विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रहिमतपूर - मुंबई, सातारा जिल्ह्याच्या कोरेगावं तालुक्यांतील एक गांव. हें सातारा शहराच्या आग्नेय दिशेस १७ मैलांवर आहे. हें व्यापारी ठिकाण असून गुरुवारी व शुक्रवारी येथें बाजार भरत असतो. ह्या ठिकाणीं एक मशीद व रणदुल्लाखाना नांवाचा घुमट आहे.