प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

राकेल तेल - राकेल तेल हा शब्द रॉक्(खडक)+ऑईल (तेल)-राकॉईल ह्याचा अपभ्रंश आहे. ह्याला घासलेट किंवा 'मातीचे तेल' (हिंदींत 'मट्टीका तेल') असेंहि म्हणतात. आज पेट्रोल म्हणून जें तेल मोटारला वापरण्यांत येतें तें शुद्ध राकेलच होय. हें तेल फार पुरातन काळापासून प्रचारांत आहे. चीन देशांत प्राचीन काळापासून ह्याचा बत्तीकडे आणि सर्पणाकडे उपयोग करीत असत. नोहानें आपली होडी ह्याच तेलाच्या डांबरानें ररंगविल्याच ख्रिस्ती पुराणांतरी उल्लेख सांपडतो. ज्या ज्या देशांत ह्या तेलाचे झरे आहेत त्या त्या देशांतील रानटी लोक ह्या झर्‍यांनां दैवत मानून भजत असत व मांत्रिक (लोक) ह्या तेलानें लोकांनां औषधोपचार करीत. या तेलांतील एक प्रकारच्या द्रव्याचा धूर आपोआप पेटतो व अशा पेटलेल्या ज्योती असलेलें रशियांतील बाकूजवळील ठिकाण ह्या चमत्कारामुळें पारशी लोकाचें क्षेत्र झालें आहे. त्याचप्रमाणें दलदलीच्या वगैरे ठिकाणीं रात्रीं दिसणार्‍या दिवटया किंवा मशाली ह्याहि वरील पेटलेल्या धुराचेच प्रकार होत. हें तेल पृथ्वीच्या पाठीवर बहुतकरून सर्व ठिकाणीं थोडयाबहुत प्रमाणांत सांपडतें. तरी त्यांतल्यात्यांत उत्तरअमेरिका व रशिया हीं दोन मुख्य ठिकाणें आहेत. आपल्याकडे हें तेल इराणांत व ब्रह्मदेशांत सांपडतें. हल्लीं खुद्द हिंदुस्थानांत पंजाबांत त्याच्या खाणी आहेत. १९२१ सालीं जगांत ७५९०००००० बॅरेल तेल निघालें; पैकीं शेंकडा ६१.९ अमेरिकेच्या संयुक्तसंस्थानांत व मेक्सिकींत शेंकडा १९.३ निघालें.

साधारणपणें हा पदार्थ पृथ्वीच्या पोटांतील आहे व तेथून तो बाहेर काढावा लागतो. परंतु क्चचित् प्रसंगी तो भुसभुशीत जमिनीमधून आपोआप देखील बाहेर येतो. आणि मग तो द्रवरूप असल्याकारणानें पाण्याच्या झर्‍याप्रमाणें जमिनीवर वाहूं लागतो. केव्हां केव्हां हा पदार्थ कोळशाच्या खाणींत कोळशाच्या थरांमधून ओघळतांना आढळतो. राकेल हें ४०० पासून ५००० फुटांपर्यंतच्या जमिनींतील थरांमध्यें सांचलेलें असतें; परंतु हें थर सारखे सपाट पसरलेले नसतात. राकेल तेल ज्वालामुखी पर्वताच्या आसपास सांपडत नाहीं. ग्रेटब्रिटनचीं बेटें ज्वालामुखीच्या घडामोडीमुळें उद्धवलेलीं असल्याकारणानें त्या बेटांत राकेल सांपडत नाहीं. त्याच कारणामुळें आपल्याइकडे देशावरहि हें सांपडण्याचा संभव कमी आहे. परंतु पंजाबांत तेथील भूगर्भीय स्थितीमुळें तें सांपडूं शकतें.

ह्या तेलाच्या उत्पत्तीबद्दल तज्ज्ञांचें ऐकमत्य नाहीं. कोणी म्हणतात कीं हें तेल पाणी व धातूंचे कार्बाइड यांच्या मिश्रणानें होतें, तर कित्येकांचें असें म्हणणें आहे कीं, लांकडावर किंवा दगडी कोळशावर पाण्याची रासायनिक क्रिया होऊन हें तेल बनतें. आणखी तिसरें असेंहि मत आहे कीं, मेलेले मासे वगैरेंच्या मोठमोठाल्या राशी कुजून प्रथम त्यांतील नायट्रोजनचा भाग निघून जाऊन नंतर त्यांचें तेलांत रूपांतर होतें. ह्या धंद्याचा आदिजनक जेम्स यंग नांवाचा इंग्लिश सुताराचा मुलगा होय. सुतारकाम शिकत असतां फांवल्यावेळीं तो रसायशास्त्र शिकत असे. ह्याच्याकडे एकदां एका गृहस्थानें कोळशाच्या खाणींतून वाहणारा काळा चिकट पदार्थ आणून दिला व त्यात काय आहे हें तपासण्यास सांगितलें. तपासाअंतीं असें आढळून आलें कीं, त्याच्यापासून राकेल उत्पन्न होतें. हा यंगचा शोध अमेरिकेंत कळतांच त्या लोकांत बरीच खळबळ उडाली. कारण हा शोध म्हणजे त्या लोकांस जणूं काय परीसच सांपडल्यासारखें झालें. पहार मारून तेल काढण्याच्या कामीं कर्नल ड्रेक हें गृहस्थ पहिले होत. याप्रमाणें जमिनींतून तेल काढून त्याचा उपयोग काय अशी पुष्कळांनां नंतर काळजी पडूं लागली. कारण त्यावेळेस पणतीच्या दिव्यासारखे दिवे वापरीत असत व त्यामुळें ज्योत संथपणें तेवत नसे व हें तेल जळतांना अतिशय धूर निघत असे. ह्या दोन दोषांमुळें राकेलचा खप फार होत नसे परंतु त्या लोकांच्या सुदेवाने सॅम्युएल कीर नावाच्या गृहस्थाने चिमणीचा दिवा तयार केल्यामुळे वरील दोनहि त्रास नाहींसे झाले व तेलाचा खप झपाटयानें वाढत चालला. सध्यां हें तेल आगगाडया, जहाजें, विमानें वगैरेचीं एंजिनें चालविण्यास वापरतात. त्यामुळें राकेलचा आज खप पुष्कळ पटीनें वाढला आहे.
हें तेल मिळेल अशी जागा शोधून काढणें म्हणजे एक धाडसाचें व हालअपेष्टेचें कार्य आहे. जागा शोधण्यास जी मंडळी निघते त्यांमध्यें एक भूगर्भशास्त्रज्ञ एक इंजिनियर व एक शोधक असे तीन गृहस्थ असावेच लागतात. ह्या त्रयीच्या मदतीस हल्लीं एक यंत्र निघालें आहे तेंहि असतें. ह्या यंत्रामुळें आतां तेलाची जागा अचुक शोधून काढितां येतें. हें यंत्र, हल्लीं जें शेतकीखात्याचें पाणी शोधण्याचें यंत्र आहे त्याप्रमाणेंच असतें.

राकेल तेल वर नमूद केल्याप्रमाणें ४०० पासून ५००० फुटांपर्यंत लागतें. व एक पहार मारण्यास ३०० पासून १५०००० रुपयेपर्यंत पहारीच्या खोलीप्रमाणें कमी जास्त खर्च येतो. पहार मारण्याची तर्‍हा ही आपल्याकडे विहीर खणतांना पहार मारतात त्याप्रमाणेंच आहे. फरक इतकाच कीं आपल्याकडे पहार हातानेंच मारतात व ही पहार यंत्रानें गिरमिटासारखी मारतात. ह्यामुळें हें काम लवकर व सोपें जातें.
नवीन झरे (विहिरी) खणण्याचा धंदा म्हणजे एक तर्‍हेचा सट्टाच आहे आणि ह्यांत श्रीमंत लोकच बहुतकरून पडतात. पहार तेलाच्या वाळूला पोंचली हें पुष्कळ वेळां अतिशय जोराचें तेलाचें कारंजें उडूं लागल्यानें दृष्टोत्पत्तीस येतें, तर कित्येक वेळां आंतील पदार्थ हळू हळू सावकाश बाहेर येऊं लागून आणाला पृथ्वीवर येण्यास मार्ग झाला असें सुचवितो. परंतु त्याची ही मंदगति असते. ती गति वाढविण्याचा प्रयत्‍न तेलाची खाण सुरुंग लावून उडविणें हा होय. ह्यास इंग्रजींत शूटिंग अथवा टॉर्पेडोइंग म्हणतात. हें काम जवळ जवळ विहिरींतील सुरुंग लावण्याप्रमाणेंच असतें. तेल खाणींतून बाहेर उपसण्याच्या निरनिराळ्या तर्‍हा आहेत. विहिरीतून बाहेर आलेलें तेल फार अशुद्ध असतें. त्याचा रंग काळसर किंवा हिरवट असा असतो व त्याला घाणहि येत असते. अशा स्थितींत तें तेल वापरणें शक्य नसतें; म्हणून तें शुद्ध करावें लागतें. ह्या शुद्ध करण्याच्या कृतींत पहिली गोष्ट म्हटली म्हणजे तेल वर येतांना त्याच्याबरोबर अजमासें ५० टक्के वाळू आलेली असते व त्याचप्रमाणें त्यांत पृथ्वीच्या पोटांतील दाबामुळें त्या तेलाचा धूर (वाफ) हि जिरलेला असतो. ह्या दोन वस्तू प्रथमारंभी दूर केल्या जातात. ही कृति कांहीं अवघड नाही. विहिरीजवळील डबक्यांत जेव्हां तेल प्रथम सांठवितात तेव्हांच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार जड रेती आपोआप तळाशी बसते व हलकी वाफ (धूर) हवेमध्यें उडून जाते. नंतर अशा रीतीनें निर्मळ झालेलें तेल सांठविण्याच्या टाक्यांत नेलें जातें व तेथून शुद्ध करण्याच्या कारखान्यांत येतें.

हें अर्धवट शुद्ध झालेलें तेल ऊर्ध्वपातनक्रियेनें पूर्ण शुद्ध करून घेतात. ठोकळमानानें राकेलाच्या तीन जाती आहे. (१) या जातींत सरतेशेवटी सफेत मेणबत्त्यांचें मेण राहतें. (२) या जातींत आपल्याकडे जमिनींत सांपडणारा डांबरासारखा काळा पदार्थ राहतो. त्याला इंग्रजींत अ‍ॅस्फाल्ट म्हणतात. ह्या अ‍ॅस्फाल्टच्या मोठमोठाल्या खाणी आहेत. (३) तिसर्‍या जातींतील तेलांत गंधक मिसळलेला असतो. ह्या तेलांत व पहिल्या दोन प्रकारांत कांहीं फरक नसतो.

अशुद्ध तेल वर सांगितल्याप्रमाणें कांहीं हिरवट कांहीं पिंवळसर तर बरेंचसें मधासारखें काळें असतें. ह्या तेलाच्या शुद्धीकरणांत ठोकळमानानें तीन प्रकारांनीं पृथक्करण करतात:- (१) भडका घेणारें तेल, (२) दिव्यांत जाळण्याचें, (३) वंगण वगैरेंस उपयोगांत येणारें.

हें पृथक्करण करतांना पहिल्या दोन प्रकारचें तेल निरनिराळें सांठवितात व नंतर तिसर्‍या प्रकारचें तेल तसेंच भांडयांत ठेवून भट्टीची आंच कमी करतात. त्यामुळें अशुद्ध तेलांतील वाफ होऊन लवकर उडून जाणारा अंश निघून गेल्यामुळें राहिलेलें तेल सांखावयास लागतें व मुख्यत्वेंकरून त्यांतील पॅराफिन मेण हें तुपाप्रमाणें कणीदार बनून सांखतें. हें मेण बाकीच्या चिकट तेलापासून अलग करण्याकरितां गोणपाटाच्या पिशव्यांतून पुष्कळ दाब देऊन गाळतात. म्हणजे मेण आंत रहातें व वंगणाचें तेल वगैरे गोणपाटामधून बाहेर पडतें. बाकीच्या राहिलेल्या सांक्यामधून नानातर्‍हेचे रासायनिक प्रयोग करून तेलाचा जितका म्हणून अंश मिळणें शक्य आहे तितका काढून घेतात व अशा रीतीनें यांतून कांहीं फुकट जाऊं देत नाहींत.

राकेलपासून जवळ जवळ दोनशें निरनिराळे पदार्थ तयार करतात. वर नमूद केलेलया तीन प्रकारांच्या प्रत्येकीं निरनिराळ्या प्रकारच्या जाती पडतात: पहिल्याचे क, ख, ग असे मुख्य तीन भाग आहेत. (क) ह्या जातीचें तेल, स्टोव्हकरितां, व्हार्निश, मेणकापड इ. बनविण्यास आणि विमानें व शर्यतीच्या मोटारी चालविण्यास वापरतात. (ख) ह्या जातीचें तल त्याचा वास घालवून नंतर औषधांच्या कारखान्यांत, रसायनांत आणि कपडे धुण्याकडे वापरतात. परंतु ह्या तेलाचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे तें हल्लीं मोटार स्पिरिट म्हणून वापरलें जातें. (ग) हा प्रकार छापण्याची शाई व कापडाचे व तेलाचे रंग बनविण्यास टरन्पेन्टाईनच्या ऐवजीं वापरतात.

दुसर्‍या प्रकारचें तेल दिवाबत्तीमध्यें जाळण्यास वापरतात हें सर्वांनां माहीत आहे. याची किंमत त्याचा रंग व पेट घेण्याचें प्रमाण यांवर अवलंबून असते.

तिसर्‍या प्रकारचें तेल पहिल्यानें गाळून त्याच्यापासून वंगणाचें तेल वेगळें करतात. हें निराळें केल्यानंतर आपल्या नेहमींच्या प्रचारांतलें व्हॅसलीन शिल्लक राहतें. ह्या व्हॅसलीनचा रंग गाळण्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जितकें जास्त वेळां गाळावें तितका रंग जास्त खुलतो म्हणजे सफेत होत जातो. अशा रीतीनें तयार केलेलें स्वच्छ कणीदार व्हॅसलीन बाजारांत साधारणपणें १२ आणे रत्तल ह्या भावानें कांहीं दिवसापूर्वी मिळत असे.

वरील निरनिराळ्या रीतींनीं निरनिराळीं तेलें वेगळीं केल्यानंतर सरतेशेवटीं मेण राहतें. ह्या मेणाच्या दोन तर्‍हा आहेत; एक अगदीं घट्ट असतें व दुसरें जरा मऊ असतें.
राकेलच्या कांहीं प्रकारांचा अत्तारें (सेंटस्) काढण्यांतहि उपयोग केला जातो. त्याचप्रमाणें फळें वगैरे जास्त दिवस टिकण्याच्या कामीं एक प्रकारच्या राकेलची मदत होते. काडयांच्या पेटया करण्याकडे मेणाचा उपयोग करतात हें महशूरच आहे. काडी लवकर व शेवटपर्यंत पेटत जावी म्हणून प्रथम ती राकेलच्या मेणांत बुडवितात व नंतर तीवर बोंड लावितात.

अगदीं सरतेशेवटीं जो गाळ राहातो तो तेलाच्या जातीवर अवलंबून असतो. हा गाळ दोन प्रकारच्या असतो. एका प्रकारच्या तेलांत कोळसा रहातो व हा विजेच्या दिव्याकडे वापरण्यांत येतो. दुसर्‍या तेलाच्या जातींतून मागें सांगिलेला अ‍ॅस्फाल्ट असतो. हा रस्ते बनविण्याकडे वापरतात. परंतु पुष्कळ वेळां ह्या अ‍ॅस्फाल्टपासून दोन तर्‍हेचे अ‍ॅस्फाल्ट बनवितात; त्यांपैकीं एक घट्ट असतो. पहिल्या प्रकारचा अ‍ॅस्फाल्ट विजेच्या तारा करण्याकडे वापरतात व दुसरा पातळ पदार्थ रस्त्यावर शिंपण्याकडे वापरतात. ह्यामुळें रस्त्यावरची धूळ बसते. ह्याच्या ऐवजीं पूर्वी धुराच्या कारखान्यांतील धुराचें पाणी वापरीत असत. परंतु त्यापासून जिकडे तिकडे फार घाण पसरत असे व त्यामुळें लोकांनां त्रास होई. म्हणून हल्लीं वरील पदार्थांचा उपयोग करण्यात येतो.

राकेलचा मुख्य खप निरनिराळ्या तर्‍हांनीं एंजिनांत वापरण्याकडे हातो. तरी ह्या तेलापासून खाण्याचे पदार्थ करण्याकडे रसायनशास्त्रज्ञांचे उोळे व विचार व प्रयत्‍न लागले आहेत. त्यांतल्यात्यांत मुख्य प्रयत्‍न कृत्रिम लोणी करण्यासंबंधीं चालू आहेत. [लोकशिक्षण, वर्ष ६, अं. १-२; हेन्री-ऑइल फील्डस ऑफ दि एंपायर; रेडवुड-पेट्रोलियम]

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .