त्यांनीं गुप्तपणें आपापले वकील बोल्शेव्हिक सरकारशीं खलबत करण्याकरतां पाठवून दिले. तथापि त्यांचा कांही उपयोग झाला नाहीं. तेंव्हां त्यांनीं रशियांत भेद पाडण्याचा प्रयत्‍न केला. रशियाच्या ताब्यांतील जीं परतंत्र राष्ट्रें आपल्या स्वातंत्र्याप्रीत्यर्थ प्रयत्‍न करीत होतीं त्यांनां त्यांनीं गुप्तपणें मदत करण्यास सुरवात केली. बोल्शेव्हिकांविरुद्ध प्रतिक्रियात्मक प्रयत्‍न रशियाच्या निरनिराळ्या भागांत होत होते, त्यांनांहि उत्तेजन देण्यास सुरवात झाली. चीनच्या टापूंत कर्नल सेमेनोव्ह यानें कॉकेशियन कोझॅकच्या मदतीनें आपली तात्पुरती सत्ता त्या भागावर स्थापन केली. सैबेरियन टांपूत नोवो निकोलायेव्हस्क येथें कोल्याक नांवाच्या एका सेनापतीनें आपला अंमल सुरू केला. याशिवाय व्ल्हाडिव्होस्टाक व टोम्स्क येथेंहि तात्पुरतीं सरकारें स्थापन झालीं. तथापि हे सर्व बंडखोर पक्ष परस्परांमध्यें ऐक्य करण्यास तयार नव्हते. त्यामुळें बोल्शेव्हिक सरकारचें अस्तित्व धोक्यांत आलें नाही. ब्रिटिश सरकार व इतर दोस्तराष्ट्रें जरी बंडखोरांनां अनकूल होती तरी रशियांत सैन्य पाठविल्या कदाचित समाजसत्तावाद्यांच्या तत्त्वांची बाधा या सैन्याला होईल व मग त्यांचा फैलाव आपल्या राष्ट्रांत होईल या भीतीनें दूर राहूनच शक्य तितकी मदत हीं राष्ट्रें करीत होती. पुढें १९१९-२० सालीं तर लाइड जॉर्जनें रशियाच्या राजकारणाशीं आपला संबंध तोडूनच टाकला. अर्थात बोल्शेव्हिक सरकारला आयतेंच पथ्यावर पडून त्यानें या रशियांतील बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला व त्यामुळें शेवटीं सोव्हिएट उर्फ बोल्शेव्हिक सरकारला इंग्लंड व इटलीनें नाखुषीनें कां होईना मान्यता दिली. अशा रीतीनें कालांतरानें कां होईना सोव्हिएट सरकारचें आंतरराष्ट्रीय अस्तित्व मानण्यांत येऊं लागलें. तथापि सोव्हिएट रशियापासून पोलंड, फिनलंड, एस्थेनिया, बेसरेबिया, जॉर्जिया, आर्मेनिया इत्यादि प्रांत स्वतंत्र झाल्यामुळें सोव्हिएट सरकार बरेंच निर्बल झालें. महायुद्धामध्यें रशियांतील सुमारें सतरा लाख लोकांचे बळी पडले. त्यामुळें पूर्वीच्या साम्राज्यांतून पोलंड प्रभृति राष्ट्रें वेगळीं झाल्यामुळें सोव्हिएट रशियाची लोकसंख्या कमी झाली. त्यामुळें व्यापाराच्या दृष्टीनें रशिया असहाय्य बनला. बाहेरच्या देशांशीं व्यापार करण्याकरतां जीं प्रमुख बंदरें होती त्यांपैकीं बरीचशीं सोव्हिएट सरकारच्या ताब्यांतून गेल्यामुळें त्या दृष्टीनेंहि रशियाचा तोटा झाला. तथापि समतेच्या व लोकसत्ताक शासनघटनेच्या तत्त्वावर रशियानें आपली पुनर्घटना केल्यास अद्यापिहि रशिया या सर्व संकटांतून निभावून जाऊं शकेल असें वाटतें.

नवीन रशियन राष्ट्राची घटना १९१८ सालीं पांचव्या सोव्हिएटांच्या आखिल-रशियन काँग्रेसमध्यें ठरली व पुढील (१९२०-२३ च्या) काँग्रेसमध्यें तींत कमी अधिक फेरफार झाले. १९२२ च्या डिसेंबर महिन्यांत चार प्रमुख सोव्हिएट प्रजासत्ताक राष्ट्रांचे प्रतिनिधी मॉस्को येथें जमून त्यांच्यांत एक सांघिक तह घडून आला व त्या अन्वयें रशिया, उक्रेनिया, श्वेत रशिया आणि ट्रॅन्सकॉकेशियन फेडरेशन या चार प्रजासत्ताकांचें एकीकरण घडून आलें. १९२४ सालीं उझबेग व तुर्कोमन या संघांस मिळालीं. या संघाच्या घटनेला दुसर्‍या यूनियन काँग्रेसमध्यें दुजोरा देण्यांत आला (जानेवारी फेब्रूवारी १९२४). यूनियन सेंट्रल एक्झेक्युटिव्ह कमिटी व यूनियन कौन्सिल ऑफ पीपल्स कमिसरीज यांचें मिळून यूनियन सरकार बनलें आहे. ता. १ फेब्रूवारी १९२४ रोजीं ब्रिटिश सरकारनं या यूनियनला मान्यता दिली. अशीच मान्यता अफगाणिस्तान, ऑस्ट्रिया, एस्थोनिया, जर्मनी, ग्रीस, इटली, लाटव्हिया, लिथुआनिया, नॉर्वे, इराण, पोलंड, स्वीडन, तुर्कस्तान, फ्रान्स, जपान, मेक्सिको आणि चीन या राष्ट्रांनी दिली.
वाड्मय.-रशियन वाङ्‌मयाचे दोन प्रकार असून त्यांची निरनिराळी माहिती दिल्यानें वाचकांनां समजण्यास सोयीचें होइ्रल. हे दोन प्रकार म्हणजे एक तोंडी व दुसरा लेखी. तोंडी वाङ्‌मयामध्यें सर्व देशभर भटकत हिंडणार्‍या भाटांच्या तोंडी असलेल्या गाण्यांचा समावेश होतो. ही गाणीं म्हणजे (१) जुन्या शूर पुरुषांचीं, (२) केव्हच्या राजाचीं, (३) नोव्हगोरांडची, (४) मास्कोबद्दलचीं, (५) कोसॅकाविषयींची, (६) पीअर दि ग्रेटरवरची, इतक्या विषयांवरचीं आहेत. या गाण्यांना प्राप्त नसतो परंतु तालबद्धता असल्यामुळें तीं कर्णमधुर असतात. बरीच वर्षे त्यांच्याकडे कोणाचें विशेष लक्ष नव्हतें, पण पुढें १७ व्या शतकांत त्याच संग्रह करण्यांत आला. १८०४ पासून पुढें तीं छापून प्रसिद्ध होऊन फार लोकप्रिय झालीं; आणि कित्येकांचीं जर्मनींत भाषान्तरेंहि झालीं आहेत. त्यांमध्यें भुताखेतांचीं, दैत्यराक्षसांची, सर्पांची, व्होल्गा नदीच्या तीरावरील रेझिन नांवाच्या दरवडेखोरांचीं व त्यांबरोबरच पीअर दि ग्रेटसारख्या चांगल्या राजांचींहि गाणीं आहेत. अलीकडील नेपोलियनवरहि गाणीं झालेलीं आहेत, कांही धार्मिक विषयांची आहेत, व तीं पौराणिक कथांचा तौलनिक अभ्यास करणारांस फार उपयुक्त आहेत.

आतां दुसरा प्रकार लिखितवाङ्‌मयाचा. त्यांतील सर्वांत जुनें पुस्तक म्हणजे ग्रेगरीनें लिहिलेलें १०५६-५७ मधील स्लॅव्हॉनिक गॉस्पेलचें होय. दुसरें १०७३ सालीं ग्रीक साधनां वरून लिहिलेलें पुस्तक म्हणजे एक रशियन ज्ञानकोशच आहे. या जुन्या पुस्तकांत कांहीं राजांच्या स्तुतिपर काव्यें आहेत, नेस्टरसारख्या बहुतेक मोठमोठया गांवाचीं बखरीवजा इतिहासवर्णनें आहेत, पवित्र क्षेत्र जेरुसलेमला ११-१२ व्या शतकांत जाऊन आलेल्या डॅनियलचें, हिंदुस्थानांत जाऊन आलेल्या ए. निकितिन (१४७०), कॉरोबिनिकोव्ह, ग्रेकोव्ह यांचीं व इतर अनेकांची प्रवासवर्णनें आहेत.
धार्मिक वाङ्‌मय:-१२ व्या शतकांतील सीरिलचीं धर्मवर व्याख्यानें व बेझबोरोडकोनें लिहिलेलं अनेक उपदेशपर साधूंचीं चरित्रें हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
गोष्टी:-इगोरनें पोलोव्ह लोकांवर केलेल्या स्वार्‍यांच्या गोष्टी, किटोव्हरास व सालोमन झारच्या गोष्टी, बल्गेरियन गोष्टींवरून लिहिलेल्या गोष्टी, १३८० सालीं बु्रडकॉक्स येथें मोंगलांविरुद्ध मिळविलेल्या जयाची हकीकत वगैरे पुस्तकें आहेत.

कायदेग्रंथ:-सन १०५४ च्या सुमाराचा यरोस्लाव्हचा रस्कायप्रवद हा ग्रंथ, सन १४९७ मधील ३ र्‍या ईव्हेनचा सुडेबनिक हा कायदेग्रंथ व सन १५५१ मधील स्टोग्लाव्ह हा धार्मिक नियमग्रंथ हे प्रसिद्ध आहेत. या कायद्यांत कांहीं कांहीं चमत्कारिक शिक्षा आहेत. नवर्‍याच्या खुनाबद्दल बायकोला जिवंत पुरण्याची शिक्षा सांगितली आहे; तंबाखूचा उपयोग करणाराला नाक कापण्याची फारच चमत्कारिक शिक्षा लिहिलेली आहे. पुढें पीटर दि ग्रेटनें ती शिक्षा रद्द करून स्वत:च तंबाखूच्या प्रचारास उत्तोजन दिलें.

छापखाने:-१५५३ सालीं मास्कोला प्रथम एक छापखाना काढण्यांत आला, व १५६४ सालीं 'अपोस्टल' नांवाचें पहिलें पुस्तक छापून काढण्यांत आलें. परंतु लवकरच फेडोरोव्ह व इतर त्याचे छापणारे सहकारी यांनां रशियांतून हद्दपार करण्यांत आलें. नंतर लवकरच दुसरा छापखाना सुरू झाला व यांत सन १६०० र्प्यंत १६ पुस्तकें प्रसिद्ध झालीं.

क्रूरकर्मा ईव्हानचा काल:-क्रूरकर्मा इव्हान याच्या काळचें डोमोस्ट्राय म्हणजे 'गृहव्यवस्थेवरील पुस्तक' हें फार मजेदार आहे. तें सिल्व्हेस्टर नांवाच्या मंकनें लिहिलेलें आहे. या मंकचे कांहीं काळ इव्हानच्या दरबारीं मोठें वनज होतें पण नंतर त्याला दूर व्हाईटसीकडील मठांत हांकलून देण्यांत आलें. वरील पुस्तक सिल्व्हस्टरनें प्रथम आपला मुलगा व सून यांच्या उपयोगाकरितां लिहिलें, परंतु लवकरच तें रशियांत लोकप्रिय झालें. या पुस्तकांत त्या काळच्या रशियन लोकांच्या रहाणीचें, त्यांच्या अज्ञानाचें व रानटीपणाचेंहि चित्र उत्तम रेखाटलें आहे. त्यावेळीं घरांत नवर्‍याच्या सेवेला पाहिलेला प्राणी असून वाटेल तशी शिक्षा तिला करण्याचा नवर्‍याला अधिकार असे वगेरे स्थिति त्यांतील वर्णनावरून दिसते. १५६३ च्या सुमारास कर्बस्की हा प्रथम इव्हानच्या नोकरींत असलेला लेखक यानें राजाच्या जुलमी कृत्यांमुळें नोकरी सोडून दूरदेशी जाऊन राहिल्यावर राजाशीं पत्रव्यवहार करून त्याच्या क्रूरकृत्यांबद्दल अत्यंत निंदा केली आहे. त्यानें इव्हानचें चरित्रहि लिहिलें आहे. शिवाय त्यानें व्हाईटलेकच्या कांठावरील मठवासीयांवर त्यांच्या चैनीच्या रहाणीबद्दल कडक टिका केली आहे. दुसर्‍या लेखकांनीं झार व ग्रांड-डयूक यांच्या कारकीर्दीच्या हकिकती लिहून ठेविलेल्या आहेत.
१७ वें शतक - १७ व्या शतकाच्या आरंभीचा टोबोलस्कच्या कुबासोव्हचा क्रोनोग्राफ (बखरग्रंथ) प्रसिद्ध आहे. त्यांत त्यानें जगाच्या उत्पत्तीपासून मायकेल रोमनोव्हची व लेखकानें स्वत: पाहिलेल्या राजघराण्यांतील इसमांची माहिती दिली आहे. त्याच वेळचें अझोव्हच्या वेढयाच्या वर्णनाचें व त्यांतील तुर्कांचे हल्ले मागें परतविणार्‍या कोसाकांच्या शौर्याच्या वर्णनाचें एक गद्यकाव्य प्रसिद्ध आहे. तसेंच पोललोकांनीं ट्रॉइटझाच्या मइाला दिलेल्या वेढयाचें वर्णन आहे. पण या सर्वांत चांगला वर्णनपर ग्रंथ म्हणजे कोटोशिखिन या वकिलातींतील अधिकार्‍यानें लिहिलेला आहे. आपल्याबरोबरच्या अधिकार्‍याविरुद्ध माहिती सांगण्याचा प्रसंग आल्यामुळें तो स्वीडनमध्यें पळून गेला व तेथें राहून त्यानें आपल्या देशांतील हकीकतीचें यथातथ्य वर्णन केलें आहे. त्या वेळचा प्रसिद्ध पॅन-स्लाव्हिस्ट क्रझानिच यानें सॅव्हियन व्याकरण लिहिलें. स्लॅव्हिॉनिक तत्तवज्ञानामध्येंहि त्याची गति चांगली होती. पुढें तर त्याची मजल येथपर्यंत गेली कीं, सर्व स्लाव्ह लोकांची मिळून एक भाषा बनविली पाहिजे, असें तो प्रतिपादन करूं लागला. असें म्हणणारें दुसरेहि कित्येक निघाले आहेत, पण ती गोष्ट अशक्य कोटींतली आहे. क्रझानिचनें १७ व्या शतकांतील रशियन साम्राज्याचा इतिहासहि लिहिला आहे. प्राचीन रशियन वाङ्‌मयांतील शेवटचा लेखक पोलोस्की (१६२८-१६८०) हा होय. अलेक्र्झसिचा फिओडोर झार याच तो शिक्षक होता. त्यानेंच रशियामध्यें पाश्चात्त्य संस्कृतीचा शिरकाव होण्यास चांगली मदत केली. त्यानें 'व्हिनेट्स व्हेरी' हा धर्मपर ग्रंथ, इतर काव्यें व धर्मपर नाटकें लिहिलीं आहेत.

आधुनिक काळ:-पीटर दि ग्रेटपासून (१६८९-१७२५) आधुनिक रशियन वाङ्‌मयाला सुरवात होती. पीअर दि ग्रेटला रशियन लोकांत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या कामांत मुख्य मदत करणारांमध्यें प्रोकोपोव्हिच हा लेखक नवीन शास्त्रीय शोधांची बाज समर्थन करणारांपैकीं होता. त्याच्या विरुद्ध जुन्या पंथाचा यार्व्होस्कीं यानें लूथरचे अनुयायी व कॅल्व्हिनिस्ट यांच्या खंडनपर 'रॉक ऑफ फेथ' नांवाचा एक ग्रंथ प्रसिद्ध केला होता. यांशिवाय पोसोश्कोव्हचा 'श्रीमंतांचे दारिद्र्य' हा ग्रंथ, कांटेमीरचे औपरोधिक लेख व लोकोनोव्हचे निबंध, उपदेशात्मक कविता, शोकपर्यवसायी नाटकें वगैरे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
फ्रेंच वाङ्‌मयांतील ग्रंथांच्या नमुन्यावर रशियांत पुष्कळ ग्रंथ निर्माण होऊं लागले. सुमारोकोव्ह यानें आनंद व शोकपर्यवसायी नाटकें, औपरोधिक काव्यें, चुटके वगैरे गद्यपद्यात्मक अनेक ग्रंथ लिहिले. १७५६ सालीं पीटर्सबर्ग येथें पहिलेंच थिएटर उघडलें, त्याचा सुमारोकोव्ह हा डिरेक्टर होता. दुसरी कॅथेराईन (१७६२-९६) ही स्वत: दांडगी लेखिका असून तिच्या कारकीर्दीत अनेक कवी होऊन गेले; व होमर, पिंडार, होरेस, व्हर्जिल असले मोठाले कवी आपल्या देशांतहि व्हावे अशी तिची फार इच्छा होती. खेमनिट्झर वगैरे अनेक कल्पित गोष्टी लिहिणारे लेखक होऊन गेले. हा प्रकार अनियंत्रित राजसत्ता असलेल्या पौरस्त्य देशांत आढळतो व त्याचाच रशियांत फार सुकाळ माजला. डेनिस व्हान व्हिसिन या जर्मन वंशांतल्या लेखकानें रशियन लोकस्थितीवर औपरोधिक वर्णनें पुष्कळ लिहिलीं आहेत. कॅथेराईनचा राजकवि डेर्झाव्हिन (१७४३-१८१६) याची 'ओड टु गॉड,' 'ओड्स ऑन दि नोबलमन,' 'दि टेकिंक ऑफ इ मेल, ऑफ वारसा' वगैरें काव्यें प्रसिद्ध आहेत.

यावेळीं रशियांतील हलक्या लोकांची स्थिती फार वाईट होती. त्यांचा कैवार घेऊन त्यांनां शिक्षण मिळून सुधारणा व्हावी म्हणून लिहिणारे व राजकर्त्यांनां दोष देणारे कांहीं निघाले. त्यांपैकीं रॅडिचेव्ह व नोव्हिकोव्ह यांनां सरकारकडून हद्दपारी वगैरे शिक्षा भोगाव्या लागल्या, व छापखान्यावर सेन्सॉरशिपहि कडक सुरू झाली.

पुढें अलेक्झांडरच्या वेळीं पुन्हां लेखनस्वातंत्र्य मिळालें. करंझिननें रशियन साम्राज्याचा इतिहास लिहिला व इंग्लिश कवी ग्रे, बायरन, मूर, साऊदे; जर्मन लेखक गॉएटे, शिलर, डहलंड वगैरे लेखकांच्या ग्रंथांचीं भाषांतरें, महाभारतांतील नलदमयंती आख्यान, शाहनाम्यांतील रुस्तुम व शोराबची गोष्ट, ऑडेसीचा कांहीं भाग यांची रूपान्तरें झालीं, पण तीं मूळ ग्रंथावरून न होतां त्यांच्या जर्मन भाषांतरांवरून रशियन भाषेंत घेण्यांत आलीं. नेडिचनें इलियडचें भाषान्तर केलें. कोल्टसोव्ह (१८०९-१८४२) हा खरा राष्ट्रीय कवि होता, याचीं पुष्कळ रसात्मक काव्यें प्रसिद्ध आहेत. झॅगोस्किन वगैरे प्रसिद्ध कादंबरीकार याचे वेळी होऊन गेले. त्यांपैकी जॉगॉल याच्या 'डेड सोल्स' 'ओल्ड फॅशन्ड हाऊसहोल्ड', 'फेअर्स बल्वा' या कादंबर्‍या व 'दि रिव्हायझर' वगैरे नाटकें चांगलीं आहेत. कादंबरीकारांत सर्वश्रेष्ठ असे टगेनीव्ह (१८१९-१८८३) व काऊंट टालस्टॉय हे होत; पैकीं टॉलस्टॉय हा नाटककार व दांडगा तत्त्ववेत्ताहि होता.

इतिहासकार:-कॅरन्झिनच्या वेळेपासून रशियाचा इतिहास लिहिण्याचें काम जोरांत सुरू झालें. सोलोव्हीएनें रशियाचा इतिहास लिहिला. इतरांनीं हॅम्लेट वगैरे शेक्सपिअरच्या नाटकांचीं भाषांतरें केलीं. कोस्टोमॅरेव्हनें 'ओल्ड अँड न्यू रशिया' 'हिस्टारिकल मेसेंजरर्स' व 'दि मेसेंजर ऑफ यूरोप' वगैरे मासिकांत अनेक उपयुक्त लेख लिहिले आहेत. कव्हेलिननें चांगले कायदेग्रंथ तयार केले. रशियेतर देशांकडे इतिहास लेखकांचें प्रथम फारसें लक्ष नव्हतें. तथापि १८५०च्या सुमारास कुडि्टसोव्हनें 'फॉर्चून्स ऑफ इटली' हा ग्रंथ लिहिला. कॅरेयेव्हनें फ्रेंच शेतकर्‍यांची स्थिति हें पुस्तक लिहिलें. झॅबोलिनचीं झार व झारच्या राण्यांचीं खासगी चरित्रें, पेपिनचा स्लॅव्हॉनिक वाङ्‌मयाचा इतिहास, पोलेव्हायचा रशियन वाङ्‌मयाचा इतिहास, बर्गचें पोलिश लोकांचें १८६३ मधील बंड वगैरे पुस्तकें प्रसिद्ध आहेत.
कवि:-नेक्रासोव्ह (मृ. १८७७), ओगॅरीव्ह, मैकोव्ह (१८२१-४७), मेई, केट पोलोन्स्की वगैरे चांगले चांगले कवी या सुमारास होऊन गेले.

भाषाशास्त्रज्ञ:-व्हास्टोकोव्हनें स्लाव्ह भाषाशास्त्रावर अनेक चांगले ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. रशियन लोकांच्या गाण्यांचा संग्रह करण्याचें काम अनेकांनीं केलें आहे. रशियानेतर भाषासंबंधीं मात्र फारसे ग्रंथ नाहींत. वॉर्सा युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर मिकुटस्कीं यानें रशियन व स्लाव्ह भाषांच्या कोशाच्या कामाचें साहित्य जमा केलें. नीतिशास्त्र व मानसशास्त्र या विषयांवरील लेखक रशियांत फारसे झाले नाहींत. कांहीं चांगले गणितज्ञ मात्र झाले आहेत. सृष्टिशास्त्राच्या बाबतींत नॅचरल हिस्ट्र्री सोसायटी ही मास्को येथील संख्या बरीच प्रसिद्धिस आली आहे.

अलीकडील वाङ्‌मय:-१९ व्या शतकांत डॉस्टॉव्हस्की, विर्सेस्की, टुर्गेनीव्ह, गॉचेराव्ह, ऑस्ट्रोव्हस्की, साल्टिकोव्ह वगैरे मोठमोठे विद्वान होऊन गेले. लिओ टॉलस्टाय हा आतां सर्वांस माहीत आहे. त्याच्या कादंबर्‍या प्रसिद्ध आहेतच, पण मानवी जीवितासंबंधाच्या त्याच्या विचारांमुळें त्याची जगभर प्रसिद्धि झाली आहे. आयुस्टीन, मैकोव्ह, पोलोन्स्की यांचेंहि नांव रशियांत सर्वतोमुखीं झाले आहे. मेरेझकोव्होस्की याच्या ऐतिहासिक कादंबर्‍या फार प्रसिद्ध आहेत. अलेक्सिस टॉलस्टॉय याच्या 'ईव्हॅन दि टेरिबल' बद्दलच्या उत्तम नाटकानंतर चांगली नाटकें रशियांत फारशीं झाली नाहींत.
इतिहास:-इतिहासग्रंथ लिहिण्यांत रशियन लोकांनी बरेंच कौशल्य दाखविलें आहे. सोलोनव्हि, कोस्टोमरोव्ह, मिलूकोव्ह, बिल्बसोव्ह वगैरे लोकांनीं ऐतिहासिक मासिकें चालविलीं व ग्रंथ लिहिले. मोलुबिनस्वीनें रशियन चर्चचा इतिहास लिहिला. कोव्हेल्स्कीनें 'एकॉनमिक डेव्हलपमेंट ऑफ यूरोप' हा ग्रंथ लिहिला. तथापि सामान्यत: रशियन लेखकांचें देशांतील राजकीय व सामाजिक स्थितीवर पुस्तकें लिहिण्याकडे फारसें लक्ष नाहीं.

शेवटीं रशियांतील इतर भाषांतील वाङ्‌मयासंबंधानें थोडेसें लिहूं. रशियांत थोरले रशियन, धाकटे रशियन व गोरे रशियन असे भेद आहेत. धाकटया रशियन लोकांत कविता फार प्रसिद्ध आहेत. यांतील गाणीं (१) पूर्वीच्या राजांविषयीं, (२) कोसॅकांविषयीं व (३) हेडामॅकविषयीं, अशीं तीन प्रकारचीं आहेत.

धाकटया रशियनांच्या लिखितवाङ्‌मयाचा पाया कोटलीरेस्कीनें घातला. कीव्हच्या राज्यांत शेव्हचेंको हा खरा राष्ट्रीय कवि होऊन गेला. त्याचें आयुष्य फार वाईट गेलें. त्याचें वर्णन त्यानें आपल्या आत्मचरित्रांत दिलें आहे. तो उत्तम कवि असून चित्रकारहि होता. युक्रेनच्या प्राचीन काळचें वर्णन यानें उत्तम केलेलें आहे. इतर ग्रंथकारांमध्यें मॅडम यूजेनिया मार्कोव्हीच ही प्रसिद्ध होऊन गेली. शब्दकोश व व्याकरणहि त्या भाषेंत लवकरच तयार झालें.

गोर्‍या रशियनांच्या भाषेंत थोडीं गाणीं, बायबलांतील भागांचें भाषान्तर, कांहीं कायदेविषयक लेखन, शब्दकोश वगैरे फारच थोडी पुस्तकें आहेत. सर्वांत हीच भाषा मागें पडली आहे.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .