विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राजनांदगांव - मध्यप्रांत. नांदगांव संस्थानच्या राजधानीचें शहर. हें बंगाल-नागपूर रेल्वेचें एक स्टेशन असून येथें मोठमोठया इमारती आहेत. न्यायकचेरी, इस्पितळ, डाकबंगला, व पांव एकर जमीन व्यापणारा राजवाडा व उच्च शाळा आणि चार प्राथमिक शाळा, तसेंच बंगाल-नागपूर-स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल्स व जिनिंग फॅक्टरी असून येथें व्यापाराची मोठी पेठ आहे. येथें राणीबाग व बलदेवबाग असे दोन उत्तम बगीचें आहेत. २॥ मैल अंतरावरील शिवनाथ नदीच्या पाण्याचा पुरवठा गांवांत केला आहे.