प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

राग व ताल - राग हा शब्द रंज म्हणजे रंजविणें, आनंद देणें ह्या धातूपासून निघालेला आहे. ह्या धात्वर्थच्या अनुरोधानें संगीतशास्त्रांतील 'राग' हा पारिभाषिक शब्द साधिला आहे. प्राचनी संगीतरत्‍नाकरादि संस्कृत ग्रंथ संगीताचे 'मार्गसंगीत' व 'देशीसंगीत' असे दोन भेद मानितात; त्याचप्रमाणें रागाचेहि 'मार्गराग' व 'देशीराग' असे दोन भेद करतात. मार्गराग.-स्वर, ग्राम, वर्ण, अलंकार इत्यादि गोष्टीसंबंधानें घातलेला निर्बंध ज्यांत कोणत्याहि प्रकारें फिरवितां येत नाहीं त्यांस 'मार्गराग' अशी संज्ञा आहे. हे मार्गराग आज प्रचलित नाहींत, एवढेच नव्हे तर त्यांचा प्रचार लुप्त होऊन अनेक शतकें झालीं आहेत.

देशीराग.-'देशीरागा' ची व्याख्या रत्‍नाकरकार अशी करतात:-'येषा श्रुतिस्वरग्रामजात्यादि नियमोनहि। नानादेशतच्छाया देशीरागास्तु ते स्मृता: ॥' श्रुति, स्वर, ग्राम इत्यादि गोष्टीसंबंधानें ज्यांत निर्बंध घातले नसून जे निरनिराळ्या देशांच्या अभिरुचीप्रमाणें रंजक होतात त्यांस 'देशीराग' अशी संज्ञा आहे. रत्‍नाकरकारानें केलेल्या रागांच्या दहा वर्गांपैकीं रागांग, भाषांग, क्रियांग व उपांग या चार वर्गांत देशी रागांचा समावेश केला आहे. या रागास रत्‍नाकरकारानंतर झालेल्या ह्या शास्त्रांवरील संस्कृत ग्रंथकारांनीं, त्याच समुच्चयसंज्ञा स्वीकारल्या आहेत. रत्‍नाकरकार व त्यानंतर झालेले संस्कृत ग्रंथकार ह्यांनीं आपल्या ग्रंथांत 'देशीराग' म्हणून जे राग सांगितले आहेत, त्यांचें गायन त्यांनीं ग्रंथांमध्यें वर्णन केल्याप्रमाणें आज कोठेंहि प्रचलित असलेलें दृष्टीस पडत नाहीं, म्हणून येथें त्यांचाहि विचार कर्तव्य नाहीं. तेव्हां हल्लीं हिंदुस्थानी संगीतपद्धतीमध्यें समाविष्ट होऊन प्रचलित असणार्‍या रागांविषयी विचार झाला पाहिजे हें उघड आहे.

शौरिंद्रमोहन टागोर, कृष्णधन बानर्जी या दोन संगीतशास्त्रांनीं आजचें संगीत ग्रंथीं उतरविण्याचा यत्‍न केला पण तो बंगालपुरताच होता. मौलाबक्ष व विष्णु दिगंबर यांनीहि उत्तरहिंदुस्थानी संगीताचे राग मांडण्याचा प्रयत्‍न केला. पण या सर्वांपेक्षां अत्यंत परिश्रमानें आणि शास्त्रज्ञाच्या पद्धतीनें प्रचलित रागांचें व्याख्याबंधन करणारा संशोधक म्हटला म्हणजे रा. भातखंडे (चतुरपंडित) हे होत.
राग पाडण्यांत, ते विशिष्ट स्वरांच्या महत्त्वावरून व त्यांतील विशिष्ट प्रकारच्या आरोहावरोहावरून पाडण्यांत येतात. आरोहावरोहाचा विशिष्टपणा, ते स्वर ४ घेतले आहेत कीं पांच घेतले आहेत कीं सहा घेतले आहेत यावरून ठरेल. तसेंच स्वरांच्या तीव्रकोमलत्वावरूनहि रागाचें वैशिष्टय ठरतें. याखेरीज स्वरांच्या अनुक्रमांत जर फरक केले तर तेवढयानें राग बदलत नाहीं; चाल बदलेल एवढेंच. आणि येणेंप्रमाणें एका रागांत अनेक चालींचा समावेश होऊं शकेल.

स्वरांचे समूह निरनिराळ्या प्रकारांनीं होतात, त्यांपैकी विशिष्ट प्रकारच्या स्वरसमूहांस थाट अगर मेळ म्हणतात आणि या थाटांपैकी रंजकतेच्या दृष्टीनें निवडक अशा सम्मुचयांस राग म्हणतात. थाट ही संज्ञा स्वरविषयक गणित्याची आहे तर राग ही संज्ञा संगीतज्ञाची आहे.

संगीताचा व्यवहाराशीं अत्यंत निकट संबंध असल्यामुळें शास्त्रास गणिती कांटेतोलपणा कधींच आला नाहीं व येणारहि नाहीं. एखाद्या रागांत अमुक स्वर असावेत, अमुक प्रकारचा आरोहावरोह असावा, आणि अमुक वादी-संवादी असावेत हें ठरलें तरी त्या रागांत विशिष्ट चीज म्हणणारा गायक आपल्या कौशल्यानें काहीं बदल करील. कर्णमाधुर्य कायम ठेवील व तसें करण्यानें रागाच्या महत्त्वाच्या अंगामध्येंहि जरी फरक झाला, तरी लोकामध्यें ती चीज विशिष्ट रागांतच म्हटली अशी प्रसिद्धि राहील, मग ती संगीतशास्त्राच्या गणिती दृष्टीनें निराळ्या वर्गांत पडत असली तरी हरकत नाहीं. तो अमुकच रागाचा प्रकार आहे, अशी लोकांची समजूत रहाणार आणि या क्रियेनें रागांत फरक होत जाणार. असा फरक होत होतच संगीतशास्त्र बदलत चाललें आहे. व रागलक्षण जुन्या ग्रंथांप्रमाणें एक व आजच्या प्रचाराप्रमाणें निराळें अशीं क्रिया वांरवार झाली आहे.

येथें पुढें दिलेलीं विशिष्ट रागवर्णने रत्‍नाकर व पारिजात इत्यादि ग्रंथांतील न देतां हल्लीच्या प्रचाराला धरून दिली आहेत. ती रा. भातखंडे यांच्या ग्रंथास धरून आहेत.राग, स्वर, थाट इत्यादि पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या मात्र जुन्याच आहेत.

गायनांतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हटला म्हणजे 'राग' होय. रागांस त्यांमध्यें असणार्‍या मनोरंजकतेमुळें महत्त्व प्राप्त झाले; म्हणून 'रंजयतीती राग:' असें कोणी रागाचें लक्षण करतात ते एका अर्थी योग्यहि आहे.

रागांचें लक्षण:- ''योSयं'' ध्वनीविशेषतु स्वरवर्णविभुषित: । रंजको जनचित्तानां स राग: कथितो बुधै: ॥'' (राग म्हणजे ध्वनींची अशी एक विशिष्ट रचना कीं, जिला स्वर व वर्ण ह्यांच्या योगानें सौदर्य प्राप्त झालें असून, ती जनचित्ताचें रंजन करते). रत्‍नाकरानें उल्लेखिलेल्या ह्या मतंगाच्या केलेल्या रागाच्या लक्षणांत 'स्वर' व 'वर्ण' हे शब्द पारिभाषिक आहेत. 'स्वर' म्हणजे 'वादीस्वर'. हा शब्द जर या लक्षणांत नसता तर सर्व 'अलंकारांचा' या लक्षणांत अंतर्भाव झाला असता. यद्यपि अलंकार हे रंजक आहेत तथापि 'वादी' स्वराची त्यांस अपेक्षा नसते; परंतु 'वादी' स्वरांवाचून राग मात्र होऊं शकत नाहीं, म्हणूनच 'रागोत्पादनशक्तेर्वदनं तद्योगतो वादी' हें 'वादी' स्वराचें लक्षण सार्थ आहे. तसेच रागाच्या लक्षणांत 'वर्ण' शब्द आल्यामुळें 'थाट' अथवा मेळ' हे रागापासून साहजिक निराळे झाले आहत. कारण थाटांस वर्णाची अपेक्षा नसते. 'वर्ण'. याचा अर्थ 'आरोहावरोह'. थाट.-हे रागाचे जनक आहेत म्हणून त्यांच प्रथमत: विचार होणें इष्ट आहे. 'थाट' अथवा मेळाचें लक्षण मेल: स्वरसमूह: स्याद्रागव्यंजनशक्तिमान्' (रागोत्पत्तिाकारक स्वररचनेस मेळ म्हणतात) असें आहे.

'मेळ' म्हणजे स्वरसमूह; तेव्हां स्वरसमूहात्मक जी मेळसंख्या, ती स्वरसंख्येवर अवलंबून असणार हें उघड आहे. सात ही शुद्ध स्वरसंख्या सर्वसंमत आहे पण विकृत स्वरांच्या संख्येविषयीं ग्रंथकारांचा मतभेद दृष्टीस पडतो. ह्यामुळें मेळसंख्या निरनिराळ्या होणे साहजिक आहे. विकृत स्वरांची संख्या कोणी बावीस, कोणी पंधरा, कोणी सात, व कोणी पांच मानतात. ह्यामुळें सत्पकांतील स्वरांची संख्या कोणाची (७+२२) = २९; कोणाची (७+१५) = २२; कोणाची (७+७) =१४; व कोणाची (७+५) =१२; अशी झाली. परंतु पंधराव्या शतकापासून आज तागायत एका सप्तकांतील स्वरांची संख्या (७+५) =१२ अशी मानण्याचा प्रचार सर्वसंमत चालत आला आहे; हें केवळ दक्षिणी संगीतज्ञांचें मत नसून औदीच्यांचेंहि आहे. म्हणून त्याचाच स्वीकार करूं. एका सप्तकांतील बारा स्वरांपासून मेळसंख्या किती होते हें पाहणें इष्ट व योग्य आहे.

थाटोप्तत्ति.-ही बारा स्वरांच्या प्रस्तारक्रियेंत विशिष्ट निवड होऊन झाली. व याप्रमाणें ७२ मेळ झाले आहेत. त्याचें स्पष्टीकरण पुढील प्रमाणें. येथें स्वराक्षराखालील आंडंवी रेघ स्वरांचें कोमलत्व दर्शवितें: तसेंच स्वराक्षरावरील बिंदु तारसप्तक दर्शवितो व मध्यमाच्या डोक्यावरील उभी रेघ तीव्रत्व दाखविते. एका सप्तकांतील रागोपयोगी बारा स्वर:-

सा रीरी गग ममं प धध निनि.
सोईसाठीं यांतील तीव्र मध्यम स्वर काढून त्यांत तारषड्ज सामील केला म्हणजे बारा स्वरांची पंक्ति अशी होते:
सा रीरी गग म प धध निनि सां.

या बारा स्वरांचे मध्यम स्वरावर दोन भाग केले तर ते असे होतात:-
सा रीरी गग म ... ... पूर्वार्ध
प धध निनि सां ... ... उत्तारार्ध.

आतां या पूर्वार्धांतून दर वेळेस चारचार स्वर क्रमानें घेतले तर एकंदर सहाच मेलार्ध होतात ते असे:-
(१) सा री री म (४) सा री ग म
(२) सा री ग म (५) सा री ग म
(३) सा री ग म (६) सा ग ग म

त्याचप्रमाणें सप्तकाचा जो उत्तारार्ध त्यांतूनहि सहाच मेलार्ध निघतात ते असे:-
(१) प ध ध सां (४) प ध नि सां
(२) प ध नि सां (५) प ध नि सां
(३) प ध नि सां (६) प नि नि सां

आतां संपूर्ण शक्य मेळ उत्पन्न करण्यासाठीं पूर्वार्धमेळांचा व उत्तारार्धमेळांचा संयोग असा करावयाचा कीं, प्रत्येक पूर्वार्धमेळाशीं प्रत्येक वेळी सहा सहा उत्तारार्धमेळ जोडून द्यावयाचे ते असे:-
(१) सा री री म, प ध ध सां.
(२) सा री री म, प ध नि सां.
(३) सा री री म, प ध नि सां.
(४) सा री री म, प ध नि सां.
(५) सा री री म, प ध नि सां.
(६) सा री री म, प नि नि सां.

असे पूर्वार्धमेल सहा असल्यामुळें एकंदर संपूर्ण वाट (६x६=) ३६ होती. या सर्व ३६ मेळांत मध्यम स्वर शुद्ध आहे, तो काढून त्याच्या जागीं तीव्रमध्यम घालीत गेलें असतां दुसरे ३६ मेळ उत्पन्न होतील. येणेंप्रमाणें उत्पन्न झालेले हे ७२ मेळ सर्व रागांचे उत्पादक किंवा जनक आहेत असें ग्रंथकार प्रतिपादन करतात, व तयांतून उत्पन्न होणार्‍या रागांस 'जन्यराग' अशी संज्ञा देतात.
ह्या थाटांचे आरोहावरोह दृष्टीनें नऊ प्रकार संभवतात ते असे:-
(१) संपूर्ण-संपूर्ण. (६) षाडव-औडुव.
(२) संपूर्ण-षाडव. (७) औडुव-संपूर्ण.
(३) संपूर्ण-औडुव. (८) औडुव-षाडव.
(५) षाडव-षाडव. (९) औडुव-औडुव

ह्याप्रमाणें थाटसंख्या ७२ व प्रत्येक थाटाचें प्रकार ९ अशी स्थिति झाली; ह्या पुढें, अशा प्रकारच्या एका थाटांतून आरोहावरोह दृष्टीनें किती राग संभवतात तें खालीं दिलें आहे.
(१) संपूर्ण-संपूर्ण ... ... १
(२) संपूर्ण-षाडव ... ... ६
(३) संपूर्ण-औडुव ... ... १५
(४) षाडव-संपूर्ण ... ... ६
(५) षाडव-षाडव ... ... ३६
(६) षाडव-औडुव ... ... ९०
(७) औडुव-संपूर्ण ... ... १५
(८) औडुव-षाडव ... ... ९०
(९०) औडुव-औडुव ... ... २२५

एकूण, एका थाटांतील रागसंख्या ४८४ झाली. एकंदर थाट ७२ म्हणून एकुंदर रागसंख्या ३४८४८ संभवते, तसेंच वादी स्वराच्या दृष्टीनें, ही संख्या पुष्कळच वाढणार; हें पाहूनच प्राचीन ग्रंथकरांनीं 'अनंता वै रागा': असें म्हटलें, तें योग्यच होय. पण ही केवळ गणितदृष्टि झाली. रंजकता हा जो रागाचा मुख्य गुण त्या दृष्टीनें विचार केला असतां ही रागसंख्या पुष्कळच मर्यादित होते.
रागांचें वर्गीकरण.-निरनिराळ्या काळचे ग्रंथकार रागांचें वर्गीकरण आपआपल्या इच्छेप्रमाणें करीत आले आहेत. रागांचें वर्गीकरण करतांना गणिताचें तत्त्व फारच क्रमानें शिरत गेलें, तें प्रथम सोळाव्या शतकांत स्वरमेलकालनिधि व तरंगिणी या ग्रंथांनीं प्रचलित केलें. रत्‍नाकराचें वर्गीकरण कोणत्या तत्त्वावर आहे हें समजत नाहीं हनुमन्मतकार व पुंडरीकविट्ठल इत्यादि ग्रंथकारांच्या वर्गीकरणांत रूपकाचा भास किंवा आभास होतो. व मनुष्यायुष्यावरून रागरुपकें करण्यांत बरेच प्रकार होऊन शेवटी ती वर्गीकरणें बंद झाली व गणितशास्त्र रागवर्गीकरणांत शिरलें. आमचें वर्गीकरण त्याच प्रयत्‍नाची परिणति होय. नि:शकशाङर्गदेवानें आपल्या २६४ रागांची वांटणीं दहा वर्गांत केली आहे ती अशी:-

 वर्गाचें नांव रागसंख्या
 १ ग्रामराग  ३०
 ५ उपराग  ८
 ३ राग  २०
 ४ भाषा  ९६
 ५ विभाषा  २०
 ६ अंतर्भाषा  ४
 ७ रागांग  २१
 ८ भाषांग  २०
 ९ क्रियांग  १५
 १० उपांग  30


शाङ्गदेवानंतर झालेल्या संगीत पंडितांनीं आपल्या रांगांस हें वर्गीकरण लाविलें नाहीं.
काहीं ग्रंथकार रागांचें वर्गीकरण 'पुरुषराग', 'स्त्रीराग,' 'पुत्रराग', 'स्नुषाराग' इत्यादि प्रकारें करतात, तें असें:- हनुमन्मताप्रमाणें रागरागिणीचें वर्गीकरण:-

 पुरुषराग  भार्याराग
 भैरव  मध्यमादि, भैरवी, बंगाली, वराटी, सैधवी
 कौशिक  तोडी, खंबावती, गौडी, गुणक्री, कक्रुभा.
 हिंदोल  बेलावली, रामक्री, देशाक्षी, पटमंजरी, ललिता.
 दीपक  केदारी, देशी, कामोदी, नाटिका, कर्नाटी.
 श्री  वसंती, मालवी, मालश्री, सावेरी, धनाश्री.
 मेघ  मल्लारी, देशकारी, भूपाळी, गुर्जरी, टक्का.

कांहीं संस्कृत ग्रंथकार आम्ही हनुमन्मताप्रमाणें रागांचें वर्गीकरण देत आहों असें म्हणून वर दिलेलें वर्गीकरण आपल्या ग्रंथांत देतात, पण आश्चर्याची गोष्ट अशी कीं, कोणीहि हनुन्ममताचा संगीतावरील ग्रंथ कोणता, याचा उल्लेख करीत नाहीं.


नारदानें चत्वरिंशच्छतरागनिरूपण नांवाच्या आपल्या संगीतावरील ग्रंथांत रागांचें वर्गीकरण पुरुषराग, स्त्रीराग, पुत्रराग, स्नुषाराग इत्यादि सदरांखालीं करून राग-पुरुषांचा संसारविस्तार दाखविला आहे तो येणेंप्रमाणें:-

 

 

रागांच्या कौटुंबिक वर्गीकरणांत नारदानें मात्र पुरुषराग संख्या १० घेतली असून, बाकीचे ग्रंथकार ही संख्या सहाच ठेवतात.
मुसुलमानी अमदानींत अयोध्येच्या आसफउद्दौला नामक नबाबाच्या पदरी असणार्‍या महंमद रेझा नामक मुसुलमान पंडितानें 'नगमाते आसफी' या नावाचा ग्रंथ संगीतावर उर्दु भाषेंत लिहिलेला आहे; त्यांत त्यानें सहा पुरुषराग, व प्रत्येकाच्या सहा सहा स्त्रिया असें वर्गीकरण केलें आहे तें असें;-

 पुरुषराग  स्त्रीराग
 भैरव.   भैरवी, रामकली, गुजरी, खट, गांधारी, आसावरी,
 मालकौंस   बागेसरी, तोडी, देशी, सुहा, सुघराई, मुलतानी.
 हिंदोल.   पूरिया, वसंत, ललित, पंचम, धनाश्री, मारवा.
 श्री  गौरी, पूर्वी, गौरा, त्रिवण, मालश्री, जेताश्री.
 मेघ.  मधुमाद, गौंड, शुद्धसारंग, बडहंस, सामंत, सोरट.
 नट  छायानट, हमीर, कल्याण, केदार, बिहागडा, यमन.

ह्या प्रकारचीं वर्गीकरणें ऐकून कानांचा संतोष होतो, व तीं कल्पनाशक्तीस रुचतात, पण शास्त्रदृष्टया त्यांची सदोषता तेव्हांच ध्यानीं येते. मालकौंस रागाची स्त्री तोडी व भैरवाची बेलावली !! भार्या म्हणून जो राग एकदां सांगितला जातो तोच स्नुषा म्हणून पुनरावृत्त झालेला दृष्टीस पडतो !! म्हणजे अशा प्रकारच्या वर्गीकरणाची रचना कल्पनेनेक्षां कोणत्याहि नियमानें बांधलेली दिसत नाहीं. असो. येथें हेंहि पण स्पष्टपणें नमूद केलें पाहिजे कीं, प्रचारांतील वाडव्यवहारांत अमुक 'राग' व अमुक 'रागिणी' असें म्हणतात, पण कोणीहि ग्रंथकार 'राग' व 'रागिणी' यांमध्यें भिन्नता कशी व कोठें आहे ह्याविषयीं कांहीं लिहीत नाहींत. ह्यावरून त्यांमध्यें भिन्नता नसून हा अयोग्य प्रयोग भाषेंत रूढ झाला आहे असें म्हटल्यावांचून गत्यंतर नाहीं. कोणाची आवड कशीहि असो, पण रागांचें वर्गीकरण वस्तुत: स्वरांच्या धोरणानें करणें शास्त्रदृष्टया सोईचें व योग्यहि आहे. अमुक एखादा जन्यराग अमुक एक थाटांतून निघतो असें म्हणतांच त्याचे स्वर सहजीं ध्यानांत येतात; कारण, थाटांचे स्वर एकदां ठरविलेले असतात. ह्या प्रकारची रागांच्या वर्गीकरणाची सोईस्कर पद्धति पंधराव्या शतकापासून चालत आलेली आहे. निरनिराळे ग्रंथकार आपल्या सोईप्रमाणें कांहीं थाट घेऊन त्यांत आपल्या रागांचें वर्गीकरण करतात; उदाहरणार्थ रागतरंगणीकार लोचनपंडित ह्यानें बारा थाट स्वीकारून त्यांत ८६ जन्यराग सांगितले आहेत; 'स्वरमेलकलानिधि' चा कर्ता पंडित रामामात्य ह्यानें वीस थाट स्वीकारून चौसष्ट जन्यराग सांगितले आहेत; सद्रागचंद्रोदयकार पंडित पुंडरीक विठ्ठल ह्यानें १९ थाट स्वीकारून ६५ जन्यराग सांगितले आहेत. रागविबोधकार पंडित सोमनाथ हा २३ थाट स्वीकारतो व त्यांत ७५ जन्यराग सांगतो. चतुर्दण्डीप्रकाशिकाकार व्यंकटेश्वर पंडित हा १९ थाटांत ५७ जन्यराग सांगतो. तंजावरचे राजे तुळजेन्द्रमहाराज हे आपल्या 'सारामृत' ग्रंथांत २१ थट व १०९ जन्यराग सांगतात. बिकानेरच्या अनूपसिंह महाराजांच्या आश्रयास असणारा सभारत्‍न पंडित भावभट्ट ह्यानें आपल्या 'अनूपसंगीतरत्‍नाकर' नामक ग्रंथांत आपल्या रागांची वांटणी २० थाटांत केली आहे. लक्ष्यसंगीतकार चतुरपंडित हा १० थाट स्वीकारून त्यांत आपले जन्यराग सांगतो. ह्यावरून पाहतां थाट पद्धतीची परंपरा मोठी व महत्त्वाची हें सहजीं ध्यानीं येईल. आम्हीहि पण चतुरपंडिताच्या थाटपद्धतीचाच अंगीकार करून हिंदुस्थानी संगीतपद्धतींत प्रचलित असणारे १५० राग त्या १० थाटांत, वर्गीकृत करून त्यांचें वर्णन करीत आहों.
आम्हीं स्वीकारलेल्या दहा थाटांचीं नावें व त्यांचे स्वर, तसेंच त्यांचीं प्राचीन ग्रंथगतनामें व त्यांतून उत्पन्न होणार्‍या जन्य रागांची संख्या, ही पुढें लिहिल्याप्रमाणें आहे:-

 थाटनाम  स्वर  ग्रंथगत.नाम  जन्यराग संख्या
 बिलावल.  सा री ग म प ध नि.  धीरशंकराभरण  २२
 कल्याण  सा री ग मं प ध नि  मेचकल्याणी.  १५
 खमाज.  सा री ग म प ध नि.  हरिकांभोजी.  १३
 भैरव  सा री ग म प ध नि.  मायामालवगौड.  १८
 पूर्वी.  सा री ग म प ध नि.  कामवर्धनी  १२
 मारवा.  सा री ग म प ध नि  गमनश्रिय.  १२
 काफी.  सा री ग म प ध नि  खरहरप्रिय.  ३५
 आसावरी.  सा री ग म प ध नि  नटभैरवी.  ११
 भैरवी.  सा री ग म प ध नि  हनुमत्तोडी.  ७
 तोडी.  सा री ग म प ध नि.  शुभपंतुवराळी.  ५

कोणी अशी शंका घेतात की, हीं थाटांची नांवें रागांचींच दिसतात; तेव्हां राग अधीं कीं थाट अधीं? अशासरखाच प्रश्न धातुपाठांतील गण पाहून पूर्वी कित्येकांनीं विचारिला व त्यास श्रीमान् पाणिनीमुनींनीं जें उत्तर दिलें तें असें:-''भ्वादि चुरादि गण ह्या संज्ञा केवळ वर्गकरणाच्या सोयीसाठीं दिल्या आहेत; तेव्हां धातूंच्या अभावीं गणवर्गीकरण असंभाव्य हें सांगणे नकोच.'' संज्ञा केवळ वर्गीकरणाच्या सोयीसाठी दिलेल्या असतात, हाच न्याय येथेंहि लागू पडतो. रागांचें अस्तित्व असल्यावांचून त्यांचें वर्गीकरण कसें संभवेल !!
ज्या एका रागाचें नांव एका थाटास दिलेलें असतें त्या रागास त्या थाटाचा 'आश्रयराग' असें म्हणतात; व त्या थाटांतून निघणार्‍या इतर रागांस 'जन्यराग' म्हणतात.
समयानुसार रागवर्गीकरण:- (अ) रागांच्या वर्गीकरणाचा आणखी एक प्रकार आहे, तो समयक्रमानुसार होय. दोनप्रहरच्या बारा वाजल्यापासून मध्यरात्रीचे बारा वाजेपर्यंत जे राग गाण्यांत येतात, त्यांस 'पूर्वराग' अथवा 'पूर्वागवादी राग असें म्हणतात' त्याचप्रमाणें रात्रीं बारा वाजल्यापासून दिवसाचे बारावाजेपर्यंत जे राग गाईले जातात त्यांस 'उत्तरराग' अथवा 'उत्तरांगवादीराग' म्हणतात. 'पूर्वागवादी रागा' च्या वादी स्वराचें क्षेत्र षड्जापासून पंचमापर्यंत असतें, म्हणजे तो वादी स्वरसप्तकाच्या त्या पूर्वार्धांत असावयाचा. तसेंच 'उत्तारांगवादी रागां' च्या वादी स्वराचें क्षेत्र मध्यमापासून तारषड्जापर्यंत असतें, म्हणजे त्या रागाचा वादी स्वर त्या सप्तकाच्या त्या उत्तारार्धांत असावयाचा. ह्यावरून हें उघड आहे कीं, मध्यम आणि पंचम हे स्वर 'पूर्वराग' व 'उत्तरराग' ह्या दोहोंचेहि वादी स्वर होऊं शकतात.
(आ) रागांच्या वर्गीकरणाची आणखी एक मार्मिक पद्धति आहे. त्या पद्धतींत रागांच्या स्वरांचा वेळेशीं कसा निकटसंबंध आहे हें खालीं केलेल्या विवेचनावरून स्पष्ट होईल.
प्रचलित हिंदुस्थानी संगतपद्धतींत रागांच्या वर्गीकरणाच्या या प्रकारानें रागांचे तीन वर्ग पडतात, ते असे:-
(१) शुद्ध 'री' 'ध' स्वर लागणारे राग.
(२) कोमल 'री' 'ध' स्वर लागणारे राग.
(३) कोमल 'ग' 'नि' स्वर लागणारे राग.
या तीन वर्गांपैकीं दुसर्‍या वर्गांत येणार्‍या रागांस 'संधिप्रकाशराग' ही संज्ञा आहे. व त्यांचें चिन्ह म्हणजे ऋषभ स्वराचें कोमलत्व व गांधार आणि निषाद या स्वरांचे तीव्रत्व हें होय. हे राग सूर्योदय व सूर्यास्त या वेळीं गाण्यांत येतात. म्हणून 'संधिप्रकाशराग' ही संज्ञा त्यांस सार्थच आहे.
पहिल्या वर्गांत येणारे राग म्हणजे 'री', 'ध' व 'ग' हे स्वर ज्यांत शुद्ध म्हणजे तीव्र असतात ते होत, व ते राग 'संधिप्रकाशरागा' नंतर गाण्याचा प्रचार आहे.
तिसर्‍या वर्गात येणार्‍या रागांत 'ग' व 'नि' हे स्वर कोमल असतात. व असे राग गान्यास मध्यान्ह व मध्यरात्र हा समय प्रचारांत युक्त मानिला आहे.
यावरून हें स्पष्ट दिसून येईल कीं या तीन वर्गांत येणारे राग दिवसाच्या चोवीस तासांच्या अवधीत नियमितपणें गाईलें जातात. अशा तर्‍हेनें रागांचा वेळेशीं कसा निकटसंबंध आहे हें सहजीं लक्षात येईल.
आरोहावरोहपरत्वें रागवर्गीकरण:- आरोहांत व अवरोहांत लागणार्‍या स्वरापुसार रागांचें वर्गीकरण करण्यांत येतें; तो प्रकार असा:-
(१) संपूर्ण-संपूर्ण; यांत आरोहांत ७ व अवरोहांत ७ स्वर
(२) संपूर्ण-षाडव; '' '' ७ '' '' ६ ''
(३) संपूर्ण-औडुव; '' '' ७ '' '' ५ ''
(४) षाडव-संपूर्ण; '' '' ६ '' '' ७ ''
(५) षाडव- षाडव; '' '' ६ '' '' ६ ''
(६) षाडव-औडुव; '' '' ६ '' '' ५ ''
(७) औडुव-संपूर्ण; '' '' ५ '' '' ७ ''
(८) औडुव-षाडव; '' '' ५ '' '' ६ ''
(९) औडुव-औडुव; '' '' ५ '' '' ५ ''
रागवर्णन.-प्रत्येक वाचकास अमुक राग अमुक थाटांतील आहे हें ज्ञान असणें शक्य नाहीं हें जाणून वाचकास आपल्या इच्छित रागाचें वर्णन सहज सांपडावें ही सोय साधण्यासाठीं, पुढें वर्णन केलेले राग अकारविल्हेनें दिले आहेत.
थाट, जाति, वादीसंवादी स्वर वर्ज्य स्वर, समय इत्यादि गोष्टी रागाचें ज्ञान होण्यास अत्यावश्याक आहेत हें जाणून दिलेल्या रागांच्या वर्णनांत ह्यांचा शक्य तितका समावेश केला आहे. पुढें दिलेल्या रागांच्या वादी-संवादी स्वरांचें तीव्रकोमलत्व दर्शविलें नाहीं; तें त्या रागाच्या थाटाच्या स्वरांच्या तीव्रकोमलत्वाप्रमाणें समजावें.
(१) अडाणा:-हा राग आसावरी थांटातून उत्पन्न होतो. ह्याच्या आरोहांत गांधार व अवरोहांत धैवत वर्ज्य आहे ह्यामुळें ह्याची जाति षाडव-षाडव आहे. ह्याचा वादी स्वर तार षड्ज व संवादी पंचम आहे. ह्याचा गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर मानितात. अवरोहांत गांधार वक्र होतो. कानडा व मेध ह्या रागाचें मिश्रण ह्यांत दृष्टीस पडतें. ह्याचें चलन सारंगांगाचें आहे. हा कानडयाचा एक प्रकार आहे.
रागास लागणार्‍या स्वरांत मुख्य स्वर तो वादी व दुसर्‍या प्रतीचा तो संवादी (अधिक माहिती संगीत शब्दाखाली पहा.)
(२) अभिरी:-हा राग आसावरी थाटांतील जन्य रागांपैकी एक आहे. ह्याच्या आरोहांत ऋषभ व धौवत हे स्वर वर्ज्य असून अवरोह सात स्वरांनी होतो. म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी निषाद आहे. ह्याचा गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर मानितात. याचें स्वरूप भीमपलासरागांत धैवत तीव्र आहे. व यांत तो कोमल आहे.
(३) अलैय्या:-हा राग बिलाबल थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत मध्यम वर्ज्य असून अवरोह सातहि स्वरांनी होतो; म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण आहे. याचा वादी धैवत व संवादी गांधार आहे. याचा गानसमय सकाळचा पहिला प्रहर आहे. याच्या अवरोहांत कोमल निषाद लागतो. या रांगात धैवत व मध्यम या स्वरांची संगति वैचित्र्यदायक आहे. हा एक बिलावल प्रकार आहे.
(४) अहीर भैरव:-हा राग भैरव थाटांतून निघतो. ह्याचे आरोहावरोह सात स्वरांचे असल्यानें ह्याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी षड्ज व संवादी पंचम आहे. ह्याचा गानसमय प्रात:काळ आहे. या रागांत तीव्रधैवत व दोनहि निषाद या स्वरांचा प्रयोग दृष्टीस पडतो. पूर्वांगांत भैरव व उत्तरांगांत काफी हे राग या रागांत स्पष्ट असतात. मध्यम स्वर सुटा सोडिल्यानें याचें वैचित्र्य वाढतें. हा एक भैरव प्रकार असून दुर्मिळ रागांपैकी एक आहे.
(५) आनंदभैरव.-हा राग भैरवथाटाच्या अन्यरागांपैकीं एक आहे. याचे आरोहावरोह सातहि स्वरांनीं होत असल्यामुळें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी षड्ज व संवादी मध्यम आहे. याचा गानसमय प्रात:काळ मानितात. या रागांत धैवत स्वर कोमल नसून तीव्र आहे. पूर्वागांत भैरव व उत्तरागांत बिलावल हे राग या रागांत दृष्टीस पडतात. हा एक भैरवप्रकार आहे.
(६) आसावरी:-हा आसावरी थाटाचा आश्रयराग आहे. याच्या आरोहांत गांधार व निषाद हे स्वर वर्ज्य असून अवरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुवसंपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर मानितात. याचें स्वरूप जौनपुरी रागासारखें भासतें. उत्तरेकडे हा राग तीव्र ऋषभाच्या ऐवजीं कोमल ऋषभ स्वरानें गाण्याचा प्रचार आहे.
(७) काफी:-हा काफी थाटाचा आश्रयराग आहे. याचा आरोहावरोह सातहि स्वरांचा आहे म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादीस्वर पंचम व संवादी षड्ज आहे. याचा गानसमय मध्यरात्र मानतात. कोणी याला सार्वकालिकाहि समजतात. याच्या आरोहांत तीव्र गांधार व तीव्र निषाद हे स्वर घेतलेले अनेक वेळां दृष्टीस पडतात. हा राग फार लोकप्रिय व मधुर आहे.
(८) कामोद:-हा राग कल्याणथाटांतून उत्पन्न होतो. ह्याच्या आरोहावरोहांत सातहि स्वर लागत असल्यामुळें ह्याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादीस्वर पंचम असून संवादी ऋषभ आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. ऋषभावरून पंचमस्वरावर जेहां गायक जातो तेव्ळां ह्या रागाची प्रतीति तात्काल होते. हा दोन मध्यम घेणार्‍या रागांपैकी एक आहे; पण तीव्र मध्यम आरोहांतच येतो. दोन मध्यमाच्या इतर रागांप्रमाणें यांतहि गांधार स्वर अवरोहांत वक्र आहे आणि निषाद आरोहांत असत्प्राय आहे. अवरोहांत विवादी या नात्यानें कोमल निषाद स्वर केव्हां केव्हां घेतलेला दृष्टीस पडतो. या रागांत हमीर व गौड हे राग मिसळलेले दिसतात.
(९) कालिंगडा:-हा राग भैरव थाटांतील आहे. याच्या आरोहावरोहांत सातहि स्वर लागल्यानें याची जाति संपूर्ण-संपूर्ण झाली आहे. याचा वादीस्वर पंचम असून संवादी षड्ज आहे. याचा गानसमय रात्रीचा चौथा प्रहर मानितात. या रागाची प्रकृति गंभीर नाही. या रागांत ऋषभ व धैवत हे दोन स्वर आंदोलित झाल्यास भैरव रागाचें स्वरूव उत्पन्न होण्याचा संभव असतो.
(१०) कुकुभ बिलावल:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सातहि स्वरांनी होत असल्यामुळें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी पंचम असून संवादी ऋषभ आहे. गानसमय सकाळचा पहिला प्रहर मानितात. या रागाची उत्पत्ति झिंझूटी व अलैय्या यांच्या मिश्रणानें होते. ऋषभ स्वराची पंचमाशी संगति झाल्यानें जयजयवंती रागाचा यांत किंचित भास होण्याचा संभव आहे. हा एक बिलावल प्रकार आहे.
(११) केदार:-हा राग कल्याण थाटांतून उत्पन्न होतो. ह्या रागाच्या आरोहांत ऋषभ व गांधार हे स्वर असतप्राय आहेत व अवरोहांत गांधार असहाय आहे म्हणून ह्याची जाति औडुव-षाढव आहे. याचा वादी स्वर मध्यम, व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. ह्याच्या अवरोहांत कोमल निषादाचा अल्प प्रयोग धैवताशीं केला जातो. अवरोहांत केव्हां केव्हां तीव्र व कोमल मध्यम स्वर एकापुढें एक जोडून गातात. ह्या रागाच्या आरोहांत निषाद स्वर वक्र असतो. ह्यांत तीव्र मध्यम बहुधां पंचमासंगतीं घेण्यांत येतो.
(१२) कौशीकानडा:-हा राग आसावरी थाटांतून निघतो. याचा आरोहावरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण होय. वादी मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर मानितात. या रागांत मालकंस व कानडा हे राग मिसळलेले दिसतात. यांतील मध्यम आणि धैवत या स्वरांची संगति फार मनोहर आहे. पंचम स्वरामुळें धनाश्री रागाचें अंग दिसतें; परंतु उत्तरांगांत मालकौंस रूप स्पष्ट पुढें आल्यानें धनाश्रीचें अंग दूर होतें. हा एक कानडयाचा प्रकार आहे.
(१३) खट:-हा राग आसावरी थाटांतील रागांपैकी एक आहे. याचा आरोहावरोह सर्व स्वरांनीं होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. याचा वादी धैवत व संवादी गांधार आहे. याचा गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर हा आहे. ह्या रागाच्या पूर्वांगांत भैरव व उत्तरांगांत आसावरी हे राग दृष्टीस पडतात. या रागांत सहा रागांचें मिश्रण आहे म्हणून त्याला 'षड्राग' असें सार्थ नांव पडलें आहे. या रागांत दोन ऋषभ, दोन गांधार, दोन धैवत व दोन निषाद हे स्वर लागतात. या रागाची प्रकृति चपल आहे.
(१४) खमाज:-हा राग खमाज थाटाचा आश्रयराग आहे. या रागाच्या आरोहांत ऋषभ वर्ज्य, व अवरोह सातहि स्वरांनीं होतो म्हणून त्याची जाति षाडव-संपूर्ण आहे. याचा वादी स्वर गांधार, व संवादी निषाद आहे. या रागाचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात, कोणी याला सार्वकालिकहि मानितात. आरोहांत तीव्र निषाद घेण्यांत येतो. याच्या आरोहांत धैवतास व अवरोहांत पंचमास महत्त्व देऊं नये. यांत धैवत व मध्यम यांची संगति रक्तिदायक आहे. हा राग क्षुद्रगीतार्ह आहे.
(१५) खंबावती:'हा राग खमाज थाटांतून निघतो. याचा आरोह सात स्वरांचा व अवरोहात ऋषभ वर्ज्य असल्यानें याची जाति संपूर्ण-षाडव आहे. याचा वादी स्वर गांधार व संवादी धैवत आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. याच्या अवरोहांत पंचम स्वर वक्र होतो. या रागांत मध्यम सुटा सोडल्यानें हा अधिक खुलतो. हा राग क्षुद्रगीताई आहे. या रागांत दोनहि निषादांचा प्रयोग झालेला दृष्टीस पडतो.
(१६) गारा:-हा राग खमाज थाटांतन निघतो. याचा आरोहावरोह सात स्वरांचा, म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. याचा वादी षड्ज व संवादी पंचम आहे. हा राग सार्वकालिक अहे. या रागाच्या आरोहांत तीव्र गांधार व तीव्र निषाद, व अवरोहांत कोमल निषाद व कोमल गांधार असे स्वर लागतात. हा क्षुद्रगीतार्ह राग आहे. मंद्रसप्तकांतील मध्यमास षड्ज कल्पून मध्यसप्तकांतील मध्यमापर्यंतच्या क्षेत्रांत गायक जेव्हां हा राग गातो तेव्हां तो फार गोड लागतो. झिंझूटी व पीलु हे राग या रागांत मिसळलेले दिसतात.
(१७) गुजरीतोडी:-हा राग तोडी थाटांतून उत्पन्न होतो. यांत पंचम स्वर वर्ज्य आहे म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी धैवत व संवादी ऋषभ आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर आहे. हा एक तोडीचा प्रकार आहे.
(१८) गुणकली:-हा राग भैरव थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहांत गांधार व निषाद हे स्वर वर्ज्य झाल्यानें याची जाति औडुव-औडुव आहे. वादी धैवत व संवादी ऋषभ आहे. गानसमय प्रात:काळ सर्वसंमत आहे. या रागाचें गायन मंद्र व मध्य या सप्तकांत फार मधुर लागतें. हा एक भैरवप्रकार आहे.
(१९) गौड सारंग:-हा राग कल्याण थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोहावरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी गांधार व संवादी धैवत आहे. गानसमय दिवसाच्या तिसर्‍या प्रहराचा प्रारंभ बहुसंमत आहे. या रागास दोन मध्यम लागतात. तीव्र मध्यम फक्त आरोहांत असून शुद्ध मध्यम आरोहांत व अवरोहांत येतो. दोन मध्यम येणार्‍या इतर रागांप्रमाणे यांत निषाद स्वराला गौणत्व असून गांधार अवरोहांत वक्र होतो. त्याचे आरोहावरोह वक्र स्वरूपाचे आहेत.
(२०) गौड मल्लार:-हा राग काफी थाटांतून निघतो. याचे आरोहावरोह सातहि स्वरांनी होत असल्यानें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. याच्या आरोहांत निषाद अल्प आहे. यांत तीव्र गांधार असल्यामुळें मिया मल्लार व मेघमल्लार यांपासून हा राग निराळा होतो.
(२१) गौरी (प्रकार पहिला):-हा राग भैरव थाटांतून उत्पन्न होत असून त्याच्या आरोहांत गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य व अवरोह सात स्वरांचा असल्यामुळें याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय सायंकाळ मानितात. हा राग मंद्र व मध्यसप्तकांतील स्वरांनीं गाइल्यानें रक्तिदायक होतो. मंद्रस्थानांतील निषाद स्वर ह्या रागांत विशिष्ट प्रकारची आकर्षकता उत्पन्न करतो. कालिंगडा व पूरिया या रागांच्या अंगानें हा गाइला जातो.
(२२) गौरी (प्रकार दुसरा): हा राग पूर्वी थाटांतून निघतो. या प्रकारांतहि गांधार व धैवत हे स्वर आरोहांत वर्ज्य असून अवरोह सर्व स्वरांचा आहे, म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी ऋषभ व संवादी पंचम आहे. हा सायंगेय रागांपैकीच एक आहे. या प्रकारांत श्रीरागाचें अंग विशेष दिसतें. मंद्र व मध्यसप्तकांतील स्वरांत हा राग खुलतो. मंद्रसप्तकांतील निषाद याहि प्रकारांत वैचित्र्य प्रकट करतो, म्हणून समप्रकृतिक इतर रागांपासून हा निराळा भासतो.
(२३) चंद्रकांत:-हा राग कल्याण थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत मध्यम वर्ज्य असून अवरोह सातहि स्वरांनी होत असल्यामुळें याची जाति षाडव-संपूर्ण आहे. वादी गांधार व संवादी निषाद आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. याचें स्वरूप् कांहीसें शुद्धकल्याण रागासारखें भासतें. हा अप्रसिद्ध रागांपैकीं एक आहे.
(२४) चांदणीकेदार:-हा राग कल्याण थाटांतून निघतो. या रागाच्या आरोहांत ऋषभ व गांधार असतप्राय आहेत व अवरोहांत गांधार असल्यानें याची जाति औडुव-षाडव आहे. वादी मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानितात. तीव्र मध्यमाचा प्रयोग शुद्धकेदार रागापेक्षां यांत जास्त होता. कोमल निषाद स्वर अवरोहांत धैवतासंगती केव्हां केव्हां घेण्यांत येतो. या रागांत हमीर राग मिश्र झालेला दृष्टीस पडतो. हा राग यावनिक व आधुनिक आहे. हा एक केदारप्रकार आहे.
(२५) छायानट:-हा राग कल्याणथाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोहावरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी ऋषभ आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे, या रागांत दोनहि मध्यमांचा प्रयोग होतो. तीव्र मध्यम फक्त आरोहांतच घेतात, व शुद्ध मध्यम आरोहांत व अवरोहांत येतो, या रागांत निषाद व गांधार या स्वरांनां अनुक्रमें आरोह व अवरोह यांत वक्रत्व आहे. अवरोहांत कोमल निषाद स्वराचा प्रयोग विवादी या नात्यानें केलेला दृष्टीस पडतो.
(२६) जयजयवंती:-हा राग खमाज थाटांतील जन्यरागांपैकी एक आहे. याच्या आरोहावरोहांत सातहि स्वर लागतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय रात्रीच्या दुसर्‍या प्रहाराचा शेवट समजतात. या रागांत दोन गांधार व दोन निषाद या स्वरांचा प्रयोग होतो. आरोहांत तीव्र गांधार व तीव्र निषाद हे स्वर लागतात; कोमल गांधार स्वर 'री ग री' या स्वरूपांत व दृष्टीस पडतो. तीव्र गांधार अवरोहांत घेतां येतो. हा मिश्र राग आहे. यांत गौंड, बिलावल व सोरट हे राग मिसळलेले दृष्टीस पडतात. या रागांत मंद्र पंचम व मध्यऋषभ यांची संगति रागवाचक आहे.
(२७) जयत:-हा राग मारवा थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहांत मध्यम व निषाद हे दोन स्वर वर्ज्य आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर पंचम व संवादी षड्ज आहे. गाण्याचा समय सायंकाल युक्त समजतात. यांत ऋषभ कोमल असल्यानें, देसकार, भूपाळी व जयत्कल्याण या रागांपासून हा निराळा होतो. कारण त्या रागांत ऋषभ स्वर तीव्र आहे. तसेंच कोमल ऋषभ लागणारे राग रेवा व बिभास, यांपासून हा निराळा होतो याचें कारण या रागांत धैवत तीव्र आहे, व त्या रागांत धैवत स्वर कोमल ठेविलेला आहे.
(२८) जयत्कल्याण:-हा कलयाण थाटांचा जन्यराग आहे. ह्याच्या आरोहावरोहांत मध्यम व निषाद हे स्वर वर्ज्य आहेत, म्हणून ह्याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर पंचम असून संवादी ऋषभ आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानितात. ह्याच कल्याण थाटांतून निघणार्‍या व मध्यम व निषाद हेच स्वर वर्ज्य असणार्‍या भूपाळी रागापासून 'वादीभेदाद्रगभेद:' या न्यायाने हा जयत्कल्याण राग निराळा होतो. ह्या रागांतील पंचम आणि ऋषभ स्वरांची संगति फार मधुर लागते.
(२९) जलधरकेदार:-हा राग बिलावल थाटांतून निघतो. या रागांत गांधार स्वर वर्ज्य आहे, म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर पंचम व संवादी ऋषभ आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानितात. केदार रागांत पूर्वांगांत ऋषभ स्वर दुर्बल असतो व उत्तरांगांत धैवत व निषाद हे स्वर दुर्बल ठेवितात, तसे ह्या रागांत तीव्रमध्यमाचा प्रयोग होतो तसा ह्या जलधरकेदार रागांत नाहीं. अशा प्रकारें हे दोनहि राग एकमेकांपासून भिन्न राहूं शकतात. हा एक केदार प्रकार आहे.
(३०) जेताश्री:-हा राग पूर्वी थाटांतून उत्पन्न होतो. ह्याच्या आरोहांत ऋषभ व धैवत स्वर वर्ज्य आहेत, पण अवरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून ह्याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गानसमय, सायंकाल हा सर्वसंमत आहे. वराटी व देसकार ह्या रागांच्या छाया या रागांत दृष्टीस पडतात.
(३१) जैमिनीकानडा:-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. ह्याचा आरोहावरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय मध्यरात्रयुक्त मानितात. अडाणा रागापेक्षां ह्यांत कानडयाचें अंग अधिक आहे. तथापि अडाण्यापेक्षां ह्यांत कानडयाचें अंग अधिक आहे. तथपि अडाण्याप्रमाणें यांत तारस्थानाचा षड्ज प्रबल असतो. पूर्वांगांत सारंग रागाचें अंग ठेवावयाचें असतें म्हणून गांधार स्वर वक्र करावा लातो. हा एक यावनिक राग आहे.
(३२) जोगिया:-हा राग भैरव थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत गांधार व निषाद हे स्वर वर्ज्य आहेत व अवरोहांत गांधार वर्ज्य आहे, म्हणून याची जाति औडुव-षाडव आहे. याचा वादी स्वर षड्ज व संवादी मध्यम आहे. गानसमय प्रात:काल उचित धरला आहे. या रागाच्या अवरोहांत पंचम अल्प ठेवितात; यांतील धैवत व मध्यम या स्वरांची संगति फार रक्तिदायक असते.
(३३) जौनपुरी:-हा राग आसावरी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत गांधार वर्ज्य आहे व अवरोह सर्व स्वरांचा होतो, म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गायनवेला दिवसाचा दुसरा प्रहर मानितात. या रागाचें स्वरूप आसावरी रागासारखें दिसतें. या रागांत आसावरी व मधुमाद यांचे मिश्रण झालेलें भासतें. हा राग आधुनिक असून जौनपुरचा सुलतान हुसेन याने हा राग प्रचारांत आणिला अशी समजूत आहे.
(३४) झिंझूटि:-हा राग खमाज थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोहावरोह सातहि स्वरांनी होत असल्यानें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर गांधार व संवादि निषाद आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. हा सार्वकालिक असेंहि समजतात. हा राग क्षुद्रगीतार्ह समजला जातो.
(३५) झीलफ:-हा भैरवी थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोह सात स्वरांचा व अवरोहांत ऋषभ वर्ज्य असल्यानें याची जाति संपूर्ण-षाडव आहे. वादी धैवत व संवादी गांधार. गानसमय सकाळचा पहिला प्रहर मानितात. या रागांत खट व जौनपुरी या रागांचें मिश्रण होत असतें. हा राग भैरव रागापासून अलग ठेवण्यासाठीं यांत ऋषभ स्वर कमजोर ठेवितात. हा आधुनिक व यावनिक राग आहे.
(३६) टंकी:-हा राग पूर्वी थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोहावरोह सातहि स्वरांनीं होतो, म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी ऋषभ आहे. गानसमय सायंकाळ मानितात. हा राग श्रीरागाच्या अंगानें गावयाचा असतो. यास कोणी श्रीटंक, टंकिका व टंकिरा अशी निरनिराळीं नांवें देतात.
(३७) तिलककामोद:-हा राग खमाज थाटांतून उत्पन्न होतो. या रागाच्या आरोहांत धैवत स्वर वर्ज्य आहे. व अवरोह संपूर्ण आहे म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण होय. याचा वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. या रागाचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. हा क्षुद्रगीतार्ह असून याचें चलन वक्र आहे. याचें स्वरूप बर्‍याच ठिकाणीं देस व सोरट या रागांसारखें भासतें. या रागांत दोनहि निषाद लागतात, तसेंच अवरोहांत ऋषभ स्वर वक्र होतो. गांधारावरून षड्जास येऊन मिळणें हें या रागाचें रक्तिदायक वैशिष्टय आहे. त्याचप्रमाणें निषाद स्वरावर होणारा अपन्यास मधुर लागतो.
(३८) तिलंग:-हा राग खमाज थाटांतील जन्यरागांपैकीं एक आहे. याच्या आरोहावरोहांत ऋषभ व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत, म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. यास कोणी सार्वकालिक समजात. हा एक क्षुद्रगीतार्ह राग आहे.
(३९) तोडी:-हा राग तोडी थाटाचा आश्रयराग आहे. याचा आरोहावरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर मानितात. या रागांत पंचमाचें प्रमाण अंमळ कमी असतें. तसेंच आरोहांत ऋषभ स्वर दुर्बल ठेवितात. गांधार स्वरावरील आंदोलन मनोवेधक असतें. या रागाची प्रकृति गंभीर आहे.
(४०) त्रिवेणी:-हा राग पूर्वी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहांत मध्यम स्वर वर्ज्य आहे. म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय सायंकाळ सर्वसंमत आहे. हा राग श्रीरागाच्या अंगानें गातात. गांधार व पंचम या स्वरांची संगति चित्ताकर्षक आहे. यांत देसकार, गौरी व पूर्वी या रागांची छाया दृष्टीस पडते.
(४१) दरबारी कानडा:-हा राग आसावरी थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोह सातहि स्वरांनी होतो व अवरोहांत धैवत वर्ज्य असतो म्णून याची जाति संपूर्ण-षाडव आहे. वादी ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय मध्यरात्र सर्वसंमत आहे. आरोहांत गांधार स्वर दुर्बल असून जलद तानांत तर तो वर्ज्य करतात. गांधार स्वरांवरील आंदोलनानें या रागास विशेष वैचित्र्य आलें आहे. निषाद व पंचम स्वरांची संगति या रागांत मनोवेधक आहे. या रागाची प्रकृति गंभीर असून तो आलापार्ह आहे. याचें मुख्यत: चलन मंद्र व मध्यस्थानांत असतें. हा राग मियातानसेन यानें प्रचलित करून अकबर बादशहास सुप्रसन्न केलें अशी आख्यायिका ओ.
(४२) दीपक:-हा पूर्वी थाटाच्या जन्यरागांपैकी एक आहे. याच्या आरोहांत ऋषभ वर्ज्य आहे, व अवरोहांत निषाद वर्ज्य आहे म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय दिवसाच्या चौथ्या प्रहराचा शेवट युक्त समजतात. कांहींहि कारण असो पण एवढें खरें कीं, हा राग गाण्याचें गायकांनीं वर्ज्य केल्याचें आढळतें.
(४३) दुर्गा:-हा राग खमाज थाटांतून निघतो. ह्या रागांत ऋषभ आणि पंचम हे स्वर वर्ज्य असल्यानें याची जाति औडुव-औडुव होय. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. या रागांत दोन्हीहि निषादांचा प्रयोग करतात. धैवत आणि मध्यम स्वरांची संगति फार वैचित्र्यदायक आहे. हा राग आधुनिक रागांपैकी एक आहे.
(४४) दुर्गा (प्रकार दुसरा):-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहांत गांधार व निषाद हे स्वर वर्ज्य आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव होय. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. याचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. या रागाला मल्लार रागाच्या अंगची दुर्गा असें म्हणतात. यांत मध्यम सुटा ठेवितात.
(४५) देवगांधार:-हा राग आसावरी थाटाच्या जन्यरागांपैकी एक आहे. याच्या आरोहांत ऋषभ व धैवत स्वर वर्ज्य होतात व अवरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर सर्वसंमत आहे. या रागाच्या पूर्वागांत धनाश्री व उत्तरांगांत आसावरी या रागांची छाया दृष्टीस पडते.
(४६) देवगिरी बिलावल:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोहावरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वरषड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय सकाळचा पहिला प्रहर मानितात. अवरोहांत गांधर व धैवत स्वर दुर्बल ठेवितात. अवरोहांत कोमल निषादाचा प्रयोग धैवताशीं करण्याचा प्रचार आहे; मध्यम स्वर आरोहांत दुर्बल ठेवितात. पूर्वांगांत कल्याण आणि उत्तरांगांत अलैय्या असें मिश्रण या रागांत दृष्टीस पडतें. हा एक बिलावल प्रकार आहे.
(४७) देवसाख:-हा राग काफी थाटंतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सात स्वरांनी होत असल्यामुळें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी मध्यम आहे. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर युक्त मानितात. या रागांत गांधार व धैवत हे स्वर दुर्बल ठेवितात. या रागांत गांधार स्वरावर होणारें आंदोलन रक्तिदायक असतें. या रागांत धैवत स्वर कोमल आहे. कानडा व मेघ यांचें मिश्रण या रागांत दृष्टीस पडतें. हा राग सारंगांगानें गाण्यांत येतो. मध्यम हा या रागाचा न्यासस्वर होय. हा एक कानडाप्रकार आहे.
(४८) देशकार:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. या रागांत मध्यम व निषाद हे स्वर वर्ज्य असल्यानें याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर आहे. या रागाचें सामान्य स्वरूप भूपाळी रागासारखें दिसतें, परंतु हा उत्तरांगप्रधान आणि भूपाळी पूर्वांगप्रधान; यामुळें दोनहि एकमेकांहून भिन्न राहूं शकतात. या रागाची प्रकृति गंभीर आहे.
(४९) देस:-हा राग खमाज थाटांतून निघतो. याचा आरोहावरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण संपूर्ण आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गाण्याचा समय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. या रागाचें स्वरूप सोरट रागाच्या स्वरूपासारखें दिसतें. सोरटांत गांधार स्वर झांकलेला असतो व या रागांत तो स्पष्ट दाखविल्यानें हा राग त्या रागापासून भिन्न होतो. याच्या आरोहांत गांधार व धैवत हे स्वर फारसे घेत नाहीं, व अवरोहांत ऋषभ स्वर वक्र आहे.
(५०) देसगौड:-हा राग भैरव थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहांत गांधार व मध्यम हे स्वर वर्ज्य आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर धैवत व संवादी ऋषभ आहे. गानसमय प्रात:कालचा पहिला प्रहर आहे. भैरव थाटांतील जन्यरागांपैकी कोणत्याहि रागांत गांधार व मध्यम हे स्वर वर्ज्य नाहींत, यामुळैं याचे स्वरूप स्वतंत्र भासतें. या रागांत पंचम व ऋषभ या स्वरांची संगति व 'सा रे सा' अशा प्रकारें ऋषभ स्वर ठेविल्यानें श्रीरागाची छाया उत्पन्न होते.
(५१) देसी:-हा राग आसावरी थाटांतून उत्पन्न होतो याच्या आरोहांत गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत, अवरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर मानितात. या रागाच्या पूर्वांगांत सारंग व उत्तरांगांत आसावरी या रागांच्या छाया दृष्टीस पडतात. गांधार स्वरावर या रागांत कंपन आहे. ऋषभ व मंद्र स्थानांतील निषाद या स्वरांची संगति फार रक्तिदायक आहे.
(५२) धनाश्री:-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत ऋषभ व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत व अवरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी षड्ज आहे. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर मानितात. अवरोहांत पंचम व गांधार या स्वरांची संगति फार मनोहर भासते.
(५३) धानी:-हा राग काफी थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहांत ऋषभ व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर गांधार आणि संवादी निषाद आहे. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर मानितात. याला सार्वकालिकहि समजतात. हा क्षुद्रगीताई राग आहे.
(५४) नट:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोह सात स्वरांनी होतो पण अवरोहांत गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत, म्हणून याची जाति संपूर्ण-औडुव आहे वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर संमत आहे. या रागांत मघ्यम स्वर सुटा ठेवितात. छायानट, कामोद व बिलावल या रागांचा भास यांत कोठें कोठें होतो.
(५५) नटबिलावल:-हा राग बिलावल थाटांतून निघतो. याचा आरोहावरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय सकाळचा पहिला प्रहर मानितात. आरोहांत नट व अवरोहांत बिलावल असें मिश्रण यांत होत असल्यानें याचें 'नटबिलावल' हें नांव यथार्थ आहे. यांतील ऋषभ व धेवत स्वरांची संगति वैचित्र्यदायचक आहे. हा एक बिलावल प्रकार आहे.
(५६) नटमल्लार:-हा राग काफी थटांतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सात स्वरांनी होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. या रागाचा अवरोह वक्र असून यांत गांधार व मध्यम या स्वरांची संगति नेहमीं दृष्टीस पडते. मल्लार रागांत छायानट मिसळल्यानें हा राग उत्पन्न होतो.
(५७) नायकी कानडा:- हा राग काफी थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहांत धैवत स्वर वर्ज्य होतो म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय मध्यरात्र सर्वसंमत आहे. याच्या पूर्वांगांत सुहा व उत्तरांगांत सारंग हे राग दृष्टीस पडतात. हा आधुनक राग आहे. हा एक कानडयाचा प्रकार आहे. हा राग गोपाल नायकानें प्रचलित केला अशी समजूत आहे.
(५८) नारायणी:-हा राग खमाज थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत गांधार व निषाद हे स्वर वर्ज्य व अवरोहांत गांधार वर्ज्य, म्हणून याची जाति औडुव-षाडव आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर मानितात. याचें स्वरूप कांहीसें सारंग रागासारखें भासतें; पण सारंग रागांत धैवत स्वर वर्ज्य असतो आणि या रागांत तो तर महत्त्व पावत असतो. या दोन रागांतील हा भेद स्पष्ट आहे.
(५९) नीलांबरी:-हा राग काफी थटांतील जन्यरागांपैकी एक आहे. याच्या आरोहांत धैवत वर्ज्य होतो व अवरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी षडज आहे. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर मानितात. या रागांत आरोहांत तीव्र गांधार स्वर लागलेला केव्हां केव्हां दृष्टीस पडतो. यांत षड्ज व पंचम या स्वरांची संगति आहे. गांधार स्वरावर कंपन असतें, यांत भीमपलाशी व मधुमाद या रागांची छाया दृष्टीस पडते.
(६०) पटदीपिकी:-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत ऋषभ व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत व अवरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. तथापि अवरोहांत ऋषभ स्वर कमजोर ठेवण्यांत येतो. वादी स्वर षड्ज आणि संवादी पंचम आहे. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर मानितात. हा राग भीमपलाशी रागाशी बराच मिळता येतो. कारण, दोनहि रागांचे आरोहावरोह सारखे आहेत; तथापि वादी स्वर भिन्न असल्यानें राग भेद स्पष्ट होतो, धनाश्री रागाच्याहि हा राग जवळ येतो. पण धनाश्रीचा वादी स्वर पंचम असून अवरोहांत ऋषभ भासतो. या रागांत दोनहि गांधारांचा प्रयोग दृष्टीस पडतो. हंसकंकणी या रागांत मध्यमस्वर सुटा ठेविल्यानें तो या रागापासून बचावला जातो.
(६१) पटमंजिरी:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सातहि स्वरांनी होत असल्यामुळें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय दविसाचा दुसरा प्रहर मानितात. यांत बिलावल रागाची छाया बरीच दृष्टीस पडते, मंद्र व मध्यमसप्तकांत हा राग खुलतो. होतांहोईल तों या रागांत तारसप्तकांत कधी प्रमाणांत जाणें इष्ट आहे. निलंबित लुईनें या रागास विशेष खुलावट येतें. संयुक्तप्रांतांत या रागास 'बंगाल' असें म्हणण्याचा प्रघात आहे.
(६२) पटमंजिरी (प्रकार दुसरा):-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सात स्वरांनी होतात, म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय दिवसाच्या तिसर्‍या प्रहाराचा प्रारंभ मानितात. याच्या आरोहांत गांधार व धैवत हे स्वर दुर्बल आहेत म्हणून याचें स्वरूप सारंगासारखें भासतें. परंतु सारंगांत हेच स्वर अजीबात वर्ज्य असल्यानें दोहोंमधील भेद स्पष्ट होतो, कोणी या रागांत दोनहि गांधारांचा प्रयोग सुचवितात.
(६३) परज:-हा राग पूर्वी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहवरोहास सातहि स्वर लागतात, म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर तारषड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय रात्रीचा शेवटचा प्रहर आहे. यांत दोनहि मध्यमांचा प्रयोग होतो, याची प्रकृति चंचल आहे, यामुळें वसंत रागापासून हा निराळा होतो.
(६४) पहाडी:-हा राग बिलावल थांटातून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सातहि स्वरांनी होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. हा राग सदागेय मानितात. मध्यम व निषाद हे स्वर यांत दुर्बल आहेत म्हणून याचें स्वरूव कांहीसें भूपाळी व शुद्धकल्याण ह्या रागांसारखें भासतें. मंद्र व मध्य सप्तकांत हा राग गाण्याचा प्रचार आहे. मंद्रसप्तकांतील धैवतामुळें ह्या रागास वैचित्र्य येतें.
(६५) पंचम:-हा राग सारखा थाटांतील जन्यरागांपैकीं एक आहे. ह्याचे आोहावरोह सात स्वरांचे असल्यामुळें ह्याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा चौथा प्रहर मानितात. ह्यांत दोनहि मध्यमांचा प्रयोग होतो. हा राग ललित रागाच्या अंगानें गातात. ह्या रागांत पंचम स्वर वर्ज्य करून सोहनी रागाच्या अंगानें हा गाण्याचा परिपाठ आहे. तिसरा एक प्रकार ह्या रागाचा असा आहे कीं, त्यांत ऋषभ व पंचम हे दोनहि स्वर वर्ज्य करतात.
(६६) पीलू:-हा राग काफी थाटाचा जन्यराग आहे. ह्याच्या आरोहावरोहांत सातहि स्वर लागतात म्हणून ह्याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गाण्याची वेळ दिवसाचा तिसरा प्रहर आहे. यास सार्वकालिन मानण्याचाहि प्रचार आहे. या रागांत सप्तकांतील तीव्र, कोमल सर्व स्वर लावण्याची मोकळीक आहे, असें कलावंत मानितात; परंतु, तीव्र स्वर बहुधां आरोहांत व कोमल स्वर अवरोहांत घेण्याचा प्रचार आहे. हा एक मिश्रराग आहे. यांत भैरवी, भीमपलाशी, गौरी, वगैरे राग युक्तीनें मिसळविले जातात. याची प्रकृति चंचल आहे. हा क्षुद्रगीतार्ह आहे.
(६७) पूरिया:- हा राग मारवा थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहांत पंचम स्वर वर्ज्य होत असल्यानें ह्याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गानसमय रात्रीच्या पहिल्या प्रहराचा आरंभ होय. याचें चलन मंद्र व मध्यसप्तकांत होत असल्यामुळें उत्तरांगप्रधान सोहनी रागापासून हा निराळा भासतो. ह्या रागातील निषाद व मध्यम स्वराची संगति वैचित्र्यदायक आहे.
(६८) पूर्याधनाश्री:-हा राग पूर्वी थाटांतून उत्पन्न होतो. ह्याचे आरोहावरोह सातहि स्वरांनीं होत असल्यामुळें ह्याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी ऋषभ आहे. गानसमय सायंकाळ मानितात. हा राग पूर्वी रागासारखा सामान्यत: भासते, परंतु ह्या रागांत कोमल मध्यमाचा प्रयोग होत नसून वादी स्वर भिन्न आहे म्हणून रागभेद स्पष्ट होतो.
(६९) पूर्वी-हा पूर्वी थाटाचा आश्रयराग आहे. ह्याच्या आरोहावरोहांत सातहि स्वर लागतात म्हणून ह्याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गानसमय दिवसाचा शेवटचा प्रहर मानितात. ह्याची प्रकृति गंभीर आहे. ह्यांत शुद्ध मध्यम स्वर विषादी ह्या नात्यानें लागतो व तो अवरोहांतच येतो. तीव्र धैवत लावून हा राग उत्तरेकडे गातांना दृष्टीस पडतो.
(७०) प्रतापवराळी:-हा राग खमाज थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत गांधार व निषाद हे स्वर वर्ज्य होतात व अवरोहांत निषाद वर्ज्य होतो म्हणून याची जाति औडुव-षाडव आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. उत्तरेकडे हा राग फारसा गाइलेला दृष्टीस पडत नाही.
(७१) प्रभात:-हा राग भैरव थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोहावरोह सातहि स्वरांचा असल्यानें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानमसय प्रात:काळ आहे. या रागांत ललित रागाचें मिश्रण झालेलें दिसतें. द्रुतलय ठेवून हा राग गाइला असतां कालिंगडा रागाचा भास होतो.
(७२) बडहंस:-हा राग काफी थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहांत गांधार स्वर वर्ज्य आहे म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर पंचम व संवादी षड्ज आहे. गानमसय मध्यान्ह आहे. मध्यम सुटा सोडल्यानें हा राग विशेष चित्ताकर्षक होतो. हा एक सारंगप्रकार आहे.
(७३) बरवा:-हा राग काफी थाटाचा जन्यराग आहे. याच्या आरोहांत गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य आहे, व अवरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी ऋषभ असून संवादी पंचम आहे. हा राग सार्वकालिक मानितात. हा क्षुद्रगीतार्ह राग आहे. याची प्रकृति चंचल आहे. या रागांत दोन निषादांचा प्रयोग दृष्टीस पडतो. हा राग कांही घराण्यांत देसी रागासारखें कांहींसें भासतें; परंतु या रागांतील धैवत तीव्र आहे व देसीमध्यें तो कोमल आहे; यामुळें रागभेद स्पष्ट होतो.
(७४) बहादुरी तोडी:-हा राग तोडी थाटांतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सात स्वरांचे आहेत म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण होय. वादी मंद्र स्थानचा धैवत असून संवादी मध्यस्थानचा गांधार स्वर आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर मानितात. याचें गायन मंद्र व मध्यसप्तकांत विशेष खुलतें. मध्यम व ऋषभ या स्वरांची संगति वैचित्र्यदायक आहे. याचें गायन विलंबित लईंत उठावदार होतें. हा एक तोडीचा प्रकार आहे. हा राग नायकबक्षु यानें नवा रचिला व गुजराथचा सुलतान बहादूरशहा याच्या नांवानें प्रचलित केला. नायकबक्षु हा बहादुरशहाच्या पदरीं होता अशी माहिती मिळते.
(७५) बहार:-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत ऋषभ स्वर वर्ज्य व अवरोहांत धैवत वर्ज्य म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय मध्यरात्र मानितात. या रागाचा संयोग अनेक रागांशी ोतो. घटकावयवांच्या घोरणानें भैरव-बहार, हिंदोल-बहार, मालकौंस-बहार, वसंत-बहार, अडाणा-बहार, बागेश्री-बहार वगैरे मिश्रनामें प्रचारांत आली आहेत. हा राग आधुनिक असून यावनिक आहे. वसंतऋतूंत हा राग हवा तेव्हां गावा अशी मसजूत आहे.
(७६) बंगाल भैरव:-हा राग भैरव थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहांत निषाद स्वर वर्ज्य आहे म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर धैवत व संवादी ऋषभ आहे. गानसमय प्रात:काल सर्वसंमत आहे. अवरोहांत गांधार स्वर वक्र होतो. हा एक भैरवप्रकार आहे.
(७७) बागेसरी:-हा राग काफी थाटाचा जन्य आहे. याच्या आरोहांत पंचम स्वर वर्ज्य करतात व अवरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण आहे. वादी मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय मध्यरात्र मानितात.
काही गुणीजन, या रागांत पंचम स्वर मुळींच घेत नाहींत व कांहीं घराण्यांत पंचम स्वर आरोहांत व अवरोहांत घेतलेला दृष्टीस पडतो. वादी स्वरांत व समयांत मात्र सर्वांचा एकमेळ आहे. पहिला प्रकार अधिक रूढ आहे.
(७८) विभास:-हा राग भैरव थाटांतून उत्पन्न होतो. या रागांत मध्यम व निषाद हे स्वर वर्ज्य असल्यानें याची जाति औडुव-औडुव आहे. वादी धैवत व संवादी गांधार या स्वरांची संगति रक्तिदायक आहे.
(७९) बिभास (प्रकार दुसरा):-हा राग मारवा थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहास सातहि स्वर लागतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय प्रात:काळ आहे. या रागाच्या पूर्वांगांत गौरी व उत्तरांगांत देसकार या रागांच्या छाया दृष्टीस पडतत. गांधार आणि पंचम, तसेंच मध्यम व धैवत या स्वरांच्या संगती या रागांत रक्तिदायक आहेत. हा राग उत्तरांगप्रबळ आहे. बिलंबित लईने हा फार खुलतो. याची प्रकृति गंभीर आहे.
(८०) बिलावल:- हा बिलावल थाटाचा आश्रयराग आहे. याचा आरोहावरोह सात स्वरांनी होतो, म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानकाल प्रात:काळचा पहिला प्रहर मानितात. हा उत्तरांगप्रधान असल्यानें याचें स्वरूप अवरोहांत व्यक्त होतें. आरोहांत मध्यम व निषाद या स्वरांचें अल्पत्व आहे. अवरोहांत गांधार दुर्बल ठेवितात. धैवत व मध्यम या स्वरांची संगति या रागांत रक्तिदायक आहे. या रागास सकाळचा कल्याण म्हणण्याचा प्रघात आहे. अलैय्या, देवगिरी, यमनी, शुक्ल सर्पर्दा, कुकुभ इत्यादि या रागाचे बरेच प्रकार आहेत. त्यांची वर्णनें योग्य स्थळी केलीं आहेत.
(८१) बिलासखानी तोडी:-हा राग भैरवी थाटांतून उत्पन्न होतो. आरोह-अवरोह सातहि स्वरांनी होत असल्यामुळें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहार मानितात. शुद्ध तोडीत मध्यम व निषाद हे स्वर तीव्र आहेत. पण या रागांत ते कोमल आहेत, यामुळें यांत थोडा भैरवीचा भास होतो, तथापि चलन तोडीचेंच ठेविलेलें असतें. हा एक तोडी रागाचा प्रकार आहे. हा राग मियांतानसेन यांचा मुलगा बिलासखां यानें प्रचलित केला अशी आख्यायिका आहे.
(८२) बिहाग:- हा राग बिलावल थाटाचा जन्य आहे. याच्या आरोहांत ऋषभ व धैवत हे स्वर वर्ज्य होतात व अवरोह सात स्वरांनीं होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गानमसय रात्रीचा दुसरा प्रहर सर्वसंमत आहे. तीव्रमध्यमाचा अल्प प्रयोग विवादी या नात्यानें या रागांत होत असतो. याच्या अवरोहांत सुद्धां धैवत व ऋषभ हे स्वर दुर्बल ठेवावे लागतात. नाहीं तर बिलावल रागाची छाया उत्पन्न होण्याचा संभव असतो.
(८३) बिहागरा:-हा राग बिलावल थाटांतून निघतो. याच्या आरोहांत ऋषभ व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत व अवरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. या रागांत दोन निषाद व दोन मध्यमांचा प्रयोग होतो म्हणून हा बिहाग रागापासून वेगळा राहूं शकतो.
(८४) बिंद्रावनीसारंग:-हा राग काळी थाटांतून उत्पन्न होतो. या रागाच्या आरोहावरोहांत गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत. म्हणून याची जाति औडुव-औडुव होय. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय माध्यान्ह आहे. याच्या अवरोहांत क्वचित धैवताचा अल्प प्रयोग केलेला आढळतो. या रागांत तीव्र व कोमल हे दोनहि निषाद अनुक्रमें आरोह व अवरोह यांत घेतले जातात. हा एक सारंगप्रकार आहे.
(८५) भटियार:-हा राग मारवा थाटाचा जन्य आहे. याचें आरोहावरोह सातहि स्वरांनीं होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण अहे. वादी स्वर शुद्ध मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर आहे. तीव्र मध्यमाचा प्रयोग याच्या आरोहांत होतो. आरोहांत निषाद दुर्बल असून अवरोह वक्र आहे. यांत पंचम व गांधार व धैवत व मध्यम या स्वरांच्या संगती रक्तिदायक आहेत. ललित, कालिंगडा व परज या रागांचें मिश्रण यांत दृष्टीस पडतें. यांत शुद्ध मध्यम स्वर सुटा सोडण्यांत येतो. हा राग भर्तृहरीनें काढिला अशी आख्यायिका आहे.
(८६) भंखार:-हा राग मारवा थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहांत सातहि स्वर लागतात, म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर मानितात. यांत दोनहि मध्यमांचा प्रयोग होतो. हा उत्तरांगप्रधान राग आहे. यांत दोन धैवत घेण्याचा कांहीं घराण्यांचा परिपाठ आहे. यांत शुद्ध मध्यम सुटा ठेवीत नाहींत म्हणून भटियार रागापासून हा भिन्न राहूं शकतो. हा राग आधुनक राग आहे.
(८७) भीमपलासी:-हा राग काफी थाटांतून निघतो. याच्या आरोहांत ऋषभ व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत आणि अवरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर समजतात.
(८८) भूपाली:-हा कल्याण थाटांतील जन्य रागांपैकीं एक आहे. या रागांत मध्यम व निषाद हे स्वर वर्ज्य आहेत, म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर गांधार व संवादी धैवत आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. हा राग पूर्वांगवादी असल्यानें देसकार रागापासून सहज निराळा राहूं शकतो.
(८९) भैरव:-हा भैरव थाटाचा आश्रयराग आहे. याचा आरोहावरोह सातहि स्वरांचा आहे, म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी ऋषभ आहे. गानसमय प्रात:काळ सर्वसंमत आहे. याच्या अवरोहांत कोमल निषादाचा प्रयोग विवादी या नात्यानें केव्हां केव्हां केलेला आढळतो. ऋषभ व धैवत हे स्वर या रागांत आंदोलित असतात. याची प्रकृति गंभीर आहे.
(९०) भैरवी.-हा भैरवी थाटाचा आश्रयराग आहे. याच्या आरोहावरोहास सातहि स्वर लागतात. म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर मानितात. हा सार्वकालिकहि समजला हातो. याच्या आरोहांत अनेक वेळां तीव्र ऋषभाचा प्रयोग विवादी स्वर म्हणून केलेला दृष्टीस पडतो. हा राग अति लोकप्रिय व मधुर आहे.
(९१) मधुमादसारंग:-हा राग काफी थाटांतून निघतो. यांत गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय मध्यान्ह सर्वसंमत आहे. या रागांत तीव्र व कोमल निषाद अनुक्रमें आरोहांत अवरोहांत लागतात. निषाद व पंचम स्वरांची संगति फार मधुर आहे. हा एक सारंगाचा प्रकार आहे.
(९२) मलुहा केदार:-हा राग बिलावल थाटांतून निघतो. याच्या आरोहांत ऋषभ आणि धैवत हे स्वर वर्ज्य आहत व अवरोह सातहि स्वरांनीं होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानितात. हा राग मंद्र व मध्य सप्तकांत अधिक खुलतो. यांत श्याम व कामोद यांचें मिश्रण दृष्टीस पडतें. हा एक केदाराचा प्रकार आहे.
(९३) मारवा:-हा राग मारवा थाटाचा आश्रयराग आहे. यांत पंचम स्वर वर्ज्य आहे म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी धैवत आहे. गानसमय दिवसाचा शेवटचा प्रहर मानितात. याच्या आरोहांत निषाद स्वर वक्र होतो. अवरोहांत जेव्हां ऋषभ स्वरावर अनेक ताना येऊन संपतात तेव्हां हा राग अधिक स्पष्ट होतो व खुलतो.
(१४) मालकौंस:-हा राग भैरवी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहांत ऋषभ व पंचम हे स्वर वर्ज्य आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर आहे. हा आलापार्ह राग असून फार मधुर आहे.
(९५) मालवी:-हा राग पूर्वी थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोहावरोह सातही स्वरांचा असल्यामुळें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय सायंकाळ उचित आहे. याच्या आरोहांत निषाद दुर्बल व अवरोहांत धैवत दुर्बल आहे. हा राग विलंबित लईंत गाइल्यानें चित्तार्षक होतो. याचें मंडन श्री रागाच्या अंगानें होत असतें.
(९६) मालश्री:-हा राग कल्याण थाटांतून उत्पन्न होतो. यांत ऋषभ व धैवत हे स्वर वर्ज्य असल्यानें याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय दिवसाच्या चौथ्या प्रहराचा प्रारंभ सर्वसंमत आहे. या रागांत निषाद व मध्यम हे स्वर दुर्बल होत असल्यानें षड्ज, गांधार आणि पंचम या तीन स्वरांनींच हा गाइला जातो असा कांहीं लोकांचा समज आहे. परंतु, पांच स्वरांपेक्षां कमी स्वरांनीं रागास अस्तित्व येत नाही या शास्त्रमताच्या विरुद्ध वरील समज आहे म्हणून तो समज ग्राह्य नाहीं.
(९७) मालीगौरा:-हा राग मारवा थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहास सातहि स्वर लागतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी धैवत आहे. हा राग सायंगेय आहे. मंद्र व मध्य सप्तकांत याचें गायन विशेष रक्तिदायक असतें. पूरिया व श्री या रागांची अंगें या रागांत दृष्टीस पडतात.
(९८) मांड:- हा राग बिलावल थाटाचा जन्य आहे. या रागाचे आरोहावरोह सातहि स्वरांनी होत असल्यामुळें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. हा राग सार्वकालिक मानितात. आरोहांत ऋषभ व धैवत हे स्वर दुर्बल आहेत. याचा अवरोह वक्र आहे. यांत निषाद स्वर कंपित होत असतो. मारवाडांत हा राग फार लोकप्रिय आहे. याची प्रकृति क्षुद्र आहे.
(९९) मिराबाईचा मल्लार:-हा राग आसावरी थाटांतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सातहि स्वरांनी होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. या रागांत दोन गांधार, दोन धैवत व दोन निषाद हे स्वर लावण्याचा गायकांचा परिपाठ आहे. प्रसिद्ध भगवद्धक्त मिराबाई हिनें हा राग प्रचलित केला अशी दंतकथा आहे. हा एक मल्लाराचा प्रकार आहे.
(१००) मीयांमल्लार:-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोह सात स्वरांनीं होतो, अवरोहांत धैवत स्वर वर्ज्य आहे म्हणून याची जाति संपूर्ण-षाडव आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय मध्यरात्र मानितात. कानडा व मल्लार या दोन रागांचें मिश्रण यांत होत असतें. हा राग मंद्र सप्तकांत खुलतो. मियांतानसेन यानें हा राग प्रचलित करून अकबर बादशहास खुष केलें अशी दंतकथा आहे. हा एक मल्लारप्रकार आहे.
(१०१) मीयासारंग:- हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. या रागांत गांधार स्वर वर्ज्य असल्यामुळें याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर ऋषभ असून संवादी पंचम आहे. गानसमय मध्यान्ह सर्वसंमत आहे. मंद्र व मध्य सप्तकांत हा राग फार रक्तिदायक होतो. मंद्रसप्तकांतील धैवत व निषाद तसेंच मध्यसप्तकांतील निषाद व पंचम या स्वरांच्या संगती या रागांत फार मधुर लागतात. यामुळें या रागांत मीयां-मल्लार रागाची व कानडा रागाची झांक दृष्टीस पडते. मीयांतानसेन यानें हा राग बनविला असें सांगतात. हा एक सारंगप्रकार आहे.
(१०२) मुलतानी:-हा राग तोडी थाटाचा जन्य आहे. याच्या आरोहांत ऋषभ व धैवत वर्ज्य होतात व अवरोह सातहि स्वरांनीं होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी षड्ज आहे. गानसमय दिवसाचा चौथा प्रहर मानितात. मध्यम व गांधार यांची संगति या रागांत पुनरावृत्त होत असते. ऋषभ, धैवत व गांधार या स्वरांचा या रागांत अयोग्य उपयोग झाल्यास जोडी राग होण्याचा संभव आहे.
(१०३) मेघमल्लार:-हा राग काफी थाटांतून निघतो. या रागांत गांधार स्वर वर्ज्य आहे म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर षड्ज असून संवादी पंचम आहे. गानसमय मध्यरात्र मानितात. या रागांत दोन निषादांचा प्रयोग होतो; ऋषभ स्वरावर आंदोलन असतें; मध्यमावरून ऋषभ स्वर घेणें विशेष कुशलतेचें आहे. कारण, हें कृतय रागवाचक व रक्तिदायक आहे. या रागाची प्रकृति गंभीर असून विलंबित लईंत गाण्यास योग्य असा हा राग आहे. हा मोसमी राग असल्यामुळें वर्षाकाळांत सदागेय आहे.
(१०४) मेघरंजनी:-हा राग भैरव थाटांतून उत्पन्न होतो. या रागांत पंचम व धैवत हे स्वर वर्ज्य होत असल्यानें याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा चौथा प्रहर मानितात. तीव्र मध्यम स्वराचाहि प्रयोग यांत दृष्टीस पडतो. शुद्ध मध्यम सुटा सोडल्यानें ललित रागाचा भास यांत बराच होतो. हा दुर्मिळ रागांपैकी एक आहे.
(१०५) मोटकी:-हा राग भैरवी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहास सातहि स्वर लागत असल्यानें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर मानितात. याच्या आरोहांत ऋषभ स्वर दुर्बल व अवरोहांत धैवत दुर्बल ठेवितात. या रागांत दोनहि धैवतांचा प्रयोग होतो. या रागांत बागेसरी रागाचा थोडासा भास होतो. हा राग दुर्मिळ रागांपैकीच आहे.
(१०६) यमन:-हा कल्याण थाटाचा आश्रयराग आहे. याचा आरोहावरोह सातहि स्वरांनीं होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी गांधार व संवादी स्वर निषाद आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. याची प्रकृति गंभीर असून हा आलापार्ह आहे. या रागांत थोडया प्रमाणानें कोमल मध्यमाचा प्रयोग केल्यास यास 'यमनकल्याण' हे नांव प्राप्त होतें.
(१०५) यमनी बिलावल:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहास सातहि स्वर लागतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय सकाळचा पहिला प्रहर आहे. आरोहांत तीव्र मध्यम लागत असल्यानें यमन रागाचें स्वरूप यांत दिसतें, यामुळें याचें 'यमनी बिलावल' हें नांव यथार्थ पडलें आहे. अवरोहांत शुद्ध मध्यमाच्या प्रयोगानें बिलावल स्पष्ट होतो. हा एक बिलावलचा प्रकार आहे.
(१०८) रागेश्वरी:-हा राग खमाज थाटांतून निघतो. याच्या आरोहांत ऋषभ व पंचम हे स्वर वर्ज्य आहेत, व अवरोहांत फक्त पंचम वर्ज्य होतो, म्हणून याची जाति औडुव-षाडव होते. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. या रागांतील मध्यम व धैवत या स्वरांची संगति रक्तिदायक आहे. या रागांत तीव्र गांधार असल्यानें बागेसरी रागापासून हा सहजच निराळा राहूं शकतो. या रागाच्या अवरोहांत ऋषभ स्वर लागतो त्यामुळें दुर्गारागापासून तो स्पष्टपणें भिन्न भासतो; कारण दुर्गा रागांत ऋषभ अजीबात वर्ज्य आहे. अवरोहांत धैवत वक्र ठेवावा असें कांहीचें मत आहे. हा राग अप्रसिद्ध रागांपैकी एक आहे.
(१०९) रामकली:-हा राग भैरव थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहास सातहि स्वर लागत असल्यानें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी ऋषभ आहे. गानसमय प्रात:काल सर्वसंमत आहे. याचें सामान्य स्वरूप भैरव रागासारखे आहे, परंतु या रागांत तीव्र मध्यम व कोमल निषाद या स्वरांचा प्रयोग एका विशिष्ट तर्‍हेनें होतो म्हणून हा राग भैरव रागाहून निराळा होतो. हा एक भैरवप्रकार आहे.
(११०) रामदासी मल्हार:-हा काफी थाटाचा जन्यराग आहे. याचे आरोह व अवरोह सातहि स्वरांनी होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर मानितात. शुद्ध मल्लारांत सुबराई रागाचें मिश्रण झालें म्हणजे हा राग होतो. हा एक मल्लारप्रकार आहे.
(१११) रेवा:-हा राग पूर्वी थाटांतून उत्पन्न होतो. या रागांत मध्यम व निषाद हे स्वर वर्ज्य आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर गांधार आहे व संवादी धैवत आहे. हा राग सायंगेय आहे. पहाटेच्या बिभास रागाचा हा सायंगेय जबाब आहे असें पंडितांचें मत आहे. हा दुर्मिळ रागांपैकी एक आहे.
(११२) लच्छासाग:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सातहि स्वरांनी होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण होय. वादी धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय सकाळचा पहिला प्रहर मानितात. याच्या आरोहांत तीव्र निषाद व अवरोहांत कोमल निषाद लागतो. बिलावल व खमाज या दोन रागांच्या मिश्रणानें हा राग बनलेला आहे. यांतील गांधार स्वराच्या प्रयोगानें यांत गौडसारंग रागाची छाया उत्पन्न होते पण बिलावल अंग पुढें आल्यानें ती दूर होते. हा एक बिलावलप्रकार आहे.
(११३) ललित:-हा राग मारवा थाटांतून निघतो; याच्या आरोहावरोहांत पंचम स्वर वर्ज्य असल्यानें याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर शुद्ध मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा शेवटचा प्रहर आहे यांत दोन्हीहि मध्यमांचा प्रयोग होतो व ते दोन स्वर एकापुढें एक जोडून घेण्यांत येतात. हा उत्तरांगप्रधान असून याचें स्वरूप स्वतंत्र आहे.
(११४) ललितपंचम:-हा राग भैरव थाटांतून निघतो. याच्या आरोहांत पंचम स्वर वर्ज्य आहे व अवरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर मानितात. या रागांत दोन मध्यमांचा प्रयोग होतो. हा राग ललित रागाच्या अंगानें गाण्याचा परिपाठ आहे. तथापि याच्या अवरोहांत पंचम असल्यानें हा ललित रागापासून निराळा होतो. याचा अवरोह वक्र आहे.
(११५) लंकादहन सारंग:-हा काफी थाटाचा जन्यराग आहे. याच्या आरोहावरोहांत धैवत स्वर वर्ज्य आहे म्हणून याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय मध्यान्ह उचितच आहे. हा राग देसी रागासारखा भासतो; पण देसी रागाच्या आरोहांत गांधर व धैवत हे दोन स्वर वर्ज्य आहेत आणि अवरोह संपूर्ण आहे. यामुळें ते एकमेकांपासून भिन्न राहूं शकतात. हा एक सारंगप्रकार आहे.
(११६) लाचारी तोडी:-हा राग तोड थाटांतून उत्पन्न होतो. याचे आरोहावरोह सात स्वरांनी होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय सकाळचा दुसरा प्रहर मानितात. शुद्ध तोडीमध्यें थोडासा कोमल मध्यम लाविल्यानें हा राग उत्पन्न होतो, अर्थात यांत दोनहि मध्यमांचा प्रयोग होतो, पण हे स्वर लावण्यांत फार कौशल्य लागतें. हा तोडीचा एक प्रकार आहे.
(११७) वराटी:-हा राग मारवा थाटांतून निघतो. याचा आरोह व अवरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर गांधार व संवादी धैवत आहे. गानसमय प्रदोषकाल मानितात. या रागांत मध्यम स्वर दुर्बल ठेवितात त्यामुळें गांधार व पंचम स्वरांची संगति रक्तिदायक होते. या रागांत मारवा रागाची छाया बरीच दिसते. परंतु यांत पंचम स्वर लागत असल्यानें हा मारवा रागाहून निराळा होतो.
(११८) वसंत:-हा राग पूर्वी थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहांत सातहि स्वर लागत असल्यनें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर तार षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय रात्रीचा चौथा प्रहर मानितात. या रागांत दोन मध्यमांचा प्रयोग होतो. याच्या आरोहांत कोणी पंचम देत नाहींत. यांत गांधार व मध्यम स्वरांची संगति पुनरावृत्त होत असते. तसेंच याच्या आरोहांत ललितांग दाखल करण्याची वहिवाट आहे. हा राग गंभीर प्रकृतीचा आहे. हा मोसमी राग असल्यानें वसंतऋतूत वाटेल त्या वेळीं गाण्याची मोकळीक आहे. या रागाचा दुसरा एक प्रकार असा आहे की, त्यांत पंचम स्वर अजीबात वर्ज्य करून तीव्र धैवत लावितात. वादी तार षड्ज व संवादी शुद्ध मध्यम ठेवितात.
(११९) वसंत मुखारी:-हा राग भैरवी थाटांतून निघतो. याचा आरोहावरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी ऋषभ आहे. गानसमय प्रात:काल युक्त आहे. याच्या पूर्वांगांत भैरव व उत्तरांगांत भैरवी हे राग दृष्टीस पडतात. हा दुर्मिळ रागांपैकी एक आहे.
(१२०) शहाणा:-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत धैवत वर्ज्य व अवरोह सर्व स्वरांचा आहे. म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी षड्ज आहे. गानसमय मध्यरात्र सर्वसंमत आहे. या रागाचें स्वरूप कानडा व मेघ या रागांच्या मिश्रणानें बनलेलें दिसतें. या रागाच्या अवरोहांत धैवत स्वर दुर्बलच असतो. हा आधुनिक व याविनक राग आहे. हा एक कानडयाचा प्रकार आहे.
(१२१) शंकरा:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहावरोहांत मध्यम स्वर वर्ज्य असल्यानें याची जाति षाडव-षाडव अहो. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. आरोहांत अल्प ऋषभ ठेवितात. या रागाचा दुसरा एक प्रकार असा कीं, त्यांत ऋषभ व मध्यम हे दोनहि स्वर वर्ज्य करितात. तयामुळें याची जाति औडुव-औडुव होते. या प्रकारांत वादी षड्ज व संवादी पंचम ठेवितात. या रागाचें सामान्य स्वरूप बिहाग रागासारखें दिसते; पण बिहागांत मध्यम स्वर स्पष्ट असल्यानें रागभेद उघड भासतो.
(१२२) शिवभैरव:-हा भैरव थाटाचा जन्यराग आहे. याच्या आरोहावरोहांत सातहि स्वर लांगत असल्यानें याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी ऋषभ आहे. गानसमय प्रात:काळ मानितात; या रागाच्या आरोहांत गांधार व निषाद हे स्वर तीव्र व अवरोहांत तेच कोमल लागत असल्यामुळें आरोहांत भैरवीची छाया उत्पन्न होते. व अवरोहांत तोडीची झांक असते. हा एक भैरवप्रकार आहे.
(१२३) शुद्ध कल्याण:-हा राग कल्याणथाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत मध्यम व निषाद हे स्वर वर्ज्य आहेत. अवरोह सात स्वरांनी होतो; म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर गांधार व संवादी धैवत आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानितात. या रागाचें सामान्य स्वरूप भूपाळी रागासारखें भासतें. हा राग गंभीर प्रकृतीचा आहे.
(१२४) शुद्ध मल्लार:-हा राग काफी थाटांतून निघतो. या रागांत गांधार व निषाद हे स्वर वज्य्र आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर मध्यम संवादी षड्ज आहे. गानसमय रात्रीचा दुसरा प्रयहर मानितात. मध्यम व ऋषभ या स्वरांची संगति वैचित्र्योत्पादक आहे. या रागांत निरनिराळ्या रागांचें मिश्रण करून याचे अनेक प्रकार झालेले प्रचारांत दिसतात.
(१२५) शुद्धसामंत:-हा राग भैरवी थाटांतून निघतो. ह्याच्या आरोहांत गांधार व निषाद हे स्वर वर्ज्य आहेत, व अवरोहांत निषाद वर्ज्य आहे, म्हणून ह्याची जाति औडुव-षाडव आहे. वादी स्वर षड्ज व संवादी मध्यम आहे. गानसमय दिवसाचा पहिला प्रकार मानितात.
(१२६) शुद्धसारंग:-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. ह्यांत गांधार स्वर वर्ज्य आहे. म्हणून ह्याची जाति षाडव-षाडव आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय मध्यान्ह सर्वसंमत आहे. ह्या रागांत दोनहि मध्यमांचा प्रयोग दृष्टीस पडतो.
(१२७) शुक्लबिलावल:-हा राग बिलावल थाटांतून निघतो. ह्याचे आरोह व अवरोह सातहि स्वरांनीं होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम आहे व संवादी षड्ज आहे. गानसमय सकाळचा पहिला प्रहर युक्त मानितात. आरोहांत ऋषभ स्वर दुर्बल ठेवितात व अवरोहांत कोमल निषाद धैवतासंगती घेतलेला आढळतो. या रागांत शुद्ध मध्यम सुटा सोडतात. हा एक बिलावलप्रकार आहे.
(१२८) श्याम:-हा राग कल्याण थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत धैवत स्वर वर्ज्य आहे व अवरोह सात वरांचा होतो म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानितात. या रागांत दोनहि मध्यमांचा प्रयोग होतो, परंतु, प्राधान्य शुद्ध मध्यमासच दिलेले आहे. हा राग कामोद-अंगानें गाइला जातो; परंतु कामोदांत निषाद व गांधार हे स्वर दुर्बल असतात, म्हणून या रागाची भिन्नता स्पष्ट राहूं शकते. ऋषभ व पंचम, तसेंच ऋषभ व मध्यम या वरांच्या संगती यांत रक्तिदायक होतात. हमीर, गौंड आणि केदार या रागांचें या रागांत मिश्रण झालेलें असतें.
(१२९) श्री:-हा राग पूर्वी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत व अवरोह सात स्वरांनी होतो म्हणून या रागाची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर ऋषभ व संवादी पंचम आहे. गानसमय सूर्यास्त मानतात. संध्याकाळच्या रागांत या रागाचें स्वरूप अगदीं स्वतंत्र आहे. याची प्रकृति गंभीर आहे.
(१३०) श्रीरंजनी:-हा राग काफी थाटाचा जन्यराग आहे. याच्या आराहांत ऋषभ व पंचम हे स्वर वर्ज्य आहेत व अवरोहांत पंचम वर्ज्य आहे म्हणून याची जाति औडुव-षाडव आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय दिवसाच्या तिसर्‍या प्रहराचा प्रारंभ मानितात. हा राग बागेसरीसारखा भासतो. परंतु बागेसरीच्या अवरोहांत पंचम स्वर घेण्यांत येतो म्हणून या दोन रागांमधील भेद स्पष्ट आहे.
(१३१) सर्पर्दा बिलावल:-हा राग बिलावल थाटांतून निघतो. याच्या आरोहावरोहास सातहि स्वर लागतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय सकाळचा पहिला प्रहर मानितात. यांत बिहाग रागाचा भास होण्याचा बराच संभव आहे. परंतु, ऋषभ दीर्घ ठेविल्याने तो भास दूर होतो. यमन, अलैय्या व गौंड या तीन रागांचें मिश्रण या रागांत होत असतें. ही एक बिलावलवकार आहे. हा यावनिक राग आहे.
(१३२) साजगिरी:-हा राग मारवा थाटांतून निघतो. याचे आरोह व अवरोह सातहि स्वरांनी होतात म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर गांधार व संवादी निषाद आहे. गानसमय सायंकाळ उचित आहे. यांत दोन धैवत व दोन मध्यम आहेत. शुद्ध मध्यमाचें प्रमाण फार अल्प आहे. पूरिया व पूर्वी यांचें मिश्रण या रागांत दृष्टीस
पेज नंबर ७१ टाईप झालेले नाही

बंगाल व पंचम या रागांच्या मिश्रणानें हा राग झाला आहे. हा एक भैरवप्रकार आहे.
(१४४) हमीर:-हा राग कल्याण थाटांतून उत्पन्न होतो. याचा आरोहावरोह सात स्वरांनी होतो, म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. या रागांत दोनहि मध्यमांचा प्रयोग होतो, परंतु, तीव्र मध्यम आरोहांतच घेतला जातो, व शुद्ध मध्यम आरोहावरोहांत येतो. याच्या आरोहांत निषाद वक्र व अवरोहांत गांधार वक्र होतो. या नात्यानें घेतला जातो. याचें चलन वक्र स्वरूपाचें आहे.
(१४५) हंसकंकणी:-हा राग काफी थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत ऋषभ, धैवत हे स्वर वर्ज्य आहेत व अवरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति औडुव-संपूर्ण आहे. वादी स्वर पंचम व संवादी षड्ज आहे. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर आहे. बिलावल व कानडा या रागांचें मिश्रण यांत झालें आहे. यांत धनाश्री रागाचें अंग प्रधानत्वें दिसून येतें. हा अप्रसिद्ध रागांपैकी एक आहे.
(१४६) हंसध्वनि:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. ह्या रागांत मध्यम व धैवत हे स्वर वर्ज्य आहेत म्हणून याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानितात. ह्या रागांत शंकरा रागाची छाया उत्पन्न होते. इकडे हा राग फारसा गाइला जात नाहीं, पण दक्षिणेकडे ह्याचा बराच प्रचार आहे.
(१४७) हिजेज:-हा राग भैरव थाटाचा जन्य आहे. ह्याचे आरोहावरोह सात स्वरांनी होतात म्हणून ह्याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर मध्यम व संवादी षड्ज आहे. गानसमय प्रात:काळचा पहिला प्रहर मानितात. ह्या रागांत तीव्र निषाद न लागतां कोमल निषाद लागतो. पूर्वांगांत भैरव व उत्तरांगांत भैरवी हे राग ह्याच्या गायनांत दृष्टीस पडतात. हा आधुनिक व यावनिक राग आहे. हा एक भैरवप्रकार आहे.
(१४८) हिंदोल:-हा राग कल्याण थाटांतून उत्पन्न होतो. ह्या रागांत ऋषभ व पंचम हे स्वर वर्ज्य आहेत म्हणून ह्याची जाति औडुव-औडुव आहे. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय रात्रीचा चौथा प्रहर आहे. हा राग उत्तरांगप्रधान आहे. ह्याच्या आरोहांत निषाद वक्र होतो. ह्यांची प्रकृति गंभीर आहे व ह्यांत गमकांचा प्रयोग चांगला शोभतो.
(१४९) हुसेनी कानडा:-हा राग काफी थाटांतून निघतो. ह्याचा आरोहावरोह सात स्वरांनी होतो म्हणून याची जाति संपूर्ण-संपूर्ण आहे. वादी स्वर तारषड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय मध्यरात्र मानितात. या रागांत धैवत स्वर कोमल आहे. या रागाचें वैचित्र्य तार स्थानांत दिसतें. या रागाचें मंडन सारंगांगानें होतें. हा यावनिक व आधुनिक राग आहे. हा एक कानडयाचा प्रकार आहे.
(१५०) हेम:-हा राग बिलावल थाटांतून उत्पन्न होतो. याच्या आरोहांत धैवत स्वर वर्ज्य आहे व अवरोह सातहि स्वरांनी होतो म्हणून याची जाति षाडव-संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम आहे. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानितात. निषाद स्वर यांत असतप्राय आहे. तीव्र मध्यमाचा प्रयोग यांत हानिकारक होत नाही; कारण यांत शुद्ध कल्याण व कामोद यांचें मिश्रण दृष्टीस पडतें. मंद्र व मध्यस्थानांत हा राग चांगला खुलतो. याची प्रकृति गंभीर आहे म्हणून विलंबित लईनें गाइल्यानेंच हा फार खुलतो हा एक कल्याण रागाचा प्रकार आहे.
एका सप्तकांत तीव्र, कोमल मिळून बारा स्वर असतात; या बारांपैकी इष्ट स्वर, तसेंच वादी, संवादी स्वर व आरोहावरोह यांच्या साहाय्यानें जे राग निर्माण होतात; त्यांपैकी हिंदुस्थानी संगीतपद्धतींत प्रचलित असणार्‍या १५० रागांचे वर्णन येथवर केलं. हे सर्व राग गायकांस येतातच असें नाहीं. यांपैकी पंचवीसच राग येणारे कांहीं गायक, तसेंच पन्नास राग येणारें कांहीं गायक समाजांत आपल्या दृष्टीस पडतात. शंभर राग अवगत असून ते चांगल्या प्रकारें गातां येणारे गायक मात्र क्चवित आढळतील; मग दीडशें राग तयार असणार्‍या गायकांचें तर नांव नको ! परंतु एकास जे राग अवगत असतात ते दुसर्‍यास येतीलच असा नियम नाहीं, म्हणून प्रचारांतील सर्व रागांचा ज्यांत समावेश होईल अशा प्रकारचें संकलन करण्याचा या ठिकाणीं यत्‍न केला आहे. रागवर्णनांत आलेल्या पारिभाषिक शब्दांचा अर्थ त्या त्या ठिकाणीं बहुधां दिलाच आहे. जो तेथें दिला गेला नसेल त्याबद्दल 'संगीत' शब्दाखाली तो पहावा.
(१) प्रथमत: चिजा अगर चाली; प्रत्येक भागाच्या निरनिराळ्या; त्यांत पहिला शास्त्रीकरणाचा प्रयत्‍न; प्रत्येक चालीला नांव देणें हा सागवेदांत दिसतो.
(२) दुसरा प्रयत्‍न अनेक चालीचें समुच्चयीकरण करण्याचा; यांत पांच किवां त्यांपेक्षां जास्त स्वर समाविष्ट झालेली जीं गानें होतीं त्यांचा रागांत समावेश करण्यांत आला आहे.
(३) याच्या अगोदरचा प्रयत्‍न म्हणजे ''जातिगायन'' हा होय रागाप्रमाणेंच यांमध्यें देखील वर्गीकरणतत्त्व स्वरविशिष्ट होते. जातिसंगीताची आज स्पष्ट कल्पना येत नाहीं.
(४) हें समुच्चयीकरण करतांना कांहीं समुच्चयीकरणें चिजांच्या अंतर्गत असलेल्या स्वररचनेवरून झालीं असावींत व कांहीं समुच्चयीकरणें लौकिक असावीत. असल्या लौकिक समुच्चयीकरणांची कल्पना ''गुर्जरराग'', ''कर्नाटकराग'', ''कलिंगराग'' या नांवावरून सूचित होईल. जेव्हां एखाद्या विशिष्ट देशांचे संगीत परिचित होई, तेव्हां त्यांच्या चाली देशवार वर्गीकरण करण्याची पद्धति प्रथम व्हावयाची आणि मागाहून त्यांतलया स्वकीय संगीताशीं सदृश चाली गळून पडून कांहीं विशिष्ट चालीच त्या नांवाखालीं रहावयाच्या. या क्रियेनें कांहीं देशमूलक किंवा उपसंस्कृतिमूलक राग तयार झाले असावेत.
ज्याअर्थी राग ही आपल्या संगीतांतील अर्वाचीन पद्धति होय त्याअर्थी तिची उत्पत्ति विशेष सूक्ष्मतेनें पाहिली पाहिजे.
राग गायन पद्धतीचा काल निर्णय.-चालीचें समुच्चयीकरण आज रागपद्धतीनें होत आहे पण त्यापूर्वी तें जातिपद्धतीनें होत असे. जातीपासून रागापर्यंत शास्त्रसंक्रमण कसें झालें हें संगीतशास्त्र (पहा) या शब्दाखाालीं दिलें आहे. रागगायनपद्धति प्रचारांत केव्हापासून सुरू झाली असा एक प्रश्न उत्पन्न होण्याचा संभव आहे. तेव्हां त्याबद्दल आतां विचार करूं.
संगीतशास्त्रग्रंथांत भरताच 'नाटयशास्त्र' ग्रंथ फार प्राचीन होय असें समजतात. त्या ग्रंथाच्या अठ्ठाविसाच्या भागांत त्यानें संगीताविषयीं लिहिलें आहे. त्यांत जातिगायनाचा विचार केलेला आढळतो. यावरून त्यावेळीं जातीचें गायन प्रचारांत असावें असें वाटतें. रागगायनाचा विचार त्यांत केला नाही. यावरून रागगायन तेव्हां प्रचारांत नसलें पाहिजे.
अब्राउद्दीन खिलजी यानें दक्षिणेंत स्वारी केली तेव्हां त्याच्याबरोबर त्याचा सरदार अमीर खुश्रू हा होता. हा सरदार संगीतांत फार प्रवीण होता. हिंदु राजाच्या पदरीं असणार्‍या गोपालनायकाचें गाणें ऐकून अमीर खुश्रू फार खुष झाला. परंतु आपला वरचष्मा व्हावा या हेतूनें, जे राग गोपालनायकानें गाइले होते तेच राग दुसर्‍या दिवशीं, त्या रागांत मुसुलमानी वजावाट करून व त्यांस खुपसुतींचा रंग चढवून त्यानें स्वत: गाइले. यामुळें गोपालनायकास हार खाण्याचा प्रसंग आला. या ऐतिहासिक गोष्टीवरून, गोपालनायकाच्या वेळीं रागगायन प्रचलित होतें, व ही कला त्यावेळी उत्कर्षांस पोंचली होती हें निर्विवाद आहे. गोपालनायक तेराव्या शतकाच्या अखेरीस झाला तेव्हां त्यावेळच्या अगोदर निदान शेंपन्नास वर्षे तरी 'रागगायन' पद्धति प्रचलित असली पाहिजे असें अनुमान केल्यास ते चुकीचें होणार नाहीं.
याच तेराव्या शतकाच्या उत्तरार्धांत संगीतरत्‍नाकर नांवाचा ग्रंथ निर्माण झाला. त्यांत रत्‍नाकरकार शाङ्‌र्गदेव यानें आपल्या ग्रंथांत भरताच्या ग्रंथांत आलेलें जातिप्रकरण घेतलें आहे. तथापि यावेळीं 'जाती'च्या गायनाचा प्रचार असावा असें वाटत नाहीं; कारण, त्यानें आपल्या ग्रंथांत रागाव्यायांत अनेक राग देऊन ते कसे गाईले जावे याचें विवेचन केलें आहे. 'राग' या पारिभाषिक शब्दाची व्याख्या मतंगानें दिलेली त्यानें उध्दृत केली आहे; यावरून रत्‍नाकरकारापूर्वी एक दोन शतकें तरी 'रागगानपद्धति' प्रचलित असली पाहिजे असें ओघानेंच म्हणावें लागेल.
आपल्या मोहक पद्यसमुच्चयानें प्रसिद्धि पावलेला जयदेव कवि हा बंगालप्रांति बाराव्या शतकांत होऊन गेला. त्यानें आपल्या 'गीतगोविंद' नामक काव्यांत राधाकृष्णाच्या लीला वर्णन केल्या आहेत. त्यांत प्रत्येक 'अष्टपदी' नामक पद्याच्या शिरोभागीं सदर पद्य कोणत्या रागांत व कोणत्या तालांत गावयाचें हे दिलें आहे. यावरून ते राग व ते ताल त्यावेळीं बरेच प्रचलित असावेत हें उघड आहे; आणि इतकी लोकप्रियता रागगायनास येण्यास कमींत कमी शेपन्नास वर्षे तरी लोटली असली पाहिजेत हें उघड आहे.
वरील विवेचनावरून असें अनुमान करतां येतें कीं, आपल्या देशांत 'रागगायनपद्धति' निदान एक हजार वर्षांवर प्रचारांत असावी.
अशा प्रकारची 'रागगायनपद्धति' पाश्चात्त्य देशांत नाहीं. पाश्चात्त्य संगीतांत प्रवीण असलेले पाश्चात्त्य पंडित नि:पक्षपातबुद्धीनें असें सांगतात कीं, ''हिंदुस्थाननें या प्रकारें केलेली प्रगति खरोखर स्पृहणीय आहे, आम्हास इतकी मजल मारण्यास बराच काळ लागेल.''
प्रबंधादिगायनार्हगीतें. -याप्रमाणें 'रागगायन' केव्हांपासून प्रचलित झालें हें आपण पाहिजें. तेव्हां असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, 'रागगायन' म्हणजे एखाद्या रागाचे स्वर त्या रागास लागणार्‍या नियमानुसार गाणें कीं काय ? या प्रकारच्या गाण्यानें मनाचें समाधान होणें शक्य आहे काय ? अशा प्रकारचें प्रश्न उचित आहेत. त्यांस उत्तर एवढेंच कीं, अशा प्रकारच्या गाण्यानें उद्दिष्ट हेतु साध्य होत नाही हें खरें तथापि मधुरकंठानें गाईलेले एखाद्या रागाचें आलाप क्षणभर चित्ताकर्षक होतील, पण ते अर्थविरहित असल्यानें मनोवृत्तींची खळबळ व एकतानता त्यायोगें होणार नाही; आणि महणूनच अर्थपूर्ण व रसान्वित अशी प्रबंधादि गायनार्ह गीतें रचिली जाऊन ती विवक्षित रागांत व तालांत मधुरकंठानें गाण्याची वहिवाट पडली असली पाहिजे हें उघड आहे.
प्राचीन ग्रंथांत निरनिराळें प्रबंध त्यांच्या लक्षणांसह सांगितले आहेत; परंतु त्या प्रबंधगानाचा प्रचार आजमित्तीस लुप्त झालेला आहे; म्हणून त्याऐवजी जी गीतें आज प्रचारांत आलीं आहेत त्या गीतांचा विचार करूं.
उद्ग्राह, मेलापक, धु्रव, अंतर व आभोग हे पांच अवयव पूर्वी प्रचारांत असलेल्या 'प्रबंधां'नां असत. ह्या अवयवांनां 'धातु' ही संज्ञा असे. प्रबंधाऐवजी जीं गीतें आज प्रचारांत आली आहेत त्यांपैकी कांहींनां स्थायी, अंतरा, संचारी आणि आभोग असे चार अवयव असून कांहींस स्थायी आणि अंतरा असे दोनच अवयव ठेविलेले दृष्टीस पडतात. प्रबंधास स्वर, पदें (= चिजेचीं अक्षरें), पाट (= वाद्यांत निघणारे बोल), ताल, तेन (= मंगलद्योतक अशीं तोमतनानीद अक्षरें), विरूद (= आश्रयदात्याचा उल्लेख) अशीं सहा अंगें असत; ह्या अंगांपैकीं तीन अंगें हल्लींच्या प्रत्येक चिजेस असतातच; व कांहींस चार व कांहींस पांच असलेली दृष्टीस पडतात.
सरगम:-'सरगम' म्हणजे रागास लागणार्‍या स्वरांची एक प्रकारची तालबद्ध रचना. 'सरगमी' निरनिरळ्या रागांत व तालांत बांधिलेल्या असतात. ह्यांचा मुख्य उद्देश स्वरज्ञान व रागज्ञान करून देण्याचा असतो. विशेषेंकरून वस्तादी व घरंदाज सरगमीचें महत्त्व फार असतें. यांत स्थायी व अंतरा असे दोन भाग असतात.
लक्षणगीत:-रागास लागणारे स्वर, त्यांची जाति, त्यांचा समय, त्यांचे वादी-संवादी स्वर वगैरे माहिती ज्या गीतांत सांगितलेली असते व जें गीत मुद्दाम त्याच रागांत गावयाचें असतें त्या गीतास त्या रागाचें 'लक्षणगीत' असें म्हणतात.
अशा प्रकारची लक्षणगीतें गाण्याची वहिवाट दक्षिणेकडे असल्याचें समजतें. उत्तरेकडे पूर्वीचे नायक आपल्या शिष्यांस 'सरगमी' स जोडूनच 'लक्षणगीत' शिकवीत असत. हा प्रचार लुप्त झाला होता. परंतु इसवी सन. १९१० सालानंतर गायनांत परिवत्रन घडवून तें योग्या अशा शास्त्रीय पायावर रचिली आहेत; व ती गाण्याचा परिपाठ महाराष्ट्रांत व उत्तारहिंदुस्थानांत सुरू झाला आहे. स्थायी व अंतरा असे ह्याचे दोन भाग असतात.
ध्रुवपद:-हा शब्द संस्कृत भाषेंतील असून संस्कृत ग्रंथांत त्याचें असें लक्षण आहे:-

''गीर्वाण मध्यदेशीय भाषासाहित्य राजितम् ।
द्विचतुर्वाक्यसंपन्न नरनारीकथाश्रयम् ॥
श्रुंगाररसभावाद्यं रागालापपदात्कम् ।
पादांतानुप्रासयुक्तं पादांतयुगकं च वा ॥
प्रतिपादं यत्र बद्धमेवं पादचतुष्टयम् ।
उद्ग्राह ध्रुवकाभोगांतरं ध्रुवपदं स्म्तम् ॥''
(अनूंपसंगीत रत्‍नाकर.)

प्रचारांतील बहुतेक ध्रुवपदें हिंदी, ब्रिज व उर्दू या भाषांत आहेत. ध्रुवपदाचे प्राय: चार भाग असतात, त्यांनां 'तूक' म्हणतात. 'स्थायी', 'अंतरा', 'संचारी' व 'आभोग' अशीं नांवें अनुक्रमें त्या चारहि विभागांस दिलेलीं आहेत. रागाचें स्वरूप व्यक्त करणारा भाग 'स्थायी' हा आहे, व त्यामुळें तो फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक भाग तीन किंवा चार चरणांच असतो. ध्रुवपदाचें गाणें मर्दानी व जोरकस असतें. त्यांत वीर, शृंगार व शांत हे रस प्रमुख असतात. परमेश्वर व निरनिराळ्या देवता यांची स्तुति, ऋतूंची वर्णनें, मंगलकार्यादि समारंभ, सृष्टिसौंदर्य इत्यादि गोष्टी ध्रुवपदपद्यांचें विषय होत. ह्या पद्यांची भाषा प्रौढ असतें. हीं पद्यें प्राय: गंभीरप्रकृतीच्या रागांत गाइलीं जातात. चौताल, सूलताल, झंपा, तीव्रा, ब्रह्म, रुद्र, सवारी इत्यादि तालांत ही बांधिलेली असतात. ध्रुवपद गायकांनां 'कलावंत' अशी संज्ञा आहे. 'खंडार', 'नोहर', 'डागुर' व गौरार' असे कलावंतांचे चार वर्ग आहेत. हे चार वर्ग त्यांच्या वाण्यांवरून (गाण्याच्या पद्धतीवरून) झालेले आहेत. संस्कृतांत 'गौडी' नांवाची जी एक गीति (गाण्याची पद्धति) सांगितली आहे त्या 'गौडी' शब्दाचेंच अपभ्रष्टरूप 'गौरार' हें असावें असें कांहीं विद्वानांचें मत आहे. या वर सांगितलेल्या चार वाण्यांमधील फरक आजमित्तीस फारसा दृष्टीस पडत नाही. नायक गोपाल, नायक बैजु, नायक वक्षु, नायक धोंडी, वृंदावन येथील बाबा हरिदास, मियां तानसेन, चिंतामणमिश्र ह्यांचींच ध्रुवपदें आजमित्तीस विशेषत: ऐकूं येतात.

इसवी सनाच्या पंधराव्या शतकांत ग्वाल्हेरच्या गादीवर असणारा तुनुवार वंशांतील राजा 'मान' हा संगीताचा मोठा चाहता व भोक्ता होता. त्यानें ध्रुवपदाचें गायन नांवारूपास आणिलें. पुढें दिल्लीपति अकबर बादशहानें आपल्या दरबारांत तानसेनाचा प्रवेश करवून ह्या कलेस जास्त उत्तेजन दिलें. ध्रुवपदाचें गायन गेल्या शतकाच्या सुरवातीपर्यंत फार लोकप्रिय होतें. अद्यापि सुद्धां ध्रुवपदाचें गायन शुद्ध व भारदस्त असें समजलें जातें. ध्रुवपदाच्या गायकींत गमक, बोलतान, दुगण, चौगण वगैरे गोष्टी दृष्टीस पडतात.

ख्याल:-हा शब्द फारसी भाषेंतील असून त्याचा अर्थ 'मजा' असा आहे. पूर्वी सभ्य समाजांत 'ख्याल' गात नसत. ध्रुवपदापेक्षां ख्यालाची रचना संक्षिप्त असते. यांत 'स्थायी' व 'अंतरा' असे दोनच भाग असतात. गांभीर्य, शब्दवैचित्र्य व रागशुद्धता या गोष्टी ध्रुवपदाइतक्या ह्यांत दिसत नाहींत. सृष्टिसौंदर्य, ऋतुवर्णन, उत्वसप्रसंग इत्यादि गोष्टी ह्या पद्यांचे विषय होत. तथापि प्राय:शृंगार ह्या गीतांतून दृष्टीस पडतो. हीं गीतें, तिलवाडा, झुमरा, आडाचौताल, एकताल, त्रिताल, वगैरे तालांत गाइलीं जातात. ख्यालाच्या गायकींत बेहेलावे, तान, पलटा, बोलतान, मीड वगैरे गोष्टी दृष्टीस पडतात. ध्रुवदांत जसें तालाच्या खटपटीकडे लक्ष असतें तसें ख्यालांत स्वरांकडे लक्ष द्यावें लागतें. जौनपुरचा सुलतान हुसेन शर्की यानें ख्यालाचें गाणें प्रचारांत आणिलें. नंतर दिल्लीपति महंमदशहा (१७१९-१७४८) ह्याच्या पदरी 'सदारंग' आणि 'आदारंग' नांवाचे प्रसिद्ध गायक होऊन गेले; त्यांनी अनेक ख्याल रचून ते आपल्या शिष्यांस शिकविले. त्यावेळीं ख्यालगायनाची चहा व लोकप्रियता इतकी वाढली कीं, त्यामुळें ध्रुवपदाचें गाणें मागें पडलें. ख्याल दोन प्रकारचें आहेत. एक 'मोठे' म्हणजे ध्रुवपदी अंगाचे व दुसरे 'छोटे' म्हणजे जलद लईचे. जलदलईचे ख्याल गाणार्‍या गायकांस 'कवाल' म्हणतात व ते आपली परंपरा प्रसिद्ध अमीर खुश्रू ह्याच्यापर्यंत नेऊन भिडवितात. ध्रुवपदी अंगाचे ख्याल गाणारे गायक आपली परंपरा सदारंग, आदारंगांपर्यंत पोंचवितात. या ठिकाणीं एक गोष्ट नमूद करण्याजोगी आहे ती ही कीं, सदारंग व आदारंग यांनी जरी अनेक ख्याल रचून ते आपल्या शिष्यशाखेस पढविले तथापि ते स्वत: ध्रुवपदेंच गात असून त्यांनी आपल्या मुलांबाळांस ख्यालाचें गाणें न शिकवितां ध्रुवपदाच्या गायनांतच त्यांस तरबेज केलें. आजमित्तीस रामपूर येथिल प्रसिद्ध दरबारगायक वजीरखां हे आपणास सदारंग, आदारंग यांचे खास वंशज समजतात व ते ख्याल न गातां ध्रुवपदेंच गातात.

टप्पा:-हा पंजाबी शब्द आहे. ख्यालापेक्षां 'टप्पा' अधिक संक्षिप्त असतो. याचेहि स्थायी व अंतरा असे दोन भाग असतात. या गीताची प्रकृति क्षुद्र मानिली जाते. यांत शृंगाररस प्रधान असतो. टप्पे सर्व रागांत नसून काफी, खमाज, भैरवी, झिंझूटी, पीलू, बरवा वगेरे हलक्या रागांत असतात. अयोध्येचा रहीस मियांशौरी यानें टप्प्याचें गाणें प्रचारांत आणून लोकप्रिय केलें. ह्या गीतांतील तान, कंप, मुरकी वगैरे गोष्टी फार चिताकर्षक असतात. टप्प्यांची प्रकृति चंचल असते; यावरून प्राचीन 'वेसरा' गीतींतून या गायनाची रीति निघाली असावी असें विद्वानांचें मत आहे.

ठुमरी:-हें एक क्षुद्र गीत समजलें जातें. याचा प्रधान रस शृंगार आहे. या गीताची शब्दरचना संक्षिप्त असते. या गीतांस 'पंजाबी' ताल अधिक शोभतो. जे राग टप्प्याचें तेच प्राय: ठुमरीचे असतात. उच्च प्रतीचे गायक ठुमरीचें गाणें कमी दर्जाचें समजून स्वत: गात नाहींत. उत्तरेकडे ठुमरी बहुधां नायकिणी गातात. संयुक्तप्रांतांत ठुमरी फार नटवून गातात. बनारस व लखनौ ही शहरें तर ठुमरीच्या गायनाविषयीं प्रसिद्धच आहेत. ठुमरींत रागाची शुद्धता राखण्याकडे लक्ष न देतां, तो निरनिराळ्या रागांच्या खुबीदार मिश्रणानें नटविण्याकडे गायकाचा कल असतो. याहि गीताला स्थायी व अंतरा असे दोन भाग असतात.

होरी:- 'होली' हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ फाल्गुन महिन्यांतील उत्सव असा आहे. त्याच शब्दाचें अपभ्रष्टरूप 'होरी' हें आहे. या उत्सवांत रंग खेळण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्ण व गोपी यांनी या उत्सवांत केलेल्या लीलांचें वर्णन असणार्‍या गीतांस यामुळेंच 'होरी' हें नांव पडलें आहे. ही गीतें वसंतपंचमीपासून चैत्र शुद्ध प्रतिपदेपर्यंतच गावयाची असा ह्यांस निर्बंध आहे. 'होरी' सर्व रागांत आढळते. 'होरी' चे प्रकार दोन; ते 'पक्कीहोरी' व 'कच्चीहोरी' हे होत. 'पक्कीहोरी' ध्रुवपदीये 'धमार' तालांत गातात; यावरून तिला 'धमार' म्हणण्याची वहिवाट आहे. तिची प्रकृति गंभीर असून तिच्यांत ठाय, दुगण, चौगण, बोलतान, गमक वगेरे प्रकार दृष्टीस पडतात. 'कच्चीहोरी' हें गीत 'दीपचंदी' तालांत असून तें ख्यालीये गातात व आपली तानबाजी त्यांत दाखवितात. हिची प्रकृति चंचल अहे. या गीतातला स्थायी व अंतरा हे दोन भाग असतात.
तराना:-हें गीत अर्थविहीन असतें. हा गीताचा प्रकार ख्यालीयांचा आहे. यांत सर्व मौज लयदारीची आहे. याचे स्थायी व अंतरा असे दोन भाग असतात. ध्रुवपदानंतर जसा धमार तसा ख्यालानंतर तराना गाण्याची वहिवाट आहे. बहादर हुसेनखां, तानरसखां व नश्रुखां यांचे तराने प्रसिद्ध आहेत.

चतुरंग:-या नांवाच्या गीतास चार भाग असतात. पहिल्या भागांत पदें (चिजांचे बोल), दुसर्‍यांत तेन (तनानादि अक्षरें), तिसर्‍यांत स्वर (सरगम) आणि चवथ्यांत पाट (पखवाजाचे बोल); अशा प्रकारची या गीताची रचना असते. ही रचना पुराणी नाही. हीं गीतें ख्यालाच्या तर्‍हेवर गाइलीं जातात.

गजल:-उर्दू, पर्शियन, अरबी या भाषांत हीं गीतें रचलेलीं आढळतात. ज्या रागांत 'टप्पा,' 'ठुमरी' असते त्याच रागांत प्राय: हीं गीतें गाइलीं जातात. यास पस्तु किंवा दीपचंदी ताल लावितात. हीं प्राय: शृंगाररसप्रधान असतात. आषकमाषुक यांचे प्रेमोद्वार, सौंदर्यवर्णन वगेरे गोष्टी या गीतांचे विषय होत. या गीताची शब्दरचना फार मनोहर असते. केव्हां केव्हां उदात्त कल्पनाहि यांत आलेल्या आढळतात. शृंगारपर व वेदान्तपर असे दोन प्रकारचे अर्थ या गीतांतून काढण्याचा प्रचार आहे. हीं गीतें मुसुलमानांची खास स्वदेशी असून तीं त्यांनीं आपणाबरोबर या देशांत आणिली. ज्यांनां चांगलें भाषाज्ञान असतें असे गायक हीं गीतें त्यांतील अर्थ, रस व भाव यांचा बिघाड न होऊं देतां उत्तम प्रकारें गाऊं शकतात. या गीतांत बरेच चरण असतात व त्यांस 'अंतरे' म्हणतात; ते अंतरे सर्व एकसारखेच गाईले जातात.

लावणी:-हा शब्द हिंदी भाषेंतील आहे. महाराष्ट्रवीर जेव्हां हिंदुस्थानांत स्वारीवर जाऊं लागले तेव्हां तिकडून त्यांनीं हें गीत महाराष्ट्रांत आणिलें. पराक्रमाच्या दगदगीनंतर विश्रान्तीची अपेक्षा साहजिक आहे. तेव्हां विश्रांतीच्या वेळी करमणुकीसाठी या नवीन आणिलेल्या गीतांचा प्रचार महाराष्ट्रांत सुरू झाला. व त्या धर्तीवर मराठी भाषेंत 'लावणी' हीं पद्यें रचण्यास आरंभ झाला. या पद्यांत बहुधा शृंगाररस प्रधान असतो; तथापि कांहीं लावण्या भक्तिरसप्रधान व कांहीं वेदांतपर अशाहि असतात. लावणी बहुधां 'पहाडी', 'पीलू', 'भैरवी', 'काफी', 'कालिंगडा', वगैरे रागांत गातात. हिची प्रकृति चंचल असल्यामुळें धुमाळी या तालाशीं तिचा जम चांगला असतो. सभ्य समाजांत या लावणीगीतास फारसा मान नाहीं. तथापि रामजोशी, होनाजी बाळ, सगनभाऊ, परशुराम, प्रभाकर, इत्यादि नामांकित शाहीरांनी केलेल्या गीतांच्या प्रौढ व गंभीर रचनेमुळें, ती फार लोकप्रिय झाली. या गीतांत बरेच चरण असतात. त्यांस 'चौक' म्हणतात, ते अंतर्‍याप्रमाणें सर्व एकसारखेच गावयाचे असतात.

पद:-हीं गीतें प्राय: साधुसंतांनीं रचलेलीं असून ती ईश्वरभक्तिपर व शांतरसप्रधान असतात. यांचा मुख्य हेतू जनतेस सन्मार्गोपदेश करणें हा आहे. कीर्तनांत हरिदास यांचा उपयोग करतात; पण सरळ चालीवर म्हणण्यापलीकडे संगीताशीं यांचा संबंध येत नाहीं म्हणून त्यांच्या अधिक बिवेचनाची येथें जरूर नाहीं.

ह्याप्रमाणें प्रचारांतील गायनार्ह चीजांचें वर्णन झालें; यावर कांहींचें म्हणणें असें येईल कीं, वामनाचा श्लोक, पंताची आर्या, तुकोबाचा अभंग व ज्ञानेश्वर महाराजांची ओवी हीं अनेक प्रकारची पद्यें काय थोडीं आहेत ? मग चिजाच कशाला ? याचें उत्तर असें कीं, श्लोकादि पद्यें छंद:शास्त्राच्या नियमानुसार रचलेलीं असतात हें खरें; पण गायनास त्यांच उपयोग व्हावा हा हेतु डोळ्यापुढें ठेवून त्यांची रचना झालेली नसते हेंहि पण तितकेंच खरें. तेव्हां अशा पद्यांचा उपयोग गायनाकडे करणें अप्रशस्त होय. गायनार्ह गीतांत म्हणजे चिजांत कठोरवर्ण असूं नये; जोडाक्षरें होतां होई तों त्यांत नसावींत; समेवरील अक्षर दीर्घ असावें; त्याच्या मागील व पुढें येणारीं एकदोन अक्षरें र्‍हास्व असावींत; विलंबित लयीच्या चिजेंत अक्षरसंख्या थोडी असावी; पण जलद लयीच्या चिजेंत तीच संख्या जास्त असावी; स्थायी व अंतरा यांच्या शेवटी यमकें यावीत; अंतरा फार चरणांचा असूं नये; अशा प्रकारचे कांहीं नियम चिजा रचणारास माहीत असले पाहिजेत. अशा नियमांनुसार चिजा रचणारास संगीतशास्त्रांत 'वाग्गेयकार' अशी संज्ञा आहे. 'वाग्गेयकाराचें' लक्षण असें:-

''वाड्:मातुरुच्यते गेयं धातुरित्यभिधीयते ।
वाचं गेयं च कुरुते य: स वाग्गेयकारक: ॥''

यांत 'वाक्' आणि 'गेयं' या शब्दांचा अर्थ साहित्य व संगीत असा आहे. यावरून साहित्य व संगीत या दोनहि विषयांचें यथार्थ ज्ञान असल्यावांचून चिजा रचितां येणें शक्य नाहीं. एवढया विवेचनावरून हें स्पष्ट दिसून येईल कीं, श्लोक, आर्या, अभंग, ओवी वगेरे पद्यें गायनार्ह नाहींत, एवढेंच नव्हे तर तीं पद्यें ओढाताण करून रागबद्ध व तालबद्ध करण्याचा कोणी प्रयत्‍न केल्यास ती गायनास्त्रदृष्टया अयोग्यच ठरेल.

गानलिपि (नोटेशन).-मनोगत व्यक्त करण्यास मुख्य साधनें प्राय: दोन; एक वाणी व दुसरी लेखणी. मानवी समाज बाल्यावस्थेंत असल्यावेळीं लेखनकला अस्तित्वांत आली नहती, त्यामुळें उत्पन्न होणारी अडचण, समाजाचें पाऊल सुधारणेच्या मार्गांत पडत जाऊन, अक्षरपरिचयापर्यंत मजल येतांच नाहींशी झाली. इतर विद्यांप्रमाणें गायनविद्येसहि लेखनकला अवश्य आहे. गुरुसान्निध्यांत या विद्येचा अभ्यास करून एकाच वेळीं तयार झालेल्या विद्यार्थ्यांमध्यें, बीजांच्या शुद्धाशुद्धतेबद्दल वाद उपस्थित झालेला पाहण्यांत येतो, याचें कारण गानलिपीचा अभाव हें होय. ज्या देशांत गानलिपि रूढ आहे तेथील गानव्सासंगी मनुष्य देशांतरी असतांनाहि, या लिपीच्या साहाय्यानें आपल्या देशांत नवी नवी प्रचलित झालेली गीतें बर्‍याच अंशी हुबेहुब गाऊं शकतो. यावरून गानलिपीची उपयुक्तता सहज कळून येणारी आहे.

गानलिपि सामान्यत: एकच असावी म्हणजे तिच्या योगें देशभर सर्वत्रांस सारखा फायदा होतो. लिपि वर्णात्मक असावी कीं चिन्हात्मक असावी याबद्दल आतां विचार करूं. पाश्चात्त्यांची गानलिपि चिन्हात्मक आहे व आम्हा आर्यांची वर्णात्मक आहे. 'सा, री, ग, म,' हे वर्ण तरी त्या त्या ध्वनींचीं चिन्हात्मक स्वरूपेंच नव्हेत काय ? असें असतां या स्वरध्वनींकरितां निराळीं चिन्हें योजून त्या चिन्हांवर त्या त्या स्वरांचा आरोप करून मग ते ते ध्वनी उच्चारावयाचे महणजे त्या त्या ध्वनीपासून दोन पायर्‍या मागें जाण्यासारखें होत नाही काय ? तेव्हां ध्वनीसाठी वर्णांचीच योजना करणें हें अधिक सोईस्कर होईल असें वाटतें. ज्यांनां ही देवनागरी लिपि येत नसेल त्यांचें कसें ? असा प्रश्न उद्धवण्याचा संभव आहे. परंतु, त्यास कोणती तरी चिन्हें ध्यानांत ठेविलींच पाहिजेत; मग सा, री, ग, म, हीं वर्णात्मकें चिन्हें काय किंवा तद्बोधक इतर चिन्हें काय, दोन्हीहि सारखीच. यावरून चिन्हात्मक लिपीपेक्षां वर्णात्मक लिपि अधिक इष्ट व उपयुकत ठरते. आमच्या इकडे गानलिपि हजार वर्षावर अस्तित्वांत आहे. संगीतरत्‍नाकरकाराची लिपि अशी आहे:-

''मंद्रस्तारस्तु दीप्त: स्यान्मन्द्रो बिंदुशिरोभवेत् ।
उर्ध्व रेखा शिरास्तारो लिपौ ..................... ॥''

भावार्थ:-कण्ठगायनांत मंद्र, मध्य व तार अशी तीनच सप्तकें उपयोगांत आणितात. स्वराक्षराच्या दडोक्यावर दिलेला बिंदु, तो र्‍हास्व स्वर मन्द्र सप्तकांतील आहे असें दाखवितो; तसेंच स्वराक्षर नुसतें लिहिल्यास, तो स्वर मध्यसप्तकांतील आहे असें समजावयाचें; आणि स्वराक्षराच्या डोक्यावर दिलेली उभी ही रेघ तो स्वर तारसप्कांतील आहे असें दाखवितें. रत्नाकर अमुक रागास अमुक मर्ूच्छना, असें सांगतो त्यामुळें त्याला तीव्र व कोमल हे स्वर निराळे सांगावे लागत नसत, म्हणून तीव्र व कोमल स्वरांकरितां खुणा करण्याचें त्यास प्रयोजन पडलें नाहीं. रत्‍नाकरकारानंतर जे संस्कृत ग्रंथकार झाले त्यांनी याच लिपीचा अंगिकार केला आहे. पंडित सोमनाथ यानें वीणावादनाकरितां वीस खुणा अधिक योजिलेल्या आहेत. पंडित व्यंकटमखी याची लिपि मात्र निराळी दिसते ती अशी:-

 स्वर  लिपिसंकेत.
 स  सा
 शुद्ध री  रा
 शुद्ध ग  रा गा
 सधारण ग  रु गी
 अंतर ग  '' नु
 शुद्ध म  मा
 प्रति म  मि
 प  प
 शुद्ध ध  धा
 शुद्ध नि  धी ना
 कैशिक नि  धु नि
 काकली नि  '' नु

इ.स. १९०४ मध्यें दक्षिणेंत कडमीमलाई या गांवी एक शिलालेख सांपडला आहे. त्यांत व्यंकटमखीची वरील लिपि दृष्टीस पडते. तो शिलालेख सातव्या शतकांतील असावा असें पुराणवस्तुसंशोधकांचें मत आहे. यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात; एक ही कीं, सातव्या शतकापासून ही गानलिपि अस्तित्वांत होती, व दुसरी ही कीं, ही गानिलिपि पंडित व्यंकटमखी यास अवगत असून तिचा त्यानें आपल्या ग्रंथांत स्वीकार केला.
मुसुलमान बादशहाच्या अमदानींत संमीतविद्येचा उत्कृर्ष होऊं लागला तेव्हां विद्यार्थ्यांची आसक्ति प्रत्यक्ष कलानैपुण्य संपादण्याकडे होऊं लागली, त्यामुळें गुरुपरंपरेने व गुरुमुखानें ही विद्या हस्तगत करण्याचे प्रयत्‍न जोरावर होऊं लागले. संपादिलेलें चिजारूपी ज्ञान गानलिपींत लिहून ठेवण्याचा परिपाठ कोठेंहि असल्याचें आढळत नाहीं. शिकलेल्या चिजा साध्या अक्षरांनीं मात्र लिहून संग्रही ठेवण्याची वहिवाट होती. गानलिपींत चिजा लिहून ठेवण्याचा परिपाठ असतां तर मियां तानसेन यांची ध्रुवपदें; सदारंग, आदारांग, मनरंग यांचे ख्याल; मियांशोरी यांचे टप्पे वगैरेंसारख्या घरंदाज व भारदस्त चिजा त्यावेळी जशा गायिल्या जात तशाच आज ऐकण्याचा सुयोग आपणास लाभला असता.

सुमारें पाऊणशें वर्षांपासून गानलिपि प्रचारांत आणण्याचा प्रयत्‍न सुरू झाल्याचें दृष्टीस पडतें. कांहीं प्रांतीं पाश्चात्त्य गानलिपि (स्टाफ नोटेशन) स्वीकारून चिजा लिहिलेल्या आढळून येतात; कांहींनीं पाश्चात्त्य गानलिपीची मोडतोड करून नवी लिपि अस्तित्वांत आणण्याचा प्रयत्‍न केलेला दिसतो. कांहीं संगीतव्यवसायी अधिक उणी चिन्हें उपस्थित करून आली स्वतंत्रच गानलिपि प्रचारांत आणण्याचा यत्‍न करतांना हल्लीं दृष्टीस पडत आहेत. ह्यावरून एवढें दिसून येतें कीं, गानलिपीची उपयुक्तता सर्वत्रांस पटली आहे.

कोणतीहि गानलिपि सर्वमान्य होण्यास तींत खालीं दिलेल्या गोष्टी अत्यावश्याक होत:-(अ) ती पूर्वपरंपरेस धरून असावी. (आ) तिच्यामध्यें चिन्हें फार नसावीत. व (इ) तिच्यांतील सुटसुटीतपणा व सौकर्य कोणासहि सहजीं पटावें. रा. विष्णु नारायण भातखंडे बी. ए. एल्. एल्. बी. हायकोर्ट वकील मुंबई, यांनी आपल्या ग्रंथांत अंगीकारलेल्या गानलिपीत सर्वसामान्य होत आहे. ती लिपि अशी:-

अधो बिंदु: स्वरो मन्द्रतारोबिंदुशिरा भवेत्।
बिंदु हीनो थ शुद्धस्याद्विकृतानधुना बु्र्रवे ॥१॥
अधोरेखांकिता ज्ञेया: कोमलास्तीव्रम: पुन: ॥
ऊर्ध्वरेखायुतो लिप्यां संकेतो त्र समाहुत: ॥२॥
(अभिनवरागमंजरी.)

भावार्थ:-मंद्रसप्तकांतील स्वरांकरितां स्वराक्षराखाली बिंदु; मध्यसप्तकांतील स्वरांकरितां बिंदुरहित स्वराक्षर; आणि तारसप्तकांतील स्वरांकरिता स्वराराच्क्षया डोक्यावर बिंदु; कोमल स्वरांकरितां स्वराक्षराखालीं आडवी रेघ; तीव्रमध्यम स्वराकरितां म स्वराक्षराच्या डोक्यावर उभी रेघ. ह्याप्रमाणें गानलिपींतील संकेत समजावे. ह्या लेखांत आम्ही ह्याच गानलिपीचा उपयोग केला आहे.
आमच्या संपादकत्त्वाखाली चालू असलेल्या 'हिंदुस्थानी संगीतपद्धति क्रमिक पुस्तकमालिकें' तील पुस्तकांत आलेल्या अनेक चिजा वरील गानलिपींत लिहिलेल्या आहेत. गानलिपीत लिहिलेल्या सताल चिजांनां 'आक्षिप्तिका' अशी संज्ञा संस्कृत ग्रंथकार देतात व तिचें लक्षण सांगतात तें असें:-'तालस्वरपदाबद्धं गीतमाक्षिप्तिकामतम् ।'

रागांचें देवतात्मक स्वरूप.- प्राचीन संस्कृत ग्रंथांत रागांची स्वरात्मक व देवतात्मक स्वरूपें देण्याचा प्रघात आहे. त्याप्रमाणें रागांची स्वरस्वरूपें देऊन झाली. आतां देवतात्मक स्वरूपांविषयीं लिहावयाचें. या स्वरूपाबद्दल दोन दृष्टींनीं विचार होईल; एक धार्मिक दृष्टि आणि दुसरी शास्त्रीय दृष्टि. (१) पूर्वीच्या श्रधाळु युगांत लोक रागांस देवता कल्पून त्यांची आराधना, जप व पूजा करून त्या त्या रागांचें ज्ञान संपादन करण्याची इच्छा धरीत. उदाहरणार्थ भैरव रागास शंकर देवता व सारंगास विष्णु देवता कल्पीत. परंतु, प्रस्तुतच्या चिकित्सक युगांत ज्ञानसंपादण्याचा हा मार्ग कोणासहि पटण्यासारखा नाही. शिवाय विद्याथी प्राय: मुसुलमान वस्तादाजवळ गायनविद्या शिकण्याची हांव धरितो; कारण, ही कला मुसुलमान लोकांनी उत्तम प्रकारें हस्तगत करून ठेवली आहे; मुसुलमान हे मूर्तिपूजेच्या विरुद्ध असल्यानें रागास देवता मानून त्यांची केलेली पूजाअर्चा त्यांस खपणार नाहीं, एवढेंच नव्हे तर ते आपल्या शागीर्दांस तसे करूंहि देणार नाहींत. (२) भैरव रागाची स्त्री भैरवी मानिली आहे. ती गौरवर्ण असून श्वेतवस्त्रपरिधान केलेली असें तिचें वर्णन ग्रंथांत दिलेलें आहे. यांतील गौरव श्वेत या रंगांवरून भैरवी रागास लागणार्‍या स्वरांपैकी कोणत्या स्वरांचा बोध होतो म्हणावयाचे !! वर्णनांतील रंग व रागांचे स्वर यांत जर कार्यकारणभाव नसेल, तर याचें महत्त्व कांहींच नाहीं; मग हा केवळ कल्पनातरंग होय, असें आज तरी समजलें जात आहे.

राग व त्यांचे संकेत:- प्रत्येक शास्त्रांत कांहीं संकेत म्हणून असतातच, त्याप्रमाणें संगीतशास्त्रांतहि रागांविषयीं कांहीं संकेत आहेत; त्यांपैकी मासल्याकरितां कांहीं खालीं दिले आहेत:-दीपक राग गाइल्यानें दिवे लागणें; मेघ राग गाइल्यानें वृष्टि होणें; श्रीराग गाइल्यानें मृत मनुष्य जिवंत होणें, हिंदोल राग गाइल्यानें झोंपाळा आपोआप हलत राहणें; मालकौंस राग गाइल्यानें अग्नीवांचून चूल पेटणें; इत्यादि.

राग नामांचा विचार.- प्रचारांत जीं रागनामें दृष्टीस पडतात त्यांपैकीं कांहीं देवता, देश, नद्या, ऋतू, स्वर व नवे राग रचणारे, यांच्या नांवांवरून पडलेली आहेत. उदाहरणार्थ (१) देवता:-शंकरा, भैरव, सारंग, बिभास, मल्ला, श्री, भैरवी, गौरी, दुर्गा, इत्यादि. (२) देश:-आभीरी, बंगाल, मालवी, सौराष्ट्र, सोरट, गुजरी, हिजेज, पूर्वी इत्यादि. (३) नदी:-सिंधूरा, रेवा इत्यादि. (४) ऋतू:-वसंत, मेघ इत्यादि. (५) स्वर:-गांधर, पंचम इत्यादि. (६) रागकर्ते:-मियांसारंग, मीरामल्लार; सूरदासीमल्लार बिलासखानी तोडी, बहादुरी तोडी इत्यादि.

मुसुलमानांच्या संसर्गाचा गायनावरील परिणाम.- देवगिरी येथील यादव वंशांतील सिंघण (इ. स. १२१०-१२४७) राजाच्या पदरीं शाङ्‌र्गदेव होता, हाच शाङ्‌र्गदेव 'संगीतरत्‍नाकर' या ग्रंथाचा कर्ता होय. या ग्रंथावरील टीकाकार पंडित कल्लीनाथ यांस विजयानगर येथील विद्याप्रेमी यादववंशांतील राजांचा आश्रय होता. दक्षिणेकडे परकीयांच्या उपसर्ग फारसा लागला नाही. यामुळें अवघ्या भारतखंडांत पूर्वी सर्वत्र एकच प्रकारें प्रचलित असलेली संगीतविद्या तिकडे जशीच्या तशीच राहिली. या शास्त्राएवरील संस्कृत ग्रंथ पाहिले म्हणजे औपपत्तिक भाग सर्वत्र एकच रूढ होता व तो मुसुलमानांसारख्या परकीयांशी आपला संबंध आला असतांहि जशाचा तसाच राहिला हें दृष्टीस पडतें. पण कलेच्या भागांत, म्हणजे प्रत्यक्ष गायनांत मुसुलमानांनीं उत्तरेकडे इतका फरक केला कीं, ती गायनकला केवळ मुसुलमानी बनली. कलेमध्यें उत्तरोत्तर मुसुलमान विलक्षण प्रावीण्य संपादित गेले, व पुढें अकबर बादशहाच्या वेळीं तर त्याच्या दरबारी असणार्‍या प्रसिद्ध तानसेन नामक गायकानें नवे नवे राग बनवून बादशहास खुष केलें. हे राग असे मधुर होते कीं, ते प्रचारांत येतांच अति लोकप्रिय झाले. या मुसुलमानी प्रकारच्या गायनगांत दिसून येणारें वैशिष्टय म्हणजे, मींड, मुर्की, बेहेलाबे, तान, पलटे, बरोबरीच्या व दुनीच्या ताना इत्यादि प्रकार होत. ही विद्या खास मुसुलमानांच्या घरची इतकी बनली आहे कीं, जर कोणा एखाद्या हिंदु गावकास आपली गुरुपरंपरा मुसुलमान वस्तादाशीं भिवितां आली नाहीं, तर त्याची गानविद्या निरस असें मानण्याचा प्रघात समाजांत पडला आहे.

रागांचा नवरसांशीं संबंध.-गायनकला इतकी मोहक आहे कीं, पशुपक्ष्याचेंहि मन तिच्या योगें आकर्षिलें जातें अशा गोष्टी आपण ऐकतों, मग मनुष्यमात्राचें मन ती आकर्षून घेईल यांत नवल काय ? शिणलेल्या मनास शांति व आनंद प्राप्त होऊन चित्तवृत्ति उल्लसित होतात. चित्तवृत्तांचें आश्रयस्थान अंत:करण; आणि गायनाचा परिणाम अंत:करणावर झाल्यानें निरनिराळे मनोभाव जागृत होतात; व त्यायोगें शृंगारवीरादि रसांचा उद्भव होतो. यावरून गायनाचा रसांशीं किती निकट संबंध येतो हें दिसून येतें. असें असतां आज उपलब्ध असलेल्या संस्कृत ग्रंथांत या गोष्टीचें विवेचनात्क विवरण केल्याचें आढळत नाहीं. रत्‍नाकरांत षड्ज व ऋषभ स्वरांपासून वीर, अद्धत व रौद्र; धैवतापासून बीभत्स व भयानक: गांधार व निषाद यांपासून करुणरस; व मध्यय व पंचम स्वरांपासून हास्य व शृंगार असे रस उत्पन्न होतात असा फक्त नामनिर्देश केला आहे. रत्‍नाकरकारानंतर सुमारें तीन शतकांनीं झालेला पारिजातकार हा स्वर व रस यांचा संबंध पुढें दिल्याप्रमाणें देतो:-षड्ज, मध्यम, धैवत व निषाद या स्वरांपासून हास्य व शृंगार; पंचमापासून बीभत्स, करुण व भयानाक; ऋषभपासून शृंगार; व गांधारापासून हास्य; या प्रमाणें रसोत्पत्ति सांगतो. या दोन ग्रंथकारांमध्यें दिसून येणारा हा मतभेद गायनकलेच्या परिवर्तनशीलत्वाचा परिणाम होय हें कोणीहि कबूल करील. प्रस्तुत स्थितींत गायनांत होणारी रसोत्पत्ति ही एखाद्या विवक्षित स्वरावर अवलंबून नसून रागांत दिसून येणार्‍या स्वरसंगतीचा तो परिणाम आहे असें म्हणणारें कांहीं आहेत. कोमल री व कोमल ध या स्वरसंगतीनें शांतरसाची उत्पत्ति होते, आणि कोमल धैवत व कोमल मध्यम यांची संगति करुणरस निर्माण करते; अशा प्रकारचीं विधानें ऐकूं येतात पण या संगती निरनिराळ्या अनेक रागांत दृष्टीस पडतात; तेव्हां त्या सर्व रागांपासून एकच रस उत्पन्न होतो असें सिद्ध होईपर्यंत, या मुद्दयाचा निर्णय होणें शक्य नाहीं. तसेंच रागांतील मुख्य स्वर जो वादी त्यावरून रसोत्पत्ति ठरवावी असें म्हणणारेहि कांहीं आहेत, पण तेथेंहि अडचण येतें. ज्यांचा मध्यम वादी स्वर आहे असे आज ठळक २८ राग प्रचारांत आहेत, तेव्हां मध्यम स्वरावरून एखादी रसोतपत्ति ठरणिें झाल्यास हे २८ राग एकच रस उत्पन्न करतात असें होईल; परंतु अनुभव निराळा येतो. आज जे राग प्रचलित आहेत त्यांची एकवाक्यता सार्वत्रिक दिसून आल्यानंतर म्हणजे रागांच्या वेळां, त्यांचे वादीसंवादी स्वर व त्यांत दिसून येणार्‍या संगती यांपासून आनुषंगिक गोष्टींच्या विरहित, रसांचे नियम बांधपणें, सोयीचें होईल. परंतु आजच्या स्थितींत तें काम कठिण व जोखमीचें आहे. रागापासून रसोत्पत्ति झालीच पाहिजे यांत कोणाचेंहि द्विमत नाहींच; तेव्हां हें काम योग्य वेळ येईल तेव्हां संतोषदायक असें पार पडेल.

दक्षिणेकडे व उत्तरेकडे प्रचलित असणारे राग व तदंगभूत गोष्टी, यासंबंधीं तुलना:-(१) रागांचें वर्गीकरण उत्तरेकडे जन्यजनक पद्धतीनें, तसेंच 'पुरुषभार्यास्नुषा' अशा धोरणानें केलेलें आढळतें. दक्षिणेकडे फक्त जन्यजनक पद्धतीनेंच हें राग-वर्गीकरण केलेलें आहे.
(२ आरोहावरोह दृष्टीनें होणारे रागांचे नऊ प्रकार उत्तरेप्रमाणें दक्षिणेंतहि मान्य आहेत.
(३) एका सप्तकांतील स्वरसंख्या बारा, ही दोघांसहि मान्य असून त्या धोरणानं थाटोत्पत्ति केलेली आहे.
(४) उत्तरेकडे रागविस्तार, रागाच्या वादी-संवादी स्वरांस महत्त्व देऊन त्या धोरणानें करतात; दक्षिणेकडे रागविस्तार त्या रागास लागणार्‍या वादी-संवादी स्वरास महत्त्व न देतां करण्याचा प्रचार दिसतो.
(५) रागगायनाच्या बाबतींत वेळेचा निर्बंध उत्तरेइतका दक्षिणेकडे कडक नाहीं.
(६) उत्तरेकडे गाण्यांत येणार्‍या चिजांचा नामनिर्देश व वर्णन योग्या स्थळीं दिलेंच आहे. दक्षिणेकडे प्रचलित असणार्‍या चिजांपैकीं कांहींचीं नांवें व वर्णन  देतों.
कीर्तन:-हें उत्तरेकडील ध्रुवपदासारखें आहे. यांत स्थायी व अंतरा असे दोनच भग प्राय: दिसतात. यांची भाषा तामिळ व तेलगू आहे. त्यागराज, श्यामशास्त्री, सुब्बय्या, व्यंकटमखी इत्यादिकांची कीर्तनें सुप्रसिद्ध आहेत. ही कीर्तनें तिकडे प्रचलित असणार्‍या मुख्य रागांत व तालांत आढळतात.
गीत:-हें उत्तरेकडील लक्षणगीतासारखेंच आहे. या गीतांची भाषा तामिळ व तेलगू आहे. ही तिकडील मुख्य रागांत व मुख्य तालांत आढळतात. गोविंद दीक्षित व्यंकटमखी वगैरेंची हीं गीतें प्रसिद्ध आहेत.
वर्ण:-उत्तरेकडील ख्यालासारखी आहे.
पल्लवी:- ही उत्तरेकडील ख्यालासारखी आहे. ह्या पल्लवींत स्वरविस्ताराची बरीच मौज आहे.
जावळी:-उत्तरेकडील ठुमरीसारखें हें गीत क्षुद्र प्रकृतीचें आहे.
(७) दक्षिणेकडील गाणें उत्तरेकडील गाण्यासारखें नसून खडया स्वराचें व तुटक लागतें.
(८) दक्षिणेकडे स्वरांची ओळख चांगली; तथापि तालावर भर विशेष.
(९) उत्तरेकडे स्वतंत्र कण्ठगायनाचें जसें प्राधान्य आहे, तसें दक्षिणेंत नसून, तिकडे गायक स्वत एखादें वाद्य हातांत ठेवून त्यावर गात असतो.
(१०) उत्तरेकडील गायनास 'दरबारी गायन' अशी संज्ञा दिली तर दक्षिणेकडील गायनास 'कीर्तन गायन' अशी संज्ञा देता येण्यासारखी आहे.
(११) दक्षिणेकडील प्रचारांत रागांची संख्या सुमारें १०० आहे. उत्तरेकडील रागांशी तुलनेच्या दृष्टीनें ह्या रागांचे तीन प्रकार होतील; पहिल्या प्रकारांत रागनामें तींच असून स्वर भिन्न पण स्वर तेच असे राग येतील; तिसर्‍या प्रकारांत मात्र नांवानीं व स्वरांनी उत्तरेकडील रागांतून भिन्न असे दक्षिणपद्धतींतील राग येतील.
[आधारग्रंथ:-संगीतरत्‍नाकर; संगीत पारिजात; स्वरमेलकलानिधि; संगीतदर्पण; हृदयप्रकाश; रागतरंगिणी; लक्ष्यसंगीत; अभिनवरागमंजिरी; चतुर्दण्डिप्रकाशिका; रागविबोध; मार्फत उल् नगमात्; नगमाते आसफी; हिंदुस्थानी संगीतपद्धति भाग, १,२,३; सौरिंद्र टागोर-युनिव्हर्सल हिस्टरी ऑफ म्युझिक; क.बिलर्ड-ट्रिटाईज ऑन दि म्यूझिक ऑफ हिंदुस्थान; कृष्णधन बानर्जी-गीतसूत्र (बंगाली मध्यें); फकीर उल्ला-संगीतदर्पण (पार्शियन); महंमद करमइमाममादनुल नगमात (उर्दु)]

ताल
अनंत अशा कालाचे विभागात्मक स्वरूप ज्यायोगें मानवास इंद्रियग्राह्य व बुद्धिग्राह्य होतें त्यास 'ताल' ही संज्ञा देतां येते. हा ताल अखिल ब्रह्मांडामध्यें वावरतांना दृष्टीस पडतो. खगोलांतील ग्रहांचे गतिनियम, पृथ्वीचें नियमबद्ध परिभ्रमण व त्यायोगें ऋतूंच्या आगमानांतील नियमितपणा, तसेंच जडसृष्टींतील समुद्राच्या भरती-ओहोटीसारख्या देखाव्यांत दिसून येणरी सुसंबद्धता, ह्या गोष्टी अनंत अशा कालाच्या विभागात्मक स्वरूपाचा प्रत्यय आणून देतात. जीवनसृष्टीतील क्रियांच्या निरीक्षणांतहि तोच प्रकार दिसतो. क्षुद्रकीटकांचें चलनवलन, पक्ष्यांचा गगनोंदरांत संचार, आणि प्रात:काळी ऐकूं येणार्‍या त्यांच्या सुस्वर लकेर्‍या, श्वापदांच्या हालचाली व मनुष्यांचें बोलणें चालणें, उठणें बसणें, इत्यादि क्रिया, या सर्वांत निसर्गसिद्ध नियमितपणा दिसतो. प्रत्यक्ष सजीव शरीरांत चालू असलेलें रुधिराभिसरण, नाडीचें उडणें यासारख्या क्रियांवरून कालाचें दृश्य स्वरूप भासविणारा जो ताल त्यांचा प्रत्यय येतो. व हें अखिल ब्रह्मांड त्या तालानें व्यापिलें आहे अशी खात्री पटून त्यानें महत्त्व मनांत बाणतें. अशा या अति महत्त्वाच्या गोष्टीची म्हणजे तालाची जोड गायनास लाभल्यानें गानपुरुषाचीं पाउलें बेढब न पडतों, मोजकी व डौलदार पडतात, हें घराणेदार चिजा सताल ऐकतांनां स्पष्ट कळून येईल.

संगीतोपयोगीताल.-गीत, वाद्य व नृत्य ह्यांच्या क्रियेच्या गतीचें नियमित प्रमाण ज्याच्या योगानें दाखाविलें जातें त्यास 'ताल' ही संज्ञा आहे. तालास लागणार्‍या विशेष महत्त्वाच्या गोष्टीस प्राण म्हणतात.
हे प्राण दहा मानिले आहेत. ते असे:-(१) काल, (२) मार्ग, (३)क्रिया, (४) अंग, (५) ग्रह, (६)जाति, (७) कला, (८) लय, (९) यति, प्रस्तार.
(१) काल:-काल हा एक व अनंत आहे. तथापि उपाधिभेदानें त्याचे विभाग संभवतात. क्षण:-कालाच्या अत्यंत लहान प्रणामास क्षण म्हणतात. कमलदलास सुईच्या अग्रानें भोंक पाडण्यास जो काळ लागतो त्यास 'क्षण' अशी संज्ञा आहे.
कालाच्या प्रमाणाचें कोष्टक.
८ क्षण = १ लव २ कला = १ त्रुटि
८ लव = १ काष्टा २ त्रुटि = १ अणु = १/४ मात्रा
८ काष्टा = १ निमेष २ अणु = १/२ मात्रा = १ द्रुत
८ निमेष = १ कला २ द्रुत = १ लघु = १ मात्रा
२ लघु = १ गुरु = २ मात्रा
३ लघु = १ प्लुत = ३ मात्रा
मत्रालक्षण:-(अ) एक र्‍हास्व अक्षर सावकाश उच्चारण्याच्या कालास 'मात्रा' म्हणतात. (आ) प्रौढ सशक्त व निरोगी मनुष्याच्या दोन ठोक्यामधील जो काल ती 'मात्रा' होय.
(२) मार्ग:-एक मात्रेचा तो ध्रुव; दोन मात्रांचा तो चित्र; चार मात्रांचा तो वार्तिक आणि आठ मात्रांचा तो दक्षिण असे चार मार्ग आहेत.
(३) क्रिया:-ताल देण्याच्या क्रियेचे प्रकार दोन: सशब्द व नि:शब्द. त्यास अनुक्रमें टाळी व खाली अशा संज्ञा आहेत. नि:शब्दक्रिया:-ह्या क्रियेस 'कला' म्हणजे प्रचारांत 'खाली' म्हणतात. ह्याचे भेद चार आहेत ते असे:-(अ) आवाप:-उताण्या हाताचीं बोटें मिटणें (मूठ सोडणें); (आ) निष्काम:- पालथ्या बोटें उघडणें (मूठ सोडणे) (इ) विक्षेप:-उताणा हात करून बोटें उघडून उजव्या बाजूस झाडणें; (ई) प्रवेशक:-पालथा हात करून डाव्या बाजूकडून बोटें मिटणें. सशब्द क्रिया:-हीस 'पात' म्हणजे प्रचारांत 'टाळी' म्हणतात. हिचे चार भेद आहेत:-(१) ध्रुव:-चुटकीनें दिलेला ताल. (२) झंपा:-उजव्या हातानें दिलेला ताल. (३) ताल:-डाव्या हातानें दिलेला ताल. (४) सन्निपात:-दोन हातांनीं दिलेला ताल.
(४) अंगें:-अंग म्हणजे तालाचा विभाग. अंगें सात आहेत तीं:-

(५) ग्रह:-तालाचे ग्रह चार आहेत ते असे:-(अ) सम, (आ) अतीत, (इ) अनागत, (ई) विषम; ह्यांस अनुक्रमें (१) ताल, (२) विताल, (३) अनुताल व (४) प्रतिताल अशीं नामांतरें आहेत. (अ) सम:-गाण्यास व ताल देण्यास जेथें एकदम सुरवात होते त्यास 'सम ग्रह' म्हणतात. (आ) अतीत:-गायन सुरू झाल्यानंतर कांहीं वेळानें ताल देण्यास आरंभ झाला म्हणजे 'अतीतग्रह' होतो. (इ) अनागत:-ताल देण्यास सुरवात झाल्यानंतर कांहीं वेळानें गाण्यास आरंभ झाला म्हणजे 'अनागतग्रह' होतो (ई) विषम:-गान व ताल यांचा आरंभ व समाप्ति यांत जेथें मेळ बसत नाहीं तेथें 'विषमग्रह' होतो. (६) जाती:-तालाच्या पांच जाती आहेत. त्या व त्यांच्या मात्रा येणेंप्रमाणें:-(१) चतुरस्त्र, पात्रा४; (२) त्र्यस्त्र, मात्रा, ३;(३) खंड, मात्रा ५; (४) मिश्र, मात्रा ७; (५) संकीर्ण, मात्रा ९.
(७) कला:-तालाच्या कला आठ आहेत. त्यांची नांवें येणेंप्रमाणें:-(१) ध्रुवका; (२) कृष्णा; (३) सर्पिणी; (४) पद्मिनी; (५) विसर्जिता; (६) विक्षिप्ता; (७) पताका; (८) पतिात. या आठ कलांचीं वांटणी वर जे चार प्रकारचे 'मार्ग' सांगितले आहेत त्यांत पुढें दिल्याप्रमाणें करावयाची. ध्रुवमार्गास ध्रुवका कला. चित्रमार्गास ध्रुवका व पतिता या दोन कला. वार्तिकमार्गास ध्रुवका, सर्पिणी, पताका व पतिता या चार कला आणि दक्षिण मार्गास क्रमानें आठहि कला.
(८) लय:-ताल देण्याच्या क्रियेमधील जो विश्रांतीचा काल त्यास 'लय' अशी संज्ञा आहे. लयीचे प्रकार:-(अ) द्रुत, (आ) मध्य, (इ) विलंबित असे तीन आहेत. (अ) द्रुतलय:-तालक्रियेमधील विश्रांतीचा काळ जेव्हां अति अल्प असतो तेव्हां 'द्रुतलय' जाणावी. (आ) मध्यलय:-विश्रांतीचा काळ द्रुतलयीच्या दुप्पट असला म्हणजे मध्यलय होते. (इ) विलंबित लय:-विश्रांतीचा काल मध्यलयीच्या दुप्पट असल्यास 'विलंबित लय' होते. तालाच्या 'मार्गप्राणाशीं' लयीचा संबंध असल्यानें तिचे अनेक प्रकार होतात.
(९) यति:-लयीच्या गतिनियमास 'यति' म्हणतात. त्याचे प्रकार पांच आहेत ते: (अ) समा:-गायनाचा प्रारंभ, मध्य व अंत या तीनहि ठिकाणीं जेव्हां लयीची गति सारखी असते तेव्हां तिला 'समायति' म्हणतात. (आ) स्त्रोतोगता:-प्रारंभी द्रुत, मध्यें मध्य व शेवटीं विलंबित अशा लयीच्या गतीस 'स्त्रोतोगता यति' म्हणतात. (इ) मृदंगा:-प्रारंभीं दु्र, मध्यें मध्य व शेवटीं द्रुत; प्रारंभीं द्रुत, मध्यें विलंबित व शेवटीं द्रुत; प्रारंभी मध्य, मध्यें विलंबित शेवटी मध्यम अशा लयीच्या तीन प्रकारच्या गतीस 'गृदंगा' यति असें नांव देतात. (ई)पिपीलिका:-प्रारंभीं मध्यम, मध्यें द्रुत व विंलंबित; प्रारंभीं विलंबित मध्यें द्रुत व शेवटी विलंबित अशा मुंग्यांच्या रांगेसारखी मध्यें व कडेस जाड असणार्‍या लयीच्या तीन प्रकारच्या गतीस 'पिपीलिका' यति म्हणतात. (उ) गोपुच्छा:-प्रारंभीं विलंबित, मध्यें मध्य व शेवटी दु्रत अशा लयीच्या गतीस 'गोपुच्छा' यति म्हण्तात.
(१०) प्रस्तार:-तालाच्या मात्रा घेऊन गणितपाशाच्या साहाय्यानें अनेकविध रचना करणें, यास ताल प्रस्तार म्हणतात. प्राचीन ग्रंथांत तालाचे 'मार्गताल' व 'देशीताल' असे दोन प्रकार मानिले आहेत.
मार्गताल:-हे ताल पांच प्रकारचे आहेत:-(१)चंचत्पुट,(२)चाचपुट, (३) षट्पितापुत्रक (४) उद्धट व (५) संपक्केष्टाक. हे ताल प्रचारांतून गेल्यास बरींच शतकें झाली आहेत. तथापि उपलब्ध संस्कृत ग्रंथकार यांचें वर्णन देऊन नंतर देशी तालांचें विवरण करितात.
देशी ताल:-प्राचीन संस्कृत ग्रंथकार आपापल्या वेळच्या 'देशी' तालांबद्दल लिहितात; कोणी १२० ताल वर्णिले आहेत, तर कोणी १२४ देतात व कांहींनीं तर ३६० देशी ताल दिले आहेत. परंतु हे ताल प्रस्तुत गायनास लागू पडत नसल्यानें त्यांचें वर्णन येथें दिलें नाहीं. ऐतिहासिक कौतुकानें ती माहिती पाहिजे असल्यास ती संस्कृत ग्रंथांतून मिळण्यासारखी आहे. प्रचलित हिंदुस्थानी संगीतास उपयोगी पडणार्‍या तालांची माहितीच येथें दिली आहे.
पारिभाषिक शब्द, मात्रा:-एक र्‍हास्व अक्षर सावकाश उच्चारण्यास जो काल लागतो त्यास मात्रा म्हणतात. ताल:-टाळी वाजविण्याच्या क्रियेस ताल म्हणतात. काल:-टाळीनंतर हात दूर करण्याच्या क्रियेस 'काल' किंवा 'खाली' म्हणतात. सम:-तालाची पहिली टाळभ्; हिजमुळें गीताचें महत्त्वाचें स्थळ दाखविलें जातें. आवर्तन:-विवक्षित तालाच्या संपूर्ण मात्रासमूहास आवर्तन म्हणतात. विभाग (अंक) :-मात्रानियमानुसार तालाचे पाडिलेले भाग. लय:-दोन मात्रांमधील ठेवलेल्या अवकाशास 'लय' म्हणतात. लयीचे प्रकार तीन आहेत; (१) अत्यल्प विश्रांतीच्या कालास 'द्रुतलय' म्हणतात. (२) 'द्रुत' लयीच्या वेळीं असणार्‍या विश्रांतीचा काल दुप्पट केला म्हणजे ती 'मध्यलय' होते व (३) 'मध्यलयी'च्या वेळीं असणार्‍या विश्रांतीच्या कालाची दुप्पट होऊं दिली म्हणजे 'विलंबित' लय होते. ठेका:- विवक्षित तालाच्या एका आर्वतनाचे बोल म्हणजे त्या तालाचा ठेका' होय. परण अथवा तुकडा:-गीताबरोबर लाविलेल्या तालाच्या ठेक्याच्या बोलाहून जे निराळे बोल समेपासून त्याच लयींत लावितात त्यांस परण किंवा तुकडा म्हणतात. मुखडा किंवा मोहरा:-कोणत्याहि तालाच्या समेवर डौलानें येऊन मिळण्याकरितां दुप्पट अगर चौपट लयींत बांधलेल्या बोलांस मुखडा अगर मोहरा म्हणतात. आड:-मध्यलयींत सुरू केलेल्या तालाच्या दोन आवर्तनांया बोलांस जो वेळ लागतो तितक्याच वेळांत त्या बोलांची तीन आवर्तनें झालीं म्हणजे त्या तालाची आड झाली असें म्हणतात. लय दीड पटीनें वाढल्यानें 'आड' होते. कुआड:-आडीची आड केली म्हणजे मूळ असलेल्या तालाची कुआड होते. ठाय:-मध्य लयींत सुरू केलेल्या तालाच्या एका आवर्तनास जो वेळ लागतो त्यास 'ठाय' म्ळणतात. दुगण:-मध्यलयींत सुरू केलेल्या तालाच्या एका आवर्तनास लागणार्‍या वेळाच्या निम्या वेळांत त्या तालाचें एक आवर्तन झालें म्हणजे त्या लयीची दुगण झाली. चौगण:-मध्य लयींत सुरू केलेल्या तालाच्या एका आवर्तनास लागणार्‍या काळांत त्या आवर्तनाची चार आवर्तनें झाली म्हणजे त्या लयीची चौपट झाली असें समजतात.
योजिलेले चिन्हसंकेत.-X हें चिन्ह तालाची 'सम' दाखवितें. सम हा पहिला ठोका मानून पुढें येणारे तालांतील ठोके या धोरणानें समजावेत. ० हें चिन्ह तालांतील 'काल' (खालीं) दाखवितें. S हें चिन्ह एकमात्रेचा अवकाश सुचवितें. तालाच्या जीवभूत गोष्टी म्हणजे मात्रा, आळी व काल या होत. विवक्षित तालाच्या आवर्तनांत असणार्‍या मात्रा, टाळी व काल यांच्य अनुरोधानें अनेक प्रकारची तालरचना तयार होते त्याची मोडणी:-
(१) टाळी व काल या विभागांत येणारी मात्रासंख्या कायम ठेवून हे विभाग सम व विषम ठेवणें. येथें हें ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, टाळीचे विभाग एकापुढें एक येऊं शकतात, पण कालाचे विभाग तसे येत नाहींत; म्हणजे कालविभागानंतर टाळीचा विभाग यावा लागतो. तसेंच टाळीचा विभाग आवर्तनांतून केव्हांहि नाहीसा होत नाहीं पण कालाचा विभाग अजीबात नाहीसा होऊं शकतो.
(२) आवर्तनांत टाळी व काल या विभागांत येणार्‍या मात्रांच्या संख्येची वाढ करणें. ही वाढ 'समान' व 'असमान, अशा दोन प्रकारांनीं करतां येते.
(३) मात्रांची संख्या तीच, टाळीविभागाची संख्या तीच आणि कालविभागाची संख्या तीच असून ही मुळें केवळ त्याच लयीच्या धोरणानें त्याच तालाचें वजन भिन्न भासवितां येतें; यालाच 'तालाचं वनज भिन्न करणें' असें म्हणतात. येणेंप्रमाणें भिन्न भिन्न प्रकारची तालरचना झाल्यानें गीताचा विस्तार करण्यास मदत होते व गीताची मनोरंजकता वाढते.
वर दिलेल्या नियमानुसार तयार होणार्‍या प्रचारांतील तालांची स्वरूपें खालीं दिलीं आहेत.

 प्रचलिंत तालांच्या मात्रा, नियम, अंगें व बोल

येणे प्रमाणें प्रचारांत असलेल्या तीस तालांची माहिती झाली.

तालाच्या ठेक्याच्या बोलांची अक्षरें:-वर दिलेल्या तालांतील ठेक्यांचे बोल ध, ग, द, त, र, क, ड न, घ, ट, म, थ ह्या बारा अक्षरांनीं व ह्या अक्षरांच्या बाराखडयांनीं तयार झाले आहेत. ह्यांपैकीं ट, र, ड, त, द, थ, न आणि म हीं अक्षरें उजव्या हातानें तबल्यावर काढावयाची असतात व क, ग, ध, हीं तीन अक्षरें डाव्या हातानें बायावर काढावयाचीं असतात. तसेंच ध हें अक्षर उजव्या व डाव्या हातानें तबल्यावर व बायावर एकदम काढावयाचें असतें. पखवाज, तबला व बाया ह्यांचें वर्णन 'वाद्य' शब्दाखालीं पहावें.
तालाचा हेतु:-तालाचा मुख्य हेतु गीताला कालमर्यादा घालणें हा होय. कोणत्या गीतास कोणता ताल लावावा हें गीताचा विषय, प्रसंग, गीताच्या अक्षरांचें लघुगुरुत्व तसेंच त्याची रचना ह्यांवर अवलंबून असतें. त्याचप्रमाणें विजेच्या बांधणीवरून तिला योग्या त्या लयीची योजना केली म्हणजे चीज डौलदार बनून तिचा श्रोत्यांच्या मनावर इष्ट तो परिणाम घडतो. स्वर आणि ताल हीं गायनाचीं समान अंगें आहेत. तीं परस्परावलंबी असून एकमेकांस पोषक होतात.
कवन हे वाक्यात्मक असल्यामुळें त्यातील विधेयपदावर सम ठेवणें उचित होय; उद्देश्यपद तालातींल इकर विभागांत असूं द्यावे. केव्हां केव्हां चिजेची अक्षरें जास्त असून तालाच्या मात्रा कमी; व केव्हां केव्हां अक्षरें थोडी व मात्रा जास्त; ह्यामुळें कोठें कोठें अक्षरांची खेचाखेच तर कोठें कोठें अक्षरांच्या मागें पुढें अवग्रहांची गर्दी असा प्रसंग येतो; हें न होंऊ देणें इष्ट आहे; म्हणजे गायनवादानाचा मुख्य हेतु जो आनंदोप्तत्ति तो सफल होतो ल त्यायोगें ऐकणारांच्या मनास शांतता व सानंद एकतानता लागते. हेंच गायनाचें उद्दिष्टकार्य आहे व ते तालाच्या साहाय्यानें सफल होते.

कवन हें वाकयात्मक असल्यामुळें त्यांतील विधेयपदावर सम ठेवणें उचित होय; उद्देश्यापद तालांतील इतर विभागांत असूं द्यावें. केव्हां केव्हां चिजेचीं अक्षरें जास्त असून तालाया मात्रा कमी; व केव्हां अक्षरें थोडीं व मात्रा जास्त; ह्यामुळें कोठें कोठें अक्षरांची खेचाखेच तर कोठें कोठें अक्षरांच्या मागें पुढें अवग्रहांची गर्दी असा प्रसंग येतो; हें न होऊं देणें इष्ट आहे; म्हणजे गायनवादनाचा मुख्य हेतु जो आनंदोप्तत्तिा तो सफल होतो व त्यायोगें ऐकणारांच्या मनास शांतता व सानंद एकतानता लागते. हेंच गायनाचें उद्दिष्टकार्य आहे व तें तालाच्या साहाय्यानें सफल होतें.
सात ताल त्यांच्या जाती, व मात्रा
दाखविणारें कोष्टक.

दक्षिणेकडील तालपद्धति:-दक्षिणेकडील तालपद्धति उत्तरेकडील तालपद्धतीहून बरीच निराळी आहे. त्या पद्धतींत मुख्य ताल सात असून प्रत्येक तालाच्या पांच पांच जाती आहेत. त्यांची नांवें व मात्रा:-चतस्त्र, मात्रा ४; तिस्त्र, मात्रा ३; मिश्र, मात्रा ७; खंड, मात्रा ५; संकीर्ण, मात्रा ९. ह्या पद्धतींतील सात तालांची नांवें:-(१) ध्रुव, (२)मठ, (३) रूपक, (४) झंप, (५) त्रिपुट, (६) अठ, व (७) एकताल.

[आधारग्रंथ:- अष्टोत्तारशत-ताललक्षण; अभिनव तालमंजरी, संगीतदर्पण, संगीतरत्‍नाकर.] [लेखक पंडित द.के.जोशी.]

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .