विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राजनपूर, तहशील.-पंजाब, डेरागाझीखान जिल्ह्यांतील तहशील. क्षेत्रफळ २०१९ चौरस मैल. तहशिलीच्या पूर्वेस व इ्रशान्येस सिंधु नदी व पश्चिमेस स्वतंत्रप्रांत आहेत. येथें सुलेमान टेंकडया उत्तरेकडून दक्षिणेस उतरत गेल्या आहेत. तहशिलींत राजनपूर व मीथनकोट ही दोन शहरें आणि १७९ खेडी आहेत.
शहर.-तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें बन्नूपासून जाकोबाबादकडे जाणार्या रस्त्यावर सिंधु नदीच्या पश्चिम तीरापासून सरासरी नऊ मैलावंर वसलेलें आहे. मखदुम शेख राजन यानें हें शहर वसविलें (१७३२-३३). सन १८६२ र्प्यंत राजनपूर हें महत्त्वाचें ठिकाण नव्हतें परंतु मीथनकोट सिंधु नदीनें वाहून गेलें त्यावेळेपासून असिस्टन्ट कमिशनरचें मुख्य ठाणें ह्या ठिकाणीं बदललें. धान्य व कापूस यांचा सक्कर शहराशीं व अफू आणि नीळ यांचा अमृतसर व मुलतान शहरांशी व्यापार चालतो. येथें १८७३ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली.